रूपक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 May 2009 - 11:55 am

भारतीय भाषांत संस्कृत मधून आलेल्या अनेक कथा आहेत. त्यातले संदर्भ बदलत असतात मतीतार्थ बदलत असतात. जुने उपदेश जाऊन त्यातून नवीनच काही निघत असते.
हितोपदेशात अशीच एक गोष्ट आहे
एक माकड पावसात भिजले. त्याला थन्डी वाजू लागली. ते कुडकुडु लागले
माकडाला कोठून तरी त्याला एक काजवा सापडला
थन्डी कमी व्हावी म्हणून माकडाने काही लाकडे गोळा केली. त्यावर त्याने तो काजवा ठेवला
आणि विस्तव पेटून जाळ व्हावा म्हणून माकड तो काजवा जोरात फुंकू लागले.
काजव्याने विस्तव पेटत नाही हे माकडाच्या लक्षात येत नव्हते,
तेथेच बसलेल्या एका चिमणीने माकडाच्या ते निदर्शनास आणले देखील.
माकडाने चिमणीकडे लक्ष दिले नाही.
विस्तव पेटावा म्हणून त्या लाकडाच्या ढिगार्‍यात ठेवलेल्या काजव्यावर ते जोरात फुंकर मारु लागले.
चिमणीला रहावले नाही. ती माकडाच्या मूर्खपणाला हसू लागली. म्हणाली "अरे माकडा काजव्याने का कधी विस्तव पेटतो कधी?"
माकड अगोदरच थन्डीने हैराण झाले होते. ते चिमणीवर चिडले. माकडाने चिमणीला रागारागने धरून मारून टाकले.
...........................................................................................................................................
हितोपदेशात चिमणीला सल्ला दिला आहे: मूर्खाना उपदेश करु नये.
नवे फाईन्डिंगः काजव्याला या गोष्टीत काहीच सल्ला दिलेला नाही
काजव्याने या गोष्टीतून घेतलेला सल्ला :
If you think that your potentials are not utilised properly; then you must be working under a MONKEY"
अवांतर
If you are your own boss; then this is strongly applicable to you.

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2009 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

वाह विजुभौ !
नवा 'विजोपदेश' आवडला हो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

25 May 2009 - 12:23 pm | अवलिया

वा! मस्त !!

(चिमणा) अवलिया

आनंदयात्री's picture

25 May 2009 - 2:10 pm | आनंदयात्री

ह्म्म छान !! आवडला हितोपदेश ..

-
(चंदेरी चिमणा) आनंदयात्री

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2009 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला हितोपदेश ..

-दिलीप बिरुटे
(चमचमणारा काजवा)

धमाल मुलगा's picture

25 May 2009 - 5:30 pm | धमाल मुलगा

आवडला हितोपदेश.
जय बाबा विजुभाऊ सातारकर!

-(भैताड माकड) ध.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

कपिल काळे's picture

25 May 2009 - 5:19 pm | कपिल काळे

खरं तर अवलियाने इथे सांगितल्याप्रमाणे लेखकाचे नाव पाहून हा धागा उघडणारच नव्हतो. पण लेखकाने खरड टाकून धाग्याचा दुवा दिला.

ह्यापुढे लेखक- विजुभाउ आढल्यास, असा कोणताही धागा न वाचणे. हा बोध .

विजुभाऊ's picture

25 May 2009 - 5:24 pm | विजुभाऊ

ह्यापुढे लेखक- विजुभाउ आढल्यास, असा कोणताही धागा न वाचणे. हा बोध .
आग्रह नाही. रूपक कथा समजत नाही. असो. असते एकेकाची मती
तुमचे मत व्यनीतून व्यक्त करता आले असते. असो.

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

अवलिया's picture

25 May 2009 - 5:24 pm | अवलिया

हा हा हा
माझा सल्ला तुम्ही मानाल असे वाटले नव्हते :)
धन्यवाद.

ओ विजुभौ,
लेखकाचे काम लेख लिहुन प्रकाशित करायचे.
त्याला कुणी वाचो वा ना वाचो, प्रतिसाद देवो वा ना देवो वाचकांची इच्छा.
लेख लिहुन प्रकाशित झाला की गंगार्पण. काहीही होवो.
उगाच खरडीतुन लिंका देवुन लोकांना त्रास नका देवु बरे :)

मात्र मी सगळे लेख कविता वाचत नसल्याने माझ्या खरडवहीत लिंक टाकत चला :)
ए़खादा लेख नीट जमला नाही म्हणुन मी लेखकाला वांझ समजत नाही.
येतो एखादा खराब लेख ... चलता है... येवु द्या अजुन सुंदर सुंदर लेखन ! :)
लिहित रहा !!!!

--अवलिया

मदनबाण's picture

26 May 2009 - 2:18 am | मदनबाण

रुपक कथा आवडली...

(चांगल्या गोष्टी मधुन बोध घेण्यास काय हरकत आहे ...)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विनायक प्रभू's picture

26 May 2009 - 6:40 am | विनायक प्रभू

हा लेख कुणाला उल्लेखुन बरे?
असंख्य वेळेला मेलेला
चिमणा प्रभु