(शोध रेडीओचा, बोध 'जीवना'चा!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
23 Jul 2009 - 9:53 pm

नमस्कार मिपाकर,
(चाणाक्ष वाचकांना या विडंबनामागची प्रेरणा कळली असेलच.)

आपल्याला एखादं गाणं का आवडतं?

तीन साधारण उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते, ३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ हे सगळंच आपलं डोकं हलवून जातं.

गाण्यांमधे बोली भाषेचा उपयोग मला नेहेमीच आवडत आला आहे. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या उपमा, तोच तोच राग आणि त्याच त्याच सुरावटी वापरलेली गाणी रेडीओवर लागतच असतात आणि अचानक मधेच एकदम त्यासगळ्याच्या विपरीत एखादं गाणं लागतं. अचानक वाजवताना तंबोर्‍याची तार तुटावी तसं! क्षणभर वाटतं, "हे काय चाल्लंय?", तरीही गाणं पुढे सुरूच रहातं आणि एकदम टकाटक, २ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम जसा पळू लागतो तसं आपले विचारही पळत जातात... अगदी सुरांची आवर्तनं चालावीत तसेच!

शंकर-एहसान-लॉयचं निकल भी जा हे गाणं आपल्यापैकी फार लोकांनी ऐकलेलं नसेलच. आवर्जून ऐका. या गाण्यातून, त्याच्या चालीतून, त्याच्या मांडणीतून जावेद अख्तरसाहेबांनी शब्दांच्या माध्यमातून (प्रकटनाच्या शेवटी गाण्याचे बोल दिले आहेत) दिलेला व्यावहारीक जगण्याविषयीचा एक संदेश श्रोत्याच्या मनःपटलापुढे वेगवेगळ्या प्रसंगांना तंतोतंत उभा राहतो. गाण्यातील भावना थेट काळजापर्यंत पोचवणारी चाल, त्याला सुसंगत वाद्यमेळ आणि त्यात करण्यात आलेले प्रयोग या तिन्हींबाबत "क्या केहेने" हीच प्रतिक्रिया उमटू शकते. हे निकल जाणं पतली गलीतून आहे. अगदी चप्पल घालून तयार रहा असंच त्यातून सुचवलं जातं. अर्थातच, चालही त्याच मार्गानंच जाते. "निकल" मधली भावना आणि 'गली'तला ग किती शुद्ध आहे पहा. माझ्यामते या दोन शब्दांमुळे जावेदसाहेबांच्या गाण्यांची दिशाच पूर्ण बदलून जाते. 'निकल'मध्ये 'क'चा उच्चार करताना गायकानं क्षणभरासाठीच केलेला एक खेळ त्या निकलला हुकुमाचाच सूर लावून देतो. या निकल जाण्याचं नातं आधी म्हटल्याप्रमाणे पतली गलीतून आहे. त्यातही 'ग' किंचित आधीच थांबवत लीचा उच्चार दीर्घ करताना शंकरनं त्याच्या गळ्याची तयारी दाखवून दिली आहे. 'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही. पुढे यात असलेले सायकेडेलिक आणि इलेक्ट्रीक बीट्स एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

