आयुष्यात प्रथमच हातात कॅमेरा नसल्याचे वैष्यम वाटले.
जून २४ ते डीसेंबर २४ ह्या कालावाधीत बायको डोळ्यात तेल घालुन पहारा ठेवते. बेसीन वरचे ओडोमॉस, आफ्टर शेव क्रीम गायब होते.
फक्त टुथ पेस्ट असते. मोज्याच्या गाठी मारुन ठेवल्या जातात. टीवी चा रीमोट लपवला जातो. टॉयलेट फ्लश झाले आहे की नाही ह्याची खात्री केली जाते. जाताना रुमाल्,मोबाईल्,छत्री परत आणा ची आठवण केली जाते. 'जेवलात का' चा फोन न चुकता असतो.
अशाच एक सकाळी श्री श्री श्री तात्या महाराजांचा फोन आला.
" मास्तर, आपल्याला ह्या भानगडीतले && काही कळत नाही. मी पडलो रांगडा माणुस. माझ्या कडे एक केस आहे. तुमचे क्षेत्र आहे. बघा काही करता येते का?
नाहीतरी रोज मला फॉरीन पावडरी ,सेंट लावुन येणार्या मुलांकडे आणि पालकांकडे बोलुन कंटाळा आला होता. म्ह्टले बघुया काहीतरी वेगळे.
रात्री बिल्डीगखाली आल्यावर एक फोन आला. तो फोन जवळ जवळ २० मिनिटे चालु होता. मी रात्री नउ ची वेळ दीली होती हे लक्षातच नव्हते.
फोन संपता संपता साडे नउ वाजले होते. इतक्यात एक मुलगा जवळ आला आणि म्हणाला, "आपण प्रभु सर का? मी नारकर, अभ्यंकर साहेबांनी पाठवले आहे".
बरोबर आई पण होती त्याची.
आई कडे बघितल्यावर पुढचे काही ओळखायची गरज भासली नाही. गळ्यात फक्त काळ्या मण्याचे मंगळसुत्र. कुठल्या तरी अडचणीला मंगळ्सुत्रातल्या सोन्याने हौतात्म्य पत्करले असणार हे लक्षात आले. पण त्या मानाने मुलगा चकचकीत दिसत होता. तीच जुनी कहाणी परत येणार होती समोर. पोटाला चिमटा लाउन मुलांची काळजी घेणारी माउली लगेच ओळखता येते.
"मला डीप्लोमा इंजीनीयरींग करायचे आहे."- मुलगा
मुलाला ८४% मार्क होते. गणित आणि शास्त्रात ९०%.
माउलीच्या डोळ्यातुन कौतुक सांडत होते.
डीप्लोमा ला लागणारा खर्च किती हे स्पष्ट करणे एवढेच हातात होते माझ्या.
घरोघर पोळ्या करुन घर चालवणारी ती माउली मुलाच्या हट्टाकरता काहीही करायला तयार होती.
शासकिय कॉलेज मधे अॅडमिशन मिळाली तर फी ८००० पड॑णार होती.
आणि डीप्लोमा करुन मग डीग्री करायचा विचार होता.
एक तर मराठी मीडीयम. डीप्लोमाचा अभ्यासक्रम जमेल का नाही ह्याची खात्री नाही. मग क्लासेस चा खर्च. त्यात इतर टूल्स चा खर्च. खात्रीची कमीत कमी २ के.टी. ह्याची बेरीज जवळ जवळ २ लाख होत होती. मग आणखी ३ वर्ष इंजीनीयरीग चा खर्च जवळ जवळ ३ लाख. ७०% मिळाले नाही तर आणखी २ लाख वाढणार. म्हणजे वर्षाला कमीत कमी १ लाख पुढील सात वर्षाकरता. सर्व एस्टीमेट कानावर पडल्यावर माउलीच्या चेहेर्यावरची निराशा स्पष्ट दिसली.
दुसरा मार्ग ११ वी १२ वी सायन्स. इथे मी ह्या दोन वर्षाचा भार ५० हजारांनी कमी करायची शक्कल लढवायचे वचन दीले. इंजिनियरींग न करता इतर दोन मार्ग सुचवले ज्यात विषेश काही खर्च नव्हता.
पण सायन्स च्या कचाट्यात न सापडता पैसा खर्च न करता सुद्धा हे मार्ग चोखाळता येणार होते.
कॉमर्स चा मार्ग सुचवल्यावर मुलगा विचारात पडला.
पण सांगोपांग चर्चेनंतर इंजिनियरीग चे भुत बर्यापैकी उतरले असावे.
माउली च्या चेहर्यावर समाधान दिसले.
बायकोने न सांगता एक पाकिट हातात आणुन दिले. मुलाच्या हातात ठेवल्यावर मुलगा पाया पडला. तो पाया पडत असताना माउलीच्या चेहेर्याकडे बघितले. आपल्या मुलाच्या यशाचे हे पहीलेच कौतुक होतानाची कृतज्ञता आणि अश्रु ह्यांचे विचित्र मिश्रण असलेला तो क्षण कॅमेर्यात टीपता आला असता तर?
मुलाला पाकीट देत असताना एकच भावना होती. कुठेतरी हे पाकीट कायमची प्रेरणा व्हावी.
जाता जाता: अभ्यंकर साहेब, ही केस माझ्याकडे पाठवुन तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. का कसे ते पुन्हा केंव्हातरी.
प्रतिक्रिया
30 Jun 2009 - 10:01 am | घाशीराम कोतवाल १.२
एकदा तुम्हाला भेटायलाच पाहिजे किती करता तुम्ही लोकांसाठी
निस्वार्थी मनाने अखेर तात्याना समुपदेशनाची केस पाठवलिच
तुमच्या कडे !!! :) ;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
30 Jun 2009 - 10:08 am | विशाल कुलकर्णी
साष्टांग नमस्कार :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
30 Jun 2009 - 10:14 am | विसोबा खेचर
मास्तर, विंजिनियरिंगला प्रवेश आणि समुपदेशन या मुद्द्यांवर इथे जरी आम्ही तुम्हाला कितीही नडलो तरी कुठची केस कुणाकडे पाठवायची ह्याचं मात्र आम्हाला बरंच नालिज आहे..! :)
अहो ती माऊली प्रथम माझ्याकडे सल्ला मागायला आली होती.. पण तुम्हाला माहित्ये मास्तर, आपण पडलो एक नंबरचा भिकारचोट माणूस..आपल्याला शिक्षण लायनीतलं काय समजतंय? काय घंटा सल्ला देणार होतो मी त्या माऊलीला??
मग मला प्रभू मास्तर नावाच्या एका एंजलची आठवण झाली! म्हटलं मास्तरच यांना काय तो मार्ग दाखवतील. असा विचार करून तुमचा फोन फिरवला!
तात्या.
30 Jun 2009 - 10:23 am | नितिन थत्ते
तात्या, मास्तरांकडे केस पाठवून त्या माय लेकांचे भले केलेत. कीप इट अप.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
30 Jun 2009 - 12:04 pm | टारझन
वा !! तात्या आणि मास्तर ... छाण .. कौतुक वाटतं !! तात्यांचे विषेश आभार, कारण इतर वेळी मास्तरच्या समुपदेशनाला जालावर शिव्या जरी घालत असले तरी प्रत्यक्षात अगदी चांगलं काम केलंय :)
बाकी मास्तर ने नेहमी प्रमाणेच रिकाम्या जागा ठेऊन डोक्याला खाज आणलीये .. कोणते दोन मार्ग सुचवले ते इथं लिहिलं असतं तर बर्याच जणांना न भेटता आपला मेसेज पोचला असता .. असो
(तात्यामास्तरचा फॅण) टारझन
30 Jun 2009 - 1:12 pm | चतुरंग
नडायच्या वेळेस फुल्टू नडणार हयगय नाही पण एकदाका गोष्ट पटली की मग मागे पुढे नाही! हाच दिलदारपणा!!
फार कमी लोकांकडे असतो. असाच कायम ठेव!!
आणि प्रभू सर तुम्हाला काय सांगू? भेटल्यावर तुमचे आणि तुमच्या मनातले ओळखून न सांगता पाकीट देणार्या माऊलीचे, पाय धरायचेत एवढंच सांगतो!!
(भाग्यवान)चतुरंग
30 Jun 2009 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तर , तुमच्या बोलण्यातूनच तुमचे वेडेपण निदर्शनास येते. तुम्ही सतत कोणाला तरी आयुष्यात उभं करत असता. अशी वेडी माणसं फार कमी असतात, आम्ही स्वार्थी माणसं 'मी आणि माझं कुटूंब' यात रमलेलो, आम्ही इतकेच म्हणू शकतो...मास्तर, लगे रहो.
बाय द वे, तात्याच्या प्रकरणाचा योग्य निपटारा झालाय, तेव्हा तात्या खूश आहे, मास्तर त्या दहावीत पहिल्या आलेल्या मुलीबद्दल लेखन येऊ दे !
-दिलीप बिरुटे
30 Jun 2009 - 10:38 am | अवलिया
हेच म्हणतो !
मास्तर ! लगे रहो !!
--अवलिया
30 Jun 2009 - 10:54 am | विनायक प्रभू
तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंडीयातुन भारतात आलो अवलियाशेठ.
मला भारतात राहायचे आहे हो. पण भारताचा इंडीया झाला त्याला मी काय करणार.
30 Jun 2009 - 1:00 pm | अवलिया
उत्तम केलेत.
भारत तुम्हाला काही कमी पडु देणार नाही... !
बाकी भारताचा जो इंडीया झाला आहे.. त्याबद्दल पर्तिसाद देण्यास नकार.
४४ चा करार बासनात गेला की बघा काय होते ते ! म्हणुनच रामदासांच्या धाग्यावर काहीही बोललो नाही. बोललो असतो तर खरोखरच जिवंतपणी जाळले असते तुम्ही ! असो.
--अवलिया
30 Jun 2009 - 10:56 am | परिकथेतील राजकुमार
मास्तर लगे रहो.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 Jun 2009 - 11:18 am | निखिल देशपांडे
मास्तर लगे रहो.
==निखिल
30 Jun 2009 - 10:18 am | सहज
अभ्यंकरसाहेब, प्रभुसाहेब जमल्यास कळवत रहा पुढे काय होते आहे ह्या विद्यार्थ्याचे. कुठे प्रवेश घेतला, खर्च इ इ .
30 Jun 2009 - 11:31 am | स्वाती दिनेश
अभ्यंकरसाहेब, प्रभुसाहेब जमल्यास कळवत रहा पुढे काय होते आहे ह्या विद्यार्थ्याचे. कुठे प्रवेश घेतला, खर्च इ इ .
सहजरावांसारखेच म्हणते,
स्वाती
30 Jun 2009 - 10:24 am | अनंता
_/\_
http://www.mazafm.com/marathimusic/details.php?image_id=249
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
30 Jun 2009 - 10:52 am | नंदन
.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Jun 2009 - 11:12 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
30 Jun 2009 - 11:40 am | तात्या विन्चू
ई. बी. सी. नावाची एक सवलत काही वर्षे पुर्वीपर्यन्त दिली जात असे. सध्या हि सवलत जर ईन्जीनीअरीन्ग अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहे का?
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
30 Jun 2009 - 7:55 pm | अनामिक
ई. बी. सी. (म्हणजे इकॉनॉमीकली बॅकवर्ड क्लास) ही सवलत अजूनही अस्तित्वात असायला हरकत नसावी (२००० पर्यंततरी होती अस्तित्वात). परंतू ही सवलत गोवर्नमेंट शाळा कॉलेजातच दिल्या जाते. आणि त्यासाठी कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न एका विशिष्ठ आकड्या खाली असायला लागते.
-अनामिक
30 Jun 2009 - 12:03 pm | रेवती
छान!
चला, तात्यांनी हातमिळवणी केली तर विप्रंशी!
रेवती
30 Jun 2009 - 12:28 pm | टारझन
अगदी !! बरं झालं तात्या त्या माऊलीला असं म्हणाले नाहीत ;)
बदल स्वागतार्ह आहे :)
30 Jun 2009 - 12:29 pm | रामदास
असे बरेच ट्रस्ट आहेत जे दहावीत चांगले गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना आर्थीक मदत करतात.
उदा : महालक्ष्मी मंदीराचा ट्रस्ट आणि सिद्धीविनायकाचा ट्रस्ट.
अशा सगळ्या संस्थांची यादी किंवा जे आपल्याला ज्ञात आहेत अशांची माहीती मिपाकर देऊ शकतील का?
30 Jun 2009 - 1:16 pm | पाषाणभेद
धन्य आहात सर.
अवांतर: "बेसीन वरचे ओडोमॉस, आफ्टर शेव क्रीम"
बेसीन वर आफ्टर शेव क्रीम समजू शकतो, पण ओडोमॉस तेथे का?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
30 Jun 2009 - 4:06 pm | खडूस
कोणते दोन मार्ग सुचवले ते सांगितलं तर आम्ही सुद्धा काही जणांना कळवू
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
30 Jun 2009 - 4:21 pm | विमुक्त
how to upload image in misalpav? please reply.... i want to upload my sketches...
30 Jun 2009 - 6:29 pm | संदीप चित्रे
तुमचा प्रत्येक लेख म्हणजे समुपदेशनाचं उदाहरणच असतं
त्या मुलाला आणि त्याच्या आईला शुभेच्छा.
30 Jun 2009 - 11:08 pm | स्वाती२
_/\_ तात्या आणि प्रभू सर.
1 Jul 2009 - 7:11 am | सुनील
हॅट्स ऑफ टू मास्तर आणि तात्या!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Jul 2009 - 7:19 am | गणा मास्तर
बायकोने न सांगता एक पाकिट हातात आणुन दिले.
काकूंना साष्टांग नमस्कार !!!
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
23 Jul 2009 - 6:08 pm | बन्ड्या
मास्तर...
मानलं तुम्हाला....
तुमचा पंखा
बन्ड्या