खरे म्हट्ले तर माझे काम झाले होते. कसे झाले कुणामुळे झाले हे पण माहीत नव्हते. निघता निघता विचार आला चला आणखी काही बेरीज होते का?
माझी मोठी बहीण तशी शेठाणी. भावोजींचा मोठा प्रेस होता प्रभादेवीला. मार्मिक च्या बाजुला. दसर्याच्या पुजेला ह्या प्रेस वर जाणे ही एक पर्वणीच असायची. पुजा झाल्यानंतर भावोजी पाकीटातुन रुपये १०१ चा बोनस देत असत. सत्तरीत १०१ रक्कम फार मोठी होती. अशाच एका पुजेला गेलो होतो. ताई आणि आई च्या गप्पा सुरु झाल्या होत्या. ताई तशी फार कनवाळू. आईला तीने कुणाला तरी मदत कशी केली ह्या बाबत बोलत होती. ताईचे बोलुन संपल्यावर आई म्हणाली,'"हे बघ , आपण कधीच कुणाला मदत करु शकत नाही. मदत करणारा एकच तो( आकाशाकडे बोट दाखवुन). माणसाच्या जन्माला येऊन आपण एकच करु शकतो, ते म्हणजे बेरीज. तु केलीस ती सुखाची बेरीज. आणि हीच बेरीज कुठल्या स्वरुपात तुझ्या आयुष्यात बेरीज करेल हे तुला कळणारच नाही."
_________________________________________________________
चिरंजीवाची ४ थी सेमिस्टर संपल्यावर आय.पी.टी. ची मागणी आली.सुट्टीमधे वेगवेगळया फार्मा कंपनीत बिनपगारी एक महीन्याची इंटर्नशिप. मी ही स्वतः इंटर्नशिप कशी मिळवायची हे चिरंजीवाना समजवले. कुटूंबाने भुवया वक्राकृती केल्यावर लगेच आवरते घेतले.
एक दिवस खर्च करुन ग्लॅक्सो मधे ही इंटर्नशिप मिळवुन दीली. ह्या वर्षी ६ वी सेमिसटर संपल्यावर आपणच हात पाय हलवुन चिरंजीवाने देवनार मधील एका कंपनीत एका महिन्याकरता ही नोकरी मिळवली. कॉलेज सुरु व्हायला अजुनही एक महिना होता. अजुन एक ठीकाणी अनुभव घ्यायची तयारी चिरंजीवानी दाखवली. हल्ली हे एवढे सोपे राहीलेले नाही. पण नशिबाने एका मोठ्या फार्मा कंपनीत ही संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. मुलाखती साठी बोलवणे आले. मुंबईच्या ह्या भागाची चिरंजीवानी फारशी माहीती नव्हती. मी आणि बायकोने पण बरोबर जायचे ठरवले. ११ वाजता पोचलो. अवाढव्य रिसेप्शन मधे सुमारे १५ मिनिटे बसल्यानंतर मुलाखती साठी चिरंजीवाना बोलवणे आले.
४ थ्या माळ्यावर मुलाखात होती. साधारण ५ मिनिटाने रिसेप्शनिस्ट ने मला हाक मारुन ५ व्या माळ्यावर जायला सांगीतले. आता हा प्रकार काय ते मला कळेना. ५ व्या माळ्यावर पोचल्यावर वाईस प्रेसिडेंट च्या ऑफिसमधे बोलावणे आले. बघतो तर चिरंजीव त्या ऑफिसमधे होते. आता मात्र आश्चर्यचकित होण्या वाचुन पर्याय नव्हता. ऑफिस मधे पोचल्यावर साहेबांसमोर स्थानापन्न झालो. मला "हलो " करुन साहेबाने असिस्टंट ला बोलवले आणि म्हणाले, " ह्याला सर्व डीपार्ट्मेंटल हेड्स कडे घेउन जा. आणि आपल्या कामाचे स्वरुप समजाउन सांगा."(मुलाखत केंव्हा झाली?- मला पडलेला प्रष्न)
चिरंजीव बाहेर गेल्यावर सुमारे एक तास साहेब माझ्याकडे गप्पा मारत होते. अगदी आपल्या शिक्षणा बद्दल सुद्धा सुमारे १५ मिनिटे बोलले.
