जुन्यात जूनं अलौकिक औषध.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
20 May 2009 - 9:26 am

अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता.
मी त्याला म्हणालो,
"अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?"
मला म्हणाला,
"तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं.
तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो. क्वचीत वेळा आनंदी लोकांपेक्षा रागीष्ठ लोकांशी माझी गाठ पडते.ह्या रागीष्ठ लोकांचं मी पाहिलंय अगदी बरेच वेळा हे लोक कसलं ना कसलं राग कमी करण्याचं औषध घेत असतात.ह्यामुळे मला आश्चर्य वाटतं की कदाचीत ह्या लोकांच्या जीवनात- ह्या दोन चार गोळ्यांच्या औषधापेक्षा- आणखी काही तरी कमी पडत असणार.
शेकडो नव्हेतर हजारो वर्षापासून ह्या व्याधीवर हास्य हे अगदी नैसर्गिक औषध असावं हे सर्वांना माहित आहे.काही म्हणतात हंसत राहिल्यामुळे आपली शरिरातली प्रतिकार-शक्ति उचल खाते,हृदयाला मजबूत केलं जातं आणि उच्च रक्तदाब असला तर तो कमी होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे हंसण्यामुळे एखाद्याची चित्तवृत्ती उचल खाते.मनावरचा भार कमी होतो आणि सर्वसाधारणपणे सभोवतालचं वातावरण चांगलं वाटतं.
कुणी तरी म्हटलंय,
"औषधाच्या उपायाची कला अशी आहे की आजार्‍याला जमेल तेव्हडं आनंदी ठेवायचं आणि मग त्याचा रोग निसर्गच बरा करतो."
डॉक्टरकडे जाण्यापूर्वी तोंड ओळख म्हणून काही लोक सहजच मला ह्या व्याधीवर एखादं जास्त खप असलेलं औषध आहे का म्हणून कुतूहलाने विचारतात."

"मग तू डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय एखादं औषध सांगतोस का?"
ह्या माझ्या प्रश्नावर माझ्या भाचा मला सांगतो,
"ते कसं शक्य आहे?ते बेकायदा होईल.नव्हेतर माझ्या ज्ञानाची सीमा मी ओलांडल्या सारखं होईल."
माझा भाचा मला पूढे सांगतो,
"मी माझ्या एका डॉक्टर मित्राला एकदा विचारलं,
मला एक कोडं पडलंय ते मी तुला विचारतो, मागल्या कुठल्या वेळेला तुझा एखादा पेशंट हंसहंस हंसला आणि मग रडायला लागला, कां असं पण झालं असेल कां एखादा हंसण्याच्या औषधाची गोळी तुझ्याकडून मिळावी म्हणून वाट पहात होता.?"
तो माझा डॉक्टर मित्र मला म्हणाला,
" मला एक माहित आहे की, मनावरचा भरपूर भार आणि मनावरचं दुःख हे माणसाच्या जीवनात एखाद्या अघटित किंवा दुःखद घटनामुळे येतं."

हे त्या डॉक्टरचं मत ऐकल्यावर माझा भाचा मला सांगतो,
"ही वास्तविकता मला चांगलीच माहित आहे.माझी स्वतःचीच कथा मी एखाद्या मासिकात देऊ शकतो. माझ्यावर आलेल्या एकूण दुःखद प्रसंगातून माझ्या लक्षात आलंय की,ह्या सर्व हलक्या वेदना कमी करणार्‍या औषधापेक्षा अवतिभोवती असलेल्या जगाबरोबर हंसत रहाणं हे मला जास्त उपायकारक वाटतं.माझ्या जीवनातला अगदी दुःखद दिवस म्हणजे जेव्हा माझ्या अगदी जवळच्या मित्राचे वडील निधन पावले तो दिवस.

