पुष्टावलेला तो उंच ऊस
मला म्हणतो आता नको खाऊस
ओली चिंब झाली झाडे
कपडे ही ओले चिंब झाले
तुझं ते हळुवार खेचणं
माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
आणि हळुच चीर काढणं
आणि माझा रस थेंब थेंब पडणं
नेहमीच हात चिकट चिकट होणं
प्रत्येक उसाला टक लावून बघतोस
आणि एकाला ऊचकतोस
तुझं उचकणं आणि आमचं पडणं
झालय आता संवयीचं शेताला
कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
29 Jul 2009 - 9:57 am | विसोबा खेचर
विडंबन अंमळ डेजरच केलं आहेस रे म्हातार्या! :)
तुझा,
तात्या.
29 Jul 2009 - 10:31 pm | लिखाळ
हा हा हा ..
सामंतकाकांनी केलेले विडंबन आणि तात्यांचा प्रतिसाद एकदम दमदार :)
-- लिखाळ.
29 Jul 2009 - 9:59 am | विनायक प्रभू
अंमळ नाय लय डेंजर.
हॅहॅहॅहॅ
29 Jul 2009 - 10:22 am | विजुभाऊ
लैच डेन्जर.
आता उसासे टाकतोय म्हणायला पण धीर होत नाही
30 Jul 2009 - 12:37 pm | ब्रिटिश टिंग्या
डोंगर म्हातारा झाला! ;)
@सामंतआजोबा,
________/\_________
नतमस्तक की काय म्हणतात ना, तेच हे!
29 Jul 2009 - 10:06 am | विशाल कुलकर्णी
च्यायला, पेटला रे ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
29 Jul 2009 - 10:49 am | टारझन
१. अरे बा प रे !!
२. सामंतकाका तुमच्याकडून ही असली अपेक्षा नव्हती !!
३. काय आहे हे तात्या ? आम्ही आमच्या मुलांसह वाचायला येतो इथे, आणि हे काय ?
४. फारंच निंदणिय
५. का हो सामंतकाका ? तुम्ही तुमच्या मुलांना (तुमच्यासाठी नातु/नाती) द्याल का हे असले वाचायला ? देणार असलात तर प्रश्नच संपला तुम्हाला __/\__
- ह्या झाल्या सोवळ्या मिपाकरांच्या प्रतिक्रिया !!
आणि "वा !! छाण !! झकास ... एकदम झकास !! " ही आमची प्रतिक्रिया !!
आणि हो , ऑळन ओळ काळीज सोडूनही अन्यत्र भिडली :)
विषेशकरून " पुष्टावलेला तो उंच ऊस " हे वाक्य काळजाला भिडले , उंच ही विषेशन का योजले हे विषेष !!
आणि हो , कोणीतरी चेक करा रे .. विडंबण खुद्द सामंतकाकांनी लिहीलंय की कोणी फेक लॉगिन करून लिहीलंय .. नाही .. प्रतिभेवर तशी शंका नाही ,,, पण एक ऑर्थोडॉक्स रेल्वे ट्रॅक सोडून डायरेक्ट डर्ट रोडवर आले म्हणून शंका आली
अजुनही असेच लेख येउन द्या सामंत साहेब !! चियर्स !!
- टारझन उसगावकर
स्वगत : शेवटी प्रतिसादांचा फॉर्मुला सापडला
कृ कृ कृ कृ ह घेणे
29 Jul 2009 - 2:42 pm | विनायक प्रभू
पुष्टावलेला ऊंच उस मंजे काय रे टार्या. पोरी बाळींनी वाचण्यासारखे काही नसेल तर व्य. नी त सांग.
अवांतरः 'रंगा खुश 'शेठ कुठे आहेत?
29 Jul 2009 - 2:57 pm | सागर
=))
आपलं मत टारु च्या बाजूने
काय भन्नाट कविता खरडली आहे ...
दादा कोंडके स्वर्गातून अवतरले तर ते म्हणाले असते म्हणाले असते सामंतबुवा आधी का नाही भेटलात ;)
- सागर
29 Jul 2009 - 11:30 pm | धनंजय
बापरे. चिकट हात आणि पुष्ट ऊस. !!!
29 Jul 2009 - 10:07 am | वेताळ
=))
वेताळ
29 Jul 2009 - 10:16 am | बेसनलाडू
साष्टांग दंडवत सामंत आजोबा!!!!!
(मळेवाला)बेसनलाडू
29 Jul 2009 - 10:28 am | पाषाणभेद
आग बाबौ !
काका SSSSS , मला वाचवा SSSSS
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
29 Jul 2009 - 11:37 am | राधा१
सामंत आजोबा,
बाप रे....हे अस पण होवु शकत...नेहमी लाइफ वर भाष्य करणारे तुम्ही...हे एकदम डायजस्ट नाही झाल.
29 Jul 2009 - 11:59 am | JAGOMOHANPYARE
विडम्बनाचा 'फड' ..?
फड सम्भाळ तुर्याला ग आला..
29 Jul 2009 - 8:05 pm | ऋषिकेश
लय बुंगाट!!!
=))
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ८ वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
29 Jul 2009 - 10:50 pm | प्राजु
लय भारी!!!
=)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Jul 2009 - 11:34 pm | अनामिक
सह्ही आहे विडंबन!
