रोज नित्यक्रमाने ताजी ए० आय० न्युज युटयुब वर बघत असताना हा व्हिडीओ नजरेस पडला. https://www.youtube.com/watch?v=v2Ur_DgaEEI
काही वेळाने या एक चिनचा नकाशा पुढे केला
या नकाशात भारताचा मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे (स्वगत- सुब्रम्हण्यम स्वामी ओरडून सांगत असलेली जमीन ती हीच का?)
आता याचा राग म्हणून जर भारताने चीनी ए० आय० वर बंदी घातली तर इतर बाबतीत एकापेक्षा एक सरस असलेली चीनी मॉडेल्स वापरण्यापासून भारतीय संशोधक वंचीत राहतील आणि सरकार गप्प बसले तर जमीन गिळंकृत केली हे स्वीकारून गप्प बसावे लागेल.
भारतीय राजकारणी भारतीय बुद्धीमत्तेला वर्षानुवर्षे नामोहरम करत आहेत - गोमूत्र, शेण यावर यावर संशोधन करून ही जमीन परत मिळणार नाही की चीनने उभ्या केलेल्या बौद्धिक आह्वानाना तोंड देता येणार नाही...
कुणी ऐकतय का?
प्रतिक्रिया
1 Apr 2025 - 10:34 am | श्रीगुरुजी
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या नकाशात दाखवेल. म्हणून मग प्रतिक्रिया देत बसायची का? चीन आपल्या नकाशात चिनी नाव देऊन अरूणाचल प्रदेश दाखवितो आणि ईशान्य भारतातील अनेक शहरांना स्वतः दिलेली चिनी नावे दाखवितो. असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.
डोकलाम व गलवान येथे भारताने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. इतर बाबतीत दुर्लक्ष करणेच योग्य.
दशकानुदशके युरोप, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे भारतीय नकाशात जम्मू काश्मीर दाखवित नव्हते. सार्वमत घजण्यास सातत्याने नकार देऊन व ३७० कलम काढून टाकून भारताने योग्य प्रतिक्रिया जगाला दिली आहे.
1 Apr 2025 - 10:54 am | युयुत्सु
<असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.>
कायद्याच्या भाषेत गप्प बसणे याला संमती आहे असे सहसा मानले जाते.
1 Apr 2025 - 12:23 pm | श्रीगुरुजी
कसला कायदा? कोणी लागू केला हा कायदा? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांसाठी कायदे, राज्यघटना असलं काही नसतं. आम्ही म्हणू तोच कायदा असतो. सूज्ञ देश इतर देशांच्या मूर्खपणावर योग्य वेळी कृतीतून उत्तर देतात. संज्या राऊतसारखे रोज उठून बरळत नाहीत.
3 Apr 2025 - 11:48 am | विजुभाऊ
काल पाकिस्तानातले लोक वक्फ च्या विरोधात प्रतिक्रीया देत होते.
भुंकणार्या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसले / दगड मारून घालवत बसलोतर पुढे जाताच येणार नाही.
3 Apr 2025 - 12:31 pm | श्रीगुरुजी
+ १
कोणत्याही भारतीय नेत्याने अरूणाचल प्रदेशला भेट दिली की चीन संतापून आक्षेप घेतो. अश्या वेळी चीनला उत्तर देत बसायचे का? भारत चीनच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून भेटी सुरूच ठेवून कृतीतून योग्य संदेश देतो.
1 Apr 2025 - 10:47 am | आंद्रे वडापाव
युयुत्सुजी , सोडून द्या विषय ...
सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ...
त्यातून त्यांना वेळ मिळाला की ,नंतर त्यांच्या दृष्टीने शुल्लक बाबींकडे ते बघतील , अशी अपेक्षा ठेवूया ..
1 Apr 2025 - 11:53 am | युयुत्सु
<सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ...>
होय तर! पण मला कुणाल कामराची अंबानी वरची कॉमेडी पातळी सोडून केलेली वाटली...
1 Apr 2025 - 12:34 pm | विवेकपटाईत
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने त्याचा नक्षा दाखवितो. स्वप्नील नेहरूजींच्या मूर्खपणाने आपण देशाचा हिस्सा गमविला. आज परिस्थिति 2014 पेक्षा अधिक उत्तम आहे. आपले सैन्य पहिल्या पेक्षा जास्त शक्तीशाली आहे. त्यामुळे चीन आता 1962 सारखा धाडस करू शकत नाही.
बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.
1 Apr 2025 - 1:22 pm | श्रीगुरुजी
सर्व प्रतिसादाशी सहमत.
आता गोबरविहारी शेणकिडे गोबरात जोरजोरात वळवळ करायला लागतील.
1 Apr 2025 - 2:58 pm | चौथा कोनाडा
महत्वाचा विषय !
वाचत आहे.
1 Apr 2025 - 8:31 pm | सुबोध खरे
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन हा आहे , यावर चीनने १९५० पासून आपला दावा सांगितलेला आहे.
कोणताही संदर्भहीन प्रतिसाद देण्याऐवजी त्याबद्दल पूर्ण वाचून घ्यावे
2 Apr 2025 - 11:54 am | मूकवाचक
चीनने गिळंकृत केलेला भूभाग परत मिळावा यासाठी गोमूत्र आणि शेणावर संशोधन होत आहे?
