फेनॉमेनल मिपाकट्टा

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
21 Jun 2009 - 1:34 pm

रामराम्स .. रामराम्स !! (णको .. णमस्कार्स लै बोर झालं)

काल बराच पाउस झाला नै ? लाईटही गेली .. करायला काही नव्हतं .. धम्याची धमी देखील नव्हती घरी .. त्यामुळे धम्या जाम पकला होता ... सगळी कामं हातानी करावी लागत होती .. किमान जेवणाचं तरी बाहेर होईल ह्या आशेनं त्याने कट्टा आयोजित केला .. (उसातनं आलेले) सुर्य .. मी .. आणि धम्या .. आणि जर खरडवह्या उचकण्यातून वेळ भेटला तर पर्‍या येणार होता ...

लाईट गेल्यामुळे आपला लॅपटॉप वर "नाईट ट्रेन" नावाचा "के व ळ अ प्र ति म" मिस्ट्रीपट पहात होतो .. सहाला धम्याचा फोन वाजला .... म्हंटलं आता निघायला हवं .. साडेसहाला निघालो .... पावसाची रिपरिप होती .. हळू हळू मजल दरमजल करत अपाचे गाठला .. आता एफ.सी. ला दोन आपाचे आहेत ... मी ज्ञानेश्वर पादूका चौकातल्या अपाचे समोर थांबुन फोन फिरवला ... धम्या मेल्या... आहेस कुठे .. बाहेर ये ". ...धम्या "#@($($(#$ , आत ये ना भो " म्हंटलं चोच्या दोन अपाचे आहेत .. कोणत्या अपाचेत ? म्हणे एफ.सी.च्या गेट समोरचं .. आता एफ.सी. ला २ गेट्स .. आणि माझ्या समोरही एक गेट होतं .. "बाहेर ये भाड्या" .. तेवढ्यात कोणी तरी खजुरछाप जाड्या फोनवर बाहेर निघाला .. म्हंतलं .. च्यामारी .. धम्यानं दोनेक महिन्यात चांगलंच वजन वाढवलंय की :) .... तो धम्या नाही हे पाहून बरं वाटलं .. "दुसर्‍या आपाचे लाया" अशी आज्ञा झाली .. गेलो ..

आत गेल्यावर अपाचेचं "या ढिंगचॅक ढिंग" म्यूझिक कानफाडत होतं ...
गेल्यागेल्या आधी त्यांची तोंड न पहाता माझं ध्यान इकडं गेलं !
From Katta1

From Katta1

पिणारे पिओ .. आम्ही आपले चिकनचापू

From Katta1

धम्या न सुर्या ला ओळखला .. पण बाकीचे दोन समान एज गृप मधलं पब्लिक कोण ? ते काही कळालं नाही ... त्यांनी त्यांची खरी नावं सांगितली .. म्हंटलं .. वक्के .. असतील हे आय.डी.ज .. काय महीत बा .. खरडींतून "मराठमोळा" ह्याणे देखील हजेरी लावण्याचा मनसुबा दाखवला होता .. धम्याला म्हंटलं आर्रे तो मराठमोळा ............... तेवढ्यात एकाने .. अर्रे मी .. मीच "मराठमोळा" ... मी जिभ चावली .. म्हंटलं लेका बरा आत्ताच बोलला .. नाय तर आख्खी रात्र तुझ्या नावाचे उपप्रकार ऐकावे लागले असते .. एकच हशा ... तिकडून स्वास(सुहास) म्हणाला .. हे "मला पण लागू होतं बरं " म्हंटलं .. च्यायला पब्लिक फारंच हुशार आहे ... प्रभु मास्तरच्या "पालकांना आवाहन"च्या झेरॉक्स काढून एरियात चिटकवायला निघालेले हेच ते धडाडीचे "मनसे कार्यकर्ते"
वा म्हंटलं .. बा .. तुम्हा दोघांचा एक कंपु ना !! साल्यानो .. डाव्यांची आणि विरोधी कंपुची बैठक .. आणि तिकडे बसलेला तो स्थितप्रज्ञ .. "सुर्य" एकदम हॉलीवूड ष्टाईल गॉगल्स बिगल्स घालून ...
सुर्य आणि मराठमोळा
From Katta1
सुहास आणि सुर्य
From Katta1

औपचारिकता केवळ काही सेकंदं होती .. मराठमोळ्याच्या लिखाणाच्या स्टायलीवरून मला तो "कलंत्री" वाटला होता .. म्हंटलं कोणी चाळीशीचा अतिशय चिकट विचारांचा खडूस माणूस असेल .. पण आपल्याबरोबरचं असून आसले दिवटे धंदे करतो मिपावर पाहून गंमत वाटली ..... सगळे बेवडाज किंगफिशर पित होते .. माझा ही घसा सुकला ...
मग राजकुमार सारखा करड्या आवाजात घसा खाचवत मी वेटर ला म्हणालो .. "वेटर्र्र ... एक थम्स अप लाना .. वो भी .. ऑन द रॉक्स .. " वेटर थोडा हँगला .. आणि निघून गेला .. समोर चिकन लॉलीपॉपची 'केवळ अप्रतिम' डिश होती .. मला थोडं हायसं वाटलं .. समोर आलेल्या चिकन ला कधी नाही म्हणू नये .. मी न विचारता प्लेट ओढली ..
पब्लिक पिण्यात .. आणि मी खाण्यात दंग :)
From Katta1From Katta1

एकेक टॉपीक निघत होते .. आणि हशांचे फवारे उडत होते .. अत्यंत मंत्रमुग्ध असे ते वातावरण होते ते. मी तर हरवूनच गेलो होतो. एवढ्या मोठ्या विचारवंतांत मी असा बसलो होतो !! सुख सुख म्हणजे ते नक्की काय ? बाकी सगळे हरपुन दारू पिण्यात मग्न आहेत .. आणि मी ही एकटक चिकन तोडत त्यांच्या सहवासाचा आणंद घेतोय .. आहाहा .. अजुन काय हवे ? जिवनातले हे क्षण माझ्या "मनाच्या कुपीत" साठवले गेले ते अगदी अलगदंच .. ( नाही .. नाही .. घाबरू नका मिपा कट्टा निबंध नाही लिहीत .. आपल्या दादांची आठवण झाल्याचा परिणाम आहे :) सदर पॅरा दादांना अर्पण . .

