सकाळी सकाळी बायकोने बड्डे 'अमृत' केला आणि लक्षात आले की के.ई.एम. मधे सकाळी ७.१५ पहिले ट्यांहां केलेल्याला ५४ पुर्ण आली. डॉक्टरने उलटा लटकवुन पाठीवर मारल्यावर किचीत रडलो होतो असे आई म्हणायची. म्हणजे निषेधापुरताच.
सिंह चालताना मागे वळुन बघतो त्याला म्हणतो त्याला सिंहावलोकन म्हणतात. तस कुत्र पण चालताना मागे वळुन बघते. त्यामुळे गेल्या ५४ वर्षात काय मिळाले आणि काय गमावले ह्याच्या हिशोबाला मी 'कुत्र्यावलोकन'च म्हणेन. उगाच साला आपल्याला सिंह समजणार्यापैकी मी नव्हे.
_____________________________________________________
" काल तुम्ही स्वःतशी जरा जास्तच हसत होतात, खरे सांगा, कुणाची खेचलीत"? बायको म्हणाली
आता तीला सर्व सांगणे भागच होते. ते झाले असे. बड्डे च्या आदल्या दिवशी संत बिजुभौ सातारकर महाराज बाबा ह्यांच्या बरोबर हॉटेल सिंधुदुर्ग मधे सत्संग झाला. तंदुरी चिकन, व सुरमई चे तुकडे मोडता मोडता बरीच चर्चा झाली. जेवण संपवुन
रानडे रोडवरुन चालत येत असताना महा महीम 'पिवळा डांबिस' ह्यांचा फोन आला. सुरवातीचे हाय हलो झाल्यावर फोन लगेच फोन बाबा महाराजाना दिला. 'सिनिऑरीटी' महत्वाची. त्यां दोघांचे सुसंवाद चालु असताना दोन महीला बाजुला खरेदी करत असताना एकमेकात बोलत होत्या ते सगळे कानावर आले आणि हहपुवा झाली. नंतर फोनवर माझा नंबर आला. सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. आता मिपावर असा कोणता सदस्य आहे की ज्याला ह्या डांबिसाबरोबर बोलुन आनंद वाटणार नाही?
एकंदरीत आनंदाच्या झोपाळ्यावर असल्यामुळे लोकल मधे केंव्हा आणि कसा चढलो ते कळालेच नाही. डबा अक्षरशः सांडत होता.
गाडी माटुंग्याला पोचता पोचता मनातला २५ जागा झाला. म्हट्ले करुया गंमत. मान साधारण १६० कोनात फिरवत, चेहेरा निर्विकार ठेवत, ह्या कोनात जे आले त्यांच्याकडे डोळ्यात बघत ( नक्की बघीतले का नाही? ह्याचा संशय ठेवत) जरा जोरात म्हणालो, काय झाल?
आता या झाल चा उच्चार नेमका झ न करता झ आणि अ च्या मधला केला.
काय सागु, ह्या १६० कोनाच्या पट्ट्यत आलेल्या सगळ्याना भरतीच आली.
पहीला प्रतिसादः आता कुर्ला येइल.
दुसरा प्रतिसादः त्या बाजुला येईल.
तीसरा प्रतिसादः काय नाय.
चवथा प्रतिसादः काय नाय वो. आता एवढ्या गर्दीत हा मला पुढे जा म्हणतोय. आता जायला जागाकुठे आहे ते सांगा. साला आझमगढ वरुन सुटले की सगळे डायरेक मुंबईत.
बस्स एवढ्यावरुन तिथल्या तीथे गोलमेज परिषद सुरु झाली.
ठाण्यापर्यंत निवांत फुकटची करमणुक.
