शाळेची वेळ झाली
चला चला बॅग भरा
चला चला डबा भरा
शाळेची वेळ झाली
शाळेची वेळ झाली
एक वही सापडत नाही
गृहपाठाचा पत्ता नाही
पेन्सिल तर तुटकी बाई
पेनामधून गळते शाई
शाळेची वेळ झाली
अंघोळ म्हणजे दोनच तांबे
नुसती बुडबुड जरा न लांबे
बाबांची तर चाले लुडबूड
टॉवेल मिळेतो माझी कुडकूड
शाळेची वेळ झाली
डब्यात काय ? पोळीचा रोल
आणि दोन बिस्किटं गोल
शाळा माझी तिची घाई
कित्ती कामं करते आई
शाळेची वेळ झाली
घाई आमची झाली भारी
तोच व्हॅन आली दारी
पण आई घे ना पापा
नाहीतर करणार नाही टाटा
शाळेची वेळ झाली
प्रतिक्रिया
2 Nov 2025 - 1:14 pm | बिपीन सुरेश सांगळे
दिवाळीची सुटी संपून उद्यापासून सुरु होणाऱ्या शाळांना आणि पोरांना
10 Nov 2025 - 4:52 am | nutanm
पोराना काय मुलाना पोरकी ती पोरे आपण व्यवस्थित आईवडिल परेसा पैसा असल्यावर आपलीच मुले ती . माझ्या आईला कधीच पोरे म्हटलेले आवडायचे नाही कारण आमचे सर्व त्यानी त्यान्चयाकडे असलेल़या साधारण पैशात व्यवसथित केले. असो राग नसावा. माझे विचार सान्गितले.
14 Nov 2025 - 12:27 am | सौन्दर्य
तुमचे हे मत वाचेपर्यंत पोरे व मुले ह्यात फारसा फरक असेल असा विचार केला नव्हता. 'पोरे' म्हणजे आसपासचे सगळेच बालगोपाल, व 'मुले' म्हणजे स्वताची अपत्ये किंवा
ओळखीची मुले असा सर्वसाधारण फरक माझ्या मनात होता.
12 Nov 2025 - 3:53 pm | श्वेता२४
आवडले.
14 Nov 2025 - 12:24 am | सौन्दर्य
साधे, सोपे , सुटसुटीत गीत. आवडले .
16 Nov 2025 - 10:53 pm | बिपीन सुरेश सांगळे
आणि सर्व वाचकांचे खूप आभार
बालकवितेला प्रतिसाद म्हणजे मजाच आहे की !
16 Nov 2025 - 10:55 pm | बिपीन सुरेश सांगळे
नूतनजी
भावना पोचल्या आभार
पोरं हा एक सर्वसाधारण शब्द आहे
आणि मुलंच असं म्हणायचं असेल तर -
माझी मुलं आता शाळेत जात नाहीत , ही कविता त्यांच्यासाठी नाही ! LOL
16 Nov 2025 - 11:39 pm | गणेशा
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम
17 Nov 2025 - 3:31 am | अभ्या..
अरे वा,
असली सेम कविता आम्ही (स्वआ.ब.) आमच्या मिपालहानपणी मिपावरच केलेली होती. अर्थात ते विडंबन होते पण आशय हाच.
https://www.misalpav.com/node/36113
.
तेव्हा निर्मळ मनाने भरभरुन प्रतिसाद देणारे होते म्हणून लिहूही वाटायचे. असो......