ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी ह्र्दयविकाराने व श्वसनाच्या दुखण्याने आज हुबळी येथे सकाळी सव्वासात वाजता निधन झाले. त्या गानतपस्विनीला श्रद्धांजली.
ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी ह्र्दयविकाराने व श्वसनाच्या दुखण्याने आज हुबळी येथे सकाळी सव्वासात वाजता निधन झाले. त्या गानतपस्विनीला श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
21 Jul 2009 - 10:07 am | नितिन थत्ते
माझी आदरांजली.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
21 Jul 2009 - 12:48 pm | विशाल कुलकर्णी
कै. गंगुबाईंबद्दल पहिल्यांदा सुनीताबाईंच्या पुस्तकातुन वाचले होते, कॉलेजच्या दिवसात. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष गाणे ऐकण्याचा योग काही आला नाही. कधी दुरचित्रवाणीवर इतर गायकांच्या तोंडुन त्यांचा उल्लेख आणि गाणी (?) ऐकली असतील तेवढीच. पण त्यांच्याबद्दल जे ऐकले ते चांगलेच होते. माझीही भावपुर्ण आदरांजली.
विशाल
21 Jul 2009 - 12:50 pm | अवलिया
भावपुर्ण आदरांजली.
21 Jul 2009 - 1:34 pm | बिपिन कार्यकर्ते
माझीही भावपुर्ण आदरांजली.
बिपिन कार्यकर्ते
21 Jul 2009 - 1:42 pm | निखिल देशपांडे
माझीही भावपुर्ण आदरांजली.
निखिल
================================
21 Jul 2009 - 5:52 pm | धमाल मुलगा
माझीही भावपुर्ण श्रध्दांजली!
संगीत आणि संगीतसाधनेला पुजा मानुन त्यात स्वतःला झोकुन देणार्या अशा फार थोड्या उरलेल्या जुन्याजाणत्या संगीत उपासकांमधील आणखी एक तारा निखळला.
ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो.
21 Jul 2009 - 10:32 am | चिरोटा
माझी आदरांजली.
१९८८ साली पंच्यात्तरी निमित्त सबिना सेहगल ह्यानी त्यांची घेतलेली मुलाखत वाचण्यासारखी आहे-
http://www.cs.washington.edu/homes/mausam/gangubai.html
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
21 Jul 2009 - 12:36 pm | योगी९००
माझीही आदरांजली.
खादाडमाऊ
21 Jul 2009 - 1:57 pm | Nile
वयाच्या ९२ व्या वर्षी, असाध्य रोगाने पिडीत असतानाही, गाण्याचा कार्यक्रम करणार्या, गंगुबाई हनगल यांची आयुष्याची वाटचाल थक्क करणारी आहे.
माझी भावपुर्ण आदरांजली!
21 Jul 2009 - 2:50 pm | घाटावरचे भट
गंगूबाईंना माझीही विनम्र आदरांजली.
21 Jul 2009 - 2:51 pm | विसोबा खेचर
माझीही आदरांजली. बेळगाव, हुबळी, कुंदगोळ आणि पुणे येथे त्यांना अनेकदा ऐकायचा योग आला होता. सवाईंचं गाणं त्यांनी शेवटापर्यंत जपलं.
आज आमच्या अण्णांची 'आक्का' गेली. अण्णा त्यांना आपली थोरली बहीण मानत. गंगुबाईंचादेखील अण्णांवर खूप जीव होता..
आपला,
(किराणाप्रेमी) तात्या,
21 Jul 2009 - 4:38 pm | वाटाड्या...
विनम्र श्रद्धांजली..
त्यांची आणि अण्णांची मुलाखत पु.लंनी घेतलेली अजुन आठ्वते आहे..त्यात त्यांनी गाण्यासाठी जे जे कष्ट घेतले आहेत त्या वरुन त्यांच्या निस्सीम गुरुभक्ती, अपार कष्ट, मायाळु आणि निगर्वी व्यक्तिमत्वाची कल्पना येते.
अण्णासुद्धा त्यांचा शब्द खाली पडु देत नव्हते..
असो..अशी माणसं आता होणे अवघड आहे...
- वाटाड्या...
21 Jul 2009 - 4:42 pm | चतुरंग
सवाईला एकदाच त्यांचे गाणे ऐकण्याचा योग आला. ज्येष्ठ गुरुभगिनी म्हणून भीमसेनजी त्यांचा केवढा मान ठेवून त्यांना नमस्कार करत हे प्रत्यक्ष बघितले.
त्यांच्या निधनाने संगीताच्या इतिहासाचा आंणखी एक दुवा निखळला!
-चतुरंग
21 Jul 2009 - 6:18 pm | क्रान्ति
विनम्र आदरांजली.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
21 Jul 2009 - 7:31 pm | llपुण्याचे पेशवेll
माझीही श्रद्धांजली.
(दु:खी)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
21 Jul 2009 - 7:32 pm | स्वाती२
भावपूर्ण आदरांजली. त्यांचे गाणे ऐकायचा योग एकदाच आला. दुर्दैवाने तेव्हा त्या गाण्यामागची साधना समजण्याची अक्कल मला नव्हती.
21 Jul 2009 - 7:44 pm | केशवराव
सवाई ला ४ / ५ वेळा गंगुबाईंना ऐकले. धबधब्यासारखे गाणे . सवाईंचा ठसा अगदी खास !
भिमाण्णांची थोरली बहीणच आज गेली.
भावपुर्ण आदरांजली !!
किराणा प्रेमी ---- केशवराव .
21 Jul 2009 - 10:03 pm | तर्री
ही तर भारतीय शास्त्रीय संगीताची मोठी हानी.
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो .
21 Jul 2009 - 10:14 pm | आनंद घारे
ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे गाणे ऐकण्याचेच नव्हे तर त्यांच्याबरोबर चार शब्द बोलण्याची संधी मला मिळाली होती. ते क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. इतक्या महान पण साध्या व्यक्ती फारच दुर्मिळ असतात. त्यांनी आयुष्याची शंभरी गाठावी अशी इच्छा त्यांच्या सर्वच चाहत्यांना असणार, पण ती अपुरी राहिली.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
22 Jul 2009 - 4:50 am | नाटक्या
आदरांजली...
- नाटक्या
22 Jul 2009 - 11:44 am | पक्या
भावपूर्ण आदरांजली.
22 Jul 2009 - 11:55 am | अश्विनि३३७९
भावपुर्ण श्रध्दांजली!
अश्विनि ....
22 Jul 2009 - 11:58 am | वेताळ
त्याच नाव बरेच एकुन आहे. संगीतक्षेत्रात त्याचे नाव खुप आदराने घेतले जाते.पण त्याचे गाणे कधी एकले नाही.
त्याना भावपुर्ण आदरांजली.
वेताळ
22 Jul 2009 - 4:54 pm | प्रमोद देव
गंगुबाईंसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिकेला माझीही विनम्र आदरांजली.
खाली त्यांच्या गाण्याची झलक ऐका.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!