रात मधुमती, चांद संगती
थांब राजसा जाऊ नको..
स्पर्श अमृती, रे तुझी मिठी
दूर उभा तू राहू नको..
धरेस बिलगुन, गगन झोपले
गळा चांदण्-मणी गुंफले
दूधाळ होई , अकाश गंगा
क्षितिज माखले , जांभूळ रंगा
रंग मिलनी पुसटू नको..
थांब राजसा जाऊ नको..
रूणझुण वाजे पुन्हा पाऊल
नव्या उषेची नवी चाहूल
आर्त स्वरांनी रात पुकारे
मनी मिलनी, नवे धुमारे
स्वप्न टिपेला नेऊ नको..
थांब राजसा जाऊ नको..
मिठीत ओल्या, मला राहु दे
मधुमिलनी, मला न्हाऊ दे
कुशित तुझा गंध घेऊ दे
उरांत तुझा छंद लेऊ दे
रात सुनी ही ठेऊ नको
थांब राजसा जाऊ नको..
- प्राजु
प्रतिक्रिया
21 Jul 2009 - 11:20 am | विश्वेश
जाम आवडली ...
21 Jul 2009 - 12:33 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख, आवडली ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
21 Jul 2009 - 1:37 pm | आशिष सुर्वे
प्राजुताई, तुमची कविता मनाला भिडली बर्र का!
- कोकणी फणस
21 Jul 2009 - 2:20 pm | शाल्मली
मस्त कविता. आवडली. :)
कवितेला असलेल्या विशिष्ट लयीमुळे वाचायला छान वाटत आहे.
--शाल्मली.
21 Jul 2009 - 10:11 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
21 Jul 2009 - 5:25 pm | प्रमोद देव
कविता मस्त आहे.
खूप आवडली.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
21 Jul 2009 - 5:39 pm | चतुरंग
आमचा 'दूसरा' इथे वळलेला आहे! ;)
(मुरली)चतुरंग
21 Jul 2009 - 6:47 pm | लिखाळ
वा ! छान कविता. आवडली
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
21 Jul 2009 - 7:19 pm | llपुण्याचे पेशवेll
छान कविता. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
21 Jul 2009 - 7:25 pm | अवलिया
मस्त कविता. :)
--अवलिया
21 Jul 2009 - 7:27 pm | निखिल देशपांडे
कविता आवडली :-)
निखिल
================================
21 Jul 2009 - 7:52 pm | पुष्कराज
छान आहे कविता, एकदम तालात
21 Jul 2009 - 8:48 pm | ऋषिकेश
अरे वा! छान लयदार कविता.. वाचायला मजा येतेय :)
आवडली..
(लयदार)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
21 Jul 2009 - 10:24 pm | प्रशांत उदय मनोहर
मस्त!
22 Jul 2009 - 10:01 am | मि माझी
मस्त कविता..!! खुप आवडली...
मी माझी..
चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..
22 Jul 2009 - 10:32 am | पाषाणभेद
एकदम छान.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
22 Jul 2009 - 10:47 am | विसोबा खेचर
छ्या! पुन्हा एकदा प्रेमकविता..
ठीक वाटली..
तात्या.