तुम्ही मराठीसाठी काय करता ?

गुळांबा's picture
गुळांबा in जनातलं, मनातलं
13 Jun 2009 - 5:48 pm

लेखन प्रेरणा - तुम्ही मराठीसाठी काय करता ?

मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो.

(पुढिल सर्व कल्पना पुर्णत: काल्पनिक)

१) वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतो.
२) तिथे लेखनाच्या / प्रतिसादाच्या जिलब्या पाडून मराठीचा वापर वाढवतो.
३) अनेक आयडी काढुन स्वत:च्याच लेखांवर वादग्रस्त प्रतिसाद देतो.
४) विनाकारण एखाद्या सदस्याची बाजु घेवुन इतराना झोडपतो. त्यासाठी ठेवणीतल्या मराठी शब्दांचा वापर करुन अनवट मराठी शब्द जनमानसात रुजवतो.
५) कोणता तरी विचित्र मुद्दा लावुन धरतो. इतर सदस्यांना उबग येईतो त्याचे
समर्थन करतो. मग लोक वैतागुन प्रतिवाद करतात. एकुण मराठीचा वापर वाढतो.
६) शुद्धलेखन फाट्यावर मारतो. मग आपोआप आपले लेखन सामान्य जनतेला आपलेसे वाटते. मराठीचा प्रसार होतो.
७) प्रत्येक नव्या सदस्याला सुरवातीला आपल्या कच्छपि लावण्याचा प्रयत्न करतो. तो नाही बधला तर त्याला प्रतिस्पर्ध्याच्या कंपुत ढकलतो. मग त्याला जिकडे तिकडे पायात पाय घालुन पाडतो.
८) फालतु आणि तद्दन बकवास लेखन करतो, काथ्याकुट टाकतो. लोक आणि वैतागाने आणि मग चेष्टा करायच्या उद्देशाने चिक्कार प्रतिसाद टाकतात. तेव्हढीच मायबोलीची सेवा घडते.
९) त्या आपल्याला अजिबात न कळणार्या विषयांवर पाने भरुन प्रतिसाद देतो.
१०) .................................

इतरही अनेक गोष्टी मी मराठीच्या विकासासाठी करतो. पण त्या जाहिर लिहिण्याच्या लायकीच्या
नसल्याने टिंब टिंब टाकली आहेत.

(वरील लेखातील मी हि कोणी एकच व्यक्ती नसुन त्या अनेक व्यक्ती आहेत. त्या कोण ते ज्याने त्याने समजून घ्यावे) ;)

भाषासद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

यन्ना _रास्कला's picture

13 Jun 2009 - 6:03 pm | यन्ना _रास्कला

शुद्धलेखन फाट्यावर मारतो. मग आपोआप आपले लेखन सामान्य जनतेला आपलेसे वाटते. मराठीचा प्रसार होतो.

खुल्ला काय ते नाव घेवुन बोला. आस आडुन आडुन बोलु नका.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

Nile's picture

13 Jun 2009 - 6:16 pm | Nile

ROFL! LM**!!! I am your fan yanna anna! ;)

गुळांबा's picture

13 Jun 2009 - 6:34 pm | गुळांबा

खुल्ला काय ते नाव घेवुन बोला. आस आडुन आडुन बोलु नका.

नाव न घेण्यानं पण लोक दुखावतात. नाव घेतलं तर जगबुडी होईल बापु. पण असले आचरट प्रकार थांबावेत असे मनापासुन वाटते म्हणुन आज नाईलाजानं लिहितोय.

पर्नल नेने मराठे's picture

13 Jun 2009 - 6:06 pm | पर्नल नेने मराठे

वरील लेखातील मी हि कोणी एकच व्यक्ती नसुन त्या अनेक व्यक्ती आहेत. त्या कोण ते ज्याने त्याने समजून घ्यावे)

:S
चुचु

टारझन's picture

13 Jun 2009 - 6:23 pm | टारझन

"तुम्ही मराठीसाठी काय करता ? " अशा आषयांचे काथ्याकुट पाडतो !!!!
यावर चर्चा होउन मराठी चर्चा पुढे जाते आणि मराठी माणूस जागेवरच रहातो

- टारांबा

गुळांबा's picture

13 Jun 2009 - 6:30 pm | गुळांबा

"तुम्ही मराठीसाठी काय करता ? " अशा आषयांचे काथ्याकुट पाडतो !!!!

मी तर "जनातलं मनातलं" या सदरात लिहिलेलं आहे. :)

मराठी चर्चा पुढे जाते

हि मराठी चर्चा काय भानगड आहे? :-/

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jun 2009 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही मराठीसाठी काहि करत नाही.

ती मराठी आहे ना ती स्वतःला फार शहाणी समजते आणी स्वतःच्या अगम्य भाषेत काय काय बडबड करते.

त्यात आज लेख लिहिल्यापासुन तर ती हवेतच आहे. हुह !!

