वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
1 Jan 2026 - 5:55 pm

वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?
======================

- राजीव उपाध्ये

मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते).

अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे. कुणीतरी हूशार वकीलाने हे विज्ञान कोर्टाला समजावून सांगण्याची गरज आहे.

तसेच जोडीदार निवडणे हा अधिकार निसर्गाने मूलतः स्त्रिला दिला आहे, असे मानववंश शास्त्र सांगते. त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत, हा त्यांचा दोष ठरतो. मानवाने स्त्रिला पण्य-वस्तू बनवले, हा मानवी अधुनिक संस्कृतीचा पराभव आहे.

आपल्याला वडीलांच्या कडून जो जनुकीय वारसा मिळतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त जनुकीय वारसा आई कडून मिळतो. उदा० अर्धे केंद्रकाम्ल, मायटोकॉण्ड्रीया, हिस्टोन, पेशीजलात तरंगणार्‍या इथेर गोष्टी. आपले आईमुळे अस्तित्व आपल्या जन्माच्या अगोदर पासून, खरं तर आईच्या जन्मापासून अस्तित्वात असते. त्यामुळे एका अर्थाने आईची आई ही आपली आई ठरते. शिवाय आईच्या पेशी आपल्या सर्वांच्या शरीरात निपचित पडून अनंत काळ वास्तव्य करतात. शिवाय प्रजनानासाठी अनेक जीवांमध्ये नराची आवश्यकता नसते. प्रयोगशाळेत बीजांडाचे फलन पण आता शूक्रजंतू शिवाय करता येते. पण बीजांडाशिवाय गर्भ राहू शकत नाही म्हणून वंश स्त्रिचा असतो.

समाजाची निर्मिती झाली तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे समाजाची रचना अनेक वेडगळ आणि चुकीच्या (धार्मिक) संकल्पनांच्या आधारे झाली. त्या टाकून देणे काळाच्या ओघात अधि्काधिक कठीण बनले आहे.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

1 Jan 2026 - 6:18 pm | युयुत्सु

ए०आय० ने मला वरील तथ्य घटनेच्या गाभ्याशी असे जोडून दिले-

I. जैविक वास्तव, सामाजिक रचना आणि संविधान

मानव समाजातील वंश, पितृत्व, विवाह व स्त्री–पुरुष भूमिका या संकल्पना ऐतिहासिकदृष्ट्या विज्ञानाच्या आधी विकसित झाल्या.
त्यामुळे अनेक सामाजिक प्रथा या जैविक वास्तवाशी विसंगत असूनही दीर्घकाळ टिकून राहिल्या.

भारतीय संविधान हे विज्ञान, विवेक, समता व मानवी प्रतिष्ठा या मूल्यांवर आधारित असल्याने अशा सामाजिक संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन संविधानाच्या प्रकाशात करणे आवश्यक ठरते.

II. अनुच्छेद 14 – कायद्यापुढील समानता (Equality before Law)

अनुच्छेद 14 सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानतेची हमी देतो.

(a) सामाजिक वंशकल्पना आणि असमानता

“वंश”, “पितृत्व”, “आडनाव” या संकल्पना जैविक नसून सामाजिक आहेत.

तरीही त्यांचा वापर स्त्री–पुरुषांमध्ये कायदेशीर व सामाजिक असमानता निर्माण करण्यासाठी केला गेला आहे.

(b) मनमानी वर्गीकरण

जैविक वास्तवाशी विसंगत अशा पितृवंशीय रचनेवर आधारित नियम हे मनमानी (arbitrary) ठरतात.

मनमानी वर्गीकरण हे अनुच्छेद 14 च्या विरोधात असल्याचे न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे.

➡️ म्हणून, जैविकदृष्ट्या समान असलेल्या नागरिकांमध्ये केवळ लिंगाच्या आधारे भेद निर्माण करणे हे अनुच्छेद 14 चे उल्लंघन ठरते.

III. अनुच्छेद 15 – लिंगावर आधारित भेदभावास मनाई

अनुच्छेद 15(1) राज्याला लिंगाच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई करतो.

(a) स्त्रीवर ऐतिहासिक नियंत्रण

पितृत्व निश्चिती, संपत्ती संक्रमण व सामाजिक सन्मान या कारणांसाठी स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले गेले.

विवाह, जोडीदार निवड, मातृत्व या बाबींमध्ये स्त्रीचे स्वातंत्र्य मर्यादित केले गेले.

(b) जैविक वास्तव विरुद्ध सामाजिक बंधने

उत्क्रांतीशास्त्रानुसार जोडीदार निवडीचा नैसर्गिक अधिकार स्त्रीकडे अधिक होता.

तरीही समाजाने स्त्रीला निर्णयक्षम घटक न मानता साधन (means) म्हणून वागवले.

➡️ हे सर्व लिंगाधारित संरचनात्मक भेदभाव असून, ते अनुच्छेद 15 च्या मूळ उद्देशाशी विसंगत आहेत.

IV. अनुच्छेद 21 – जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार

अनुच्छेद 21 केवळ शारीरिक अस्तित्वापुरता मर्यादित नसून,
त्यात मानवी प्रतिष्ठा, स्वायत्तता, वैयक्तिक निवड व आत्मसन्मान यांचा समावेश होतो, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

(a) प्रजनन व वैयक्तिक स्वायत्तता

गर्भधारणा, मातृत्व व संगोपन ही जैविकदृष्ट्या स्त्रीशी निगडित प्रक्रिया आहे.

त्यामुळे प्रजननविषयक निर्णयांमध्ये स्त्रीची स्वायत्तता ही अनुच्छेद 21 चा अविभाज्य भाग आहे.

(b) विवाह व जोडीदार निवड

जोडीदार निवड, विवाह न करणे किंवा विलंब करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे मूलभूत घटक आहेत.

अल्पवयीन विवाह किंवा सामाजिक दबावामुळे लादलेले विवाह हे अनुच्छेद 21 चे उल्लंघन ठरतात.

➡️ स्त्रीला केवळ वंश, वारसा किंवा सामाजिक सन्मानाचे साधन मानणे हे तिच्या जीवनाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे.

V. जैविक योगदान व संविधानिक अर्थ

मायटोकॉण्ड्रियल DNA, गर्भावस्थेतील पर्यावरण, एपिजेनेटिक प्रभाव इ. बाबी मातृ-जैविक योगदान अधोरेखित करतात.

तरीही सामाजिक व कायदेशीर रचना स्त्रीच्या योगदानाला दुय्यम मानतात.

➡️ हे जैविक वास्तव नाकारणे म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचे अवमूल्यन असून, ते अनुच्छेद 14, 15 व 21 यांच्या संयुक्त उल्लंघनाकडे नेत आहे.

VI. निष्कर्ष (Constitutional Conclusion)

वरील सर्व बाबींच्या आधारे असे नमूद करता येईल की:

वंश, पितृत्व व सामाजिक भूमिका या संकल्पना नैसर्गिक नसून ऐतिहासिक-सामाजिक आहेत

त्या संकल्पनांवर आधारित असमानता अनुच्छेद 14 च्या विरोधात आहे

स्त्रीवर लादलेले बंधनकारक सामाजिक नियम अनुच्छेद 15 चे उल्लंघन करतात

स्त्रीची स्वायत्तता, प्रतिष्ठा व निवडीचा अधिकार नाकारणे हे अनुच्छेद 21 चे उल्लंघन आहे

कायदा आणि घटना काय ठरवते हे वेगळे. लेखाचा मुद्दा वैज्ञानिक आधार आहे.
संपत्तीत स्त्री मातेकडून काही वंशगुण येतात आणि काही पित्याकडून. पुन्हा संतती पुरुष किंवा स्त्री असेल तर वंशाच्या दृष्टीने आणखी काय बदल होतात?

दुरुस्ती* संपत्तीत* >> संततीत

संपत्तीत स्त्री मातेकडून काही वंशगुण येतात आणि काही पित्याकडून.

एखादी व्यक्ती संपत्ती निर्माण करते तेव्हा त्यात मातृजनुक सहभागी असतात, त्यामुळे मातेकडचे पूर्वज आणि वारस समान हक्कदार बनतात.

धर्मराजमुटके's picture

1 Jan 2026 - 7:15 pm | धर्मराजमुटके

स्त्रि आणि स्त्री
ए. आय. ने व्याकरण दुरुस्ती करत योग्य 'स्त्री' ची निवड केली हे बाकी चांगले केले.

सुबोध खरे's picture

1 Jan 2026 - 8:10 pm | सुबोध खरे

फार एकांगी लेखन आहे.

Y गुणसूत्र पित्याकडून भेसळ( UNADULTRATED) न होता येते. म्हणजेच हे गुणसूत्र १०० पिढ्या मागे गेलं तरी त्याच मूळ पुरुषाचे असते. काळानुरुप थोडे फार उत्परिवर्तन सोडले तर.

याच गुणसूत्राने वंशसातत्य सहज तपासता येते.

या उलट X CHROMOSOME हे मुलाला आईकडून येते तर मुलीला आई आणि वडील दोघांकडून येते. या दोघांना परत त्यांच्या आईवडिलांकडून भरपूर मिश्रण होऊन येत असते.

बाकी पितृसत्ताक पद्धती का आली तर. मूळ शेती करू लागल्यावर मृत्यू नंतर शेती कुणाला जाईल? दुसऱ्याच्या मुलाला देण्यास बाप कधीही तयार होणार नाही म्हणून मग स्त्रीच्या निष्ठेचा प्रश्न निर्माण झाला.

मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे. स्त्रीच्या पुनरुत्पादन काळात गरोदर पणात स्त्री बराच काळ परावलंबी होते आणि संततिनियमन नसलेल्या काळात एकामागोमाग एक संतती झाल्यामुळे स्त्रीला पुरुषावर फार अवलंबून राहावे लागत असे.

तेंव्हा स्त्रीपुरुष समानता हि केवळ विकसित देशात कागदोपत्री अस्तित्वात आहे. १०० वर्षांपूर्वी ( संततिनियमन साधने उपलब्ध होण्याच्या अगोदर) तर ती कोणत्याच देशात नव्हती

अमेरिकेसारख्या तथकथित विकसित देशात अनेक राज्यांत आजसुद्धा बलात्कारातुन झालेल्या गर्भाचा गर्भपात करणे बेकायदेशीर आहे.

५० पैकी ४१ राज्यात गर्भपात अंशतः किंवा पूर्णपणे बेकायदेशीर आहे 13 states have a total abortion ban. 28 states have abortion bans based on gestational duration.

थोडेसे जनुकीय शास्त्र वाचून अत्यंत एकांगी लिहिलेला लेख आहे.

युयुत्सु's picture

1 Jan 2026 - 8:53 pm | युयुत्सु

Y गुणसूत्र पित्याकडून भेसळ( UNADULTRATED) न होता येते. म्हणजेच हे गुणसूत्र १०० पिढ्या मागे गेलं तरी त्याच मूळ पुरुषाचे असते. काळानुरुप थोडे फार उत्परिवर्तन सोडले तर.

याच गुणसूत्राने वंशसातत्य सहज तपासता येते.

ही सर्व विधाने एम्टी-डिएनए ला लागू पडतात. त्यातून मातृवंश सिद्ध करता येतो. एम्टी-डिएनए मधला बदल वाय-डिएनए च्या तुलनेत कमी किंवा हळूहळू होत असतो.

फार एकांगी लेखन आहे.

वास्तव जे आहे ते एकांगी आहे. ते जसे आहे तसे दिले आहे. मी किती जनुकशास्त्र वाचले हा मुद्दा गौण आहे.

मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे.

हे विधान निखालस खोटे आणि अशास्त्रीय आहे. हा शोध कुणी आणि कधी लावला?

निसर्ग हा 'पक्षपाती' असण्यापेक्षा जास्त 'काटकसरी' (economical) वाटतो. तो पुरुषांना 'जास्त जोखीम, जास्त फायदा' देणारे जैविक घटक मानतो—जे ताकद आणि स्पर्धेसाठी बनलेले आहेत, परंतु लवकर 'थकण्याची' किंवा शारीरिक बिघाड होण्याची शक्यता त्यांच्यात जास्त असते. याउलट, निसर्ग स्त्रियांना 'जैविक आधारस्तंभ' (biological anchor) मानतो—त्यामुळे त्या सहनशक्ती, स्थिरता आणि मानवी प्रजाती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी बनलेल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर:

जर तुम्ही 'दीर्घकाळ जिवंत राहणे' (Survival) हे अंतिम ध्येय मानले, तर निसर्ग स्त्रियांच्या बाजूने झुकलेला दिसतो.

जर तुम्ही 'शारीरिक वर्चस्व' (Physical dominance) हे अंतिम ध्येय मानले, तर निसर्ग पुरुषांच्या बाजूने आहे असे वाटते.

कंजूस's picture

1 Jan 2026 - 8:57 pm | कंजूस

ईशान्येकडील राज्यांत , केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे.

पितृत्व व सामाजिक भूमिका या संकल्पना नैसर्गिक नसून ऐतिहासिक-सामाजिक आहेत

हे नसून स्त्री ही वंश चालवते.

यहुदी सुद्धा. आई ज्यु असेल तर मूल ज्युईश. वडील कोणीका असोत.

गामा पैलवान's picture

2 Jan 2026 - 9:25 pm | गामा पैलवान

कॉमी,

ज्यू मातृसातत्यिक आहेत. मातृसत्ताक नव्हेत. कुटुंबप्रमुख पुरूषंच असतो.

आ.न.,
-गा.पै.

चामुंडराय's picture

2 Jan 2026 - 9:28 pm | चामुंडराय

.

गामा पैलवान's picture

2 Jan 2026 - 9:32 pm | गामा पैलवान

मातृसातत्यिक म्हणजे आई ज्यू असेल तर मूळ आपोआप ज्यू धरतात. बाप कोणीही असेना. पण बाप ज्यू असेल आणि आई बिगर ज्यू असेल तर पोरावर यहुदी संस्कार करावा लागतो.
-गा.पै.