दोन अंतर्‍यांमध्ये एक प्रयोग करण्यात आला आहे. या मधल्या टप्प्यात एका वेगळ्याच आवाजात धृवपद म्हटलं जातं. त्यासाठी जाणीवपूर्वक त्या मुलाचा आवाज किरटाच लागेल याची काळजी घेत गाण्याच्या संदेशाशी प्रामाणीकपणा राखण्याचा प्रयत्न संगीत संयोजकांनी केल्याचे दिसते. या मुलाने 'निकल भी जा'ला एक वेगळेच परिमाण गाठून दिले आहे. मधेच 'फटाफट' या कोरस आवाजाचा जो काही ध्यास घेतला आहे की आपल्यालाही तो आवाज अतिशय दैवी, डिव्हाईन वाटतो. (म्हणजे असं की आपल्याला कोणालाही तो काढता येणार नाही म्हणून दैवी.) स्वतः शंकर-एहसान-लॉयना देखील तो आवडला असावा कारण या संपूर्ण गाण्यात हा आवाज आपल्याला दोन ओळींसाठी ऐकता येतो.
या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची. मुख्य म्हणजे मुखड्यातच ते स्पष्ट होतं. पुढे मात्र "अरे बच्चमजा"वर सरकताना आधुनिक संगीत मुद्रण, ठेका आणि कोरसचा उपयोग एकदम लाजवाबच! दो और दो को बाईस बना, बेच अंगूर के भाव चना या दोन ओळी व्यक्तीशः जावेदसाहेबांच्या काव्यलेखनातला एक मानदंडच, पण त्याबरोबर शंकरने ज्या प्रकारे सूर-लयीचा खेळ केला आहे, अक्षय खन्नाने बोटांचा खेळ दाखवला आहे, चित्रपटाचं अर्ध नाव व्हीडीओत येतं तो अनुभव अंगावर काटे आणतो. अतिशयच उच्च. 'खुल के मुस्कराले', 'मितवा', 'मां' अशा गाण्यांबरोबरच 'कजरा रे', 'हे बेबी', आणि आताचं 'पतली गली' अशी काही कंटेंपररी गाणी ही शंकर-एहसान-लॉय यांची खासियतच. तुम्हा-आम्हाला अगदी आपले वाटणारे, "अरे", "अबे" असे शब्द सहज (सदस्य क्र. ८ नव्हे) गाण्यात वापरणे ही तर शंकरच्या सर्वसामान्य तरीही लवचिक आवाजाची जादू; आणि अशा लयीच्या गाण्यावर अतिशय उच्च नाच हे फक्त अर्शद-अक्षयच करू जाणे!

आपल्याला आवडलेलं आहे का नाही हे सुद्धा समजत नाही अशा एखाद्या गाण्यातील एखाद्या ओळीचा, एखाद्या बीट्सचा अभ्यास करताना, त्यात असलेल्या(!) गूढ अर्थाचा शोध घेताना, मागोवा घेताना खरंच खूप आनंद होतो हेच खरं!

'जीवना'चा बोध! कधीच अनमोल न वाटणारा तरीही ठेवा. मम विडंबनाची ठेव...!

गाण्याचे बोल:
निकल भी जा निकल भी जा पतली गली से निकल भी जा
सही है क्या गलत है क्या सोच के अपना दिल ना जला
अरे बच्चम जा ले ले शॉर्टकट अरे यही अच्छा ले ले शॉर्टकट
अरे सुन बच्चा चल दे तू फटाफट
अरे कर नही गम, ले ले शॉर्टकट, ओये टाईम है कम, ले ले शॉर्टकट
है तुझ को कसम चल दे तू फटाफट॥

दो और दो को बाईस बना बेच अंगूर के भाव चना
फायदा तेरा जो कर सके, उस को लगा मस्का उस को मना
अरे बन चमचा, ले ले शॉर्टकट, अरे यही अच्छा ले ले शॉर्टकट ... ॥

सिधा चलेगा तो गिर जायेगा टेढा चल राह जो टेढी मिले
सब से उपर जाना तो उपर जाना है तो
चढ जहा भी सिढी मिले
कभी ऐसा ले ले शॉर्टकट, अरे कभी वैसा ले ले शॉर्टकट
अरे दे पैसा चल दे तू फटाफट ... ॥

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

_समीर_'s picture

23 Jul 2009 - 10:00 pm | _समीर_

कै च्या कै कोट्या आणि रटाळ लांबड ह्यामुळे विडंबन आवडले नाही. मूळ लेखासारखेच छोटेखानी विडंबन करायला हवे होते.