ते त्याचे वडील जणू मला माझे दुसरे वडील कसे होते.ज्या दिवशी मला त्यांची दुःखद घटना कळली मी तसाच दोन अडीच तासाचा गाडीचा प्रवास करीत माझ्या मित्राच्या घरी गेलो.
आम्ही दोघे आमच्या घरी परत येत होतो तेव्हा गाडीत अगदी शांत बसलो होतो.घर जवळ येता येता कुठून कुणाष्ठाऊक पाण्याचा पाईप फुटावा तसा माझा मित्र एकाएकी आम्ही पूर्वी ऐकलेला टीव्हीवरचा एक विनोद सांगू लागला.आणि त्या शांत वातावरणात एक हास्याची लहर निर्माण झाली.त्यावेळी आमच्या दोघांच्या लक्षात आलं की त्या उदास वातवरणात पण एखादा आनंदाचा फुलोरा उडतो.
मला अजून वाटतं की आमच्या विनोदितामुळेच- sense of humor- त्याच्या वडीलांच्या जाण्यानंतरच्या पुढच्या दिवसात आम्ही मार्ग काटू शकलो."
हे सर्व ऐकून मी माझ्या भाचाला म्हणालो,
" तुझ्या मित्राच्या वडीलांच्या दुःखद निधनाची गोष्ट आणि त्यानंतर तुमचा तो आनंदाचा फुलारा ह्याबद्दल जे मला तू सांगितलंस ते मला अगदी पटतं.पण बाहेरच्या जगाला हे संवेदानाशून्य वाटेल.
परंतु,दिलीप प्रभावळकर आणि लक्शा बेरडे यांच्याजवळ असलेल्या हंसवण्याच्या शक्तिची मी अशावेळी जास्त कदर करतो."
माझं हे मत ऐकून माझा भाचा खूष झाला.
मला म्हणाला,
"हे विनोदी लोकच हंसण्याच्या ह्या जुन्यात जून्या नैसर्गीक औषधाचं नकळत फैलाव करीत असतात.आणि Anti-depressant घ्यायची इतराना पाळी येत नसावी."
तसं पाहिलं तर माझ्या ह्या भाचाचं म्हणणं किती खरं आहे हे नाही काय?

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

बापु देवकर's picture

20 May 2009 - 9:51 am | बापु देवकर

सुंदर लेख वाचुन परत आठवण झाली की ...... हसण्यासाठी जन्म आपुला....

यन्ना _रास्कला's picture

20 May 2009 - 1:32 pm | यन्ना _रास्कला

सान्गायचा हो किस्ना काका, आजकाल लोक हासायचेच इसरलेत जनु. जबाब लिवताना हासरा चेहरा दाखवुन पन चालत नाय. हा इनोद आहे. हालके घेने आसे पन सान्गावे लागते. तरी बी लोक शिरियशली घ्येतात. आत्ता बोला.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?

Nile's picture

21 May 2009 - 6:38 am | Nile

हा हा हा! भारी विनोद आहे! ;)

रेवती's picture

20 May 2009 - 7:13 pm | रेवती

लेखन आवडले.
आपले लेख नेहमी काहीतरी चांगले सांगून जाणारे व सकारात्मक असतात.
आजकाल आपण प्रत्येकाचे आभार मानत नाही हे जाणवते आहे.
त्याचीही मजा वाटायची (नंतर काही सदस्यांकडून त्याची चेष्टा झाली, पण हरकत नाही...).

रेवती

क्रान्ति's picture

20 May 2009 - 10:37 pm | क्रान्ति

शेकडो नव्हेतर हजारो वर्षापासून ह्या व्याधीवर हास्य हे अगदी नैसर्गिक औषध असावं हे सर्वांना माहित आहे.काही म्हणतात हंसत राहिल्यामुळे आपली शरिरातली प्रतिकार-शक्ति उचल खाते,हृदयाला मजबूत केलं जातं आणि उच्च रक्तदाब असला तर तो कमी होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे हंसण्यामुळे एखाद्याची चित्तवृत्ती उचल खाते.मनावरचा भार कमी होतो आणि सर्वसाधारणपणे सभोवतालचं वातावरण चांगलं वाटतं.
१००% पटलं. लेख खासच.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा