एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
19 May 2009 - 2:26 pm

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा
या लेखनमालेच्या पहिल्या भागात काही सदस्यांच्या प्रतिसादास मी सहमत आहे तसाच असहमतही आहे. तरीही मिळालेल्या प्रचम्ड प्रतिसादामुळे ( २६ प्रतिसाद ८६८ वाचने) मी पुढचा भाग लिहीत आहे.
एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवण्याचे तुम्ही ठरवले असेल तर सर्वप्रथम तुमचे अभिनन्दन
तुमच्या निश्चयाला आमचा सलाम. निश्चयी माणसेच जगात यशस्वी ठरतात.
तर मित्रानो आपण आपल्या निश्चयास जागून सुरुवात करुया.
कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर त्याची पूर्व तयारी करावी लागते.
आपल्या "एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा" या निश्चयाचेही असेच आहे.
त्या साठी तयारी म्हणून.
ज्यानन्तरचा दुसरा संपूर्ण दिवस मोकळा असेल आणि आपलाच असेल असा कोणताही दिवस निवडावा उदा: शनीवार रवीवार अथवा जोडून सुट्ट्या येतात तो कोणताही दिवस.
सकाळी सकाळी मस्त डब्बल आम्लेट पाव अथवा मिसळ पाव हाणावा.
दुपारच्या जेवणात गुलाबजाम लाडू रसगुल्ले असे गोलवर्गीय पदार्थ खावे
सोबत खमण ढोकळा /उंधीयो असे आरोग्यवर्धक पदार्थ असावेत.
नुसती साधी पोळी खाण्यापेक्षा पुरनपोळी सारखे भरीव काहितरी खावे.
पातळ पदार्थात रस्सा वगैरे आकारान्त पदार्थापेक्षा बासुंदी वगैरे इकारान्त पदार्थ असावेत.
दुपारी शक्यतो सामीश जेवण नसावे.
संध्याकाळे बाहेर फिरायला जाण्यापेक्षा घरातच भेळ कचोरी समोसे वडे असे हलके पदार्थ खावे.
( तरंगतात ते सारे पदार्थ हलके असतात. वडे समोसे कचोरी हे तेलावर तरंगतात)
रात्री जेवणात सामीश असल्यास तळलेली अंडी , खीमा , तंदूरी चिकन , हे पदार्थ असावेत. सोबत तोंडी लावायला बोटीकबाब खीमा कबाब असे कबाब असावेत.
भात वर्गीय पदार्थात बिर्याणी/ पुलाव असे रुचकर पदार्थ असावेत. सोबत मिर्चीचे सालन असावे.
निरामीश असल्यास
लग्नात हमखास करतात ती बटाट्याची लगदा भाजी. पावट्याची उसळ.
भरल्या वांग्याची भाजी , बिरड्यावालाची रस्शाची उसळ. पुरी सारखे हलके पदार्थ
गोडाच्या पदार्थामध्ये आमरस सोबत तळलेले पापड कुरडया व तत्सम हलके पदार्थ.
भात वर्गीय पदार्थात काश्मिरी पुलाव.
जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून ३.१४२ कप बटरस्कॉच आइसक्रीम खावे
..............................................................................
ही झाली आपल्या "एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा" या निश्चयाची पूर्व तयारी.
पुढच्या भागात प्रत्यक्ष कोर्स बद्दल .......
(क्रमशः)

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

19 May 2009 - 2:29 pm | लिखाळ

>>( तरंगतात ते सारे पदार्थ हलके असतात. वडे समोसे कचोरी हे तेलावर तरंगतात)<<
हा हा हा .. हे मस्त :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2009 - 2:30 pm | परिकथेतील राजकुमार

(तरंगतात ते सारे पदार्थ हलके असतात. वडे समोसे कचोरी हे तेलावर तरंगतात)

=)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अनुप कोहळे's picture

19 May 2009 - 10:46 pm | अनुप कोहळे

=)) =)) =))

चिरोटा's picture

19 May 2009 - 2:50 pm | चिरोटा

आहे.

