रूपक ३ ( तात्पर्य)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
2 Jun 2009 - 2:43 pm

प्रत्येक गोष्टीला एक तात्पर्य असते.
ते त्या कथेतल्या एखाद्या पात्राला लागू पडते आणि त्यापासून बोध घ्यावा अशी अपेक्षा असते.
प्रत्येक तात्पर्याचे एक परस्पेक्टीव्ह असते.
कथेतल्या पात्रानुरूप ते बदलत असते. त्यानुसार तात्पर्यही बदलत असते.
ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपणा सर्वानाच माहित आहे.
तीच ती .......एकदा ससा आणि कासवाने शर्यत लावली...आणि भरभर धावणारा ससा मध्येच दिसलेले गवत खाऊन झोपी गेला . कासव न थकता संथपणे चालतच राहिले आणि अघटीत घडले. कासव शर्यत जिंकले.
त्या गोष्टीतले आपल्याला माहित असणारे तात्पर्य म्हणजे. "स्लो ऍन्ड स्टेडी विन्स द रेस" पण हे झाले कासवाच्या दृष्टीकोणातून.
गोष्टीतल्या सशाला कोणताच बोध दिलेला नाही.
आपण सशाच्या दृष्टीकोणातून पाहिले तर त्याच्या काय चुका झाल्या ते कळते.
सर्वप्रथम त्याने शर्यत ही महत्वाची प्रायोरीटी असताना ती मध्येच बदलली आणि हिरवे लुसलुशीत गवत खाण्याला दिली. त्याहीपुढे जाऊन त्याने ताणून झोप काढली.
कथेचा फोकस बदलला की तात्पर्य बदलते.
या कथेचे तात्पर्य सशाच्या दृष्टीकोणातून असे असेल.......
"बिगीन विथ द एन्ड इन मिन्ड ऍन्ड नेव्हर चेन्ज युवर प्रायोरिटी इन बीटवीन"
अनेक जुन्या कथांचा असा वेगळा विचार केला तर नवीच तात्पर्ये बाहेर येतील. पहा एखादे नवे तात्पर्य सुचतेय का ?
असेच एक नवे तात्पर्य या कथेचेही http://misalpav.com/node/7910

कथाविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

2 Jun 2009 - 2:47 pm | अवलिया

अशाच काही कथा मी मागे दिल्या होत्या http://www.misalpav.com/node/3964#comment-57551
परत देतो :)

कथा १

ससा कासवाची शर्यत ठरते. सशाला आत्मविश्वास असतो पळत पळत जातो. एके ठिकाणी दमतो अन झोपतो. कासव हळुहळु चालत रहाते. सशाला पहाते. हळुच निघुन जाते. जिंकते.

आपल्याला आपल्या वडिलांनी अनेक वेळेस हा दाखला दिलेला असतो अन सशाप्रमाणे घाई न करता हळुहळू वागायचा सल्ला दिलेला असतो. हो ना? आता पुढील गंमत ऐका,

कथा २

ससा परत कासवाशी पैज लावतो. कासवाला आता आत्मविश्वास असतो. परत शर्यत चालु. आता ससा झोपत नाही. ठरवुन थेट जावुन पोहोचतो. कासव हळुहळु येते. रस्त्यात झोपलेला ससा दिसत नाही. येवुन पाहाते तर ससा जिंकलेला. कासव चरफडत शांत बसते.

तात्पर्य- अनुभवाने शहाणपण

आता पुढची कथा

कथा ३

कासव आता सशाशी पैज लावते. पण मार्ग कासव ठरवेल तो. ससा तयार होतो. शर्यत चालु. रस्त्यात नदी लागते. ससा थांबुन घेतो. मागाहुन कासव हळुहळू येतो. अलगद नदीत उतरतो. पलिकडे जातो. पुढे शर्यत जिंकतो. ससा हरतो.

तात्पर्य - आपले शक्तिस्थान व कमकुवत स्थान ओळखा.

कथा ४

आता ससा पुढाकार घेतो. कासवाशी मैत्रि करतो. दोघे मिळुन इतर प्राण्यांशी शर्यतीच्या पैजा लावतात अन एकत्र जिंकतात.

तात्पर्य - विना सहकार नाही उद्धार.

--अवलिया

शार्दुल's picture

2 Jun 2009 - 3:03 pm | शार्दुल

नेहा

दशानन's picture

2 Jun 2009 - 3:04 pm | दशानन

लै भारी !

थोडेसं नवीन !

जागु's picture

2 Jun 2009 - 3:10 pm | जागु

वा नविन दृष्टीकोन.

पर्नल नेने मराठे's picture

2 Jun 2009 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे

विजुभाऊ छान लेख!!!

चुचु

पर्नल नेने मराठे's picture

2 Jun 2009 - 3:29 pm | पर्नल नेने मराठे

माफ करा लेख नाहि कथा
चुचु

विनायक प्रभू's picture

2 Jun 2009 - 5:43 pm | विनायक प्रभू

सातारकर महाराजांचा विजय असो

अनंता's picture

2 Jun 2009 - 5:43 pm | अनंता

अल्लाउद्दिनला जादुई चिराग मिळाल्यावर, हळुहळू त्याला त्याच त्या कामाचा कंटाळा येऊ लागतो. मग काय एक शक्कल लढवतो..
जादुई चिराग घासण्यासाठी एक पगारी नोकर ठेवतो. कालांतराने 'तो' नोकर जादुई दिव्यासह पोबारा करतो!
अल्लाउद्दिनच्या हाती पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही.

तात्पर्य : आळसे कार्यभाग नासतो.

em>प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

क्रान्ति's picture

2 Jun 2009 - 8:09 pm | क्रान्ति

कथा, तात्पर्य आणि प्रतिसादातल्या कथाही छान.
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2009 - 8:16 pm | परिकथेतील राजकुमार

स्पेशल इजुभै इफेक्ट. मस्तच कथा.
नानाचे मार्गदर्शनही उच्चच !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

6 Jun 2009 - 2:11 pm | विसोबा खेचर

विजूभाऊ, जियो..! :)

तात्या.