लोकं एकामागुन एक बियर्स ऑर्डर करत होती ... आणि मी आपला एकामागुन एक प्लेट खाली करत होतो ..
स्वास बिचारा बियर बरोबर कांदा खाच बसला ... थोडक्यात मिपावरचे कंपुभेद विसरून सगळे एक झाले होते ...

From Katta1

खाता खाता आणि गप्पा झोडता झोडता साडे नऊ वाजून गेले .. कळ्ळंच नाही .. मग पर्‍याला फोनवन्यात आल ... धमक्या दिल्यावर येतो म्हणाला .. धम्यानेही मनिश ला बोलवून घेतला ... पर्‍या आल्यावर गप्पांचा वेग वाढला .. पर्‍या आल्या आल्या गप्प्पांचा वेग वाढला .. आधी वैयक्तिक चाललेल्या गप्पा मिसळपाव आणि मिपाकरांवर येउन सुरू झाल्या ... हो नाही हो नाही करत केवळ "जॉनी वॉकर" पिणारे पराभौ .. किंगफिशरला तोंड लावायला तयार झाले .. एक घोट घेतल्या नंतर "बाझवला तिच्यामायला " चा जयघोष सुरू झाला ... काहीही झालं की "बाझवला तिच्यामायला " ... मग पर्‍यानं कोणाकोणाच्या खरडवह्यांत कोण कोण गुट्टूरगु करतं त्याची पोल खोलली ... णाणा पासून "ली" आणि "नी" घराण्यापर्यंत चर्चा झाल्या... ह्याचा हा व्यासंग पाहून मी आपला गप ऐकत राहिलो .. "बाझवला तिच्यामायला " .... गप्पांचा ओघ ओसरता ओसरत नव्हता ... कोणी एक मिणीटही बोर झालं नाही ..

दारू पितांना धम्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती .. ते पहा
From Katta1

सात जणांचा हा मिणी कट्टा "विदाऊट गाजावाजा" साजरा झाला .... मात्र ह्या सगळ्यात आपल्या सगळ्यांचे लाडके "तात्या अभ्यंकर उर्फ मालक उर्फ विसोबा खेचर" ह्यांना फोन करण्याचा विसर झाला नाही ...
हार्ड रॉकच्या म्युझिक मधे समोरच्याचं बोलणं ऐकून येणं अवघड होतं .. इथे मी चक्क "तात्याला फोन लावला होता .. .. हे "लिसनिंग स्किल्स" च्या टेस्ट पेक्षा काही वेगळं नसावं .. तात्याशी जेवढं बोललो त्यापैकी १०% कळलं असावं "कट्ट्याचे फोटो टाक ... हे मात्र पुर्ण कळालं .. .. पण मी ही इकडून काही तरी बोलत होतो .. आणि तात्याही काहीतरी बोलत होते .. शेवटी "टाटा गुडबाय" करून तात्यांचे आशिर्वाद घेऊन कट्टा सुरू राहिला ... सुर्य साहेबाला स्टेटस कॉल आला .. त्याला क्लबाच्या बाहेर जाऊन स्टेटस देणं प्राप्त होतं .. धम्याचं ही सेमच .. मराठमोळा,स्वास्,पर्‍या आणि टार्‍या ,मणिश्,धम्या आणि सुर्य ...
एक मस्त संध्याकाळ गेली .. पिण्याचा कार्यक्रम संपल्यावर शिवाजीनगर बस स्थानकाकडे जेवणासाठी मोर्चा वळला .. सुर्य ला अधिक थांबणं शक्य नसल्याने तो घरी पळाला .. आणि आम्ही पण जेवणं करून रात्री दिड वाजता पांगलो ..

काही क्षणचित्र : बाकी क्लिक करून पिकासावर जाउन पहावीत :)

From Katta1From Katta1

भोचक सम्राट परा
From Katta1

आणि पार्टी संपल्यावर .. सगळी गँग एकसाथ
From Katta1
परा,धम्या, टारझन,मागे मराठमोळा, मनिष,मागे सुर्य, आणि उजवीकडे सुहास
मिसळपाव झिंदाबाद
टिप : सगळ्यांनी चोचेपणा करून मला लेख लिहायला लावलाय .. त्यांनी पण ह्यात भर घालायची आहे म्हणून बर्‍याच जागा रिकाम्या ठेवल्यात ...

जाता जाता : डावे पक्ष मराठमोळा आणि सुहास .. ह्यांना कट्टा झाल्याने मिपावर "तुम्हाला आणि डाव्यांना सोडण्यात येणार नाही " अशी धमकीवजा सुचणा देण्यात आली आहे ;)

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2009 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्टावर्णन मस्तच, पण वृत्तांत टाकतांना पेयाच्या वर्णनाला अधिक महत्त्व दिल्यासारखे वाटले. त्यापेक्षा विविध गमती-जमती,काहींचे अनुभव वाचायला अधिक मजा आली असती. कट्ट्यात सूर्य,धमाल,टार्‍या,आणि स्पष्ट फोटोमुळे परा ओळखता आला. बाकी काहीच कळत नाही. :(

वर्णन लिहायला टार्‍याच एक शिक्षित होता का ? शुद्धलेखनाचं जाऊ द्या, पण पहिलं वाक्य कुठे संपते आणि दुसरे कुठून सुरु होते त्याचा अंदाजच येत नाही. (मेलो आता :))

- दिलीप बिरुटे

टारझन's picture

21 Jun 2009 - 1:56 pm | टारझन

शुद्धलेखनाचं जाऊ द्या, पण पहिलं वाक्य कुठे संपते आणि दुसरे कुठून सुरु होते त्याचा अंदाजच येत नाही.

चला !! लेखणाचा हेतू तर कळाला :)

पण वृत्तांत टाकतांना पेयाच्या वर्णनाला अधिक महत्त्व दिल्यासारखे वाटले.