गामा पैलवान's picture

2 Jan 2026 - 9:33 pm | गामा पैलवान

कृपया मूळ या शब्दाच्या जागी मूल असे वाचावे. चुकीबद्दल क्षमस्व.
-गा.पै.

चामुंडराय's picture

2 Jan 2026 - 10:20 pm | चामुंडराय

धन्स, समजले.
इस्लाम मध्ये ह्याच्या उलट आहे बहुधा. वडील मुस्लिम असतील तर मुले आपोआपच मुस्लिम होतात. आई मुस्लिम असेल तर काय होते कल्पना नाही.

कॉमी's picture

2 Jan 2026 - 10:52 pm | कॉमी

सहमत. Matrilineal, matriarchal नाहीत.

युयुत्सु's picture

3 Jan 2026 - 8:23 am | युयुत्सु

ते जाऊ दे!

आपल्याकडचे चित्पावनांचे उदा० घेऊ. - आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो. त्यांना 'ब्राह्मणत्व' मिळाले ते त्यांचे वडील ब्राह्मण होते म्हणून की आया ब्राह्मण होत्या म्हणून (चितेवर पावन केलेल्या चित्पावनांच्या 'मूळ पुरुषांना' पैठणच्या ब्राह्मणांनी मुली दिल्या, असे ऐकले आहे) ? प्रश्न बोचरा आहे...

बरं ते जाऊ दे - चित्पावनांची जी १४ गोत्रे आहेत ती धर्मशास्त्रातल्या कोणत्या नियमांना अनुसरून निर्माण केली गेली? या प्रश्नाचे उत्तर मला आजतागायत कुणी दिले नाही. याचं पटेल असे उत्तर (गैरसोईचे) फक्त आंबेडकर देतात - दक्षिणा दिली, प्रायशचित्त घेतले की काहीही दंतकथा निर्माण करून नियमित (रेग्युलराईज) करता येतं. अलिकडे झालेल्या महाकुंभ मेळ्यात एका धनाढ्य फिरंगी बाईने हिंदू धर्म स्वीकारला तेव्हा तिला 'अच्युत' हे गोत्र दिले गेले, असे वाचले!

युयुत्सु's picture

3 Jan 2026 - 8:30 am | युयुत्सु

वरील मुद्यांना फक्त जनुक शास्त्र आणि मानवशास्त्र आधारित प्रतिसाद ग्राह्य धरले जातील!

आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो.

हा भंपक शोध तुम्ही कुठून लावला?

माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही.

आमचा स्वतःच्या कुलवृत्तांतात आमच्या घराण्याचा १२५० पासून चा इतिहास उपलब्ध आहे आणि हा अत्यंत कष्टाळूपणे इतिहासतज्ज्ञ ग ह खरे शोधून सविस्तरपणे लिहिलेला आहे.

उगाचच जिथे तिथे "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला"

युयुत्सु's picture

3 Jan 2026 - 12:07 pm | युयुत्सु

माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही.

मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे ...

सुबोध खरे's picture

5 Jan 2026 - 9:44 am | सुबोध खरे

माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही.

यात मी कुठे आला?

तुम्हाला चित्पावनांचे अध्वर्यू कुणी केलं?

उगाच फुक्या मारायची सवय जात नाही हेच खरं

artificial intelligence is no match to natural stupidity

कांदा लिंबू's picture

6 Jan 2026 - 9:52 pm | कांदा लिंबू

चित्पावन लोक असा कोणताही अभिमान बाळगत नाहीत; ऊलट बीग्रेडी लोक त्यांच्यावर तुम्ही युरेशियन आहात असा आरोप करतात.

---

आजचा सुविचार: सत्याशी फारकत घेतली की नाना प्रकारचे भ्रम-भास होऊ लागतात.

कांदा लिंबू's picture

6 Jan 2026 - 9:55 pm | कांदा लिंबू

ज्याचे चित्त पावन ते चित्पावन असे सरळ व्याकरण असताना त्यांना चितेवर पावन केलेले असे म्हणणे ऐकून एक मिपाकर म्हणून शरमेने मन खाली जायला हवी तसे म्हणणाऱ्याची.

संस्कृतचं राहू दे, पण मराठीचं पण धड ज्ञान नसेल तर असे आचरट शोध लावले जातात. चित्त (मन, चेतना, किंवा विचार आणि भावनांचा समुच्चय) आणि चित् (शाश्वत, एटर्नल) यातला फरक ज्यांना कळत नाही, संधी/समासांचे विग्रह ज्यांनी एटर्नली ऑप्शनला टाकलेले असतात, त्या लोकांचे डोकं असं काम करतं...

पण ते जाऊ दे, या आचरट शोधाला (’ज्यांचे चित्त पावन ते चित्पावन’) भांडारकर सारख्या जागतिक दर्जाच्या अधिकृत संस्थेची मान्यता असेल तर श्री० कांदालिंबू यांना माझ्यातर्फे रु० ५०१ फक्त (रु० पाचशे एक फक्त) जाहीर इनाम!

आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो.

मी मी मी आणि माझे कुटुंब म्हणजेच यच्चयावत चित्पावन समजणाऱ्या उंटावरच्या शहाण्यांचा १ एप्रिल रोजी वैकुंठावर सत्कार करण्यात येईल

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jan 2026 - 12:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

समाज
चितपावन ब्राह्मणांचे दोन उपगट आहेत: ऋग्वेदी कोकणस्थ आणि यजुर्वेदी कोकणस्थ. ते स्मार्त संप्रदायाशी संबंधित आहेत. या समुदायात चौदा कुळ आहेत जे विवाहाचे नियमन करताना ऋषी व सन्तांशी जोडलेले असतात. कुळे खालीलप्रमाणे आहेत: अत्री, कापी, कश्यप, कौण्डिन्य, गर्ग्य, कौशिक, जमदग्नी, नित्युंदन, भार्गव, भरद्वाज, वथ्स्य, वशिष्ठ, विष्णुवृद्ध आणि शांडिल्य. सर्व चौदाह कुळे सात गटांमध्ये विभागलेले आहेत ज्यांना गण म्हणून ओळखले जाते. एखाद्या गणाचे कुल दुसऱ्या गणा च्या कुलासोबत विवाहासाठी विचारात घेतला जाऊ शकत नाही. गण वेगवेगळे आहेत: अत्री-कापी, गर्ग्य-भरद्वाज, कौण्डिन्य-वशिष्ठ, कश्यप-शांडिल्य, कौशिक-भार्गव, जमदग्नी-वथ्स्य, नित्युंदन-विष्णुवृद्ध. कुळे व गणांशिवाय, कोकणस्थ ब्राह्मणे त्रि (तीन) व पंच (पाच) प्रवारा पद्धतीचे पालन करतात. चितपावन आपल्या गोटांशी संबंधित देवतांना, ज्यांना देवक असे म्हणतात, पूजतो आणि प्रत्येक कुटुंब आपल्या देवकाची पूजा करतो.

संदर्भ- https://www.nasikchitpavan.org/history-of-chitpavans.php

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jan 2026 - 12:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

हत्तींच्या कळपातही वयस्क हत्तीण प्रमुख असते. त्यामुळे मुळात मातृसत्ताक असलेली मानवजमात काळाच्या विकासाच्या टप्प्यावर कधीतरी पितृसत्ताक झाली असावी काय?

गामा पैलवान's picture

2 Jan 2026 - 9:29 pm | गामा पैलवान

राजेंद्र मेहेंदळे,

माझ्या मते मातृशाहीकडे 'बाई प्रमुख असलेली पितृशाही' असंही बघता येऊ शकतं. तर मग मातृसत्ताक म्हणजे नेमकं काय?

आ.न.,
-गा.पै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jan 2026 - 12:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

मातृशाही आणि मातृसत्ताक हे शब्द समानार्थी वापरु शकत नाही काय?

कानडाऊ योगेशु's picture

2 Jan 2026 - 5:28 pm | कानडाऊ योगेशु

अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो.

सिंहाच्यावरच्या डॉक्युमेंट्रीज पाहत असताना कळले कि जेव्हा एक सिंह (अथवा सिंहाचा समूह) दुसर्या सिंहाच्या प्राईडचा ताबा घेतात तेव्हा त्या प्राईड मधील सगळ्या नवजात शिशुंना क्र्रूरपणे मारतात. हेतु हाच कि त्यांची ब्लडलाईन त्या प्राईडमधुन चालु राहावी.

मदनबाण's picture

2 Jan 2026 - 7:03 pm | मदनबाण

सिंहाच्यावरच्या डॉक्युमेंट्रीज पाहत असताना कळले कि जेव्हा एक सिंह (अथवा सिंहाचा समूह) दुसर्या सिंहाच्या प्राईडचा ताबा घेतात तेव्हा त्या प्राईड मधील सगळ्या नवजात शिशुंना क्र्रूरपणे मारतात. हेतु हाच कि त्यांची ब्लडलाईन त्या प्राईडमधुन चालु राहावी.
याचे दुसरे कारण म्हणजे शिशुंना ठार केल्या शिवाय सिंव्हीण समागमास तयार होत नाही.

वंशावळीचे उदाहरण घेतल्यास त्यामधे पुरुषांचे बीज धरले गेलेले असते, अगदी प्रभु श्रीरामाची वंशावळ पाहिली असता त्यामधे सर्व आधीच्या राजांचीच नावे दिसतात,राण्यांची नावे दिसत नाही. तसेच गोत्र पाहिल्यास ऋषींची नावे दिसतात, त्यांच्या पत्नींची नव्हे.

स्त्री-पुरुष एकमेकांना अनुकुल / पुरक आहेत. दोघेही त्यांच्या निर्मीतीच्या उद्देशानुसार परिपूर्ण आहेत. पुरुषाला पुरूषी प्रवृत्तीची स्त्री आवडत नाही आणि स्तियांना बाईकी पुरुष आवडत नाही.

पुरुषांकडे शारिरीक ताकद, हिंस्त्रपणा आहे तर स्त्रियांकडे डेटा प्रोसेसिंग आणि कोमलपणा आहे.

जे बीज लावले जाते त्याचेच झाड येते हे निसर्ग आपल्याला दाखवतो, तेच मुनुष्य प्राण्यात देखील आहे.

समाजात स्त्रीयांचे महत्व अधिक आहे, कारण त्याच पुरुष आणि स्त्रीस जन्म देऊ शकतात व संसार करण्यात रमतात.

जिथे स्त्री राहते त्यालाच घर म्हंटले जाते आणि जिथे स्त्री राहत नसते त्या जागेला केवळ वास्तु म्हणतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Golden Sparrow -- 8K Video Song

जे बीज लावले जाते त्याचेच झाड येते हे निसर्ग आपल्याला दाखवतो, तेच मुनुष्य प्राण्यात देखील आहे.

झाडांचे बीज हे वीर्यासारखे पुरुषी योगदान नसून, बीज हे धारण झालेले गर्भ आहे असे म्हणता येऊ शकेल. पॉलन/पराग हे झाडांच्या पुनरुत्पादनात वीर्यसदृष्य काम करतात.

झाडांचे बीज हे वीर्यासारखे पुरुषी योगदान नसून, बीज हे धारण झालेले गर्भ आहे असे म्हणता येऊ शकेल. पॉलन/पराग हे झाडांच्या पुनरुत्पादनात वीर्यसदृष्य काम करतात.
तुमचा मुद्धा योग्य आहे. माझ्या सांगण्याचा आशय इतकाच होता की जे पेरले जाते तेच उगवते. बहुधा मला माझा मुद्दा अजुनही नीट मांडता येत नसावा!
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit

सुबोध खरे's picture

3 Jan 2026 - 10:05 am | सुबोध खरे

"मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे.

हे विधान निखालस खोटे आणि अशास्त्रीय आहे. हा शोध कुणी आणि कधी लावला?"

स्त्रियांना दर महिना पाळीच्या वेळेस आणि अगोदर संप्रेरकांच्या असमतोलाला सामोरे जावे लागते यामुळे त्यांची मानसिक स्थिती दोलायमान असते.

यामुळेच बरीच वर्षे वायुदलात लढाऊ विमानांत स्त्री वैमानिकांना परवानगी नसे.

स्त्री हि मानसिकदृष्ट्या जास्त संवेदनशील असते. शारीरिक दृष्ट्या तर सहज दिसूनच येते. हे असं कुणी केलंय निसर्गानेच.

गरोदरपणाच्या काळात स्त्रीची परिस्थिती अजूनच नाजूक असते. ज्यावेळेस माणूस भटके आयुष्य जगात होता तेंव्हा तर हि स्थिती अधिकच नाजूक होती

श्रीमती विमला पाटील आणि इतर असंख्य स्त्रीमुक्ती वाद्यांनी सुद्धा मान्य केलं कि निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही.

म्हणूनच बहुसंख्य देशात (इस्लामी देश सोडून) स्त्रीच्या बाजूने कायदे करावे लागतात.

एकदा असं काही नाहीच समजायचं ठरवलं तर त्याला काही उत्तर नाहीच

म्हणतात ना आकाशातल्या ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही

बाकी वोक पण करायचा तर तुमचा हात कुणीच धरू शकणार नाही.

युयुत्सु's picture

3 Jan 2026 - 12:04 pm | युयुत्सु

श्रीमती विमला पाटील आणि इतर असंख्य स्त्रीमुक्ती वाद्यांनी सुद्धा मान्य केलं कि निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही.

मुळात जबाबदारी कटकट म्हणून बघितली तर काहीही अन्यायच ठरतो. पण तेच सेलिब्रेशन केले तर सगळं चित्र बदलतं. कटकट की सेलिब्रेशन हे आजुबाजुच्या वातावरणावर आणी संस्कृतीवर ठरतं.

