जोडीदार भाग २

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
16 Jul 2009 - 3:47 pm

जोडीदार (भाग १) -http://www.misalpav.com/node/8320

सुप्रिया आणि सतिश आठ दिवसांनी हनिमुनसाठी महाबळेश्वर येथे रवाना झाले. सहजीवनाच्या नवनविन स्वप्नांचे ढग त्यांच्या नजरेसमोर वाहत होते. स्पर्शभावनांनी रोमांचीत झाल्याने सुप्रियाला स्ट्रॉबेरीची गुलाबी चढली होती. प्रेम, ओढ, आनंद, औत्स्युक्याचा हिमवर्षावात दोघ चिंब चिंब भिजत होती.

दोघही एकमेकांच्या आवडी पारखत आणि जपत होते. एकमेकांचा स्वभाव जाणून घेत होते. सुप्रिया ही शांत तर सतिश गप्पिष्ठ होता. सुप्रियाला तो अनेक प्रश्न, किस्से विचारुन बोलक करत असे. स्वतःबद्दल, करियर बद्दल, त्याच्या भावी स्वप्नांबद्दल तो तिच्याशी सुसंवाद साधत होता. सुप्रियाही त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं, वाक्याच समर्थन करत होती. स्वतः अबोल असली तरी सतिशने आपल्याबरोबर सतत बोलतच रहाव असच तिला मनोमन वाटत होत. त्याचा सहवास तिच्या शांत मनाला हवाहवासा वाटत होता. अशाप्रकारे आपला मधुर मिलनाचा प्रवास करुन दोघ आपल्या संसारात विलिन झाले.

पंधरा दिवसांच्या सुट्टीनंतर सुप्रिया आणि सतिश आपआपल्या व्यवसायात रुजू झाले. सुप्रियाला रोज ८ वाजता घर सोडावे लागे. घर सोडण्याच्या आधिच सुप्रिया कामवालीकडून धुणी भांडी आटोपुन घेत असे. स्वतःसाठी डबा व सतिशसाठी जेवण बनवुन ठेवत असे. सतिशचे ऑफीस त्याच्याच बिल्डींगच्या पाठी असल्याने तो रोज १० वाजता घर सोडत असे. लग्ना आधी तो जेवणाचा डबा बाहेरुन मागवत असे तर कधी कधी मामीच्या घरी जाउन जेवत असे. पण आता हक्काचे आणि प्रेमाचे चार घास आपल्याच घरकुलात उपभोगण्याचे त्याने आनंदाने ठरवले आणि सतिश आता दुपारी घरी येऊन जेऊ लागला.

सुप्रिया निघाली की सतिश तिला टाटा करण्यासाठी गॅलरीत उभा राहत असे व ती नजरे आड होईपर्यंत तिथेच थांबून राही. सुप्रियाही वर पाहत त्याला टाटा करुन हसर्‍या चेहर्‍यानी त्याचा निरोप घेत असे. संध्याकाळी येतानाही तो गॅलरीत उभा राहून तिची वाट पाहत असे. सतिशला कधी कधी कामानिमित्त बारही जावे लागे त्यावेळी मात्र सुप्रियाला गॅलरी सुन्न वाटे. त्या वाटेवरुन जाताना तिची पावले व त्याला रिप्ल्याय देण्यासाठी वर केलेला हात अडखळत असे.

सुप्रिया संध्याकाळी घरी आली की घराला घरपण येई, कारण घरावर माया करणारा सतिश होता पण आता त्याच्यावर ममतेने हात फिरणारी सुप्रिया आली होती. सुप्रियाने थोडयाच दिवसांत फ्लॅट निटनेटका करुन त्याची सुबक सजावट केली होती . फ्लॅटही आता नववधू समान भासत होता. सुप्रिया आली की फ्रेश होऊण दिवाबत्ती करुन दोघ गप्पा गोष्टी, मस्ती करत एकत्र कॉफी घेत असत. रात्रीच्या जेवणात सतिश सुप्रियाला थोडीफार मदत करत असे. रात्रीच्या जेवणही दोघेजण एकत्र बसुन घेत असत. सतिश सुप्रियाच्या बनवलेल्या पदार्थांची स्तुती करत असे. कधी जर सुप्रियाला उशीर झाला , थकली असेल किंवा बाहेर जेवण्याचा मुड असेल तर दोघे हॉटेलमध्ये जेऊन येत असत. जेवणाचा कार्यक्रम उरकला की दोघजण आपल्या बेडरुमचा ताबा घेत असत. असा त्यांचा दृष्ट लागण्या सारखा संसार चालु होता.

एक दिवस सुप्रिया नेहमी प्रमाणे घरी आली पण तिच्या नेहमीच्या हसर्‍या चेहर्‍यावर चढलेली नाराजी सतिशला जाणवली. सतिशने तिला विचारले " अग काय झाल ? तुझा चेहरा का असा पडला आहे. " सुप्रियाने पर्स मधुन एक कागद काढला आणि सतिशच्या हातात देउन त्याला मिठी मारुन ती ओक्साबोक्शी रडू लागली. सतिशने तो कागद वाचला. ती सुप्रियाला जॉब सोडण्या बाबतची नोटीस होती. रिसेशनची अवकळा तिच्या आनंदावर पसरली होती.

