वाचलंच पाहिजे असं काही- अलिप्त द्रुष्टिकोनातून

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
13 Jun 2009 - 6:35 am

भारत हा शेतिप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ७०% शेतिवरच अवलंबून आहे. पण एखाद्या अर्थ तज्ज्ञाच्या नजरेने पाहिले तर अर्थशास्त्राचे अजुनही बरेच पैलु असतात. अशाच काही पैलूंवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे नामांकित अर्थ तज्ज्ञ, २००४ ते २००९ या काळात भारताचे अर्थ मन्त्री राहिलेले आणि सध्याच्या युपिए सरकारमध्ये ग्रुहमन्त्री असणार्‍या पी. चिदंबरम यांच "अलिप्त द्रुष्टिकोनातून" हे पुस्तक.

पुस्तकाच्या मुखप्रुश्ठावर पी. चिदंबरम यांचं अतिशय प्रसन्न हसरं चित्र आहे. आणि "चांगले अर्थशास्त्र प्रत्येकासाटीच चांगली कामगिरी करणारे असते" ही टॅग लाईन आहे. चिदंबरम यांनी एन्.डी.ए. सरकार सत्तेत असताना २००१ ते २००४ या काळात ईंडियन एक्सप्रेस आणि फायनान्शियल एक्सप्रेस मध्ये साप्ताहिक स्तंभलेखन केले होते. प्रस्तुत पुस्तक हे या सर्व लेखांचा एकत्रित संग्रह आहे. मूळ ईंग्रजी पुस्तकाचा अनुवाद शारदा साठे यांनी केला आहे.

पुस्तकामध्ये चिदंबरम यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाशी निगडित शेति, जागतिक व्यापार संघटना, परकीय गुंतवणूक, अर्थमंत्री, अंदाजपत्रक, वित्तिय धोरण, नैतिकता आणि धोरण, राष्ट्रीक्रुत उद्योग खाजगी कंपन्यांसाठी खुले करणे, धोरणे आणि प्रशासन, कर आकारणी, राजकारण आणि प्रशासन, राजकारण, निवडणुका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणापासून दूर अशा १५ विविध विषयांच्या अंतर्गत बरेच मुद्दे मांडले आहेत.

पलनियप्पन चिदंबरम यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगी असलेला विनम्रपणा आणि साधेपणा. पण तरीही त्यांचा अर्थशास्त्राचा असलेला प्रचंड अभ्यास आणि सखोल निरिक्षण यामुळे त्यांच्या वागण्यात अतिशय सुस्पष्ट आणि परखडपणा आहे. त्यांच्या सर्व लेखांमधूनही हेच गूण अधोरेखित होतात. त्यांची भविष्याकडे पाहण्याची नजर किती सुक्ष्म आणि व्यवस्थित आहे हे आपण त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात पाहिलंच आहे. हे सर्व लेख लिहीताना काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्ष होता. पण म्हणून चिदंबरम यांनी लेखांमधुन एन.डी.ए. वर फक्त टीकाच केली आहे असे नाही तर जिथे वाटलं तिथे जसवंत सिंग, अरूण जेटली यांच्या धोरणांचे कौतुक केलेले आहे. तर कारगिल प्रकरणावरून तत्कालिन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या वर त्यांच्या निष्क्रीयतेचे पुरावे दाखवून टीका सुद्धा केलेली आहे.

एकूण पाहता हे पुस्तक अतिशय वाचनिय आहे. काही ठिकाणी थोडं कंटाळवाणं वाटतं पण बाकी अत्यंत वाचनिय. अर्थशास्त्रामध्ये रस असणार्‍या प्रत्येकाने वाचायला हरकत नाही.

अर्थकारणविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:52 am | अवलिया

त्यांची भविष्याकडे पाहण्याची नजर किती सुक्ष्म आणि व्यवस्थित आहे हे आपण त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात पाहिलंच आहे.

फार म्हणजे फार आवडले हे वाक्य !!!!! :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

कपिल काळे's picture

13 Jun 2009 - 2:15 pm | कपिल काळे

चिदंबरम हे अर्थमंत्री होते, ते अर्थतज्ञ होते किंवा आहेत हे "प्रथमच" समजले.
"त्यांची भविष्याकडे पाहण्याची नजर किती सुक्ष्म आणि व्यवस्थित आहे हे आपण त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात पाहिलंच आहे""

हे वाक्य मात्र अवलियाप्रमाणे आवडलं . अतिश्य हुच्च दर्जाचे वाक्य.

नानबा's picture

13 Jun 2009 - 7:28 pm | नानबा

हो ना???? त्यांच्या कार्याबद्दल फारसं न बोलणंच ईष्ट..... पण पुस्तक वाचल्यावर मनात एक तुच्छ शंका आली..... जर जसवंत सिंगांच्या इतक्या गोष्टी यांन्ना खटकल्या, तर त्या गोष्टींचं निराकरण त्यांनी स्वतः अर्थ मंत्री असताना का नाही केलं???

"आम्ही कोण म्हणुनि काय पुसता आम्ही असू लाडके"

वेताळ's picture

13 Jun 2009 - 8:25 pm | वेताळ

लुंगी नेसली की साधेपणा होय? बाकी त्याच्या पत्नी च्या कंपनीला ह्याच्या कारकिर्दीत फायदा होत असे काही नतदष्ट्र लोक अफवा पसरत असत.त्यावरील टिका देखिल ते सुक्ष्मपणे घेत.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