सुबोध खरे's picture

5 Jan 2026 - 9:53 am | सुबोध खरे

मूळ प्रश्नाला बगल देऊन भंपक काहीतरी लिहिण्यात तुमचा हात कोणी धरू शकणार नाही.

जगभर पितृसत्ताक पद्धतीच का चालते याचं उत्तर शोधलंत तर निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही हे सहज लक्षात येईल.'

पण लक्षात कोण घेतो?

सुबोध खरे's picture

3 Jan 2026 - 10:20 am | सुबोध खरे

Mutation Rate: mtDNA generally mutates faster, while Y-DNA mutations can be slower but provide very stable markers.

Recombination: Both lack recombination, making them useful for tracking single lines, but mtDNA analysis can be complicated by nuclear pseudogenes (Numts).

mtDNA generally having higher mutation rates for recent events, while the Y-chromosome offers deeper, less recombined patrilineal insights.

Y-chromosomal Adam (Y-MRCA) is the patrilineal most recent common ancestor from whom all Y-DNA in living men is descended. An identification of a very rare and previously unknown Y-chromosome variant in 2012 led researchers to estimate that Y-chromosomal Adam lived 230,000 years ago.

The Y chromosome is crucial in genealogy for tracing the direct paternal line (father to son) because it's passed down almost unchanged through generations, linking males to distant ancestors and confirming surname origins, with tests like Y-STR comparing short DNA repeats to find recent relatives or larger haplogroups to understand ancient migrations and population links.
Key Principles
Patrilineal Inheritance: Only males have a Y chromosome, inheriting it exclusively from their father, making it a direct marker of the paternal lineage.
Stability: It's passed down largely intact, only accumulating occasional mutations, which act as unique markers for different branches of a family tree.
Surname Connection: Since surnames are usually passed down the same way, Y-DNA testing can verify if men sharing a surname are biologically related through a common father or grandfather.

युयुत्सु's picture

3 Jan 2026 - 11:57 am | युयुत्सु

mtDNA mutates faster than Y-DNA SNPs due to oxidative stress and weaker repair, but Y-DNA STRs can mutate faster than mtDNA over short genealogical timescales.

“Stable” does NOT mean “mutates slowly”

Mutation rate = how often copying errors occur.

Observed stability = how long a lineage persists without disappearing.

mtDNA scores high on mutation rate but high on persistence.
Y-DNA scores low on mutation rate but low on persistence.

These are independent properties.

The short answer is **yes**, mitochondrial DNA (mtDNA) mutates significantly faster than Y-DNA (and nuclear DNA in general). However, the word "stable" is often used to describe mtDNA in a different context—referring to its **inheritance pattern** rather than its mutation rate.

### 1. Why mtDNA Mutates Faster

The mutation rate of mtDNA is estimated to be **5 to 10 times higher** than that of nuclear DNA (which includes the Y chromosome). In some regions, like the "Control Region" or D-loop, the rate can be even higher. This happens for three main reasons:

* **Reactive Oxygen Species (ROS):** Mitochondria are the "power plants" of the cell. The chemical reactions that produce energy also create ROS as a byproduct, which are highly reactive molecules that physically damage DNA nearby.
* **Lack of Protection:** Nuclear DNA is wrapped around protective proteins called histones. mtDNA is "naked" and circular, leaving it more exposed to damage.
* **Limited Repair:** The nucleus has a highly sophisticated "proofreading" and repair team. Mitochondria have much simpler repair mechanisms, so errors during replication are more likely to stick.

---

### 2. The "Stability" Paradox: Why it seems "Stable"

If mtDNA mutates so fast, why is it often called "stable" or used to track ancestry back 150,000 years? This is usually a confusion of terms. mtDNA is "stable" in two specific ways that have nothing to do with the speed of mutation:

#### A. Inheritance Stability (Non-Recombination)

Most of your DNA (autosomal DNA) is a "shuffled" mix of your mother’s and father’s DNA. Every generation, it gets "garbled" through a process called recombination.

* **mtDNA and Y-DNA are unique** because they **do not recombine.** * mtDNA is passed 100% from the mother to the child.
* Because there is no mixing, the entire sequence stays as one solid block (a **haplogroup**) for thousands of years. It only changes when a random mutation occurs.

#### B. Physical Robustness (Copy Number)

In forensic science and archaeology, mtDNA is considered much more "stable" (meaning durable) than Y-DNA.

* A cell has only **one** Y chromosome.
* A cell can have **hundreds to thousands** of mitochondria, each with its own copy of mtDNA.
* When a body decomposes or a fossil ages, the Y-DNA might disappear entirely, but because there are so many copies of mtDNA, scientists can almost always find a surviving fragment.