त्यात सर्व काही आले. मराठी माणूस, लालुचे मॅनेजमेंट कौशल्य, आता बाई बंगालला झुकते माप देउन मुंबईची कशी वाट लावणार, संजय गाधी जिवंत असता तर भारताची परिस्थिती कशी वेगळी असती , पानवाल्याकडे बिअर व पाकीटे मिळायची सोय ह्या विषयावर विचारांची देवाण घेवाण करता करता ठाणे कधी आले ते कळालेच नाही. मी पण हीरीरीने भाग घेतला.
"तुम्ही वयानुसार कधी वागणार " बायको म्हणाली.
" अग,जरा वाफेला जागा करुन दीली, दुसरे काय नाय" मी
"काहीही सांगु नका , काल वाण्याकडे उंदीर मारायचे ऑषध मागत होतात असे शेजारीण म्हणत होती. आपल्याकडे कुठे उंदीर आहेत? उगीचच कुणाची तरी चेष्टा करायची"
" अग पॉलिएस्टर विकणारा अंबानी आता भाजी विकायला लागला, म्ह्टले अशीच क्रांती वाण्याकडे झाली आहे का ते बघु?
तसे बाबा महाराजांनी सांगितलेच होते, "मास्तर तुम सुधरेगा नही"
जाता जाता: दादर ला दोन महीलांच्या संवादाचा सारांश. आजोबांनी आय. पी. एल सुरु झाल्यावर चष्मा दुरुस्त केला.
क्रिकेट ला शिव्या देणारे आजोबा गेले दिड महीना टी.वी वर दुसरे काहीही लावू देत नाही. राजस्थान रॉयल फायनलला गेली नाही ह्याचे फार दु:ख झाले आजोबांना.
प्रतिक्रिया
25 May 2009 - 8:15 am | मुक्तसुनीत
काका ,
हॅपी बर्थ डे :-)
25 May 2009 - 8:19 am | सँडी
अमॄत यु अ वेरी हॅपी अँड डिलाईटफुल बड्डे!
(५४व्या )वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
गोलमेज परिषदेची मजा वाटली. :)
आजोबांनी आय. पी. एल सुरु झाल्यावर चष्मा दुरुस्त केला.
=)) आजोबांचं आयपीएल 'चियर्स' प्रेम मस्तच!
राजस्थान रॉयल फायनलला गेली नाही ह्याचे फार दु:ख झाले आजोबांना.
आजोबा नक्किच 'शिल्प'प्रेमी असावेत!;)
25 May 2009 - 8:26 am | मीनल
हॅपी बर्थ डे. <:P
मीनल.
25 May 2009 - 8:33 am | बहुगुणी
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! आणि 'वयानुसार वागण्याच्या' अपेक्षांपासून तुम्हाला कायमच मुक्ती मिळो! May you stay ageless.
25 May 2009 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
25 May 2009 - 8:45 am | लवंगी
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा
25 May 2009 - 8:54 am | निखिलराव
काका ,
हॅपी बर्थ डे
25 May 2009 - 8:54 am | पाषाणभेद
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
25 May 2009 - 8:58 am | सहज
जिंदादील! हॅपी बर्थ डे.
५५ म्हणजे पहीले पाढे पंच्चावन्नच की! :-)
25 May 2009 - 9:59 am | वेताळ
हॅपी बर्थडे ....... <:P :O)
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
25 May 2009 - 9:59 am | वेताळ
हॅपी बर्थडे ....... <:P :O)
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
25 May 2009 - 10:21 am | अनंता
आता जबाबदारी वाढली!!
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
25 May 2009 - 10:25 am | मराठमोळा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 May 2009 - 10:27 am | क्रान्ति
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
<:P =D> :) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
25 May 2009 - 10:28 am | मदनबाण
गुरुजी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
25 May 2009 - 10:35 am | परिकथेतील राजकुमार
गुर्जी तुम्ही ५५ वर्षाचे झाला ? च्यायला कै च्या कै ....
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!
:)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
25 May 2009 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्यापी बड्डे हो काका.
(इथेही तिरक्या प्रतिसादाचा मोह आवरेना!)