सहमत ... प्रसंग इतके होते की एकही ऐण वेळेस आठवेना :)

त्यापेक्षा विविध गमती-जमती,काहींचे अनुभव वाचायला अधिक मजा आली असती.

ते लिहीणं बाकीच्यांच काम आहे ... सगळं लिहीण्याचा मक्ता मी नाही घेतलाय हो :)

कट्ट्यात सूर्य,धमाल,टार्‍या,आणि स्पष्ट फोटोमुळे परा ओळखता आला. बाकी काहीच कळत नाही.

फोटूं वर नावं देऊन पण नाही कळाले मनिष्,सुहास आणि मराठमोळा कोण ते ?
असो .. हे लिहिणारंच नव्हतो :) कारण हिणकस लेखणात आमचे हात चालतात :) एखाद्या आधीच्याच कट्टा वृत्तांताचं विडंबण करून लिहिणार होतो ... पण नको म्हंटलं ..

असो .. अपेक्षाभंगाबद्दल स्वारी .. बाकी लोकं ती उणिव प्रतिसादांतून भरून काढतील अशी आशा करतो :)

(लेखण कुठे सुरू होते-कुठे संपते हे कळू न देणारा) टोयोटा प्राडो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2009 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सगळं लिहीण्याचा मक्ता मी नाही घेतलाय हो
हम्म ! तेही खरं आहे म्हणा. :(

>>मनिष्,सुहास आणि मराठमोळा कोण ते ?
ओळखताच येत नाही. शेवटच्या फोटोत तरी म्हणायचे होते की, डावीकडून अमुक अमुक, नंतर धमाल, त्याच्यापाठीमागे टार्‍या, त्यांच्या शेजारी अमुक अमुक, त्या नंतर....

असो, मजा केली ना ! बस्स झालं. :)

-दिलीप बिरुटे
(रोखठोक)

सूहास's picture

22 Jun 2009 - 5:38 pm | सूहास (not verified)

सुरुवातीला आम्ही चारजण होतो...टेबल छोट असुनही पुरत होत..अर्थातच न॑तर मात्र टेबल बदलुन घ्याव लागल व त्याला दुसर जोडाव लागल.तेव्हा कुठ धम्याला,मला आणी टार्‍याला पण नीट बसता आल.....त्यात नेमका पहिल्या टेबल शेजारी "सा॑उड बॉक्स" शेजारी...आणी डी.जे. आल्या न॑तर तर विचारू नका...कान देवानी कशासाठी दिले ? असा प्रश्न माझ्या सकट सर्वा॑ना पडला होता...

एकच टेबल असताना माझ्या समोर तीन ग्लासेस होते..सुर्याचा आणी माझा असे दोन बियरचे ग्लासेस आणी तिसरा टारुभाऊचा थ॑म्स्-अप चा ग्लास(चित्र क्र॑माक एक) होता.. नेमक त्याच्या पलीकडे सर्व चकणा ठेवलेला होता...तिथे हाथ न्यायचा म्हणजे जरा रिस्क होती...
न॑तर पार्टी स॑पेपर्य॑त जो काही चकणा वेटर आणायचा तो थेट टारू भाऊच्या समोर आणुन ठेवायचा..डोळे ऊघड्झाप होईपर्य॑त तिथुन गायब व्हायचा.....

मी "प्लेन चीज" मागविल्या न॑तर,"प्लेन चीज, व्हिस्की आणी सर्वोत्तम चकणा" यावर मी,धमु आणी मराठमोळा ह्या॑च्यात एक छोटासा परि॑सवाद चालु झाला.परिस॑वाद एन " फॉ॑र्मात" असताना,धमु आणी मी हात मिळवले(शेक-हॅन्ड), मात्र हात सोडताना,धमुचा हात टारुभाउच्या थ॑म्स्-अप च्या ग्लासला लागला आणी ग्लास मधले तीर्थे टारुभाऊच्या पॅन्टवर सा॑डले.पण ते राहिले बाजुला ,टार्‍या म्हणतो" "साल्यानो॑, जर का चिकन मध्ये सा॑डल असल तर दोघा॑चा भुस्काटच करतो" पण आमच्या सुदैवाने थ॑म्स्-अप काही चिकन मध्ये सा॑डल नाही.नाहीतर हे लिहायला आम्ही ईथे राहीलो असतो की नाही माहीत नाही...

माझ्या डाव्या बाजुला सुर्या आणी टारभाऊ ऊजव्या बाजुला बसले होते..माझ्या हातातील सिगरेट (पहिल्यावाल)टेबलच्या खाली घेताना सारखी टारुभाऊच्या पॅन्टला लागायची ,दोनवेळा विझली ..पण ते एका अर्थी बर झाल ...मला त्या मुळे "झिप्पो कसा पेटवायचा" ह्याच प्रात्यक्षिक करता आल्..त्या आधी धमु आणी सुर्या ह्या॑नी मार्गदर्शन केल होतच...

सुर्या आणी मी जवळ-जवळ बसलो होतो..म्हणुन मधे मधे त्याच्या शी बोलण्याचा योग आला ..कि॑चीत मानेला झटका देउन,डाव्या हाताचा मनगटाशी ९० अ॑श कोन करित,आपण जस बाय-बाय करतो तसा हलवत,त्याची बोलायची स्टाईल एकदम मस्त..एखाद्या प्रशिक्षक बोलतो तसा.... मराठमोळा मात्र बोलायला जरा वेगळा..अजिबात हातवारे करित नाही..एकदम ठाम बोलतो...त्यात आवाजात एकदम कणखरपणा आहे...धमु कडे बघताना सर्वात आधी लक्ष वेधुन घेत होती ती म्हणजे फ्रे॑च्-कट दाढी...आणी हसताना मनापासुन हसतो..एकदम प्रसन्न आणी हसतमुख चेहरा,एखाद्या लग्न झालेल्या
पुरुषाचा ईतका प्रसन्न आणी हसतमुख चेहरा मी पहि॑ल्या॑दाच पाहिला,
टारुभाऊ तर काय विचारु नका..प्रत्येक तिसर्‍या वाक्याला हशा घ्यायचाच हे अस्सल पुणेकरा॑चे सुत्र अतिशय कटाक्षाने पाळतो...स्वत:वर,अ॑गापि॑डामुळे होणारे जोक्स पण खुप लाईटली पचवितो.