सतिश तिची समजूत काढत होता. " अग नोकरी गेली तर काय झाल ? गरजेपुरते पैसे मी कमवतोच नोकरी नाही केली तरी चालेल. पण जर तुला करीयर करायच असेल तर माझा बिझनेस आहे तुझ्या मदतीला. मी माझा पार्टनर ललितशी बोलतो व तुलाही त्यात भागीदार करुन घेतो. नाहीतरी आम्हा दोघांना ऑफीस सांभाळताना जरा तारांबळच होते टुर्स मुळे. जर तुला आवडत असेल तर ये तू उद्यापासुन माझ्या ऑफीसमध्ये. " सुप्रियाने सतिशला आनंदाने मिठी मारली आणि त्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.

आता दोघांचे रुटीन अचानक बदलले. आता सुप्रियाची सकाळी धावपळ कमी झाली होती. ड्ब्याच्या ऐवजी ती आता दोघांचे जेवण बनवत होती. आता सतिशला सुप्रियाला टाटा करण्यासाठी गॅलरीत उभे रहावे लागत नव्हते तर दोघेही ऑफीसमध्ये एकत्र जात होते. दुपारी एकत्र जेवायला येत होते. संध्याकाळीही एकत्र परत येत होते. फक्त सतिश टुरवर जात असे तेंव्हा तिला सतिशची कमी जाणवत असे. मग अशा वेळी ती ऑफीसमध्येच आपल मन रमवत असे.

सुरूवातीचे काही दिवस सतिश सुप्रियाला कामाचे स्वरुप समजाउन देत होता, मग सुप्रियाने सतिश आणि त्याचा पार्टनर ललित ह्याना विश्वासात घेउन बिझनेस वाढवीण्याच्या दृष्टीने काही सोयिस्कर बदल सुचवले. ते दोघांनाही पटले व त्यानुसार बदल करण्याचे त्यांनी मनावर घेतले. सतिशला सुप्रियाच्या हुशारीचा अभिमान वाटत होता. त्या दिवसा पासुन बिझनेसचे निर्णय तिघांच्या विचारविनीमयाने होऊ लागले.

सुप्रियाने बिझनेस मध्ये प्रवेश करताच घराप्रमाणे बिझनेस मध्येही नवनविन बदल झाले. कामगारांना, टुरिस्टना आकर्षक भेटवस्तु, सुविधा मिळायला लागल्या. टुरीस्ट आणि कामगार दोन्ही खुष झाल्याने बिझनेस झपाट्याने वाढू लागला. आता सतिशलाही कामानिमित्त वारंवार बाहेर जावे लागत होते. आता सुप्रियानेही त्यासाठी मनाची तयारी केली होती.

अशा भरभराटीचे दिवस चालू होते आणि अजुन एक आनंदाची भर सतिश आणि सुप्रियाच्या जीवनात पडली. सुप्रियाला डोहाळे लागले होते. नव बिज तिच्या कुशीत उमलणार होत. सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. अशा नाजूक स्थितीत सतिश सुप्रियाची काळजी घेत होता. रोज वेळच्या वेळी जेवण, नाश्ता, डॉक्टरांची ट्रिटमेंट ह्यात जातिने लक्ष घालत होता. तिला लागलेल्या डोहाळ्यांचे हट्ट पुरवत होता.

सुप्रियाच्या आई वडीलांना ही गोष्ट कळताच ते तिला आरामासाठी घरी घेऊन जाण्यासाठी आले.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Jul 2009 - 3:57 pm | घाशीराम कोतवाल १.२

वाचत आहे येउ दे पटापट
बाकि कथा बीज सुरेख फुलविले आहेत जागु ताई तुम्ही

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

रेवती's picture

16 Jul 2009 - 5:46 pm | रेवती

हा भाग चांगला मोठा लिहिला आहे.
आता पुढे काय होइल याची उत्सुकता आहे.

रेवती

सूहास's picture

16 Jul 2009 - 8:49 pm | सूहास (not verified)

अजुन वळण यायचे आहे तर....

व्हाट नेक्स्ट...

बाकी काही म्हणा ..सुप्रियाला आतापर्य॑तच्या लिखाणावरुन एक खुप समजुतदार पती मिळाला आहे..पण कथेच नावच " जोडीदार असल्याने..जरा श॑का-कुश॑का मनात येताहेत...
पुढे काय ???

सुहास

प्राजु's picture

16 Jul 2009 - 8:54 pm | प्राजु

वाचते आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

17 Jul 2009 - 1:49 am | दिपाली पाटिल

दिपाली :)

ऋषिकेश's picture

16 Jul 2009 - 9:12 pm | ऋषिकेश

वाचतो आहे..

ऋषिकेश

स्वाती२'s picture

17 Jul 2009 - 1:49 am | स्वाती२

या ही भागात सर्वकाही छान चाललय त्यामुळे पुढे काय या बद्दल उत्सुकता वाढलेय.

मदनबाण's picture

17 Jul 2009 - 6:20 am | मदनबाण

जागुताई पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

पाऊसवेडी's picture

17 Jul 2009 - 2:39 pm | पाऊसवेडी

वाचते आहे..

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

सुबक ठेंगणी's picture

17 Jul 2009 - 7:17 pm | सुबक ठेंगणी

सगळं अगदी सुखात चाल्लेलं आहे सध्यातरी आणि पुढे काय होणार ह्याची ताकास तूर नाही!
लिहा लिहा भराभर!
(टांगलेल्या चक्क्याच्या भुमिकेतून) सुबक
अवांतरः बाकी आता कथेत काहीतरी वाईट घडलं नाही तरच मला धक्का बसेल!

ठकू's picture

17 Jul 2009 - 8:50 pm | ठकू

दोन्ही भाग वाचले. पुढच्या भागाची प्रतिक्षा करतेय.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे