सदरहू लेखाचे श्रेयापश्रेय विप्र यांचे असून मी निमित्तमात्र आहे. ;)
तरीही हा लेख (?) वाचून काही विप्रीत घडले तर, लेखकाला जबाबदार धरता येणार नाही.
तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहीजेत प्रभूमास्तरांसाठी !!
------------------------------------------------------------------------------------------------
ढेकणाधिपतींनी घसा खाकरला आणि सभा सुरु केली.
________________________________________________________
मिपाच्या २ र्या वर्धापन दिनानिमित्त तात्या अभ्यंकरांनी 'मिपा विश्वसंमेलन 'भरवायचे ठरवले. दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता.
निवासित अनिवासित सर्व सद्स्य संमेलनाला येणार होते. तात्यांनी कौल घेतला. विश्वसंमेलन पुण्याला करायचे ठरवले. सामिष, आमिष व शाकाहारी मेन्यु ठरला. हॉटेल बुकींग क्लार्क शी संभाषण करताना खुर्चीतल्या ढेकणाला ही बातमी कळाली. मंदीमुळे गेले २ वर्षे ह्या हॉटेल मधे 'पेस्ट कंट्रोल' झाले नव्हेते. तात्याना बघताच ढेकुण खुष झाला. येत्या मेजवानीची खबर त्याने सर्व ढेकुण समाजाला पोचवली. ह्या निमित्ताने आपल्या सर्व समाजाचे हिताची काळजी घेणार्या ढेकणाधिपतींनी संभाव्य धोक्याची सुचना देण्यासाठी सभा बोलवली.
_______________________________________________________
" तुम्ही सर्व जण आनंदीत झाला आहात हे मला दिसतच आहे. हे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे. फारसे नुकसान न होता. हॉटेलचा म्यानिजर रोज मिपाहार करत असतो. त्या निमित्ताने ह्या संस्थळाच्या काही सभासदांचे स्वभाव विशेष मला कळाले आहेत. 'हल्ला बोल" करताना हे गुणावगुण लक्षात घेउनच चढाई करावी. आपापल्या वह्या मधे आता मी जे काही सांगणार आहे त्याची नोंद करा.
अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या.
२१ जागु : यांना मिपावरील जयश्री गडकर किंवा अलका कुबल म्हणता येईल. अत्यंत हळूवार मन असल्याने यांच्याबद्दल फारसे बोलता येणार नाही. कठोर मनाच्या ढेकणीणींनी
ह्या रक्तापासून चार हात लांब राहणे उत्तम. शिवाय कवितेचीही लागण होऊ शकते! हा धोका निराळाच!!!
२२ दवबिन्दु : अल्लड पिल्लांना हे गोग्गोड रक्त म्हणजे मेजवानीच जणू! चिंचा , बोरे, रावळगांव इ. नी समृद्ध रक्त, लहान लेकरं आवडीने पितील.
२३बाकरवडी : सावधान, इथे नावामुळे गैरसमज होऊ शकतो. नावात काय आहे, असला फालतू प्रश्न विचारु नये. ढेकणीणींनी (रक्ताशिवाय)कोणत्याही स्त्रीसुलभ गोष्टी शेअर करु नयेत, हा अवांतर सल्ला.
२४ बिकाजी अरबपती: खजूर फ्लेवरचे हे रक्त सप्तधातूवर्धक आहे. ४०+ (पुरुष) वयोगटासाठी उत्तम!
२५ धमाल मुलगा : या रक्ताला मुळीच शिवू नये, १/२ सी.सी. रक्त प्यायल्यास, चार बाटल्या रक्त भरपाई म्हणून द्यावे लागेल.
२६ शरदिनी : सगळ्यात कडक आणि पचायला जड रक्त! वाटेला जाल तर, शब्दबंबाळ व्हाल.
२७ ब्रिटिश : शांत मनोवृत्तीच्या ढेकणांनी चार हात दूर रहावे, आयुष्यभर हिमानी नवरत्न तेल वापरावे लागेल.
२८ प्राजु : हे रक्त प्यायल्यावर एक पापड लाटण्याएवढ्या वेळात चार कविता पाडता येतात.
२९ आंद्या : हे रक्त प्यायल्यावर दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची खोड जडते. मात्र रक्त अतिशय गोड!!
३० अविनाशकुलकर्णी : ह्यांचं रक्त पिणं म्हणजे कुलनाश !! हे रक्त होताहोईतो पिऊ नये हा वैधानिक इशारा !!
भाग ३रा लवकरच..
प्रतिक्रिया
22 May 2009 - 7:14 pm | नितिन थत्ते
चालू द्यात. :)
खराटा
(रंग माझा वेगळा)
22 May 2009 - 10:50 pm | टिउ
हेच म्हणतो!
22 May 2009 - 7:15 pm | विनायक प्रभू
अनंत
ब्रम्हांडड्कोटी राम राम गोविंदा न गोविंदा
गो विं दा
22 May 2009 - 7:15 pm | अवलिया
वा! मस्त !!
--अवलिया
22 May 2009 - 7:19 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त! वा !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
22 May 2009 - 11:08 pm | टारझन
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हाणा साल्यांनो शालजोडीतले !!!!
बाय द वे ... हे होतं काय ? कैच्याकै ?
बाकी लेखण मात्र मास्तर सारखंच हो @!! जिथं सूरू झालं तिथंच संपलं ..
©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º©
फाडून फाल्तू काथ्याकुटाची जळमटं, एक तरी ओळ अशी लिहावी खवट...
22 May 2009 - 7:15 pm | रेवती
ह्या भागासाठी टाळ्या आणि शिट्ट्या.
पुढच्या भागासाठी शुभेच्छा!
रेवती
22 May 2009 - 7:30 pm | मराठमोळा
अनंतराव :) लै भारी.. समीक्षण जोरदार.. ;)
येऊ द्या पुढचा भाग लवकर.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
22 May 2009 - 10:37 pm | बाकरवडी
>>>>बाकरवडी : सावधान, इथे नावामुळे गैरसमज होऊ शकतो. नावात काय आहे, असला फालतू प्रश्न विचारु नये. ढेकणीणींनी (रक्ताशिवाय)कोणत्याही स्त्रीसुलभ गोष्टी शेअर करु नयेत, हा अवांतर सल्ला.
निषेध निषेध निषेध !
त्रिवार निषेध !!!
पुण्यातल्या ढेकणांना बाकरवडी आणि चितळे माहीत आहेत,त्यांच्याबद्दल आदरही आहे.
तुम्ही वाईट मते पसरवत आहात. म्हणून निषेध....... ~X( ~X(
अवांतर :- काही झालं तरी प्रश्न तत्वाचा आहे.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
22 May 2009 - 11:16 pm | जागु
अनंता जयश्री गडकर चालेल हो, अलका कुबल नको ती सतत रडत असते. मी नाही तशी रडत. बाकी तुमचे निरीक्षण दाद देण्यासारखे आहे.
23 May 2009 - 7:10 am | क्रान्ति
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
23 May 2009 - 7:07 am | क्रान्ति
मिपापुराणे साहित्यखण्डे मत्कुणहित कथाय द्वितियोध्यायः!
=)) =)) =)) =))
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
23 May 2009 - 1:50 am | प्राजु
मास्तरांच्या लेखानाची सर नाही आली.
असो..
चालुद्या !
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/