धमुकडे जो मोबाईल आहे त्यावरुन तो मिपावरच काय पण पुर्ण जगातल्या सगळ्या चाटि॑ग आय.डी. वर दिवस-रात्र"ऑनलाईन" राहु शकतो.मला " जॉनी मेरा नाम" ची लि॑क ऊघडुन त्यातला फोटु दाखवला त्याबद्दल धन्यवाद,,,दुसरीकडे टारुभाउचा जो मोबाईल आहे.त्याचे "फ॑क्शन्स" मला अजिबात समजत नव्हते..म्या पामरास काढलेले फोटु पुढे -मागे सरकवता येत नव्हते...टारुभाऊने समजविण्याचे दोन-तीन प्रयत्न केले व न॑तर (मला माझ्या अवस्थेवर)सोडुन दिले..पण त्यामुळे सुर्याचा पट्टीचा फोटोग्राफर असुन कॅमेरा (क्या मेरा क्या तेरा ...सब ऊपरवालेका) न आणल्याबदद्ल निषेध नो॑दविण्यात आला.सुर्याला पावसाने पळवाट दाखविली व आम्ही पुढच्या कट्ट्याचे सर्व "फोटोग्राफी "चे "कॉन्ट्रॅक्ट" त्याला दिले...

ह्या सर्व प्रकारात मला तिर्थरुपा॑चा फोन येवुन गेला...माझी धु॑दी वाढत चालली होती...तसे मला वेळोवेळी मराठमोळा ने निदर्शनास आणुन दिले...

त्या॑नतर पराभाऊ आला...मग खरी मजा/चर्चा सुरु झाली, ईकडे आमचा मिपा चा अभ्यास कमी असल्याची जाणीव झाली..त्यात मिपावर आमची एका॑मेका॑ मधली ला॑बी कमी पडली काय म्हणुन आम्ही दोघे दोन कोपर्‍यात पडलो(न॑तर स॑दीपमध्ये जेवताना पण तेच घडले).त्यात त्या भ॑गार डी.जे. चा कर्णकर्कश आवाज्...मला पराशी आणी मनीषशी जास्त बोलता आले नाही,याची नेहमी ख॑त राहील..परा बोलायला एकदम मस्तच...झकास हजरजबाबी जोक्स...आणी खणखणीत आवाज्...बोटा॑मध्ये अग॑ठ्या,बोलताना ऊजवा हात वर घेउन मधले बोट देवाकडे(क्रिकेटचे प॑च आउट देतात तसे)करुन बोलण्याचे लकब छानच...आणी नजर थेट नजरेवर्...चष्मा घालुन अस बोलण म्हणजे..थोड अवघड वाटत....मनीष मात्र टेबलावर हात ठेवुन ,बोट वाजवत बोलतो...पण चेहरा खुप बोलका आहे...

कारण नसलेली क्षणचित्रे:::

१) अपाचेमध्ये आम्ही साधारण पाच तास काढले .डी.जे.चालु झाल्यान॑तर स॑गळ्या॑नाच ओरडुन बोलावे लागत होते.तरी ही कोणी ही पाणी मागविले नाही ..पण परा आल्यानत॑र जे हास्यकार॑जे ऊडाले..त्यान॑तर डी.जे. चा ही आवाज धड येत नव्हता...
२) ह्या चार तासा॑मध्ये केवळ पाचच मिनीटे,जवळपास "ऑल-बॉईज अ‍ॅन्ड बॅचलर्स कॉकटेल पार्टी"असुनही केवळ काही स्त्री-सदस्या॑चा विषय झाला..बाकी विषयामध्ये "तात्या"एकदम फॉर्म मध्ये...
३)"अवलिया" हा विषय ही क्रमा॑क दोन वर होता...
४)जेवायला निघताना " मी हरविलो होतो"..पण निघताना टारुभाऊच गाडी ऊडवियाच प्रात्यक्षिक झाल...
५)अपाचे ची चायनीज"स्नॅक्स" ची क्वॉलिटी " ओके"आहे..पण त॑दुर मध्ये पाणी जाऊन, ऊशीरा का होईना आणलेल "त॑दुरी चिकण झकास होत...

बाकी साधारण साडेपाच तास खुप मजेत गेले..कसे ते कळलेही नाही...

वेताळ's picture

21 Jun 2009 - 2:00 pm | वेताळ

चालु द्या.
परा जरा जास्तच गंभीर वाटत आहे. सामंत काकाची डायरी वाचुन आला होता काय?

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

बाकरवडी's picture

21 Jun 2009 - 2:20 pm | बाकरवडी

पराचे जरा जास्तच वय झाले असे वाटते आहे फोटू वरून ;)

:B :B :B बाकरवडी :B :B :B

खरडवह्यांच्या अभ्यासाच्या ओझ्याखाली दबुन गेल्यासारखा वाटतोय परा ....

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jun 2009 - 3:22 pm | प्रकाश घाटपांडे

त्यामुळे धम्या जाम पकला होता ... सगळी कामं हातानी करावी लागत होती .

हॅहॅहॅ! धम्या शेवटी अपना हात जगन्नाथ! पार्टीत आमच्या नावाने बी दोन थेंब उडवित जा बाबा!
(आता उरलो शास्रापुरता)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विनायक प्रभू's picture

21 Jun 2009 - 5:25 pm | विनायक प्रभू

कामे म्हणजे नेमकी कुठ्कुठली?
सुहास कसा आहे.?
टार्‍या तु एवढा बारीक का दिसतोस?
काही वर्षापुर्वी तु होतास तसाच दिसणारा तो कोण?

अवलिया's picture

21 Jun 2009 - 3:23 pm | अवलिया

वा! मस्त कट्टा वर्णन रे टारोबा ढेकर !!

