माझी मद्रास ची सफर- भाग ३

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
15 May 2009 - 10:48 pm

... भाग १
... भाग २
मद्रासची सफर तिथल्या रिक्षावाल्यांबद्दल बोलल्याशिवाय पूर्ण कशी होईल?? मुंबईत जिथे किमान रिक्षाभाडे ९ रू. मध्ये जाता येते, अशा ठिकाणीही हे लोक ४०रू आकारतात.. मी ४०रू पेक्षा खाली येणारा रिक्षावाला एकदाही नाही पाहिला.. आय आय टीच्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी स्थानक १० मिनिटांच्या अंतरावर आहे.. पण त्यासाठीही ५०रू. मोजलेयत.. आमचे सहाध्यायी एक तमिळ हिंदी वाद सोडला तर खूपच चांगले होते.. कुठेही जायचे असेल, तर रिक्षावाले त्यांना तर फसवतातच, पण आम्ही बाहेरचे म्हणून आम्हांला आणखी जास्त फसवतील म्हणून ते घासाघीस करून भाडे ठरवून द्यायचे.. मीटर प्रकार तिथे कुणाच्या खिजगणतीतही नाही..
असेच एकदा आम्हास शहरात जायचे होते.. रेशमी साड्या.. झालंच तर आणखी काही इथल्या खास गोष्टी घरी नेल्या असत्या.. गटाल्या इतर बायकांना रस्त्यांवर खरेदी करायची होती.. मुंबईत फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोड वरती फिरून झाल्यावर मला तिथल्या फॅशन स्ट्रीट वा तत्सम प्रकाराचं अप्रूप नव्हतं.. पण सगळ्यांसोबत रिकामपणाचे उद्योग म्हणून सगळेच निघालो.. बहुधा तो शनिवार होता..आणि तिथे आय आय टी मध्ये एक खुले थिएटर आहे.. दर शनिवारी तिथे माफक दरात चित्रपट दाखवले जातात.. पुरूष मंडळीना आमच्या खरेदीत काही रस नव्हता.. त्यांना संध्या़काळी आराम करून रात्री चित्रपट पाहायचा होता.. शिबिरातून अतिथीगृहात न जाता थेट शक्य तितक्या लवकर मुख्य प्रवेश द्वारापाशी आलो... नेहेमीप्रमाणे रिक्षा ठरवण्याचे काम स्थानिक सहकार्‍यांने पार पाडले.. ४०रू.. पोंडी बाजार पर्यंत.. तिथे फॅशन स्ट्रीट.. अणि पुढे T नगरमध्ये नल्ली, चेन्नई सिल्क अशी इतर दुकाने आहेत... मला पोंडी बाजारातली आवडलेली एकमेव गोष्टः

नल्ली'ज मस्त प्रशस्त आहे.. साड्यांची पुष्कळ व्हरायटी आहे.. तिथे आणखी एक स्टोअर आहे.. "सरवाना'ज"..ते चेन्नईतले सगळ्यात मोठे स्टोअर आहे... नल्ली'ज पेक्षा स्वस्त आहे.. अर्थात वस्तूंचा दर्जाही त्याच लायकीचा असतो. पण तरीही गर्दी इतकी असते की पाय ठेवायला जागा मिळत नाही.. नल्ली'ज मध्ये मनसोक्त खरेदी केल्यावर समोरच आणखी एक कपड्यांचेच दुकान होते.."पोथी'ज"!!! वेळही भरपूर होता हाताशी.. चला म्हटले.. विन्डो शॉपिंग करू... माझ्या एक सहकारी.. त्याना माझं जीन्स कुर्ता प्रकरण भलतंच आवडलं होतं... त्या म्हणाल्या चार मजली दुकान आहे.. भरपूर कपडे असतील तिथे.. मला जीन्स कुर्ता निवडायला मदत कर... दुकान छानच होतं.. पण माहीत आहे..??? त्या दुकानात चार स्वागतिका ठेवल्या होत्या... भरतनाट्यमला घालतात तसा पारंपारिक पोषाख न दागिने घालून त्या दिवसभर उभ्या असतात.. नंतरही त्या दुकानात दोनदा जाण्याचा योग आला.. तेव्हाही त्या तशाच.. चेहेर्‍यावर हसू आणून उभ्या होत्या.. मला त्यांच्याबद्द्ल खरंच खूप वाईट वाटलं..

परत येताना.. रिक्षा शोधू लागलो.. पहिला म्हणाला.. ८०रू... कैच्या कै??? त्याला सांगितले.. ए बाबा.. येताना ४०रू. मध्ये आलो.. थोडे तरी कमी कर.. तो ऐकेचना.. सरळ निघून गेला...दुष्ट मेला!!! त्यानंतर भेटलेले रिक्षावाले... चढत्या क्रमाने.. १५०/-, २००/- शेवटी २५०/- पर्यंत पोचले हो ते रास्कल आण्णा लोक!!! पैसे देण्याबद्द्ल ना नव्हती... पण ते सरळ्सऱळ अडवणूक करत होते हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं.. तेवढ्यात समोर बस स्थानक दिसलं.. नि त्यात ५ब क्रमांकाची बसही... थेट आय आय टी त जाणारी... मग आणखी काय हवं होतं?? "तुम्हा रिक्षावाल्यांच्या नानाची टांग" असं मनात नाही.. B) मोठ्यांदा म्हणून (नाहीतरी कुणाच्या बापाला मराठी कळत होतं तिथे?? :p ) बसमध्ये शिरलो.