-अनामिक
30 Jul 2009 - 12:52 am | योगी९००
अ गा गा गा...
खादाडमाऊ
30 Jul 2009 - 4:20 am | प्रअका१२३
वा काका.
तिकडे बेसनलाडूने मस्तच लिहिलंय.
मी मात्र एकच अर्थ (जास्तीत जास्त) वालं निरर्थक छापतोय........
उष्टावलेला तो माझा हात
अजूनही किती उरलाय भात
लाडू बघतोय मिस्किल हसून
म्हणतोय आहेच कसा तू बसून
पुरणपोळ्या, विलायची घातलेल्या
चार दोन थेंब तुपात न्हालेल्या
आहेत पोटात बसल्या घुसून
झोपवतीलच मला, तरी आहे बसून
टम्म फुगून दाखवी वाकुल्या
पोट म्हणे का खाल्ल्या चकल्या
ऐक नाहीतर उद्यापर्यंत पोट बसेन रुसून
कप्पाळाला हात लाऊन निस्ता राहशील बसून
आलीच ती आता पाणी घेऊन
जमेल तेवढे घे आता पाहून
समाधान का नव्हते इतके खाऊन
कळलंय आता हात घ्या धुवून
30 Jul 2009 - 8:41 am | काळा डॉन
माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
आणि हळुच चीर काढणं
आणि माझा रस थेंब थेंब पडणं
नेहमीच हात चिकट चिकट होणं
_/\_
30 Jul 2009 - 5:11 pm | ज्ञानेश...
हा जो काही कविता/विडंबनसदृष्य प्रकार आहे, यात खरंच इतकं आवडण्यासारखं काय आहे?? :/ :O :(
मुळात लोकांना जो अर्थ काढून इतक्या गुदगुल्या होताहेत, लेखकाने हे त्याच अर्थाने लिहिले आहे का? (लेखकाचा पुर्वेतिहास पाहता तसे वाटत नाही.) पण मग सामंतकाकांनीच येऊन खुलासा का केला नाही? की त्यांना हेच अपेक्षित होते?
असे काही प्रश्न पडले आहेत.
"Great Power Comes With Great Responsibilities"
30 Jul 2009 - 10:35 pm | श्रीकृष्ण सामंत
ज्ञानेश,
"माझे पुण्य फळा आले
आज मी रघूनंदन पाहिले"
ही गाण्याची ओळ मला आपली प्रतिक्रिया वाचून आठवली .
"मुळात लोकांना जो अर्थ काढून इतक्या गुदगुल्या होताहेत, लेखकाने हे त्याच अर्थाने लिहिले आहे का? (लेखकाचा पुर्वेतिहास पाहता तसे वाटत नाही.)"
आपल्या प्रतिक्रियेतला हा भाग वाचून मला वरील गाण्याच्या ओळी आठवल्या.माझ्या मायबाप वाचकापैकी एक तरी वाचक अशा तर्हेची प्रतिक्रिया देऊन मला माझा प्रतिसाद/खुलासा द्यायला उद्युक्त करील अशी मी अपेक्षा करीत होतो.
खरं म्हणजे मी केलेलं विडंबन आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांना माझा प्रतिसाद देण्याचा लेख यापूर्वीच मी लिहून ठेवला होता आणि आहे.
"तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात नाही."
अश्या मथळ्या खाली मी स्वतंत्र लेख लिहिला आहे तो आज उद्या मिपावर आपल्याला वाचायला मिळेल.तो जरूर वाचावा.
त्यामुळे,
"पण मग सामंतकाकांनीच येऊन खुलासा का केला नाही? की त्यांना हेच अपेक्षित होते?
असे काही प्रश्न पडले आहेत."
ह्या आपल्या कुतूहल मिश्रीत प्रश्नाला माझा लेख वाचून आपोआप खुलासा होईल अशी मी अपेक्षा करतो.
ज्ञानेश,आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
31 Jul 2009 - 12:26 am | बेसनलाडू
मुळात लोकांना जो अर्थ काढून इतक्या गुदगुल्या होताहेत, लेखकाने हे त्याच अर्थाने लिहिले आहे का? (लेखकाचा पुर्वेतिहास पाहता तसे वाटत नाही.) पण मग सामंतकाकांनीच येऊन खुलासा का केला नाही? की त्यांना हेच अपेक्षित होते?
असे काही प्रश्न पडले आहेत.
बरं ते ठीक; पण या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा आहे का आणि असल्यास का, असा प्रश्न पडला आहे (उत्तराची अर्थात अपेक्षा नाही; पण दिलेत तर पुढे अधिक चर्विचरण करायला कुरण मोकळे सापडेल, हे खरे)
(चराऊ)बेसनलाडू
31 Jul 2009 - 11:38 am | ज्ञानेश...
@बेसनलाडू- उत्तरे मिळाली तरी चालतील, नाही मिळाली तरी हरकत नाही अशा पद्धतीची शंका होती.
सामंतकाकांच्या प्रतिसादामुळे काही गोष्टी क्लिअर झाल्या, हेही नसे थोडके.
@सामंतकाका- "आज मी रघूनंदन पाहिले" हे वाचून मज्जा आली. फारच भाव दिलात तुम्ही मला. :>
धन्यवाद.
(शंकेखोर)
ज्ञानेश.
"Great Power Comes With Great Responssibilities"