बाकी तु अंमळ रोडावलेला दिसतोस रे? का ? फार 'काम' करतोस की काय आजकाल? काळजी घे बाबा !
त्या मास्तरचे काही ऐकु नकोस ;)

पराला काय मनाजोगता आंब्याचा स्टाक नाय गावला की काय यंदाच्या मोसमात? चेहरा उतरलेला दिसतोय फार ! :?

धम्या ! धम्या !!! अरे काय हे? काही जनाची नाही तर मनाची? छ्या!! बियर काय पितोस लेका? कुठे न्यायच्या लायकीचा नाहीस बघ तु :)

बाकी मंडळी, तुमच्या वर परत कधीतरी :)

--अवलिया

निखिल देशपांडे's picture

21 Jun 2009 - 4:54 pm | निखिल देशपांडे

वा कट्टा भारीच झाला म्हणा ना.....
पराला काय मनाजोगता आंब्याचा स्टाक नाय गावला की काय यंदाच्या मोसमात? चेहरा उतरलेला दिसतोय फार !
काय रे परा स्टाक मिळाला नाही का मिळालेला सडका होता
==निखिल

श्रावण मोडक's picture

21 Jun 2009 - 3:37 pm | श्रावण मोडक

चांगले उद्योग चाललेत. चालू द्या. धम्या, विसरलास... :(

विसोबा खेचर's picture

21 Jun 2009 - 4:46 pm | विसोबा खेचर

चूतमारिच्यो...!

साले मजा करता आणि आम्हाला नाय बोलवत?! :)

धिक्कार असो...

असो,

फोटू आणि वृत्तांत जबरा..!

तात्या.

टारझन's picture

21 Jun 2009 - 7:17 pm | टारझन

बाझवला तिच्यामायला ...
आहो तात्या ... कट्ट्याचा प्लान एकतर रिजिड नव्हता .. सगळे आयत्यावेळेस उपस्थित होतील असे होते .. तुम्हाला ठाण्यावरनं बोलवायचं .. आणि बाकी सगळ्यांनी कलट्या मारायच्या ... त्या आयोजकाचा तुमाराम कापसे होईल ना राओ .. म्हणून .. आपुण उधर आके कट्टा करेंगेश :)

(खाजवला तिझ्याकानाला) टारोबा

प्रसन्न केसकर's picture

21 Jun 2009 - 5:16 pm | प्रसन्न केसकर

सामिल न करुन घेता जळवल्याबद्दल.....

सगळ्यांना बघून घेईन ;)
असो. सुहास की सूहास?

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

जेन's picture

21 Jun 2009 - 6:12 pm | जेन

खूपच मज़ा केलेली दिसते.......
सगळ्यांच्या पंगतीत तू पण प्यायला लागलो का टार्‍या.....
कि फक्त फोटो काढण्यासाठी हा पोस दिला ????

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jun 2009 - 6:38 pm | बिपिन कार्यकर्ते

जरा मोकळं सोड की त्याला... :)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jun 2009 - 6:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे.

श्रावण मोडक's picture

21 Jun 2009 - 6:40 pm | श्रावण मोडक

+२

अवलिया's picture

21 Jun 2009 - 6:44 pm | अवलिया

+३

टारझन's picture

21 Jun 2009 - 7:09 pm | टारझन

+४

मनिष's picture

22 Jun 2009 - 10:56 am | मनिष

सदर कट्ट्याला टार्‍या आणि मी (मनिष), आम्ही दोघांनीहि अजिबात दारू/बीअर घेतली नाही.

अवांतर - हा खुलासा मी बायकोच्या भीतीने करत नाहीये...खरच! ;)

आता मुद्याकडे - आवडत्या पुरुषांबरोबर ;) काही वेळ मद्यपानात घालवून खरच छान वाटले. सिरीयसली, नुसती 'धमाल' केली, कित्येक दिवसांनी कॉलेजच्या दिवसांसारखे नुसते धो-धो हसत होतो....सह्ही मजा आया बॉस!!!!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jun 2009 - 6:40 pm | बिपिन कार्यकर्ते

पश्चिमेला चार थेंब उडवलेत ना? आणि टार्‍याने वृत्तान्त अजून हि&ही लिहायला हवा होता. त्याच्यात आहे ती क्षमता. हे उगाच पाट्या टाकल्या सारखं झालं रे टार्‍या....

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

21 Jun 2009 - 7:05 pm | टारझन

हे उगाच पाट्या टाकल्या सारखं झालं रे टार्‍या....

हे वृत्तांत लिहीणं म्हणजे खरच गुळचाट काम हो .. च्यामारी .. इथं एकतर इकडून तिकडून पब्लिक पटकन टाक म्हणत होतं .. आणि दुसरीकडे खरडींचा पाउस आणि तिसरी कडे ... असो .. बास ..

-(बोर्कुट) टारायक "पाट्या"लग

मराठमोळा's picture

21 Jun 2009 - 7:01 pm | मराठमोळा

मस्त रे!!!!
वा! मस्त !!
वृत्तांत एकदम ही & ही होईल असे वाटत होते.. ;)

असो,
अचानक जोरदार झालेल्या पावसामुळे कट्टा किती यशस्वी होईल याची खात्री नव्हती. पण वरुणराजाला सुद्धा हा कट्टा व्हावा हे मान्य होतेच, संध्याकाळी पाऊस बरोबर थांबला आणी फोनाफोनी सुरु झाली. राघवला बोलवण्यात येणार होते पण त्याला बायकोबरोबर तुळशीबागेत जायचे असल्याने आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या. कोण कोण येणार आणी अचानक कोण येणार हा विचार करतच घरातून निघालो. प्रमुख सूत्रधार ध.मु. शेट असल्याने वेळेतच पोहोचला होता.
सर्वाना प्रथमच भेटणार असल्याने मनात एकेकाची प्रतिमा बनविली होतीच. अपाचेच्या एंट्रंसला ध.मु. शुभ्र पांढरा सदरा, नेहमीचा चष्मा, खांद्याला लटकवलेली एक बॅग घेऊन रस्त्यावरची हिरवळ बघताना लवकर लग्न झाल्याचा पश्चाताप करत सर्वांची वाट बघत होताच. मी पोहोचलो आणी इतरांची वाट बघत आम्ही गप्पा सुरु केल्या. पहिल्यांदाच भेटतोय अशी थोडीसुद्धा जाणीव झाली नाही. तेवढ्यातच सुर्य आला आणी आम्ही जवळ जवळ राहतो आणी एकाच कंपनीत काम करतो हे समजल्यावर दोघे आश्चर्यचकितच झालो. सुर्यने धमुसाठी युसए वरुन खास झिप्पो आणला होता, कट्ट्यावरच त्याचे उदघाटन करण्याचे त्याने ठरविले. सुहास आला आणी टारझन कोरड्या कॅटॅगरीत मोडतो त्यामुळे तो येईपर्यंत आपण सुरुवात करु अशी धमुने सूचना केली आणी आम्ही अपाचेमधे प्रवेश केला. डीजे अजुन आला नव्हता आणी लवकरच गप्पा रंगायला सुरुवात झाली. खरी नावे सांगितल्यावर अजुन चांगली ओळख झाली. सर्वजण माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित आहेत अशी माहिती पुढे आली.