---

### 3. Comparison at a Glance

| Feature | Mitochondrial DNA (mtDNA) | Y-Chromosomal DNA (Y-DNA) |
| --- | --- | --- |
| **Mutation Rate** | **High** (Changes more frequently) | **Low** (Changes more slowly) |
| **Inheritance** | Maternal (Mother to all children) | Paternal (Father to son) |
| **Recombination** | None (Inherited as a single unit) | None (mostly) |
| **Copies per Cell** | Thousands | Only one |
| **Use Case** | Deep maternal ancestry; ancient/degraded samples | Direct paternal lineage; surname tracking |

### Summary

mtDNA is like a **fast-ticking clock** that never gets reset. Because it doesn't "shuffle" with other DNA, you can follow that ticking clock back through a single maternal line for hundreds of thousands of years. It isn't "stable" because it doesn't change; it’s "stable" because it **never mixes**, making the changes it *does* have very easy for scientists to track.

**Would you like me to explain how "Mitochondrial Eve" was discovered using these mutation rates?**

युयुत्सु's picture

3 Jan 2026 - 12:43 pm | युयुत्सु

एका पेशीतले सर्व वाय डिएनए एका पारड्यात टाकले आणि सर्व एमटी डिएनए एका पारड्यात टाकले तर कोणते पारडे जड असेल असा प्रश्न उपस्थित केला तर

एमटी डिएनए (जे आईकडून येते) वरचढ ठरते!

तात्पर्य- वडीलांच्याकडून मिळणारा जनुकीय वारसा आईकडून मिळणार्‍या वारशाच्या तूलनेत कमी असतो.

मेगाबायटी प्रतिसाद देऊन सत्य बदलणार नाही.

जगभर पितृसत्ताक पद्धतीच का चालते याचा नीट अभ्यास केला तर ( आपला मेंदू चालवून कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे) हे सहज लक्षात येते.

समुद्रावर फिरताना दोन चार सुंदर शिंपले मिळाले कि मला पूर्ण सत्य गवसले म्हणून भूभू: कार करून काहीही होत नाही.

विवेकपटाईत's picture

8 Jan 2026 - 12:33 pm | विवेकपटाईत

खरा वंश हा स्त्रियांचा असतो. याबाबतीत मी लेखकाशी १००० टक्के सहमत आहे

'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकाची आठवण आली. हे पुस्तक मी १०-१५ वर्षांपूर्वी वाचले तेंव्हा थक्क झालो होतो. सांप्रत चर्चेच्या अनुषंगाने त्यातला एक मुद्दा आठवला:
हिंदू पध्दतीच्या लग्नात मुलीला व मुलाला त्याचा मामा आणतो, वडील नाही. हे तुंम्ही सगळ्यांनी अगदी आज देखील पाहिले असेल. त्याचे खाडकण डोळे उघडतील असे कारण राजवाडे यांनी वरील पुस्तकात दिले आहे. ते असे की पूर्वीपासून टोळ्यांमध्ये मुक्त लैंगिक संबंध असत. त्यामुळे मुलीचा अगर मुलाचा भाऊ (एकाच आईच्या पोटातून आल्यामुळे) खात्रीलायक रित्या माहीत असे पण 'बापा'बद्दल खात्री नसे. म्हणून लग्नात मुलीच्या व मुलाच्या कुळाचा पुरूष प्रतिनिधी म्हणून आईचा भाऊच त्यांना घेऊन येत असे. आजतागायत ही प्रथा सुरू आहे.

वरील चर्चा खरा वंश कुणाचा याबद्दल आहे तर त्याचे उत्तर आईकडचा असे आपल्या विवाहसंस्थेने आधीच देऊन ठेवले आहे.

बाकी राजवाडे यांचे पुस्तक वाचले तर आजचे धर्ममार्तंड बेशुध्द पडतील. त्यांचे पुस्तक कोणीही छापायला तयार होईना. गंमत अशी की मदतीसाठी ते शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले. आंबेडकर यांनी त्यांना पुस्तक प्रसिध्द करण्यासाठी मदत केली असे वाचल्याचे आठवते. बहुधा पुस्तकाच्या प्रस्तावनेतच जी डांगे यांनी लिहिली असावी.

त्याच्यावरची आणखी मोठी गंमत अशी की, राजवाडे यांनी महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारी १०० व्यक्तीमत्वे असे काही पुस्तक लिहिले आहे , जे मी वाचले नाही. पण त्यात त्यांना महात्मा फुले यांना स्थान द्यावेसे वाटले नाही, जे बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू होत. राजवाडे यांना आपल्या तथाकथित चित्पावन की कायतरी जातीच्या उच्चतेचा खूप अभिमान होता म्हणे.