११ वीत कॉलेज मधे गेल्यावर वातावरणातल्या फरकामुळे कसे वाटोळे झाले. नंतर सावरल्यावर कसे करीयर झाले वगैरे. भारतामधील ६ नंबरच्या कंपनीचा साहेब त्याची कर्मकहाणी माझ्यासमोर का मांडत होत हा प्रश्न अनुत्तरीतच होता. मी पण माझे काही अनुभव साहेबांसमोर मांडले( मिपावरच्या ९८ लेखांपैकी ४). वेळ कसा गेला हे कळलेच नाही. सुमारे एका तासाने चिरंजीव परत आले.
"You are starting from Monday. First week will be on the field. or otherwise you will think that farma is all about A.C Office."
चिरंजीवाने मान डोलावली. निघता निघता विचार आला. तो मी बोलुन दाखवला साहेबांना. आणि मंजुरी पण दीली साहेबाने.
आता दरवर्षी सुमारे चार विद्यार्थ्याना मी ह्या कंपनीत आय्.पी.टी. ला पाठवु शकणार होतो.
परत येत असताना चिरंजीवाने १ तासाची रनींग कॉमेंट्री दीली. कुठल्या तरी 'तेजा सेठचा" मुलगा अमेरिकेत शिकुन आल्यावर आपल्या बापाच्या कंपनीत पहिल्या दिवशी आल्यावरचा हिंदी सिनेमातला सीन होता तो. अजुनही मी दुग्ध्यात होतो. हे असे कसे झाले? बायकोला बोलुन दाखवले.
" अहो, तुम्ही यायच्या १० मिनिटे अगोदर एक मॅडम आल्या होत्या. त्या म्हणाल्या, सरांना सांगा, त्याचे काम झाले आहे म्हणुन." बायको
"नाव तरी विचारायचेस."मी
" मला वाटले तुम्ही ओळखत असाल. आपण मघाशी बसलो होतो तेंव्हा सुद्धा त्या आल्या होत्या. तुम्ही पेपर वाचत होतात"- बायको.
जाता जाता: "बाबा मी माझ्या एका कलिग ला रेकमेंड करु? हॉस्टेल मधे राहते. सातार्याकडची आहे. टॉपर आहे. घरची लोक अशिक्षित आहेत. त्यांना ह्या सर्वाचे महत्व माहीत नाही." चिरंजीव
मुद्दाम कर. बेरीज करायला कचीच घाबरु नकोस्.-मी
प्रतिक्रिया
12 Jun 2009 - 9:26 am | एकलव्य
आवडली...
12 Jun 2009 - 9:32 pm | टारझन
चिरंजीव सिलेक्ट झाल्याचं कळलं .. पण असं काय झालं की तुम्ही चार लोकं रिकमेंड करू शकता ? सुमारे ४ वेळा खालून वरून वाचून समजलं नाय पामराला ..
- (पांव जमीन पर) टार्झन अवस्थी
13 Jun 2009 - 7:19 am | विनायक प्रभू
कोण तो अनामिक आहे ज्याने साहेबांपर्यंत माझ्या कामाचे स्वरुप पोचवले ते अजुनसुद्धा कळाले नाही.
ते स्वरुप कळाल्यावर साहेबांनी माझा रेकमेंडेशन चा पर्याय स्विकारला.
13 Jun 2009 - 10:03 am | टारझन
जर तुमच्याकामाकडे बघून तुम्हाला रेकमंडेशनची ऑफर केली असेल तर त्याचाच फायदा आपल्या चिरंजीवांना झाला असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, किंबहुना त्यामुळे त्यास आमण स्वःबळावर काही करू शकतो ह्यावरील त्याचा विष्वास तर उडणार नाही ना ? गुरूजी ... त्याचा "अभिषेक बच्चन" होऊ नये असं वाटतं :)
-टारसुनित
13 Jun 2009 - 10:09 am | दशानन
+१
हेच म्हणतो....
थोडेसं नवीन !
13 Jun 2009 - 11:14 am | विनायक प्रभू
ह्या बाबतीत काहीही काळजी नाही.