"जवानो का ड्रिंक" बीयर ची ऑर्डर देण्यात आली. दोन दोन घोट पोटात गेल्यावर सगळ्यांमधले मिपाकर जागे झाले आणी मग जुन्या मित्रांसारखीच टिंगलटवाळी, जोक्स, आणी गप्पा सुरु झाल्या. टारझन आला आणी एखादी १० मजली ईमारत पहावी तसे सर्व बसल्या बसल्या त्याच्याकडे बघायला लागले. वेटर सुद्धा थोडे घाबरले. धमुला चिरडत दोन खुर्च्यांवर टारझन विराजमान झाला आणी पुन्हा एकदा ओळख परेड करण्यात आली. मीच मराठमोळा म्हंटल्यावर थोडावेळ निशःब्द झाला. बीयर रिचवत आणी चिकनचा स्वाद घेत पुन्हा गप्पा सुरु झाल्या. एक घोट घेईपर्यंत चिकनचा पुर्ण फडशा पडल्याचे दिसत होते. टारझन पायी त्या दिवशी कमीत कमी १०-१२ कोंबड्यांना कंठस्नान घालण्यात आले असावे.
हळुहळु गप्पा रंगायला सुरुवात झाली, मिपावरच्या काही आयडींचे स्मरण करण्यात आले आणी हसुन हसुन पुरेवाट झाली. बीयर आणी चिकनचा अविरत ओघ चालु होता, किती वेळ गेला कुणाला फिकिर नव्हती. परा आणी मनिषला फोन गेला. लगेच दोघे हजर. मग तर काय विचारायलाच नको. मिपावरच्या "वा! मस्त !!" पासुन "बाझवला तिचायला" पर्यंत सगळे डायलॉग आळीपाळीने म्हणुन झाले.
अवलिया आयडी कोण यावरुन सगळेजण एकमेकावर संशय घेत होते आणी फारच गुढ अशी चर्चा त्यावर झाली. त्यात कुणीही जंगलाबद्दल आणी क्रिप्टीक बोलत नसल्याने आपल्यात कुणीही अवलिया नाही याची खात्री झाली. पराने पुन्हा एकदा खरडवह्यांचा अभ्यास मांडला आणी मग हसुन हसुन पोट दुखु लागले. सगळे जण एकेक करुन हलके होऊन येत होते. मागे वाजत असलेल्या गाण्यांची कुणालाही पर्वा नव्हती. माझ्यावर मात्र उगीचच कंपुबाजीचा आरोप केला गेला. मी मराठमोळा आहे असे सांगताच सर्वांचे चेहर्‍यावर वेगळीच प्रतिक्रिया उमटत होती पण हळु हळु सगळे मतभेद विसरत इतके मिसळलो की खमंग मिसळच तयार झाली तिथे. सुर्य आणी सूहास दोघेही कमी बोलण्यात धन्यता मानत होते. पण मधुनच एखादा टाईमबाँब टाकत होते, मग हसण्याचा बाँब फुटत होता. वेळ कधी कसा गेला कळले नाही.
शिवाजीनगरला जेवण करुन सर्वांचा निरोप घेतला आणी सर्व घरी सुखरुप पोहोचावेत अशी मनोमन ईच्छा करत मी पण घरच्या रस्त्याला लागलो, पुढच्या कट्ट्याच्या अशा मनात धरुनच. :)

आणी हो, दुसर्‍या फोटोमधे उजवीकडे मी आणी डावीकडे सुर्य
तसेच तिसर्‍या फोटोमधे डावीकडे सूहास आणी शेवटच्या फोटोमधे डावीकडुन चौथ्या नंबरला प्रसन्न हसणारा मनिष!! (ओळखण्यात गल्लत होत असेल तर.)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अनामिक's picture

22 Jun 2009 - 2:44 am | अनामिक

मराठमोळा आणि टारझण... दोघांनीही मस्तंच वृत्तांत दिलाय...

-अनामिक

राघव's picture

22 Jun 2009 - 5:01 pm | राघव

आता नाही येऊ शकलो हे तर खरंच. :(
पण,
राघवला बोलवण्यात येणार होते पण त्याला बायकोबरोबर तुळशीबागेत जायचे असल्याने आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या.
तुझा तुळशीबागेचा लेख आवडला असे म्हटले म्हणजे इतका नाय काय का लगेच बायकोबरोबर तुळशीबागेत जायचा प्लॅन बनेल ;)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

मराठमोळा's picture

21 Jun 2009 - 7:16 pm | मराठमोळा

आणी हे काय रे?
डावे पक्ष मराठमोळा
काय डावे पक्ष म्हणुन शिव्या देतोस रे.. चायला खर्‍याची दुनियाच नाही बॉ.. :(

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सहज's picture

21 Jun 2009 - 7:23 pm | सहज

नवे चेहरे / मिपाकर दिसले ह्या कट्ट्यात!!

आनंद आहे.

संदीप चित्रे's picture

21 Jun 2009 - 8:30 pm | संदीप चित्रे

केलेला दिसतोय लेको...
बीयर आणि चिकनचा रतीब लावलेला दिसतोय.
(अवांतरः कट्ट्याला एकही स्त्री मिपाकर नसल्याने वृत्तांताला 'नोफिमेल' कट्टा म्हणावं का ? :))

पिवळा डांबिस's picture

21 Jun 2009 - 8:42 pm | पिवळा डांबिस

कट्टा झकास झाला हे वाचून आनंद झाला...
टारोबाच्या रंगरूपाबद्दल काही बोलणंच नाही . मारूतीच्या रंगरूपाबद्दल आपण बोलतो का कधी? म्हणजे बघा, लोक आपल्याला सांगतात की अमक्या देवळातली रामाची मूर्ती खूप सुरेख आहे, तमक्या देवळातली कृष्णाची मूर्ती खूप गोजिरी आहे....
तुम्हाला असं कोणी सांगणारं भेटलंय का की फलाण्या देवळातली मारूतीची मूर्त एक्दम फस्क्लास आहे, जाऊन बघ?
तसंच आमच्या टारोबाचं!! एकदम जंक्शन काम आहे ते!!!!
आपण त्याला फक्त एक रूईच्या पानाची माळ वहायची आणि मोकळं व्हायचं!!!!! :)
(टार्‍या, ह. घे!!)

त्यामुळे टार्‍या सोडा पण इथे या फोटोंमध्ये परादेखिल एकदम जेम्स बॉन्डसारखा दिसतोय!!!! म्हणजे जर जेम्स बॉन्ड पुण्यात रहात असता ना तर जसा दिसला असता तसा!!!! :)
शेकन बट नॉट स्टर्ड!!!:))

बाकी श्री. मराठमोळा आणि श्री. सुहास यांना सामावून घेऊन कंपूविरोधी कंपूला भलंमोठं भगदाड पाडल्याबद्दल टार्‍याचं आणि धम्याचं हार्दिक अभिनंदन!!! कोण म्हणतं की मराठे आपला गनिमीकावा विसरले आहेत म्हणून!!!!:))
मराठमोळा आणि सुहासराव, बाबांनो हे मिपा हे असंच आहे....
असर करता है सबपर ये, मिपा,
आहिस्ता आहिस्ता...
के जैसे रंग लाती है, शराब,
आहिस्ता आहिस्ता....
(ह. घ्या)
:)

ऋषिकेश's picture

21 Jun 2009 - 8:45 pm | ऋषिकेश

अरे वा! चांगलाच कट्टा ओला झालेला दिसतोय..
आय मीन चांगलाच ओला कट्टा झालेला दिसतोय ;)

टारोबा आणि धम्या सोडल्यास सगळेच चेहरे नवे होते.. धम्या कसा काय जमवतो असा कट्टा .. मानलं बॉ! __/\__

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सूर्य's picture

21 Jun 2009 - 9:36 pm | सूर्य

एकंदरीत कट्टा लय भारी झाला. मी प्रथमच सगळ्यांना भेटत होतो पण तसे वाटलेच नाही.
टार्‍या येईपर्यंत सगळ्यांमधे त्याचीच चर्चा चालु होती. त्याचा फोन आल्यावर धम्या बाहेर गेला व आम्ही खिडकीबाहेर बघितले. एक मोट्ठी आकृती खिडकी व्यापुन उभी होती. 'टार्‍या आलेला दिसतो आहे' असे आम्ही एकमेकांना म्हणतोय तोवर तो आलाच आतमधे. कल्पनेपेक्षाही 'भारी' व्यक्तीमत्व. ;). आणि बोलणे एकदम मऊ.

चिकनच्या अनेक डिशेस व बिअरचे अनेक ग्लास मारुन निरोपाच्या गोष्टी बोलायला लागणार इतक्यात पराचे आगमन झाले. मनीषसुद्धा आला व कट्टा पुन्हा पहिल्यापासुन चालु झाला.

पुन्हा एकदा लवकरच मोठा कट्टा ठरवु मित्रांनो.

- सूर्य.

छोटा डॉन's picture

22 Jun 2009 - 7:17 am | छोटा डॉन

परवाच्याला संध्याकाळी असेच शुन्यात नजर लाऊन बसलो होतो, काय करावे काही सुचत नव्हते. प्रचंड कंटाळाच आला होता म्हणा ना ...

पण मग अचानक डोक्याची शीर उडु लागली, उचक्या लागु लागल्या, मन सैरभर होऊ लागले, कश्शा कश्शातच मन लागेना. म्हतालं हा काय शॉट आहे बे च्यामायला, कोणतरी लै आठवण काढते आहे अथवा लै श्या देते आहे, मग नंतर कळाले की "पुण्यात टारबाचा कट्टा" चालु होता. आम्हाला एका क्षणात आमच्या उचक्या आणि डोकेदुखीचे कारण समजले.

मस्त झाला आहे कट्टा, जागा अगदीच सुरेख निवडली असल्याने "सोईसुविधांचा" प्रश्नच नाही.
बाकी नवी मंडळी म्हणजे पर्यायाने सुर्य, सुहास ( की सूहास ते एकदा ठरवा भौ ;) ) आणि मराठमोळा यांचे दर्शन झाले, बाकीचे आमच्या नेहमीच्या आघडीतले.
परा पवार ह्यावेळी फार बदललेले दिसले, बहुतेक निवडणुकीतला पराभव त्यांनी फार मनाला लाऊन घेतलेला आहे असे दिसतेय, वर अवलिया म्हंतात त्याप्रमाणे त्यानी ह्यावर्षी आंबेसुद्धा खाल्ले नाहीत, चालयचेच ...
बाकी आमच्या दोस्तदार धमालरावांबद्दल काय बोलायचे ( की कैच्या कै बोलायचे ) ? माणुस भयंकर विनोदी हो, कुठे काय बोलेले हे सांगता येत नाही. पण इथे अपाचेमध्ये जरा त्यांची "मुस्कटदाबी" झाल्यासारखे वाटले बॉ, कदाचित ढॅण्णटॅडॅण ढॅण्णटॅडॅणढॅण्णटॅडॅण म्युझीकमुळे असावे.

