तूर डाळीचा हा सोपा, साधा आणि स्वादिष्ट प्रकार कोंकण किनारपटीवर, विशेषतः गोवा-कारवारकडे वरचेवर केला जातो. ही पातळच केली जात असल्यामुळे तूर डाळ कमी असली तरी चालते!
साहित्य -
तूर डाळ
तूप
मोहरी
हिंग
सुक्या मिरच्या
मीठ
कढीपत्ता (वैकल्पिक)
कृती -
१) तूर डाळ शिजवून घ्यावी. पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवावे (तोय म्हणजे पाणी!)
२) तुपावर हिंग, मोहरी आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करून डाळीला द्यावी.
३) चवीप्रमाणे मीठ घालावे.
टीपा -
१) फोडणी ही तुपावरच करावी. तेलावर केल्यास "तो" स्वाद येणार नाही.
२) वर उल्लेखलेल्या फोडणीच्या साहित्याखेरीज अन्य साहित्य घालण्याची फारशी आवश्यकता नाही.
३) गरम गरम भाताबरोबर हा प्रकार उत्तम लागतो.
सुचना - पर्नल नेने मराठे यांचा तूर डाळीच्या भाववाढीवरील धागा वाचून उत्स्फुर्तपणे ही पाकृ लिहिलेली असल्यामुळे सध्या फोटो नाही. घरी केल्यास लवकरच चढवीन.
प्रतिक्रिया
28 Jul 2009 - 12:43 pm | चिरोटा
मस्तच.
ह्या डाळी तोय बरोबर नीर फणसाच्या कचर्या(हाही तिकडचाच प्रकार)/बटाट्याच्या कचर्या/तळलेले मासे(पापलेट/रेणव्या/मांदियाळी ) मस्त लागतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
28 Jul 2009 - 12:43 pm | यशोधरा
>>कढीपत्ता (वैकल्पिक) >>> वैकल्पिक नको, हवाच! :)
मस्त, साधी. सोपी आणि चविष्ट पाकृ!
28 Jul 2009 - 1:57 pm | नंदन
सहमत आहे. डाळितोय - मुगांबट - लोणचं हे अस्सल कारवारी कम्फर्ट फूड!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Jul 2009 - 2:26 pm | यशोधरा
>>हे अस्सल कारवारी कम्फर्ट फूड!
अगदी! :)
3 Aug 2009 - 6:52 am | सुनील
कारवारी कम्फर्ट
कारवार हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, तेव्हा ह्याला महाराष्ट्राचे "सदर्न कम्फर्ट" म्हणावे काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Jul 2009 - 1:52 pm | ललिता
डाळ शिजत लावताना हिरवी मिरची व थोडे आले किसून घालतात. मग कढिपत्ता (must) मोहरी हिंगाची तुपाची खमंग फोडणी व बरोबर कच्ची केळी, बटाटे, रताळी, निरफणस किंवा माडीच्या (मोठी अरवी) कचर्या.. आणि गरम गरम भात! :)
28 Jul 2009 - 2:14 pm | ऋषिकेश
नाय परवडत भौ
तूरडाळ = ६० ते ८५रू प्रतिकिलो
(महागाईग्रस्त) ऋषिकेश
28 Jul 2009 - 2:20 pm | विनायक प्रभू
सौ. हे डाळीतोय लय भारी करते.
28 Jul 2009 - 2:24 pm | कपिल काळे
इंटरेस्टींग!!
करुन बघू!!
28 Jul 2009 - 2:39 pm | नियती
महागाई मधे देखील असे सून्दर प्रकार सुचविल्याबद्द्ल शतशः धन्यवाद्!!!!
28 Jul 2009 - 6:46 pm | स्वाती दिनेश
पाकृ मस्तच दिसते आहे, लवकरच करणार.
स्वाती
28 Jul 2009 - 9:11 pm | सूहास (not verified)
मस्त..
डाळ आमची लै फेव्हरेट..
डाल-रोटी खाओ,प्रभुसर के गुण गाओ..
सुहास
29 Jul 2009 - 12:20 am | लवंगी
आमचा कोकण्या नवरा हि डाळ म्हटली कि खुष.. आज करावी म्हणते.
29 Jul 2009 - 12:23 am | बेसनलाडू
'आमटी' या प्रकारातील माझी सर्वाधिक लाडकी पाककृती!
(सारस्वत)बेसनलाडू
तूरडाळ महाग झाली असताना परवडणार आहे का पण तोयीची चैन? ;)
(चैनी)बेसनलाडू
29 Jul 2009 - 7:36 am | शोनू
डाळ कुकरला शिजवून घ्यावी. नंतर डाळ व पाणी मिसळून एका पातेल्यात उकळत लावावे-उकळताना थोडे खोबरे, एक-दोन हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून त्यात टाकाव्या. कधी कधी आल्याचा इंचभर तुकडा जरासा ठेचून टाकावा. फोडणीत खडा हिंग घातल्यास वेगळाच स्वात येतो. निखार्यावर भाजलेल्या लाल पापडावर थोडे खोबरेल तेल घालून डाळी-तोय भाताबरोबर हाणावेत!
जीएसबी पासपोर्ट व्हॅलिडेट करण्याचा हमखास उपाय!
29 Jul 2009 - 9:17 am | विसोबा खेचर
लै भारी रे! :)
तात्या.
2 Aug 2009 - 3:12 pm | पांथस्थ
हा घ्या फोटो...डाळींतोय गरमागरम भात आणी कच्च्या केळ्याचे काप, अरबीचे काप आणी इथे बेंगळुर मधे मिळणारी एक पालेभा़जी (नाव आठवत नाहि... चव आंबटसर...)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
2 Aug 2009 - 3:28 pm | प्रदीप
तोंडाला पाणी सुटले आहे.
कचर्या (गोव्यात त्याला कापे म्हणतात) बटाट्याच्या (उत्तमच), नीरफणसाच्या, तसेच अरवीच्याही करतात.
3 Aug 2009 - 1:20 am | हरकाम्या
ह्या प्राण्याला कुणीतरी आवरा रे, ह्या महागाइच्या काळात ही चंगळ
परवडणारी नाही गड्या.