25 May 2009 - 10:55 am | निखिल देशपांडे
गुर्जी तुम्ही ५५ वर्षाचे झाला ? च्यायला कै च्या कै ....
असेच म्हणतो...
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!
==निखिल
25 May 2009 - 12:57 pm | धमाल मुलगा
५५ वर्षं? आणि गुर्जी तुम्ही??? ह्यॅ: फेकू नका राव.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
25 May 2009 - 2:07 pm | आनंदयात्री
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
>>५५ वर्षं? आणि गुर्जी तुम्ही??? ह्यॅ: फेकू नका राव.
हेच म्हणतो .. येवढा अनुभव व्यासंग पहाता तुम्ही कमीत कमी ६५ वर्षांचे तरी असलाच पाहिजेत !!
25 May 2009 - 6:52 pm | विनायक प्रभू
लेको लवकर
25 May 2009 - 10:42 am | विशाल कुलकर्णी
गुर्जी,
वाढदिवसाच्या अधिकाधीक शुभेच्छा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
25 May 2009 - 10:57 am | दिपक
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !! :)
25 May 2009 - 12:18 pm | घाशीराम कोतवाल १.२
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
![]()
मास्तर <:P <:P <:P <:P <:P <:P <:P
*************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
25 May 2009 - 12:24 pm | माया
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
25 May 2009 - 1:23 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
25 May 2009 - 1:26 pm | जागु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
25 May 2009 - 1:56 pm | मॅन्ड्रेक
जै हो .
at and post : janadu.
25 May 2009 - 3:18 pm | पर्नल नेने मराठे
काका, वाढदिवसाच्या शुभेच्छा.
चुचु
25 May 2009 - 3:29 pm | सूहास (not verified)
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(खर तर काका मनाने ईतके तरूण आहेत की ५५ बम्स देणार होतो..पण सिनीयर सिटीझन्स ना सुट आहे.)
सुहास...
25 May 2009 - 4:20 pm | सुर
* * * <:P * वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा * <:P * * *
सुर तेच छेडीता......
:) Waiting For Good Luck To Come In My Life :)
25 May 2009 - 4:41 pm | सायली पानसे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.
25 May 2009 - 5:12 pm | पोलिसकाका_जयहिन्द
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!
काय-द्याच बोला.....
25 May 2009 - 7:29 pm | लिखाळ
लोकांना बोलते करण्याची चांगलीच कसब तुमच्याकडे आहे :)
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
25 May 2009 - 7:48 pm | बापु देवकर
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
25 May 2009 - 7:51 pm | रामदास
नविन संकल्प काय आहेत ?
25 May 2009 - 7:57 pm | अवलिया
मास्तर ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
:)
--अवलिया
25 May 2009 - 9:09 pm | विनायक प्रभू
क्या बात है.
वाढदिवसाच्या शुभेच्छाबद्दल सर्व मिपाकरांचे आभार
26 May 2009 - 5:17 am | चतुरंग
५५ म्हणजे डब्बल पंजा! जोरात होऊन जाऊदे सेलिब्रेशन! :)
(खुद के साथ बातां - रंग्या, तुझ्या संदेशात काहीही क्रिप्टिक नाहीये ना? उगीच अर्थ शोधत बसतील! ;) )
चतुरंग
26 May 2009 - 10:24 am | ऋषिकेश
कसा कोण जाणे....अरे हा धागा उघडलाच गेला नव्हता..
असो.
विप्र,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(वरातीमागून)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
27 May 2009 - 11:28 am | मिसळभोक्ता
मास्तर,
५४ नाही, १४ सारखं वागणं !
(आणि लिहिणं देखील ! बायकोने बड्डे विश करण्याला बड्डे अमृत करणे म्हणणे, म्हणजे आणखी काय ??)
लय भारी !
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
28 May 2009 - 6:59 am | डॉ.प्रसाद दाढे
वाढदिवसाच्या (उशिरा का हुईना) शुभेच्छा!
(विजूभाऊंनी साबण ठाण्याहून आणला तर..!!)