अपाचेही फारच बदललं हो, आमच्या काळी असं नव्हतं राव.

बाकी आम्हाला ह्या कट्ट्यातुन फोन न गेल्याने आम्ही नाराज आहोत ( फोन आल्यावर सगळे बील आम्हीच परस्पर भरले असते असे काही नाही, उगाच गैरसमज नको ), चालायचेच.
पुढेमागे टारबा भेटल्यावर त्याला एखादी धोबीपछाड घालुन आम्ही त्याचा बदला घेऊच ....

बाकी कट्ट्याच्या वॄत्तांत थोडा अधिक हीन व हिणकस होऊ शकला असता, तो ण केल्याबद्दल टारबाचा णिषेध ...!!!

आणि हो, एक महत्वाचे ...
"अपाचे" ला जाऊन तिथले "अपाचे टॉरंटो अथवा गो-टू-हेल" नावाचे अप्रतिम कॉकटेल न पिता बियर पीत बसलेल्या सर्व कट्टेकर्‍यांचा निषेध ...

आणि हो, ते शिवाजीनगराचा काय उल्लेख आहे शेवटी, जेवण कुठे केलेत ? का ठेसनावर रात्री १ वाजता भुर्जी वगैरे खाल्लीत ?

------
छोटा डॉन
डॉन्या म्हणे आता उरलो वॄत्तांतापुरता ... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2009 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

वा वा वा आम्ही येइपर्यंत सगळे प्रतिक्रीया देउन मोकळे ?

खरे तर या कट्ट्याला हजेरी लावणे आपल्या नशीबात आहे की नाही ह्याची शेवटच्या क्षणापर्यंत खात्री न्हवती. कॅफेत काम चालु असल्याने आम्ही काही एम .आर. दोस्तांसमवेत सुख दु:खाचे धागे विणत २ घोट पोटाखाली ढकल बसलो असतानाच अचानक ९.४० वाजता काडी पैलवान टारु यांचा धमकीवजा विनंती असा दुरध्वनी आला. त्या बरोबरीनेच धम्मु पैलवानांनी आपली सगळी शब्द संपदा आमच्यावर रीती केली. ४ घोट पोटात गेलेले आम्ही मग पेटुन उठलो. ताबडतोब शटर खाली घेउन अपाचेच्या दिशेने कुच केली.

अपाचे बाहेर धम्मुशेठ अत्यंत नम्र आवाजात कोणाशी तरी फोनवर संवाद साधत होते, त्यावरुन आम्ही तो फोन 'होम मिनिस्टरचा' असावा हे ताडले. आत घुसलो, टेबलवर सुर्य आणी टार्‍या ह्या दोनच व्यक्ती अपेक्षीत असताना चार व्यक्ती दिसल्याने संभ्रमीत झालो. काही क्षणातच सुर्य, मराठमोळा आणी सूहास ह्यांच्याशी ओळख करुन देण्यात आली. सूहासपेक्षाही खरेतर मराठमोळ्या जीवाला बघुन जास्त आश्चर्य वाटले. मला खरच मराठमोळा हा आमच्या विप्र,बिका, घाटपांडे, मोडक इत्यादी काकांसारखा कोणी काका माणुस वाटत होता ;)

सुख दु:खात कॅफेबाहेर रिचवलेला व्हिस्कीचा आधार अपाचेमध्ये मिळणार नाही हे कळताच आम्ही कसलाही विचार न करता 'पिचरला' हात घातला. आणी मग खर्‍या अर्थाने कट्टा रंगला. काही वेळातच 'आवडते पुरुष' तात्या यांना फोन लावण्यात आला. पिणे आणी चकणा संपवणे हा पराक्रम संपत असतानाच बाहेर जाउन उदरभरण करावे असा प्रस्ताव सर्वसंमतीने मान्य करण्यात आला.

काही वेळातच आम्ही अपाचे बाहेर पडलो, काही दाक्षीण्यात्य दारु प्रवाशांची मदत घेउन ग्रुप फोटो काढले, दाक्षीणात्यांनी त्यांचा ग्रुप फोटो काढायला मात्र मराठमोळ्याला जवळ केले. काही मिनिटांच्या त्यांच्या सहवासानंतर मराठमोळ जो गाडीवर बसला तो सरळ निघुनच गेला, काही वेळाने पुन्हा एक वळण घेउन आम्हाला सामील झाला.

शिवाजी नगरच्या 'संदीप' मध्ये पोटपुजेचा कार्यक्रम पार पडला. कोल्हापुरी चिकन हंडी आणी मी आणी मनीषने मागवलेली शेवभाजी असा फर्मास बेत रंगला. शेवभाजीचा खास काढलेला फोटु दिपाली ताईंच्या शेवभाजीच्या धाग्यावर टाकायचे ठरवण्यात आले.

कट्टा वृतांत लेखक म्हणुन हि & हि टार्‍याची नेमणुक करत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन's picture

22 Jun 2009 - 12:03 pm | दशानन

आम्ही काय खपलो होतो की काय राव... एक फोन तरी मारायचा फेकुन.. नाय तर मिस्ड कॉलतरी सोडायची राव... किती किती राग आला आहे माहीत आहे... !

धम्या... तुला काय बोलू मी... पण टार्या लेका तुला डॉन्या धोबीपछाड देणार तर मी तुला उचलून एकदा पंचगंगेत बुडवून नक्की काढणार... एकदम हलकट आहेस ;)

प-या सुकाळीच्या... नको नको ते एसएमएस करायला वेळ आहे तुझ्या कडे ... एक फोन नाय फेकु शकलास ... कमीने... मेरा खुन पिजाऊंगा.. जब मिलूंगा....

B)

नेक्स्ट कट्टाला फोन आला पाहीजे नाय तर..............

थोडेसं नवीन !

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jun 2009 - 1:37 am | llपुण्याचे पेशवेll

अरेरेरेरे.. एक मोठा कट्टा हुकला. असो पुढच्या वेळेला पुण्यात असलो की नक्की येणार कट्ट्याला. ..

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984