बाप हा आपला 'वेठबिगार' आहे ह्या बाबतीत त्याच्या मनात काहीही शंका नाही.
12 Jun 2009 - 10:00 am | सहज
चिरंजीवांचे अभिनंदन!
प्रभुसरांची बेरीज मोजायची झाली तर कॅल्युलेटर, संगणक पाहीजे. :-)
12 Jun 2009 - 10:20 am | अवलिया
:)
--अवलिया
12 Jun 2009 - 11:25 am | निखिल देशपांडे
माणसाच्या जन्माला येऊन आपण एकच करु शकतो, ते म्हणजे बेरीज
वा मास्तर काय वाक्य आहे..
बेरिज मस्तच जमली आहे हो...
==निखिल
12 Jun 2009 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार
गुर्जींचे गणित आपल्याला पहिल्यापासुनच आवडते :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
12 Jun 2009 - 12:33 pm | स्वाती दिनेश
माणसाच्या जन्माला येऊन आपण एकच करु शकतो, ते म्हणजे बेरीज
वा.. बेरीज आवडली.
स्वाती
12 Jun 2009 - 12:41 pm | नितिन थत्ते
आवडले.
सरांची बेरीज आता किती आकडी झाली असेल? 8>
खराटा
(रंग माझा वेगळा)
12 Jun 2009 - 1:17 pm | डॉ.प्रसाद दाढे
सरांचे व त्यांच्या मुलाचे (व त्यांच्या बॉसचेही) हार्दिक अभिनंदन !
खुद के साथ बाता: मास्तर पूर्वी गुणाकार-भागाकारावर ल्ह्यायचे..हे काय नवीन? (बेरिज नंतर होतेच म्हणा..)
12 Jun 2009 - 2:36 pm | रामदास
उत्तर ध्रुवावर जाताना बर्फात अन्नाचे साठे पेरून गिर्यारोहक पुढे जातात .
(असं कधीतरी वाचलं होतं.)
उतरून परत येताना ते साठे हाताशी येतात.(जीव वाचवतात.)
मला वाटतं की बेरजेचं गणित असचं काहीसं असावं.
12 Jun 2009 - 3:05 pm | सर्वसाक्षी
बेरजेचे हे सूत्र उत्तम समजावलेत.
12 Jun 2009 - 3:14 pm | मराठमोळा
बेरजेचे हे सूत्र उत्तम समजावलेत.
सहमत आहे. बेरजेचे गणित निराळे आणी नविन.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
12 Jun 2009 - 4:49 pm | लिखाळ
:) मस्त !!
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
12 Jun 2009 - 4:55 pm | अभिज्ञ
Be good with the people you meet when you are going high, because you will meet the same people when falling.
हे वाक्य आठवले.
बाकी अनुभवकथन उत्तम.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
12 Jun 2009 - 5:20 pm | मदनबाण
माणसाच्या जन्माला येऊन आपण एकच करु शकतो, ते म्हणजे बेरीज
बेरजेच महत्व खरचं खुप मोठ आहे !!!
( ∞ )
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
12 Jun 2009 - 6:47 pm | रेवती
आपल्या लेखाने भारावून गेले आहे. आपली कुठतरी, कधीतरी केलेली बेरीज अशी फळाला आली. चिरंजीवांकडे आपण आपले विचार सहजपणे, कृतीतूनच दिले आहेत.
रेवती
12 Jun 2009 - 6:54 pm | चतुरंग
अंतर्मुख झालो. मीच मदत का करु? ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आईनं सांगितलं, ते तुम्ही कृतीतून तुमच्या चिरंजीवांपर्यंत पोचवलंत आणि बेरीज पुढे चालू राहिली! धन्य आहात! :)
(आम्ही काय कुणाचे खातो रे| तो राम आम्हाला देतो रे||)
(+)चतुरंग
12 Jun 2009 - 9:03 pm | क्रान्ति
आवडली. सहजपणे दिलेला मूलमंत्र खासच! चिरंजीवांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
12 Jun 2009 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पॉझिटीव्ह लेख आवडला. अभिचे अभिनंदन.