शाळेची वेळ झाली -बालकविता
शाळेची वेळ झाली
चला चला बॅग भरा
चला चला डबा भरा
शाळेची वेळ झाली
शाळेची वेळ झाली
एक वही सापडत नाही
गृहपाठाचा पत्ता नाही
पेन्सिल तर तुटकी बाई
पेनामधून गळते शाई
शाळेची वेळ झाली
अंघोळ म्हणजे दोनच तांबे
नुसती बुडबुड जरा न लांबे
बाबांची तर चाले लुडबूड
टॉवेल मिळेतो माझी कुडकूड
शाळेची वेळ झाली
डब्यात काय ? पोळीचा रोल
आणि दोन बिस्किटं गोल
शाळा माझी तिची घाई
कित्ती कामं करते आई
शाळेची वेळ झाली
घाई आमची झाली भारी
तोच व्हॅन आली दारी
पण आई घे ना पापा
नाहीतर करणार नाही टाटा
शाळेची वेळ झाली
वाचने
1392
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
दिवाळीची सुटी संपून
पोराना काय मुलाना पोरकी
In reply to पोराना काय मुलाना पोरकी by nutanm
पोरे व मुले
छान बालगीत
छान गीत
आणि सर्व वाचकांचे खूप आभार
नूतनजी
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम
झैरात झैरात झैरात