कोण्या इसमाने "जीवनोन्नत्तीचे सहा सोपान" असे कायसेसे लिहुन ठेवले आहे. भाई काकांच्या गटण्याने ते तोंडपाठ केले होते म्हणे.
काल अचानक प्रदीर्घ अभ्यासान्ती मला असेच काही सोपान गवसले.
माणसे त्यांच्या स्वभावानुसार अभ्यास करत असतात. पाश्चात्य देशांत तर प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान शोधले जात.
उदा : भरभर चालण्याचे वैज्ञानीक तीन प्रकार
शास्त्रीय रित्या आळस कसा द्यावा.
जेवताना ढेकर कसा द्यावा.
घोरण्याचे शास्त्रीय फायदे ईत्यादी.
आंघोळीचेही बरेच प्रकार आहेत. उदा: सचैल स्नान / गोपिचन्द स्नान /मन्दाकिनी स्नान / काकस्नान / अंघोळीची गोळी स्नान वगैरे.
या सर्व स्नानात अत्यन्त महत्वाचे आणि अडचणीचे म्हणजे स्नान करताना पाठीला साबण लावणे. पाठीला साबण लावणे हा महत्वाचा अभ्यास आहे. माणसे आपापल्या स्वभावानुसार पाठीला साबण लावत असतात.
प्रदीर्घ अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की पाठीला साबण लावण्याचे एकूण सहा मुख्य प्रकार आहेत.
त्यांचे फायदे आणि तोटे असे:-
१) सर्वसामान्य : हाताला साबण लावून / हातात साबणाची वडी घेऊन शरीर ( हात खान्द्यावरून मागे घेऊन)गोमुखासनात वळवुन पाठीला साबण लावणे
यात पाठीला साबण लागतो परन्तु पाठ नीट चोळली जात नाही. दंड आणि हाताला व्यायाम होतो.
२) जानवे / पंचा या साबण गुंडाळुन पाठीला लावणे.
या प्रकारात साबण पाठीला लागला जातो नीट चोळलाही जातो परन्तु पंचा ओला झाल्यामुळे अंग पुसण्यासाठी नवा टॉवेल वापरावा लागतो. साबणाचे डाग पंचावर पडण्याची शक्यता असते.
३) काठीच्या टोकाला साबण लावून पाठीला लावणे.
या प्रकारात साबण नीट चोळला जातो परन्तु सदर प्रयोग साबण नवीन असतानाच करता येतो.शिवाय साबण गळुन गेल्यास पाठीला काथीने इजा होण्याचा सम्भव असतो.
४) भिन्तीला साबण चिकटवून त्यावर पाठ घासणे.
या प्रकारात पाठ मस्त रगडली जाते. साबण फार झिजल्यास नुसती भिन्तही साबणाचे काम करु शकते. हा प्रकार करताना पाठ अनेक ऍन्गल मध्ये वाकवावी लागत असल्याने पाठीच्या कण्यास मस्त व्यायाम होतो.
फार जोरात केल्यास घसरून पडण्याची भीति असते.
५) दुसर्याकडुन पाठीस साबण चोळून घेणे.
मुले किंवा पत्नी यांच्या कडून पाठीस साबण चोळून घेता येतो. पाठीस साबण व्यवस्थित लागतो.
अनुभव असा आहे की मुले आपल्या पाठीस साबण लावण्यापेक्षाही स्वतःची अंघोळ झाली की पळून जातात.
सावधानता : पत्नीने पाठीस साबण लावताना कोणत्याही विषयावर चर्चा करु नये. विषय भरकटत जातो
६)समाधानी अंघोळ : आयसो कायनेटीक अंघोळ
हा प्रकार सर्वात जास्त लोकांकडून केला जातो. यात पाठ आणि साबणाचा अजिबात सम्बन्ध येत नाही. अंघोळ करताना पाठीला साबण लावला आहे अशी भावना मनात व्यक्त करावी आणि डोक्यावरुन पाणी घ्यावे.
हे आहेत पाठीला साबण चोळण्याचे सहा मुख्य प्रकार .
जिज्ञासुनी यात भर घालावी.....
प्रतिक्रिया
25 May 2009 - 10:14 am | अवलिया
वा! मस्त !!
परंतु काही जणांना साबण लावुन घेण्यापेक्षा साबण लावण्यात जास्ती मजा वाटते त्याचे काय ? :?
तेव्हा हे तुम्ही सांगितलेले प्रकार स्वतःला साबण लावुन घ्यायचे असतील तर आहेत, ज्यांना साबण लावायचा असेल त्यांच्यासाठी पण एक मार्गदर्शनपर लेख टाकावा ही नम्र विनंती :)
--अवलिया
25 May 2009 - 10:33 am | कपिल काळे
एका रात्रीत वजन कमी नंतर मिपावरील लेखन स्वातंत्र्याचा गैरवापर बंद होइल असे वाटले होते.
पण हे प्रकार अजून सुरु आहेतच. ते ही एका वरिष्ठ सभासदाकडून ह्याचे वैषम्य वाटले.
25 May 2009 - 10:41 am | अवलिया
असहमत.
यात लेखन स्वातंत्र्याचा काय गैरवापर झाला हे समजले तर बरे होईल. प्रत्येकाची लेखनाची आवड निवड असते, तो त्याप्रमाणे लिहित असतो. वाचकांना सर्वच लेख वाचले पाहिजेत असे बंधन नाही, लेखकाचे नाव पाहुन लेख उघडायचा की नाही हा निर्णय करावा. वाचकांनी लेखकांना अमुक लिहुच नका असे जाहिररित्या सुचवु नये. वैयक्तिक संपर्कात शिव्यांची लाखोली वाहिली तरी हरकत नाही (जी मी नुकतीच विजुभाउंना व्यनीतुन घातली आहे)
--अवलिया
25 May 2009 - 10:43 am | परिकथेतील राजकुमार
वा वा उत्तम लेख.
अवांतर :- विजुभौ तुम्ही 'वरिष्ठ' कधीपासुन झाले? ;) आणी तुम्ही लेखन स्वातंत्र्याचा गैरवापर केला म्हणजे काय केलेत ?
ह्या प्रश्नांची उत्तरे माहीत असो अथवा नसो पण तुम्ही जर ती दिली नाहीत तर तुमच्याच चारोळ्यांची कडवी तुमच्याच कानावर लोंबायला लागतील.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
25 May 2009 - 10:43 am | योगी९००
मस्त लेख आहे.
अन्दाकिनी स्नान म्हणजे काय हो? आम्हाला फक्त मन्दाकिनी स्नान ठावूक आहे.
खादाडमाऊ
25 May 2009 - 10:47 am | सुनील
साबण स्वतःच्या पाठीला लावण्या / लावून घेण्यापेक्षाही दुसर्याच्या (दुसरीच्या) पाठीला साबण लावण्यात अधिक मनःशांती मिळते, असे जाणकार सांगतात! (खरे खोटे जाणकारास ठाऊक).
असो, विषय उत्तम पण अधिक खुलवता आला असता, असे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 May 2009 - 8:46 am | काळा डॉन
स ह म त
25 May 2009 - 3:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
साबणाला मधे एक आरपार भोक पाडावे. त्या मधुन एक दोरा ओवावा. उभे राहील्या नंतर पाठी पर्यंत येइल अश्या बेताने तो नहाणी घराच्या छताला टांगावा. पाठीला साबण लावावासा वाटला की उभे राहुन साबणावर पाठ घासावी. अतीशय उत्तम प्रकारे मर्दन करावे. यामधे बरेच फायदे आहेत. कोणतीही इजा व्हायचा संभव नाही, साबणाची अनावश्यक झीज होत नाही आणि या प्रकारात पाठीला साबण लावण्या साठी लग्न करायची गरज नाही आणि समजा दोघांना एकत्र आंघोळ करायची असेल तेव्हा साबणाच्या दोन्ही बाजुंना दोघेही आपापली पाठ एकाच वेळी लावु शकता, वेळ वाचतो.
