कोनतीबी सोसायटी म्हनली कि डोल्यापुढ आपसात भांडनारे सोसायटी मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन कान्दीवली मधी चारकोपला येक मिहार नावाची हायफाय हौसिंग सोसायटी हाए तिथ कोन्त्याबी मेंबराकड लग्न, एन्गेजम्येंट आस कायबी आस्ल तर सोसाटीतले सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात.
नंतर लग्न, एन्गेजम्येंटच्या ४-५ दिवस आधि सर्वे मिळुन रातभर नाच गाणी म्हंतात. मी
गेल्या वेळला तिथ गेलो व्हतो आमच्या पाव्हन्याकड लग्न होत तर सर्वे जमले आनि परत्येकान सारी रात जुन्या हिंदी पिक्चरामधली गानी म्हटली. सोबतीला ढोल्की होती आनी घुंगरु, पन्जाबी चिपल्या आस काय काय होत. जास्त करुन लताजीची गानी म्हटली. ना जीया ना लगे, आपकी नझरो ने समझा जा रे उड जारे पन्ची, जाये तो जाये कहान, घडी घडी मोरा दील धडके, अय दिले नादान, आयेगा आनेवाला ई. रफि, किशोर, हेमनदा, शैलेनदर, मन्ना डे यान्ची पन गानी भर्पुर म्हनली गेली.
काय काय गानी तर आमी लोकानी कदीपन एैकलीच नवती. जाम मजा आली. आनी कोनी कोनी तर रस्त्यावर मिलतात ती लता-आशाची गान्याची पुस्तक आनली होती. काय काय लोकानी मराठी, बंगाली, पंजाबी गुजराती आनि सिंदी गानी बी गायली. मग ज्यान्चाकड लग्न होत त्यानी सर्वान्ला चाहा, सरबत, समोसे, वेफर्स आस काय काय दिल. आनी मंग सकाली सर्वी लोक आपल्या आपल्या घराला गेली. कोनाच कोनाशी भान्डन नाय, इगो नाय. कायच नाय.
ओन्ली प्रेम.
प्रतिक्रिया
17 May 2009 - 12:12 pm | अवलिया
कस बोललात राव. आता आमचबी मिपा अक्सी असच हाय. कोनताबी लेख यिवुदे, कविता यिवु दे कउल येवु दे. काय?
परतिसाद देतात. लोक कवतिक करतात. आता कोनतेबी सनकेतस्थळ म्हनले कि डोल्यापुढ आपसात भांडनारे मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन मिपा नावाच हायफाय स्थल हाए तिथ कोन्त्याबी मेंबरान लेख, कविता आस कायबी लिव्हल तर सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात. काय काय कविता तर आमी लोकानी कदीपन वाचलीच नवती. जाम मजा येते. आनी मंग सर्वी लोक आपल्या आपल्या घराला जातात. कोनाच कोनाशी भान्डन नाय, इगो नाय. कायच नाय.
ओन्ली प्रेम.
--अवलिया
17 May 2009 - 5:59 pm | यन्ना _रास्कला
तात्या त त्येंना म्हायत नसलेली जुनी गानी पन तेचा इतिहास-भुगोलासंगट अयकवतील. तात्याना तित बोलावलच पाहिजे लोकानी. त्ये पन मानदन द्येवुन.
तात्याचा सम्मान हाच मिपाचा सम्मान.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
17 May 2009 - 12:14 pm | अनंता
बाकी गाण्याबद्दल म्हणाल तर, हे गाणे (आपकी नझरो ने समझा जा रे उड जारे पन्ची ) माझ्या फार आवडीचे ;)
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
17 May 2009 - 12:21 pm | सहज
थोडक्यात "मिहार" मधे देखील उच्चभ्रुंची कंपूबाजी आहे तर.
चांगले आहे :-)
17 May 2009 - 12:28 pm | पर्नल नेने मराठे
मुबै त अम्च्या बिइल्डीग मधे पण असेच सण्-समारम्भ साजरे होतात.
वरील लेख वाचुन मुम्बै चि आथ्वन आली.
चुचु
17 May 2009 - 5:53 pm | यन्ना _रास्कला
तुहि सोसायटी कंची आनि तुला तित आध्यक्श केल का नाय इतर लोकानी.
पुर्वी आमच्या सालेत जेला शिकवता येत नाय तेलाच मुक्यादापक बनवायचे तेचीच आटवन जाली. येकदा का तो मुख्यादापक जाला की शिकवायच तास कमी आनी मिटींगा जास्त. निदान पोरांच हाल टलतात.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
18 May 2009 - 1:29 pm | पर्नल नेने मराठे
तुहि सोसायटी कंची आनि
ममता सोसायटी....मला नाहि अध्यक्श केले :(
चुचु
17 May 2009 - 6:55 pm | llपुण्याचे पेशवेll
हम्म्म.. चांगले आहे. मला मिहार असे लाव वाचून वाटले कि दवबिंदुने 'भारतभेट' सारखा एखादा उद्बोधक लेख लिहीला आहे की काय परत की ज्यात निवडणूकांमुळे महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे वगैरे वगैरे... :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984