निळूभाऊ गेले!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
13 Jul 2009 - 7:22 am

nilu phule

निळूभाऊ गेले!

माझ्या अतिशय आवडत्या नटांपैकी एक!

पण `पुढचं पाऊल', सिंहासन, पिंजरा, सामना, अशा अगदी मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळला, तर मराठी चित्रपटस्रुष्टीने त्यांना साच्यातच अडकवले. त्यामुळे त्यांच्यातल्या चतुरस्र अभिनेत्यावर अन्याय झाला. (अमरीश पुरींचेही हेच झाले!)
त्यांचे नाटक कधी पाहण्याचा योग आला नाही. `प्रेमाची गोष्ट...?' आले होते आमच्या काळात, पण बघायचे राहून गेले.
एकदा प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आला.
असो.

त्यांना विनम्र श्रद्धांजली.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 7:29 am | मिसळभोक्ता

निळूभाऊंना भेटणे अनेकदा झाले. कर्वे रोड वरच्या प्रेममध्ये त्यांचा दर बुधवारी अड्डा असायचा. पण खरी "भेटायची" वेळ एकदाच आली होती. पण सगळे फ्यान भेटतात तशी नव्हे. ह्या भेटीत "तुमचे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीवर किती उपकार आहेत," वगैरे भंकस बडबड काहीही नव्हती. सध्या सिग्नेचर श्रेष्ठ का ? देशी हल्ली जमत नाही. खेडेगावात नाटकांचे प्रयोग होतात तेव्हा, तिथले ऑर्गनायझर्स कसल्या "सोयी" करतात, ह्याविषयी दोन पेगांनंतर जसे मनमोकळे डिस्कशन होते, तसे.

आता कर्वे रोड वर "प्रेम" मध्ये बाजूचा तो टेबल रिकामा रिकामा राहील. पंच्याहत्तरीतले ते चार तरुण चाळीशीतल्या आम्हा म्हातार्‍यांना जीवनोन्नतीतले सहा सोपान (आणि सातवा: सिग्नेचर) सांगणार नाहीत.

निळूभाऊ, वरती मजा करा. एखादा कानडी शेट्टी तिकडेही चित्रगुप्ताच्या मदतीने बार उघडून बसला असेलच. चीयर्स.

-- मिसळभोक्ता

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jul 2009 - 9:58 am | प्रकाश घाटपांडे

खरीच ही भावपुर्ण श्रद्धांजली. सामाजिक कृतज्ञता निधी साठी जेव्हा महाराष्ट्र भर नाटकांचे प्रयोग करायचे त्यावेळी संयोजकांना सोय करताना तारांबळ व्हायची. एखादी रुम जर गैरसोयीची असेल तर चमुमध्ये नाराजी , तणतण . कटकट व्हायची तेव्हा निळु भाउ सांगायचे की जी रुम गैरसोयीची असेल ती मला नीस्सन्कोच पणे द्या. बाकी निळुभाउ आपल्यालतेच. चिअर्स पोचले म्हणुन सांगितलय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

13 Jul 2009 - 7:31 am | विकास

त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली.

"मास्तर..." ह्या शब्दातील खोली तो जेंव्हा त्यांच्या तोंडून आला तेंव्हाच कळली असावी! त्यांच्या ही बातमी आठवता क्षणी आठवलेल्या (आणि ज्यांनी इंपॅक्ट केला आहे)अशा भुमिका म्हणजे: पिंजरा, सिंहासन, आणि अर्थातच सगळ्या भुमिकांवर कळस असलेली "सामना" मधील भुमिका. अजून अनेक चित्रपट आहेत...या प्रत्येक भुमिकेत त्यांनी विविध रुपे दाखवली आहेत. कधी राजकारणी खलनायक, कधी परीस्थितीने लाचार झालेला तर कधी समाजातील विकृती, गुन्हे, भ्रष्टाचार बघत अंती स्वतःची सॅनिटी घालवून बसणारा पत्रकार...

विशाल कुलकर्णी's picture

13 Jul 2009 - 10:59 am | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो.

निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..

विशाल

संताजी धनाजी's picture

13 Jul 2009 - 3:47 pm | संताजी धनाजी

"मास्तर, मारलत तुम्ही मला!" वा वा!

- संताजी धनाजी

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2009 - 7:32 am | llपुण्याचे पेशवेll

निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सहज's picture

13 Jul 2009 - 7:34 am | सहज

मराठी सिनेमातील टॉपचा कलाकार.

असा कलाकार परत होणे नाही.

विनम्र श्रद्धांजली.

वाटाड्या...'s picture

13 Jul 2009 - 7:36 am | वाटाड्या...

"असा कलाकार परत होणे नाही."

खरेच....असचं म्हणावसं वाट्टय...

माझीही श्रद्धांजली..

- वाटाड्या...

छोटा डॉन's picture

13 Jul 2009 - 7:38 am | छोटा डॉन

निळुभाऊंसारख्या हरहुन्नरी आणि अजरामर कलाकाराला आमची श्रद्धांजली ...
आमच्या पिढीला जुने सिनेमे बघायची गोडी लावण्यात निळुभाउंच्या अभिनयाचे फार मोठ्ठे योगदान आहे, त्यांना सलाम ...!!!

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्रमोद देव's picture

13 Jul 2009 - 7:47 am | प्रमोद देव

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट निळूभाऊंना माझीही विनम्र श्रद्धांजली.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

'कूली' सिनेमात अमिताभच्या समर्थ अभिनयाला तितकीच तोलामोलाची टक्कर देताना त्यांचे हिंदी उच्चार ऐकले तर चुकूनही वाटणार नाही की हा अभिनेता मराठी आहे! हिंदी चित्रपटही त्यांनी गाजवला असता असे राहून राहून वाटते.
कायिक, वाचिक आणि मुद्राभिनयाने पडदा व्यापून उरणार्‍या ह्या महान अभिनेत्याला आणी तितक्याच महान व्यक्तीला विनम्र श्रद्धांजली!

(दु:खी)चतुरंग

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 7:50 am | मिसळभोक्ता

'कूली' सिनेमात अमिताभच्या समर्थ अभिनयाला

मेलो, संपलो, उद्ध्वस्त झालो !!!

आमचे येथे येणे संपले आता.....

-- मिसळभोक्ता

सहज's picture

13 Jul 2009 - 7:53 am | सहज

हेच खरे फॅन.

:-)

चतुरंग

आपला अभिजित's picture

13 Jul 2009 - 7:56 am | आपला अभिजित

'कूली' सिनेमात अमिताभच्या समर्थ अभिनयाला तितकीच तोलामोलाची टक्कर देताना त्यांचे हिंदी उच्चार ऐकले तर चुकूनही वाटणार नाही की हा अभिनेता मराठी आहे! हिंदी चित्रपटही त्यांनी गाजवला असता असे राहून राहून वाटते.

`हिंदी' चित्रपट मला कधी मानवलेच नाहीत, असे निळूभाऊ स्वत:च म्हणायचे. `हिंदी उच्चार करण्यात कम्फर्टेबल वाटायचे नाही. म्हणून तिकडे रामराम ठोकला' असे त्यांचे म्हणणे होते! म्हणजे किती निगर्वी होते पाहा ते!

चतुरंग's picture

13 Jul 2009 - 7:58 am | चतुरंग

परंतू ताकदीच्या भूमिका मिळाल्या असत्या आणि ते स्वतः कंफर्टेबल असते तर त्यांनी नक्कीच गाजवले असते असे वाटते.

चतुरंग

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 7:59 am | मिसळभोक्ता

खरंच त्यांना हिंदी उच्चार जमत नव्हते ! प्रामाणिक नक्कीच. निगर्वी माहिती नाही.

-- मिसळभोक्ता

सुहास's picture

13 Jul 2009 - 8:19 am | सुहास

सेवादलाचे सच्चे कार्यकर्ते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते निळुभाऊ फुलेंना आदरांजली..!

--सुहास

पाषाणभेद's picture

13 Jul 2009 - 8:20 am | पाषाणभेद

विनम्र आदरांजली.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

निळुभाऊंना अखेरचा मुजरा

त्यांचा अभिनय वादातित श्रेष्ठ होता, आहे व राहील!! त्यांच्या अनेक अजरामर भुमिकातुन ते आपणास सदैव भेटत राहतील....

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद् गती देवो

प्रशु's picture

13 Jul 2009 - 8:26 am | प्रशु

प्रेम प्रतिज्ञा मधला त्यांचा कष्टकरी माणसाचा अभिनय सुंदरच.. शेवट्चा उभ्या उभ्याने मरतानाचा अभिनय अप्रतिम.....

विनम्र आदरांजली.

विसोबा खेचर's picture

13 Jul 2009 - 8:29 am | विसोबा खेचर

निळूभाऊंना माझाही मानाचा मुजरा...

तात्या.

लवंगी's picture

13 Jul 2009 - 8:48 am | लवंगी

भन्नाट अभिनय. खरतर अभिनय नाहिच, प्रत्येक भुमिका सहजगत्या जगलेत ते. लहानपणी खूप घाबरायचे मी त्यांना. यातच त्यांच्या अभिनयाचे सामर्थ आहे.

नितिन थत्ते's picture

13 Jul 2009 - 8:37 am | नितिन थत्ते

माझीपण आदरांजली.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

मुक्तसुनीत's picture

13 Jul 2009 - 8:39 am | मुक्तसुनीत

श्रद्धांजली.

अवलिया's picture

13 Jul 2009 - 9:05 am | अवलिया

आदरांजली

आकाशी नीळा's picture

13 Jul 2009 - 8:21 pm | आकाशी नीळा

श्रद्धान्जली माझीही .

टुकुल's picture

13 Jul 2009 - 9:09 pm | टुकुल

भावपुर्ण श्रद्धान्जली

धनंजय's picture

13 Jul 2009 - 8:44 am | धनंजय

समर्थ अभिनेत्याला आदरांजली.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2009 - 8:49 am | बिपिन कार्यकर्ते

_/\_

बिपिन कार्यकर्ते

अनंत छंदी's picture

13 Jul 2009 - 8:51 am | अनंत छंदी

दु:ख व्यक्त करायला शब्द नाहीत.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.

दिपक's picture

13 Jul 2009 - 4:01 pm | दिपक

निळुभाऊंचे जाणे हे मराठी चित्रपटसॄष्टीचे मोठे नुकसान. एक अष्टपैलु अभिनेता आणि अभिनयही तितक्याच ताकदीने उभा करणारा अवलिया हरपला.

माझे लाख सलाम!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2009 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी चित्रपटसृष्टीतला मोठा कलाकार गेला.
निळुभाऊंना, माझीही भावपूर्ण श्रद्धांजली...!

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

13 Jul 2009 - 9:39 am | मदनबाण

निळुभाऊंना श्रद्धांजली.
लहानपणी छोट्याश्या पुस्तकावर त्यांची सही घेतली होती तेव्हा मला विलक्षण आनंद झाला होता...

मदनबाण.....

निखिल देशपांडे's picture

13 Jul 2009 - 9:36 am | निखिल देशपांडे

निळुभाऊंना, माझीही भावपूर्ण श्रद्धांजली...!
==निखिल

संदीप चित्रे's picture

13 Jul 2009 - 9:42 am | संदीप चित्रे

सुदैवाने एकदा राम नगरकरांबरोबर त्यांनी केलेला 'कथा अकलेच्या कांद्याची'चा प्रयोग पाहिला होता. त्याहून मोठे सुदैव म्हणजे आमच्या अप्पांच्या ते चांगले परिचित होते त्यामुळे प्रत्यक्षही भेटता आले होते. निळूभाऊंना विनम्र श्रद्धांजली.

वेताळ's picture

13 Jul 2009 - 10:05 am | वेताळ

लहानपणी खुप वर्षे त्याना पाहिले की जगातला सर्वात हलकट माणुस आहे हा,म्हणुन माझी कल्पना होती.इतका दर्जेदार अभिनय त्याचा असे.तितकाच कट्टर समाजवादी कार्यकर्ता.त्याना मानाचा मुजरा.

वेताळ

आशिष सुर्वे's picture

13 Jul 2009 - 10:23 am | आशिष सुर्वे

काल रविवारची सायंकाळ मला आता कधीही विसरणे शक्य नाही..

माझ्या संग्रही संगणकावर 'सिंहासन' हा चित्रपट बरेच दिवस होता.
बरेच दिवस हा चित्रपट पहायचे राहून गेले होते.

नेमका कालच दुपारच्या जेवणानंतर मी आणि माझ्या मित्राने 'सिंहासन' हा चित्रपट पाहिला..

राजकारण आणि राजकारण्यांवर एवढया प्रभावीपणे भाश्य करणारा हा चित्रपट मी ईतके दिवस का पाहिला नाही ह्याचेच आश्चर्य आणि दु:ख वाटले.

निळुभाऊंचा 'दिगू' मात्र मनावर ठसा उमटवून गेला.
शांत, मितभाशी, भेदक नजर ही 'दिगू' च्या व्यक्तिरेखेची ठळक वेशिश्ट्ये निळुभाऊंनी एकदम नेसर्गिकपणे उभी केली होती.

चित्रपटाचा शेवट मनाला चटका लावून गेला.
राजकारण आणि राजकारण्यांसमोर हतबल झालेला एका पत्रकाराची शोकांति़का अस्वस्थ करुन गेली..

आणि आजच्या बातमीने निळुभाऊंचा 'दिगू' माझ्या मनात मात्र कायम घर करुन गेला.

निळुभाऊ.. समस्त मराठी रसिकांतर्फे आपल्याला मानाचा मुजरा!
-
कोकणी फणस

विसुनाना's picture

13 Jul 2009 - 10:46 am | विसुनाना

एक पर्व संपले. समर्थ अभिनेत्याला सादर आदरांजली.

लहानपणी या माणसाचा प्रचंड राग यायचा. इतका की अशा शरीरयष्टीचा, चेहरेपट्टीचा, धोतरटोपी घालणारा प्रत्येक माणूस हा पाताळयंत्री राजकारणी असतो याची खात्री होती.

पंचगंगा साखर कारखान्यावर रत्नाप्पाण्णा खास सोयीनिशी बडदास्त ठेवत - त्याच्या कथाही ऐकल्या होत्या. बाकी लहानपणी एकदाच प्रत्यक्ष पाहिले होते.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Jul 2009 - 10:49 am | घाशीराम कोतवाल १.२

निळुभाऊंचे जाणे मराठी चित्रप्टसॄष्टीचे मोठे नुकसान. एक अष्टपैलु अभिनेता आणि अभिनयही तितक्याच ताकदीने उभा करणारा अवलिया हरपला.

हेच म्हणतो असा हुरहुन्नरी कलाकार पुन्हा होणे नाही!!!

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

अश्विनि३३७९'s picture

13 Jul 2009 - 10:51 am | अश्विनि३३७९

निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2009 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

भावपूर्ण श्रद्धांजली __/\__

नीलकांत's picture

13 Jul 2009 - 11:25 am | नीलकांत

निळूभाऊंना माझी विनम्र आदरांजली.

-नीलकांत

राजू's picture

13 Jul 2009 - 11:30 am | राजू

एक अष्टपैलु अभिनेता आणि अभिनयही तितक्याच ताकदीने उभा करणारा अवलिया हरपला.
__/\__

JAGOMOHANPYARE's picture

13 Jul 2009 - 12:03 pm | JAGOMOHANPYARE

रंजल्या जिवाची गांजल्या जिवाची मनी धरी खन्त
तोची खरा साधु तोची खरा सन्त....

हीच खरी दौलत मधील निळू फुलेंचे हे गाणे कुणी इथे टाकू शकेल का ?

संगीत बहुधा राम लक्श्मण... गायक सुधीर फडके....

बबलु's picture

13 Jul 2009 - 12:15 pm | बबलु

एक पर्व संपले. अभिजात अभिनयाची एक संस्थाच संपली.

निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

....बबलु

योगी९००'s picture

13 Jul 2009 - 12:20 pm | योगी९००

निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..

लहानपणी मला या माणसाची फार भिती वाटायची. माझी आज्जी तर याला खुपच शिव्या घालायची.

"पण बाई मी काय म्हणतो.." हा निळूभाऊंच्या ठेवणीतल्या आवाजातला डायलॉग तर माझ्या प्रचंड आवडीचा...

खादाडमाऊ

चन्द्रशेखर गोखले's picture

13 Jul 2009 - 7:43 pm | चन्द्रशेखर गोखले

निळुभाउंच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीचे तर नुकसान झालेच , पण त्याचबरोबर एका समाजिक चळवळीशी आपली बांधिलकी मानण्या-या कार्यकर्त्याचेही निधन झाल्याने ,या चळवळीचेही नुकसान झाले आहे. कलाकाराची सामाजिक बांधिलकी म्हणजे काय ? हे निळुभाउंकडुन शिकावं. केवळ पैसा मिळावा म्हणुन त्यांनी काम केलं नाही ,तर या क्षेत्राकडे चळवळ म्हणुन बघितलं. किंबहुना सेवादलाच्या समाजप्रबोधन करणा-या नाटकांतुनच काम करत ते कलकार म्हणुन पुढे आले. पण पैसा आणि नाव मिळाल्यावरही ते ही बांधिलकी विसरले नाहीत, तर आपल्या नावाचा , किर्तीचा ,पैशाचा चळवळीसाठी उपयोग केला हे फार महत्वाचं. अश्या संवेदनशील कलाकाराला विनम्र अभिवादन !!

क्रान्ति's picture

13 Jul 2009 - 11:09 pm | क्रान्ति

महान अभिनेत्याला विनम्र श्रद्धांजली.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

वेदश्री's picture

13 Jul 2009 - 11:33 pm | वेदश्री

लहानपणी निळू फुलेंना २-३ मराठी चित्रपटात पाहिल्याचे अंधुकसे जरूर आठवतेय पण चित्रपट, टीव्ही वगैरेची मुळातच आवड नसल्याने ते तितकेसे पुरते लक्षात मात्र राहिले नाही. नाटकाची आवड असूनही त्यांची नाटके पाहण्याचे भाग्य मिळाले नाही. निळू फुलेंची खरी ओळख झाली ती 'रामनगरी'मध्ये राम नगरकरांनी त्यांच्या या मित्राबद्दल जे आणि जितकं लिहिलं त्यामधून. त्यातून लक्षात आलेले त्यांचे कष्ट हे कल्पनेच्याही पलिकडचे वाटले होते मला. एक झपाटलेला कलाकार असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल असे वाटते.

निळू फुलेंना भावपूर्ण श्रद्धांजली!

पक्या's picture

14 Jul 2009 - 12:05 am | पक्या

निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

स्वाती२'s picture

14 Jul 2009 - 12:58 am | स्वाती२

भावपूर्ण श्रद्धांजली.

दत्ता काळे's picture

14 Jul 2009 - 11:40 am | दत्ता काळे

निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

दिपोटी's picture

14 Jul 2009 - 6:34 pm | दिपोटी

निळू फुले ... मराठी नाट्य-चित्रसृष्टीला लाभलेला एक अनमोल हिरा ! हाती आलेल्या भूमिकेची नेमकी व नेटकी जाण ठेवून अगदी सहजगत्या त्या भूमिकेचं अक्षरशः सोनं करणारा एक चतुरस्त्र आणि जातिवंत कलावंत !

काही महिन्यांपूर्वीच पाहिलेल्या 'सातच्या आत घरात' या चित्रपटात अवघ्या दोन मिनिटांच्या भूमिकेतून सारा चित्रपट अख्खा कच्चा खाऊन टाकला होता आपल्या निळूभाऊंनी ! भूमिकेच्या लांबी-रुंदीपेक्षा त्या भूमिकेची खोली कधीही महत्वाची हे निव्वळ संवादफेकीतून व संयत अभिनयातून सिध्द करणार्‍या या अभिनयसम्राटाला सलाम !

सामना, सिंहासन, पिंजरा, एक गाव बारा भानगडी, सखाराम बाइंडर, सूर्यास्त - या व अशा कित्येक चित्रपटांतील आणि नाटकांतील आपल्या सकस अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकाला आपलंसं करणार्‍या निळूभाऊंना विनम्र श्रध्दांजली !

- दिपोटी