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
25 May 2009 - 3:36 pm | चिरोटा
निर्मळ मन काय करील साबण!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
25 May 2009 - 3:30 pm | ऋषिकेश
हं विजुभौ एकदम पाठीला साबण वगैरे ;)
चालुद्या .. :) आम्हि वाचतोय
अवांतर: श्री. कपिल काळे यांच्याशी असहमत
(सर्वसामान्य) ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
25 May 2009 - 3:32 pm | सूहास (not verified)
एक सुटकेसच्या आकाराचा साबण घ्यावा आणी त्यावर पाठ घासावी...
सुहास
25 May 2009 - 3:37 pm | बाकरवडी
आपला कारखाना आहे का साबणाचा ?
सुट्केस साबण ............... =)) =))
(ह. घ्या.)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
25 May 2009 - 5:13 pm | सूहास (not verified)
<<<आपला कारखाना आहे का साबणाचा ?>>>
अरे हा ईतका मोठा ईश्यु झालाय तर ... टाकावा म्हणतो...
सुहास...
पेश॑ट :डॉक्टर, मला अलीकडे स॑डा*ला होत नाही..
डॉक्टर : ठीक आहे ,मग पलीकडे बसत जा....
25 May 2009 - 3:50 pm | मराठमोळा
>>एक सुटकेसच्या आकाराचा साबण घ्यावा आणी त्यावर पाठ घासावी...
=)) ~X( :O :T
काय खरं नाय...का सुटकेसलाच साबण समजुन पाठ घासावी? ;)
असो, सगळ्याच लोकांचा हात पाठीपर्यंत पोहोचत नाही असे नाही. त्यामुळे कोणत्याही पर्यायाची आवश्यकता नाही.
पाठ घासायचा ब्रशही मिळतो बाजारात. आधी ब्रश साबणावर घासावा आणी मग पाठ घासावी. सोपा पर्याय.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 May 2009 - 5:39 pm | मीनल
काय बाई म्हणावे आता? दुसरे सर्व विषय संपले का लिहायला? :))
मीनल.
25 May 2009 - 5:41 pm | Suhas Narane
साबण क चोलावा.
घेत्ल साबन आन लावल्ल.
25 May 2009 - 6:12 pm | स्वानन्द
हा हा हा... एक नंबर!! हसून हसून पाठ ...सॉरी पोट दुखायला लागले!
25 May 2009 - 6:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या आयसो-कायनेटीक शब्दाचा अर्थ अंमळ कळला तर बरं होईल!
25 May 2009 - 7:52 pm | रामदास
परीणाम ....एका दिवसात.
25 May 2009 - 9:23 pm | विनायक प्रभू
कुणाच्या वो रामदास भावजी.
अशा सर्व सामान्यांच्या जिवनातले प्रश्न मांडत राहा विजुभौ.
25 May 2009 - 10:53 pm | हरकाम्या
मी पाठिला साबण लावणारा रोबो तय्यार केला आहे . मिपावर लवकरच त्याची जाहिरात येइल,
सर्व मिपाकरांनी तोपर्यंत आपल्या पाठि तशाच ठेवाव्यात ही आग्रेवाची विनंती .
आपला हरकाम्या.
26 May 2009 - 12:01 am | ऋषिकेश
का बरे? तुमचा रोबो काहि ठराविक दिवस न धुतलेल्याच पाठी चोळतो का?
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषधं घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
26 May 2009 - 12:40 am | सुहास
आम्ही पुण्यात "शास्त्रशुध्द आंघोळ कशी करावी?" हे शिकवण्यासाठी आंघोळीचे क्लासेस काढणार आहोत (महिलांसाठी स्वतंत्र कक्ष व स्वतंत्र शिक्षिका असेल), त्याच्या लेखी पाठ्यक्रमात हा वरील धडा समाविष्ट करायचा आमचा मानस आहे, अर्थात तुमचा होकार असेल तरच.. योग्य मानपान केला जाईल.. ;)
(ह.घ्या.)
बाकी लेख मस्तच आहे
--सुहास
29 May 2009 - 10:47 pm | १.५ शहाणा
एखादी चांगली पाठ घासणारी बोलवा व पाठीचे धिरडे करवुन घ्या