वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."
सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले? त्यानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले.
----------------
हा म्हणाला--माझ्या बाबांनाही एकच पाय होता
प्रतिक्रिया
16 Sep 2025 - 2:45 pm | श्वेता व्यास
आवडली. माझा अमक्यावर विश्वास नाही, तमक्यावर विश्वास नाही म्हणून फुशारक्या मारणाऱ्यांना नियती कधी कशावर विश्वास ठेवायला भाग पाडेल काही सांगता येत नाही.
16 Sep 2025 - 3:03 pm | सावत्या
चेपुवर एक रीलमधे सेम कथा सांगितली होती.
चुलत भावाऐवजी आई होती.
योगायोग असावा!!!!
16 Sep 2025 - 3:32 pm | अनन्त्_यात्री
अंदाज आला होता.
पु ले शु
झैरात https://www.misalpav.com/node/43370
16 Sep 2025 - 3:37 pm | कर्नलतपस्वी
अधिकारवाणीने शंकासमाधान करणारे न भेटल्याने गोधंळ उडतो. मग सोईस्कर मार्ग म्हणजे फुशारकी मारणे.
काही काही गोष्टी साठी स्पष्टीकरण मिळतच नाही. काही पिंडाला कावळा शिवतच नाही.असे का?
इच्छा राहिली असेल म्हणून स्पष्टीकरण दिले जाते.
खखोदेजा.
16 Sep 2025 - 3:40 pm | कर्नलतपस्वी
अधिकारवाणीने शंकासमाधान करणारे न भेटल्याने गोधंळ उडतो. मग सोईस्कर मार्ग म्हणजे फुशारकी मारणे.
काही काही गोष्टी साठी स्पष्टीकरण मिळतच नाही. काही पिंडाला कावळा शिवतच नाही.असे का?
इच्छा राहिली असेल म्हणून स्पष्टीकरण दिले जाते.
खखोदेजा.
16 Sep 2025 - 3:48 pm | अनन्त्_यात्री
ख खो का जा म्हणावेसे वाटते अशा वेळी
16 Sep 2025 - 4:04 pm | कुमार१
आवडली..
16 Sep 2025 - 6:35 pm | श्वेता२४
आवडली कथा
16 Sep 2025 - 7:31 pm | अमरेंद्र बाहुबली
कथा आवडली, पण कसलेल्या लेखकाकडून अजून मोठी अपेक्षा आहे, कथा सौम्य वाटली.
16 Sep 2025 - 7:42 pm | प्रचेतस
आयुष्मान्भव काकेश त्वं चिरंजीव पश्य मां|
पितॄणां प्रियतां नित्यं मयि भक्तिं विधास्यसि||
16 Sep 2025 - 7:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रचेतसभौ, अर्थ पण सांगा ना या सुभाषिताचा
16 Sep 2025 - 8:26 pm | नावातकायआहे
आयुष्मान्भव काकेश त्वं चिरंजीव पश्य मां|
पितॄणां प्रियतां नित्यं मयि भक्तिं विधास्यसि||
काकेशा चिरंजीव हो आणि बराच वेळ माझ्याकडे बघ
तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नेहमीच माझ्यावर भक्ती कराल. :-) :-)
16 Sep 2025 - 8:42 pm | प्रचेतस
हे काकेशा, तूर आयुष्य वाढून तू चिरंजीव हो. पितरांचे प्रिय करण्यासाठी माझ्या भक्तीचा स्वीकार कर.
16 Sep 2025 - 8:56 pm | अभ्या..
पितरांचे प्रिय करण्यासाठी माझ्या भक्तीचा स्वीकार कर.असली प्रार्थना केली तर मला पितरप्रिय व्हावे लागेल किंवा काकेश
16 Sep 2025 - 9:10 pm | Bhakti
बराच वेळ माझ्याकडे बघ... खुप खुप इमाजिन केलं,कावळा माझ्याकडे टक लावून कस किती वेळ पाहत असेन... ;) ;)
18 Sep 2025 - 10:16 am | कर्नलतपस्वी
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,म्हणाले
मिटवून हिशोब टाक
19 Sep 2025 - 11:30 am | राजेंद्र मेहेंदळे
झकास कविता!!
काढून दर्भ काक,म्हणाले
मिटवून हिशोब टाक
एकदम प्रॅक्टीकल