इतिहासाची दुरुस्ती

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
30 Dec 2025 - 5:06 pm

इतिहासाची दुरुस्ती
==========

- राजीव उपाध्ये

इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो.

एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे. ही मुलाखत बघताना वरील प्रश्न पडला.

एक उदा० देतो. माझ्या वडीलांचे शिक्षण युरोपात (तेव्हाच्या झेकोस्क्लोव्हाकीयामध्ये) नेहेरूंनी आणलेल्या काही शिष्यवृत्त्यांमुळे झाले होते. ते त्याबद्दल बोलत असत आणि मी पण युरोपमध्ये जावे म्हणून आग्रही होते. माझे वडील १९८६ गेले, त्यानंतर त्यांच्या एका बॅगेत त्यांचा पासपोर्ट सापडला. त्या पासपोर्टमध्ये माझ्या वडीलांनी युरोपात कोणता प्रवास केला याच्या नोंदी सापडल्या. त्यात मला स्वित्झर्लँडच्या व्हिसाचा शिक्का सापडला. तो बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी स्वित्झर्लँडला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला.

१९५८-५९ मध्ये जग काय करत होतं माहित नाही पण आपले वडील तेव्हा युरोपात बर्फ तुडवत होते याचं अधूनमधून भारी वाटतं, पण "उत्खननात सापडलेल्या स्वित्झर्लँडच्या व्हिसाच्या" पुराव्याचा नंतर पुढे काहीच उपयोग झाला नाही.

देशाचा इतिहास बदलून तरी काय साधणार?

इतिहासविचार

प्रतिक्रिया

त्यामुळे { विद्यार्थ्यांचं}भविष्य बदलेल का?

युयुत्सु's picture

31 Dec 2025 - 7:52 pm | युयुत्सु

कळीचा मुद्दा आहे..

कांदा लिंबू's picture

31 Dec 2025 - 4:15 pm | कांदा लिंबू

"अहो तुमच्या चिन्मयचे काय सांगता, आमचे वाडवडील तर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच विलायतेत जाऊन-येऊन होते" हेच म्हणायचं आहे ना?

युयुत्सु's picture

31 Dec 2025 - 5:32 pm | युयुत्सु

श्री० कांदालिंबू

फक्त वाडवडील नाही, तर माझी कन्या पण! म्हणजे पुढची पिढी देखिल...

कांदा लिंबू's picture

31 Dec 2025 - 5:56 pm | कांदा लिंबू

तेच तर म्हणतो, वाडवडील, पुत्रपौत्र विलायतेत आहेत हे सांगण्यासाठीच धागा काढला आहे.

युयुत्सु's picture

31 Dec 2025 - 6:08 pm | युयुत्सु

पुत्रपौत्र विलायतेत आहेत हे सांगण्यासाठीच धागा काढला आहे.

ज्याची त्याची समज!

सुबोध खरे's picture

3 Jan 2026 - 11:33 am | सुबोध खरे

मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

जाता जाता -- आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात कमी नाहीत

गामा पैलवान's picture

31 Dec 2025 - 6:31 pm | गामा पैलवान

युयुत्सु,

इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते आज घटकेस असं समीकरण मांडता यावं :

इतिहास = तथ्ये + दृष्टीकोन

तथ्यांविषयी साधारणत: अभ्यासकांत एकमत असतं. परंतु दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. किंबहुना 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न' या न्यायाने तसा तो असावाच लागतो.

जसजशी ऐतिहासिक साधनांची उपलब्धता वाढते तसतशी वेगवेगळी तथ्ये नव्याने उदयास येऊ शकतात. त्यानुसार दृष्टीकोन ठीकठाक करणे तर्कसंगत ठरावे. तर तुमच्या मते इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ?

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

31 Dec 2025 - 7:42 pm | युयुत्सु

श्री० गा०पै०

नवी तथ्ये सांगायला हरकत नाही,पण ती कोणत्या पद्धतीने सांगितली जातात, तसेच त्याचा भविष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो का की कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना एव्हढेच साध्य होते? हा मुद्दा आहे...

गामा पैलवान's picture

1 Jan 2026 - 12:09 am | गामा पैलवान

युयुत्सु,

नेमक्या याच कारणासाठी स्वत:चा दृष्टीकोन स्वत:च विकसित केलेला बरा पडतो. बाकी, एखादी कालबाह्य गोष्ट पुनर्स्थापित केल्याचं काही उदाहरण मिळेल काय? धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

1 Jan 2026 - 8:40 am | युयुत्सु

अनेक उदाहरणे देता येतील-

० २०२४ च्या निवडणूकीच्या वेळेला जो उन्माद बाहेर पडला त्यावेळेला अनेक कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला गेला - त्यात सर्वात संतापजनक म्ह० मुलीना शिकवू नका कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत.

० गोत्र, कन्यादान - या कालबाह्य, निरर्थक आणि अपमानकारक संकल्पनांचे उदात्तीकरण आणि पुरस्कार
० मनुस्मृती - https://www.youtube.com/shorts/b_K3wXnorGw
० बागेश्वर तत्सम बाबा-बुवांचे दरबार बघा. तिथे चालणारे 'मार्गदर्शन' पुरेसे आहे

गामा पैलवान's picture

1 Jan 2026 - 7:54 pm | गामा पैलवान

युयुत्सु,

मुली जात्याच अनुलोमी ( = hypergamous ) असतात. स्वत:पेक्षा जास्त शिकलेला वा अधिक उत्पन्न असलेला मुलगाच पती म्हणून हवा असतो. मग लग्नाला उशीर होणारंच.

गोत्र म्हणाल तर ती पद्धती हा य गुणसूत्र सांभाळून ठेवायचा एक प्रयत्न आहे : https://www.misalpav.com/comment/1001787#comment-1001787

कन्यादान भावनिक प्रश्न आहे.

या तीन उदाहरणांचा इतिहासाच्या ( = राजकीय सत्ताकेंद्राच्या ) अभ्यासाशी थेट संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

1 Jan 2026 - 9:02 pm | युयुत्सु

श्री० गा०पै०
गोत्राची पोलखोल माझ्या या लेखात विस्तृत्पणे केली आहे. यात अजुन ही कुणी चूक काढलेली नाही

https://www.misalpav.com/node/52684

युयुत्सु,

याच तर्काने पाहू जाता गोत्रपद्धतीतही चूक सापडली नाही, असं म्हणता यावं.

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

2 Jan 2026 - 9:25 pm | युयुत्सु

हा हा हा!

गोत्र पद्धतीमध्ये असंख्य चुका आहेत. मुख्य म्हणजे काहीही सिद्ध झालेले नाही. गोत्राला कायद्याने मान्यता नाही आणि मिळणार नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो-
- एक गोत्र म्हणजे एक मूळ्पुरुष. म्हणजे त्या गोत्रातले सर्वाचे वाय-डीएनए एकच असायला हवे. मग समान गोत्रांचे उदा घेऊ उदा अत्रि गोत्राच्या पुरुषामध्ये एकच हॅप्लोग्रुप असायला हवा (एकापेक्षा एकही अधिक हॅप्लोग्रुप एका गोत्रात चालणार नाही). तेव्हढे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा किंवा सिद्ध केलेले दाखवा. माझ्याकडून ५००१ररू (रू पाच हजार एक) जाहीर इनाम!

- किमेरीझम बद्दल लिहीलेला लेख वाचला असेलच. वरील इनाम मिळवल्यास तुम्हाला अधिक प्रश्न विचारेन. उदा० सगोत्र बद्दल केल्या जाणार्‍या अडाणी प्रचाराबद्द्ल...

युयुत्सु,

हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? हॅप्लोग्रुप रोगाचे वाहक आहेत का? या संबंधी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. माझ्या मते यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सरसकटपणे गोत्रास अंधविश्वास मानणं कितपत उचित ?

आ.न.,
-गा.पै.

हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत?

एखाद्या जोडप्याला मुले होतात तेव्हा आईकडून एम टी डिएनए आणि पित्याकडून य डिएनए मिळते. पुरुषवंशात वाय डिएनए समान असते अशी धारणा आहे. पण तसे नसते. एम टी डिएनए आणि वाय डिएनए च्या रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाला हॅप्लोग्रुप असे नाव आहे. ज्यांची संख्या बरीच आहे.

कंजूस's picture

3 Jan 2026 - 1:29 pm | कंजूस

इतिहास बदलणे......

इतिहास आहे तिथेच आहे. फक्त त्यातली कोणती प्रकरणे शालेय पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत करायची किती पानांचा मजकूर घ्यायचा हे बदलले आहे.( म्हणजे हे पूर्वीपासून चालूच आहे.)
( अवांतर - भाषेसाठी कोणत्या लेखकांचे कोणत्या लेखनातून धडे घ्यायचे हे बदलत असते तसे.)

युयुत्सु's picture

31 Dec 2025 - 6:55 pm | युयुत्सु

संघ आणि भाजपा हे सतत इंग्रजांनी केलेल्या भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाचे दळण दळत असतात. पण ते याच वेळेला नेहेरूच्या कर्तृत्वाचं विकृतीकरण, पश्चिमेच्या ज्ञानाचे विकृतीकरण करत असतात.

नथुरामने गांधीना मारले नसते तर गांधी इतके मोठे झाले नसते आणि सावरकर वि नेहेरू हा वाद पण निर्माण झाला नसता.

माणसाना मारल्याने सहानुभूतीने मिळून ती जास्त मोठी होतात.

विजुभाऊ's picture

31 Dec 2025 - 7:08 pm | विजुभाऊ

हे म्हणजे टिळक गेले , गांधी गेले, नेहरू गेले
मी पण आजारी पडलोय
असे म्हणण्यासारखे आहे