छोटा डॉन's picture

24 Jul 2009 - 10:41 am | छोटा डॉन

खल्लास च्या खल्लास कोट्या आणि सुयोग्य लांबी ह्यामुळे विडंबन अतिशय आवडले. विडंबन करताना मुळ लेखाची लांबी फाट्यावर मारली हे ही आवडले ;)

>>"निकल" मधली भावना आणि 'गली'तला ग किती शुद्ध आहे पहा.
हे वाक्य ह्रुदयाला व भावना मनाला भिडल्याने डोळ्यात पाणी आले.

असेच अजुन येऊद्यात ...

------
छोटा डॉन..
सावधान..! प्रतिसादशुद्धिचिकित्सक आयोग"बसला" आहे ;)

श्रावण मोडक's picture

23 Jul 2009 - 10:04 pm | श्रावण मोडक

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
हे असंही होऊ शकतं याची कल्पनाच नव्हती.

स्वाती दिनेश's picture

24 Jul 2009 - 11:20 am | स्वाती दिनेश

हे असंही होऊ शकतं याची कल्पनाच नव्हती.
असेच म्हणते,
स्वाती

Nile's picture

24 Jul 2009 - 11:31 am | Nile

धन्य आहात. गाणं तर त्याहुन भारी. येउद्यात अजुन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2009 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाण्यातले बारकावे, सॉरी 'जागा' काय शोधल्या आहेत, केवळ सुंदर...! आपला गाण्यांचा अभ्यास आपल्या लेखनीतून प्रकट झाला आहे. सूर्यग्रहणाच्या परिणामाने लख्खन प्रतिभा स्फूरली आणि लेख आकाराला आला असावा असे वाटते..! :D (ह.घे)

गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची.
हे निरिक्षण तर केवळ अप्रतिम.....!

-दिलीप बिरुटे

सहज's picture

24 Jul 2009 - 7:08 am | सहज

गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची...
२ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम ....
'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही.

.. केवळ अप्रतिम.....!

:-)

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jul 2009 - 10:21 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! लै भन्नाट!!! शास्त्रज्ञ बाईंचं डोकं कुठं कधी काय शोधेल काय भरवसा नाय ब्वॉ!!! निरिक्षणं भन्नाटच. :D

=)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

23 Jul 2009 - 10:33 pm | आनंदयात्री

एक नंबर !!
=)) =)) =))
(लेख/विडंबन जे काय असेल ते वाचले नाही पण प्रतिसाद द्यायचा मोह आवरला नाही .. काय आहे या विडंबनाने आमची खुप दिवसांची इच्छा पुर्ण होईल .. लेखांची विडंबने वैगेरे साहित्यप्रकारांवर प्रशासकिय निर्बंध येतिल.)

प्राजु's picture

23 Jul 2009 - 10:43 pm | प्राजु

___/\___

ज ह ब ह र्‍या!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

23 Jul 2009 - 11:04 pm | विसोबा खेचर

गाणं आणि त्याचं विडंबन, दोन्हीही जबर्‍या! :)

चालू द्या..

तात्या.

सुहास's picture

24 Jul 2009 - 12:51 am | सुहास

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

छानच.......!!!!

--सुहास

पिवळा डांबिस's picture

24 Jul 2009 - 1:18 am | पिवळा डांबिस

...'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही...
...या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची...
२ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम जसा पळू लागतो तसं आपले विचारही पळत जातात...
क्या बात है!!!
जियो!!!!

विकास's picture

24 Jul 2009 - 1:58 am | विकास

लेख चांगला आहे. विचार करायला लावणारा वैचारीक आहे. तरी देखील वाचताना मला हसावेसे वाटले. पण वर पाहीले तर लेखाची विभागणी संगीत आणि प्रकटन मधे झालेली, विरंगुळा, विनोद मधे नाही... मग हसण्याचे चित्र काढले तर चुकून अवांतर समजले जाऊन कुणाला चांदणी मिळू शकेल ना!

Nile's picture

24 Jul 2009 - 11:46 am | Nile

प्रतिसाद चांगला आहे. विचार करायला लावणारा वैचारीक आहे. तरी देखील वाचताना मला हसावेसे वाटले. पण तुम्ही wink ची स्मायली न काढल्याने हसत नाही.

खरं तर अवांतर प्रतिसाद देउन मलाही इतर कुणाला चांदणी मिळण्यास प्रोत्साहन द्यायचे नाही. पण संपादक साहेबांचा असा भावी (हंगामी) संपादकाला पदग्रहण करण्यापुर्वीच पदच्युत करण्याच्या प्रयत्नाचा जाहीर निषेध.

आणि त्यात त्यांनी wink ची स्मायली न काढल्याने आम्हीही काढत नाही.

घाटावरचे भट's picture

24 Jul 2009 - 2:04 am | घाटावरचे भट

क आणि ड आणि क आणि च !!!!!!!!

योगी९००'s picture

24 Jul 2009 - 3:35 am | योगी९००

मुळ लेख आणि हे विडंबन झकास...

खादाडमाऊ

सही...

हे मला चमकलंच नव्हतं.. आता "दिगंबरा दिगंबरा" ऐकताना "निकल भी जा" आठवत रहाणार..

प्रअका१२३'s picture

24 Jul 2009 - 10:02 am | प्रअका१२३

चाल ओळखीची वाटत होती, आता कळलं की `दिगंबरा...'ची आहे.
आता हे गाणं ऐकताना `दिगंबरा' आठवत राहील.

मुशाफिर's picture

24 Jul 2009 - 3:58 am | मुशाफिर

तुझी 'सुक्षदृष्टी' (कि श्रवण?) एकदम भन्नाट आहे :)

मुशाफिर.

शाहरुख's picture

24 Jul 2009 - 7:30 am | शाहरुख

खीखीखीखी..

आधी गाणं न बघता वाचल्याने डोक्याला त्रास झाला होता..बहुदा तोच लेखनाचा उद्देश असावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jul 2009 - 9:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कालानुक्रमे सर्वप्रथम एका मित्राचे आभार ज्याने 'दिगंबरा दिगंबरा' आणि 'निकल भी जा' या दोन्हीची चाल खूपच सारखी आहे हे लक्षात आणून दिलं.
नंतर आभार दोन मिपाकरांचे (नोबडी शुड बी नेम्ड) ज्यांनी मला गप्पा मारताना फूस लावून हे विडंबन लिहीण्यास भरीस पाडलं, आणि वर माझ्या लेखनात सुधारणाही करून दिल्या.
तात्यांचे आभार ज्यांनी आधी एका सुंदर गाण्यावर लेख लिहीला (त्या लेखावर प्रतिक्रिया देणं माझ्या आवाक्यातलं नाही.) आणि शिवाय हे विडंबन खेळीमेळीने घेतले.
सर्व वाचक/प्रतिसादकांचेही आभार.

यापुढेही मी रेडीओवर अशी भन्नाट गाणी ऐकून राहेन पण .... घाबरू नका, याच पद्धतीचा आणखी एक लेख मी तरी लिहीणार नाही! ;-)

अदिती

विसोबा खेचर's picture

24 Jul 2009 - 10:32 am | विसोबा खेचर

घाबरू नका, याच पद्धतीचा आणखी एक लेख मी तरी लिहीणार नाही

का बरं?

मी लौकरच एखादा पुढचा लेख टाकतो आहे त्याचंही विडंबन आलं तर वाचायला मजा येईल.. :)

तात्या.

अवलिया's picture

24 Jul 2009 - 9:33 am | अवलिया

हॅ हॅ हॅ

मजेशीर विडंबन. :)

--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

सुबक ठेंगणी's picture

24 Jul 2009 - 10:09 am | सुबक ठेंगणी

आत्ता त्या ओळी "दिगंबरा, दिगंबरा"च्या चालीवर पुन्हा म्हणून पाहिल्या...आणि =))
आता कोणी मिपाकराला "पतली गली से निकल" म्हणायचं असेल की "दिगंबरा दिगंबरा हो हां..." असं म्हटलं तरी चालेल! ;)

ऋषिकेश's picture

24 Jul 2009 - 12:22 pm | ऋषिकेश

'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही...
...या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची...

लै भारी =))
मजा आली.. अजून येऊ दे! :)

आता कोणी मिपाकराला "पतली गली से निकल" म्हणायचं असेल की "दिगंबरा दिगंबरा हो हां..." असं म्हटलं तरी चालेल!

=)) =))
हे पण लै भारी

( =)) )ऋषिकेश
------------------
जीवन झाले हो चांदणी!

धमाल मुलगा's picture

24 Jul 2009 - 4:28 pm | धमाल मुलगा

लय भारी! एकसे एक पंचेच :)

वर सु.ठेंनी सुचवलेला उपाय तर एकदम फस्सकल्लास :)

येऊ द्या दुर्बिटणेताई अजुन काही :)

----------------------------------------------------------------------------------------
चांदण्यात फिरताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........

विजुभाऊ's picture

25 Jul 2009 - 12:52 am | विजुभाऊ

चांदण्यात फिरताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........
या ऐवजी
चांदण्या जमवताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........
असे म्हणा धम्या

सुनील's picture

24 Jul 2009 - 10:24 am | सुनील

गाण्याचे उत्तम रसग्रहण किंबहुना गानसमीक्षेचा एक नवा मापदंडच!
तरीही अधिक उदाहरणे देऊन लेख अजून खुलवता आले असते असे वाटते.

;)

(पुढील समीक्षेच्या प्रतीक्षेत)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निखिल देशपांडे's picture

24 Jul 2009 - 11:23 am | निखिल देशपांडे

सही जमल आहे गं विंड्बन...
या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची

हे आले होते लक्षात.... आता परत एकदा गाणे त्या चाली वर म्हणुन पाहिले सही जमतयं....
बाकी कोट्या मस्त जमल्यात
निखिल
================================

कपिल काळे's picture

24 Jul 2009 - 11:39 am | कपिल काळे

हेहेहेहेहेहाअ
हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...

जबरी विडंबन !!

सुप्रिया's picture

24 Jul 2009 - 11:49 am | सुप्रिया

विडंबन मस्तच् !
"दिगंबरा दिगंबरा.." - भन्नाट!

विनायक प्रभू's picture

24 Jul 2009 - 11:58 am | विनायक प्रभू

वा बै वा

सागर's picture

24 Jul 2009 - 12:08 pm | सागर

केवळ भन्नाट ... शब्दच नाहीत

आपल्याला एखादं गाणं का आवडतं? चौथे उत्तर ;)
१) शब्द आवडतात,
२) संगीत - चाल आवडते,
३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ

४) चित्र विचित्र अंग हलवणारे बाजूचे नर्तक (किमान अक्षय - अर्शद मुळे आज ह्या गाण्यात त्यांच्याकडे पहिल्यांदा लक्ष गेले माझे =)) =)) =)) )

शंकर-एहसान-लॉयचं निकल भी जा हे गाणं आपल्यापैकी फार लोकांनी ऐकलेलं नसेलच. आवर्जून ऐका.
आधी ऐकले होते. पण आज हे गाणे म्हणजे अत्भुत असल्याचा नव्याने साक्षात्कार झाला :)

जावेद अख्तरसाहेबांनी शब्दांच्या माध्यमातून (प्रकटनाच्या शेवटी गाण्याचे बोल दिले आहेत) दिलेला व्यावहारीक जगण्याविषयीचा एक संदेश श्रोत्याच्या मनःपटलापुढे वेगवेगळ्या प्रसंगांना तंतोतंत उभा राहतो.

१००% सहमत

त्यासाठी जाणीवपूर्वक त्या मुलाचा आवाज किरटाच लागेल याची काळजी घेत गाण्याच्या संदेशाशी प्रामाणीकपणा राखण्याचा प्रयत्न संगीत संयोजकांनी केल्याचे दिसते. या मुलाने 'निकल भी जा'ला एक वेगळेच परिमाण गाठून दिले आहे.

हा गाण्याचा सुवर्णमध्य वाटला मला =))

या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची.
हे निरिक्षण अफलातून आहे आदितीताई ... हे केवळ तुमच्यासारख्या तीक्ष्ण बुद्धीचेच शास्त्रज्ञ करु जाणे :)
मी लिहिण्यापूर्वी ऑफिसात चक्क मोठ्याने हसलो आहे ह्या गाण्याबरोबर दिगंबरा दिगंबरा ची लिंक लावून =))

अक्षय खन्नाने बोटांचा खेळ दाखवला आहे,

येडचाप चाळे असतातच अक्षयचे. पण गाण्याचे सगळ्यात हाईलाईट दृष्य म्हणजे अर्शद नोटा उडवताना दिसतो ते... वा वा... एवढ्या नोटा कुठून आणल्यास रे ठोंब्या.... ;) जणू काही लोकांना तो नोटा उडवून हिणवतो आहे की लोकांनो या चित्रपटाला वेळ देऊन तुमचे पैसे गेले पाण्यात :D हा सीन मात्र थिएटर मधे हा चित्रपट पाहणार्‍याच्या अंगावर नक्की काटा आणत असेन =))

अशा लयीच्या गाण्यावर अतिशय उच्च नाच हे फक्त अर्शद-अक्षयच करू जाणे! .. खरे आहे.. म्हणून तर सपोर्टींग नर्तक गाण्यात का घेतात हे आजच कळाले =))

शेवटी पुन्हा एकदा =)) =)) =))

मनापासून खूप खूप धन्यवाद आदितीताई...
एवढे पोट भर हसवल्याबद्दल...
आप ने तो हमे जीना सिखा दिया =))

(मदमस्त) सागर

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2009 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार

अदिती, गाणं आहेच क्लास. मला नेहमीच आवडत आलेलं आहे हे गाणं. परत ऐकलं. परत आवडलं. पण आपल्याला गाण्यातलं कळत नाही ही बोच परत एकदा तीव्र झाली.

आता माझा प्रश्न -
गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ?

©º°¨¨°º© परालिया अवांतरकर्ते ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jul 2009 - 1:58 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! या राजे, तुमचीच कमी होती. हाणा च्यायला...

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

24 Jul 2009 - 2:11 pm | श्रावण मोडक

गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ?
गाणं कळण्यासाठी ते आवडलंच पाहिजे असे आहे का?

सागर's picture

24 Jul 2009 - 2:25 pm | सागर

=)) =)) =)) =))

लई भारी
... सॉलिड इमॅजिनेशन.... हा हा आपलं भन्नाट कल्पनाविलास ...
आहे का उत्तर कोणाकडे याचं =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jul 2009 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा आणि श्रावण यांनी अतिशय उत्तम प्रश्न विचारले आहेत. मी एकदा काही वेगळ्या संदर्भात हेच, असेच प्रश्न प्रो. किरटेंना विचारले होते, जेव्हा ते मला संध्याकाळी फिरता फिरता तळ्याकाठी भेटले होते. प्रो. किरटे हे अतिशय विद्वान आणि बहुश्रुत गृहस्थ! त्यांनी लगेच संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी मला असं सांगितलं, "जालिंदर बाबांनी १९९१ साली त्यांचा ग्रंथ अरण्यरूदनरसग्रहणसंहिता यात तिसर्‍या प्रकरणाच्या चौदाव्या पानावर अशा परिस्थितीचे यथायोग्य वर्णन केलं आहे. जेव्हा जालिंदर बाबांचे परात्पर शिष्य श्रीकुमार परापूरकर यांनी बाबांची एक आरती लिहीली आणि त्या आरतीला सागरगडाचे किल्लेदारांची वारस रेशमताई नाकपुरवालिया यांनी अतिशय आधुनिक आणि उच्च चाल लावली. ती ऐकून बाबांचे एक भक्त श्री. केसरी जंगली यांनी हाच प्रश्न विचारला होता जो सद्यस्थितीत तू मला विचारत आहेस. तर ग्रंथात बाबांनी दिलेली उत्तरं अशी:

"प्रः गाणं कळण्यासाठी ते आवडलंच पाहिजे असे आहे का?
"उत्तरः गाणं कळण्यासाठी आधी अमुक एक गाणं आहे हे कळलं पाहिजे. जर ते कळलं नाही तर कदाचित धडा आवडेल पण गाणं आवडणार नाही. तर गाणं म्हणजे काय हे आधी समजलं पाहीजे, कारण गाणं आणि कविता यांमधेही फरक असतो. प्रत्येक कविता गेय नसते, आणि प्रत्येक गेय कविता गाणंही नसते. गाणं असण्यासाठी त्या रचनेत एक प्रकारची लय, ताल, स्वरावली वारंवार यावी लागते. आणि एवढंच नाही तर गाणं ऐकताना त्यात एक ध्रुवपद आहे, एक किंवा जास्त अंतरे आहेत हेही लक्षात यावं लागतं. नाहीतर ते गाणं होत नाही.
आता हा प्रश्न विचारला आहे तो या आरतीसंदर्भात. तर या आरतीला अत्याधुनिक चाल लावल्यामुळे हे गाणं आहे हे आधी लक्षात यायला वेळ लागतो, त्यामुळे गाण्यात नेमकं काय आहे हे कळायला आणखीनच वेळ लागतो. पण अशा पद्धतीची गाणी आवडण्यासाठी एक विशिष्ट शिस्त निर्माण व्हावी लागते जी एका दिवसात लागत नाही. ही एक-दोन महिने शाळेत जाऊन शिकण्याची गोष्टच नव्हे. उलट असं केलंत तर दोन महिन्यात परत येऊन तुम्ही आधीच्या संगीताचा तिटकारा कराल. तसं होऊ नये.

"प्र. गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ?
"उत्तरः याचं उत्तर निश्चित असं देता येणार नाही. कसं आहे ना की आपल्याला जे पहायचं असतं तेच आपल्याला दिसतं. तर आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला कळल्याशिवाय गाणं आवडणार नाही तर तसंच खरं असतं आणि जर आपल्याला उलट वाटत असेल तर तसं खरं असतं. अर्थात मनाची ही अवस्थाही कायमची नसते. ही अवस्था अतिशय मायावी अर्थात फसवी आहे. आपल्याला जे पहायचं असतं ते दिसतं तरी आपल्याला काय पहायचं असतं हे मात्र आपल्या हातात नसतं.

"यापुढे मात्र बाबांनी हा ग्रंथ सामान्य वाचकांसाठी असल्याने क्लिष्टता टाळण्यासाठी त्यांच्या पुढच्या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे, जो ग्रंथ सध्या मी लिहीत आहे. प्रकाशन झालेले नसल्यामुळे पुढचं स्पष्टीकरण देण्यासाठी मला थांबावं लागेल. किंवा प्रकाशनपूर्व सवलतीत, अदिती, तू तो खरेदी कर. शिवाय तुला प्रकाशनाच्या आधी हा ग्रंथ वाचता येईलच कारण प्रूफरिडींगसाठी इतर कोणी बकरे हल्ली मिळतही नाही आहेत."

एवढं बोलून झाल्यावर मी प्रो. किरट्यांची रजा घेतली.

अवांतरः त्यांच्या घरी तेव्हा चहा मिळाला नाही.

अदिती

श्रावण मोडक's picture

24 Jul 2009 - 3:06 pm | श्रावण मोडक

ठ्ठो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
मॉनिटर साफ करा रे कोणी तरी...

सागर's picture

24 Jul 2009 - 4:01 pm | सागर

आई गं... आदिती... आज तू मला मनसोक्त हसवण्याचा वसा घेतला आहेस की काय? आजपर्यंत एवढा खळाळून क्वचितच हसलो असेन मी.....

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

त्यात हे वाक्य म्हणजे जबर्‍या ... ;)
सागरगडाचे किल्लेदारांची वारस रेशमताई नाकपुरवालिया यांनी अतिशय आधुनिक आणि उच्च चाल लावली.
मी हिमेश च्या आवाजात सध्या दोन्ही गाणी इमॅजिन करत आहे
दिगंबरा दिगंबरा ... आणि ते आपलं भयानक गाणं - पतली गलीसे निकल भी जा... =))

निखिल देशपांडे's picture

24 Jul 2009 - 3:08 pm | निखिल देशपांडे

आईगं
अदिती काय प्रतिसाद दिला आहेस
=))
हसुन मरतो का काय मी आता???

निखिल
================================

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jul 2009 - 3:22 pm | बिपिन कार्यकर्ते

आय अ‍ॅम स्पीचलेस!!!

(केसरी जंगली) बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2009 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

बेक्कार बेक्कार !!

=)) =)) =))

धन्य आहात आपण अवखळकर पाटील __/\__

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Jul 2009 - 3:29 pm | ब्रिटिश टिंग्या

हा ग्रहणाचा परिणाम समजावा का?

- टिंग्या

अवांतर : हा प्रतिसाद अवांतर आहे. चांदणी मिळवण्याकरिता लवकर क्रमांक १२५ शी संपर्क साधा अन्यधा प्रतिसाद उडवला जाईल!

अवलिया's picture

24 Jul 2009 - 4:34 pm | अवलिया

दिगंबरा दिगंबरा ....

--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2009 - 3:09 pm | परिकथेतील राजकुमार

गाणं कळण्यासाठी ते आवडलंच पाहिजे असे आहे का?

निश्चीतच !

उद्या नुसते हिन आणी हिणकस आवडुन कसे चालेल ? ते आधी हिन आणी हिणकस आहे म्हणजेच ते पर्यायाने टार्‍या किंवा पर्‍याने लिहिलेले आहे हे कळायला नको ? त्यासाठी ते आधी आवडायला नको ?

आवडलच नाही तर कळवुन घ्यायचे कशाला ? एखाद्या नावडत्या पदार्थाची पाककृती शोधत हिंडतो का आपण ? तसेच आहे ते !

©º°¨¨°º© पराचा कावळा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Jul 2009 - 3:31 pm | ब्रिटिश टिंग्या

लै भारी!
लोल!

अवांतर : यावरुन मनोगतावरच्या एका लेखाची आठवण झाली (टल्ली हो गयी) ;)

लिखाळ's picture

24 Jul 2009 - 6:51 pm | लिखाळ

अदिती,
जोरदार, छप्परफाड लेख. हे गाणे मी अजूनतरी ऐकले नाही. पण सवड मिळाली तर ऐकेन म्हणतो.
प्राध्यापकांशी झालेला संवाद सुद्धा उद्बोधक आणि माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित करणारा. लिहित राहा. मला नेहमी प्रतिसाद द्यायला जमतेच असे नाही पण मी वाचत असतो :)

-- लिखाळ.
आपण खूप बोललो म्हणजे आपण बरोबर बोललो असे नसते :)

भडकमकर मास्तर's picture

25 Jul 2009 - 1:35 am | भडकमकर मास्तर

मजा आली...लै झांटामाटिक वाटला लेख

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)