प्रतिक्षेत जीव हा दाहला
विसंबली तुजवर जीवनमाला
तुजविन हर जीव अधुरा
आकाशी फाकल्या निल धमन्या
डोंगरी आगी वाचुन वणवा
सिंधू, तलावाची महानता पणाला
घाल धाव बरसत जीवन धारा
अधिर धरती तुज स्पर्शाला
तुज संगच्या ओलपणाला
गुदमरे अंकुर बी प्रसुतीला
पशू पक्षी घालती कोरड ताना
वृक्षे आतूर गार पल्लवीला
ये रे बरसत अमृत धारा.
प्रतिक्रिया
15 Jun 2009 - 3:36 pm | निशिगंध
मस्त कवीता..
ये रे बरसत अमृत धारा.
अगदी मला पण असेच वाटत आहे..
____ नि शि गं ध ____
15 Jun 2009 - 3:50 pm | पर्नल नेने मराठे
जागु मस्त्च !!!
चुचु
15 Jun 2009 - 5:20 pm | विसोबा खेचर
आम्हीदेखील पावसाची वाट पाहतो आहोत...
जागू,
सुंदर कविता केली आहेस रे!
तात्या.
15 Jun 2009 - 9:04 pm | क्रान्ति
पावसाला साद घालणारी कविता आवडली .
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
16 Jun 2009 - 1:06 am | प्राजु
कविता आवडली.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jun 2009 - 10:53 am | जागु
निशिगंध, मराठे, तात्या,क्रांती, प्राजू धन्यवाद.