३.१४२ कप बटरस्कॉच आइसक्रीम खावे

आपण कुठलातरी गणिती फॉर्म्युला वापरलेला दिसतोय.३.१४.. म्हणजे Pi का काय म्हणतात त्याला.असो.
३.२५ कप खाल्ले तर चालेल ना? पदार्थांची यादी एवढी मोठी आहे की महिन्याचा पगार जायचा.२/३ लग्नाची कार्यालये जवळच आहेत. २५ रुपयांची पाकिटे वधु वरांस देवून जेवून यायचा विचार करतो.तसे चालेल का?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अभिज्ञ's picture

19 May 2009 - 2:53 pm | अभिज्ञ

दादानु,
ह्या सर्व आयटेम चे वजन ५-६ किलो निश्चितच भरेल.
दुस-या दिवशी सकाळी २-२.५ किलो नक्कीच कमी होणार.
हाय का नाय मज्जा. ;)

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विनायक प्रभू's picture

19 May 2009 - 3:15 pm | विनायक प्रभू

सहमत
पॉझिटीव ऍक्शन नेहेमीच जमते

दशानन's picture

19 May 2009 - 5:05 pm | दशानन

वजन वाढवतो आहे त्यामुळे प्रतिसादामध्ये शब्द संख्या कमी ;)

थोडेसं नवीन !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2009 - 3:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ, आम्हाला का छळताय? मिपाचा एवढा दुरूपयोग, तेही एखाद्या जुन्या सदस्याकडून पहिल्यांदाच होत असेल.

-- कं. अदिती

(खरंतर उघडलाच नसता हा धागा, पण खरडवहीत लिंक टाकलीत त्यामुळे उघडला!)

विजुभाऊ's picture

19 May 2009 - 3:35 pm | विजुभाऊ

का? व्हाय बॉदर?? हू केअर्स???
सहमत आहे. पण इट्स फॉर दोज ;हू केअर्स.
वजन ही गोष्ट अशी आहे की ती वाढते पण कमी होत नाही.
शंका: गुरुवर वजन करुन नन्तर शुक्रावर केले तर त्यात किती फरक होईल?
विजुभाऊ, आम्हाला का छळताय?
"छळण्यासाठी जन्म आपुला आधी छळलेची पाहिजे" ही संत उक्ती आहे.
मिपाचा एवढा दुरूपयोग, तेही एखाद्या जुन्या सदस्याकडून पहिल्यांदाच होत असेल

याला दुरुपयोग नाही तर इलियाहु गोल्ड्रट्ट च्या भाषेत मॅक्झीमम युटीलायझेशन ऑफ एव्हेलेबल रीसोर्सेस असे म्हणतात.

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

अवलिया's picture

19 May 2009 - 3:40 pm | अवलिया

प्र का टा आ

--अवलिया

विजुभाऊ's picture

19 May 2009 - 5:30 pm | विजुभाऊ

ठ्यॉ

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

यन्ना _रास्कला's picture

21 May 2009 - 10:52 am | यन्ना _रास्कला

म्याच प्र का टा आ.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?

यन्ना _रास्कला's picture

19 May 2009 - 9:13 pm | यन्ना _रास्कला

रात्रभर मीपाव इजुभाव तुमच्या कविता वाच्यायच्या कि काय. अतिसारान मानुस नकि बारिक होयील (हाशा घ्यावा इनोद हाय) :)

साटरडे नायीट फुल टायीट.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*

पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?

वेदनयन's picture

20 May 2009 - 5:47 am | वेदनयन

तेवढेच कशाला विसरलात? त्या शिवाय आमचे (आणी इतर ७५% मिपाकरांचे कसे होणार). आणी तात्यांचा सहभाग हवा असेल तर तुम्हाला सुरापानचा समावेश करावाच लागेल

स्लिम मी होणार

विजुभाऊ's picture

26 Sep 2011 - 6:02 pm | विजुभाऊ

हम्म.............. लै दिवस झाले सिम्गल माल्ट ला...............