हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
20 Apr 2025 - 9:14 am

श्री० देवेन्द्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र

स० न० वि० वि०

सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स.

मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे -

० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे. त्यात कुपोषण आणि प्रदुषण भर घालून गंभीर समस्या निर्माण करत आहेत. याचा परिणाम म्ह० शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे मधुमेह, हृदयरोगासारखे आजार. मेंदूच्या क्षमतेवर होणार्‍या परिणामावर मी नोव्हे० २४ मध्ये म०टा०मध्ये लेख लिहीला होता.

० निसर्ग सर्वाना समान ग्रहणक्षमता देत नाही. त्यात वर उल्लेख केलेले घटक अधिक भर टाकतात आणि समस्या अधिक वाढतात.

० हिंदीचे मराठीवर आक्रमण झाल्याने मराठी समृद्ध किती झाली याचा वस्तूनिष्ठ विचार/मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

० पुरेशी ग्रहण क्षमता नसलेले मानवी मेंदू ’लर्निंग कॊन्फ्लिक्ट’च्या ताणामुळे मराठीभाषेच्या वाढीला पूरक ठरतील की मारक याचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नसेल असे मराठीची सद्यस्थिती बघून वाटते.

राजकीय हेतूने प्रेरित धोरणे वैज्ञानिक सत्याचा आदर करतील असे वाटत नाही.

-राजीव उपाध्ये

धोरणविचार

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Apr 2025 - 11:19 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय?
दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी-
"शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...."
https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI
कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?

युयुत्सु's picture

21 Apr 2025 - 6:25 am | युयुत्सु

सहमतीदर्शक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

युयुत्सु's picture

21 Apr 2025 - 11:30 am | युयुत्सु

फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.

उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2025 - 6:11 pm | प्रसाद गोडबोले

M

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 6:23 pm | अथांग आकाश

तुमच्यापेक्षा संक्षी परवडले!
.