बाकी बाईमाणसं संध्याकाळच्या चित्रपटासाठी उत्सुक नव्हती.. मी माझं तिकीट आधीच इतरांना काढायला सांगितले होतं.. मला त्या आय आय टी मध्ये सगळ्यांत जास्त काही आवडलं असेल तर ओपन एअर थिएटर... खूप मोठं आहे... खुलं असूनही आवाज अगदी स्पष्ट.... रात्रीची मस्त थंड हवा... नि चित्रपट होता.. "द वॅन्टेज पॉइन्ट"!!!! वाह!!!! =D> उन्हाळ्याच्या सुटयांमुळे गर्दी जास्त नव्हती... पुढे खुर्च्या होत्या पण आम्ही पाठीमागे पायर्‍यांवर बसून चित्रपट मस्त अनुभवला.....

तसे रोज संध्याकाळी फिरायला तर जात असूच.. एकदा सागरकिनारी (मेरिना बीच नव्हे.. या किनार्‍याचं नाव नाही आठवत्)गेलो होतो.. आपल्या चाट्च्या गाड्यांसारख्या मासे तळून देणार्‍या गाड्या भरपूर होत्या.. नि बाँबे भेळ नि चौपाटी आईस्क्रीमच्या पण!!!! समोर मुरूगन नावाचे हॉटेल आहे... तिथल्या इड्ल्या मात्र.. मस्त.. लाजवाबच होत्या.. वसतीगृहातील अर्धकच्च्या इडल्या खाऊन आयुष्यात पुन्हा कधीही इडली न खाण्याची प्रतिज्ञा या इडल्या खाऊन मोडली...

मस्त कोवळं लुसलुशीत केळीचं पान.. त्यावर गरमागरम इडली... नि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या... नि काटा-चमच्यांना पूर्ण फाटा... अहाहा.... स्वर्गसुख म्हणजे आणखी दुसरं काय असतं?? (उत्तर आहे माझ्याकडे: मस्त वाफाळता भात.. त्यावर वरण... वरून तुपाची धार... लिंबाची फोड.. नि मेतकूट... याला भूतलावर कुठेही पर्याय नाही)....!!!

<क्रमशः)

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 May 2009 - 10:53 pm | यशोधरा

सरवाना आणि पोथी बद्द्ल ऐकले आहे, आणि त्या उभ्या असणार्‍या स्वागतिकांबद्द्लही. ते ऐकून खरच वाईट वाटले होते. दिवसभर ते नटून असे उभे राहणे काय खेळ आहे का? पण पोथी खूप मस्त दुकान आहे असं ऐकलय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2009 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या स्वागतिकांना अगतिका म्हणावसं वाटत आहे.

एकदम लंडनच्या राजमहालाबाहेरचे गार्डस आठवले. त्यांच्याबद्दलही मला असंच वाटलं होतं. ज्या घोड्यांवर ते बसतात, त्या घोड्यांना हलण्याची, शेपटी हलवण्याची परवानगी असते, पण हे आपले आर्ननेटरसारख्या मख्ख चेहेर्‍याने तिकडेच उभे, चेहेर्‍यावरची माशीही न हलवता!

मस्त लिहिलं आहेस, पण अजून थोडे मोठे भाग टाक ना!!

प्रमोद देव's picture

15 May 2009 - 10:59 pm | प्रमोद देव

हा भागही छान आहे.
तो 'अड्यार'(अडियार)बीच तर नव्हे?
लहानसाच आहे पण चांगला आहे.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मस्त कलंदर's picture

15 May 2009 - 11:07 pm | मस्त कलंदर

अडियार बीच!!!
काही केल्या मेलं ते नावच आठवत नव्हतं... धन्यु...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

Nile's picture

15 May 2009 - 11:24 pm | Nile

छान! मा़झ्या सर्व आठवणी ताज्या होत आहेत. :)

नल्ली, चेन्नई सिल्क म्हणजे तर काय विचारता! सरवानाची टोलेजंग अशी किमान पंचवीस दुकान असतील चेन्नईत.

समिधा's picture

15 May 2009 - 11:31 pm | समिधा

हा पण भाग खुप छान लिहीला आहेस.फुलांच्या वेण्यांचा फोटो खुप छान

वसमिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मस्त कलंदर's picture

15 May 2009 - 11:34 pm | मस्त कलंदर

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

16 May 2009 - 12:27 am | बिपिन कार्यकर्ते

हाही भाग मस्त. लगे रहो.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

16 May 2009 - 1:48 pm | सहज

हेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 1:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो !

धमाल मुलगा's picture

19 May 2009 - 1:54 pm | धमाल मुलगा

असेच म्हणतो.
मजा आली वाचायला. :)

(स्वगतः आयला, मोठ्ठ्या लोकांच्या प्रतिसादात +आकडे टाकून प्रतिसाद टाकतोय, चुकुन मोठ्ठ्यांच्या कंपूत नाय ना शिरलो? ;) )

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2009 - 1:48 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त वाफाळता भात.. त्यावर वरण... वरून तुपाची धार... लिंबाची फोड.. नि मेतकूट... याला भूतलावर कुठेही पर्याय नाही बहुमताने सहमत !
हा भाग ही आवडला. ओघवत्या शैलीतले वर्णन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

क्रान्ति's picture

19 May 2009 - 9:20 am | क्रान्ति

याआधीचा आणि हा भागही मस्त. फोटोही छान. सहज आणि ओघवती शैली आवडतेय.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

चिरोटा's picture

19 May 2009 - 9:42 am | चिरोटा

आहे. फोटो मस्त आहेत.
अवांतर-फ्युचर ग्रूप चे किशोर बियानी ह्याना बिग बाझारची प्रेरणा 'सरवाना'कडून मिळाली होती.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

स्वाती दिनेश's picture

19 May 2009 - 11:22 am | स्वाती दिनेश

ह्या भागात फोटोंनी अजून मजा आणली,
स्वाती