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:29 pm | अवलिया

~X(
अरे ती मराठे ! =))
हे मराठीविषयी विचारत आहेत <:P

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

पर्नल नेने मराठे's picture

13 Jun 2009 - 6:30 pm | पर्नल नेने मराठे

काय चल्लय रे
चुचु

Nile's picture

13 Jun 2009 - 6:34 pm | Nile

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) च्यायला आज हसुन हसुन मुरकुंडी आहे!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jun 2009 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार

मराठे नावाच्या मुलाचा राग आला की तो = मराठ्या

मराठे नावाच्या मुलीचा राग आला तर ती = मराठी

कळले का नॅन्स ? Now U Understood ? Hell !

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:40 pm | अवलिया

वा रे पराठ्या !!!
=))
=)) =))
=))

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

टारझन's picture

13 Jun 2009 - 7:37 pm | टारझन

कळले का नॅन्स ? Now U Understood ? Hell !

how cheap english , you people don't know how to speak english. That is such a low ! Raj Kumar , better you go and learn some english !!
U understood ? Raje will understand it anyways =))

~ फालुदा

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:40 pm | अवलिया

वा रे पराठ्या !!!
=))
=)) =))
=))

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

पर्नल नेने मराठे's picture

13 Jun 2009 - 6:45 pm | पर्नल नेने मराठे

:| चुचु

बाकरवडी's picture

13 Jun 2009 - 8:20 pm | बाकरवडी

=)) =)) =))

:B :B :B बाकरवडी :B :B :B

तिमा's picture

13 Jun 2009 - 7:18 pm | तिमा

आम्ही रोज जेवताना साखरांबा न खाता (कारण साखर परदेशी ) गुळांबा खातो(जो मराठी घरांत पूर्वी जास्त वापरत). असे करुन आम्ही केवळ मराठीसाठीच नाही तर देशासाठीही काही करतो. मेथांब्याला स्पर्शही करत नाही.
मुंबईत वावरताना चुकुनही मराठी बोलत नाही, उलट आपण हिंदी भाषिक आहोत असे भासवून इतर, मराठी लोकांविषयी काय बोलतात ते गनिमीकाव्याने ऐकतो आणि कोणी वाईट बोलत असेल तर त्यांची 'राजसाहेबांकडे' कागाळी करतो.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

Nile's picture

13 Jun 2009 - 7:20 pm | Nile

=))

मेथांब्याला स्पर्शही करत नाही.

याचं पण कारण सांगा! >:)

गुळांबा's picture

13 Jun 2009 - 7:29 pm | गुळांबा

ती कशी काय? उस इथलाच ना?

टारझन's picture

13 Jun 2009 - 7:33 pm | टारझन

त्यांना "सागर परदेशी" म्हणायचं असाव काय ?

ऍडीजोशी's picture

14 Jun 2009 - 8:48 am | ऍडीजोशी (not verified)

असे धागे काढत नाही.

विनायक प्रभू's picture

14 Jun 2009 - 8:53 am | विनायक प्रभू

मी माझे सर्व 'व्यवहार' मराठीतुन करतो.

प्रशु's picture

14 Jun 2009 - 9:03 am | प्रशु

मी ए. टी. म. मध्ये सुद्धा मराठीच वापरतो.

नीधप's picture

14 Jun 2009 - 10:20 am | नीधप

त्याने मराठीचं संवर्धन कसं होतं?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

यन्ना _रास्कला's picture

14 Jun 2009 - 10:01 am | यन्ना _रास्कला

अनेक आयडी काढुन स्वत:च्याच लेखांवर वादग्रस्त प्रतिसाद देतो.

जस्त करुन (कोक्नी) बायकांच आयडी का? :-/

चुन्ना _चास्क्ला
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

मराठमोळा's picture

14 Jun 2009 - 12:19 pm | मराठमोळा

तुम्ही मराठीसाठी काय करता ?

कुणी मराठीसाठी काही करताना दिसला की त्याच्या तंगड्या खेचतो, त्याने आम्ही मराठी आहोत हे सिद्ध होते.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विसोबा खेचर's picture

15 Jun 2009 - 8:05 am | विसोबा खेचर

५) कोणता तरी विचित्र मुद्दा लावुन धरतो. इतर सदस्यांना उबग येईतो त्याचे समर्थन करतो. मग लोक वैतागुन प्रतिवाद करतात. एकुण मराठीचा वापर वाढतो.

६) शुद्धलेखन फाट्यावर मारतो. मग आपोआप आपले लेखन सामान्य जनतेला आपलेसे वाटते. मराठीचा प्रसार होतो.

फालतु आणि तद्दन बकवास लेखन करतो,

मी वरील तीन गोष्टी करतो..! :)

तात्या.

प्रसाद लेले's picture

15 Jun 2009 - 8:35 am | प्रसाद लेले

मराठीतुन शिव्या मारतो हा हा हाहा

मराठी_माणूस's picture

15 Jun 2009 - 8:55 am | मराठी_माणूस

टेलिमार्केटिंग वाल्यांशी मराठित बोलतो