2 Apr 2025 - 6:25 pm | प्रसाद गोडबोले
मलाही हाच प्रश्न पडला आहे .
महत्वाच्या विषयावरील लेखात सदरहू लेखकाने ही असंबद्ध उल्लेख का बरे केले असावेत ? की हा ही लेखकाच्या पूर्वग्रहदूषित विशिष्व्ठ व्यक्तीद्वेषी विचारसरणीचा अजून एक पुरावा असावा ?
2 Apr 2025 - 3:14 pm | विअर्ड विक्स
त्या नकाशात अक्साई चीन हा चीनच्या नकाशात दाखवलाय पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवलाय याबद्दल खरे तर आपण चीनचे आभार मानले पाहिजे.
अश्या अनेक आंतरराष्ट्रीय बातमीदार वाहिनी भारताचे वेगवेगळे नकाशे दाखवतात.
बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे.
2 Apr 2025 - 6:57 pm | सुबोध खरे
देशाच्या सीमारेषा या तलवारीने आखल्या जातात
लेखणीने नव्हे
-- स्वातंत्र्यवीर सावरकर
2 Apr 2025 - 9:29 pm | श्रीगुरुजी
नेपाळसुद्धा काळापाणी हा भारतीय भूभाग आपल्या नकाशात दाखवितो व भारत त्यावर शष्प प्रतिक्रिया न देता दुर्लक्ष करतो.
3 Apr 2025 - 6:58 am | युयुत्सु
खोड्या कोण काढतं यावर त्याचे गांभीर्य ठरतं. लहान मुलाने खोडी काढली आणि नुकसान फार नसेल तर दूर्लक्ष केलं जातंं, मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही.
नेहरूंच्या चूका उगाळण्यात ज्यांची "समरसता" एकवटली आहेत, ते सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपांना कसलेच उत्तर देत नाही, हे फार गमतीशीर आहे. पण ते जाउ दे, सतत दिशाभूल करत राहणा-यांकडून, सतत गोलपोस्ट हलवणा-यांकडून माझी कसलीही अपेक्षा नाही.
स्वगत- डावे हे जर 'वाळवी' असतील तर उजव्यांना 'बुरशी' का म्हणू नये?
3 Apr 2025 - 8:11 am | श्रीगुरुजी
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही.
वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला.
२०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले.
चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे.
तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे.
भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच.
याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे.
जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.
3 Apr 2025 - 9:44 am | सुबोध खरे
चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे
पहिली ७० वर्षे जसे त्यांना अतिकडक महाभयंकर आणि अतिभयंकर महाकडक खलिते पाठवत होते तसे करायला हवे.
चिनी नेतृत्व घाबरगुंडी उडून आत्महत्या करेल
3 Apr 2025 - 9:47 am | श्रीगुरुजी
त्यापेक्षा हिंदी चिनी भाई भाई गाणे म्हणत भांगडा केला तर चीन घाबरून घामाघूम होईल.
3 Apr 2025 - 9:52 am | युयुत्सु
...किंवा गंगेच्या काठावर चीनचा नि:पात करण्यासाठी नियमित अनुष्ठाने करावित. अघोरी साधूंच्या तपःसामर्थ्याने जमीन परत मिळवता येईल यावर मोठे निधी मंजूर करून, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करावे.
3 Apr 2025 - 11:06 am | श्रीगुरुजी
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी असले प्रकार केल्याने १९४७ व १९६२ मध्ये मोठा भूभाग गमवावा लागला.
आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.
मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने आपणास उठासारखे आचरट प्रतिसाद द्यावे लागत आहेत.
3 Apr 2025 - 11:09 am | युयुत्सु
<मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने >
आपली निष्कर्ष क्षमता कौतुकास्पद आहे.
3 Apr 2025 - 11:14 am | श्रीगुरुजी
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही हाच निष्कर्ष काढेल. काही समर्पक आणि तार्किक उत्तर असते तर ते केव्हाच दिले गेले असते. पण ते नसल्याने आचरटपणा करावा लागला.
3 Apr 2025 - 3:18 pm | युयुत्सु
<आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.>
श्रीगुरुजी,
कृपया ६:३७ मि०पासून ही मुलाखत बघावी. डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे (नोबेल पुरस्कार विजेत्या बरोबर संशोधन करणे हे येरागबाळ्याचं काम नाही. )
https://www.youtube.com/watch?v=hknB9QIDuvs
3 Apr 2025 - 5:07 pm | अमरेंद्र बाहुबली
एखादा कितीही हुशार असुदे पण तो “खरं “ बोलत असेल तर आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!
3 Apr 2025 - 5:31 pm | युयुत्सु
< आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!>
हा हा हा
3 Apr 2025 - 10:34 pm | टीपीके
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
4 Apr 2025 - 9:58 am | वामन देशमुख
ते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.
4 Apr 2025 - 10:49 am | युयुत्सु
<तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल>
"तुमच्या" या शब्दाला माझा आक्षेप!
तुम्ही रागा आणि सोगा बद्दल बोलत असाल तर मी त्यांच्या बद्दल कधी, केव्हा आणी कुठे "ममत्व" दाखवले होते. मला बुद्धीवंतांचे आकर्षण आहे त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.
4 Apr 2025 - 11:26 am | चंद्रसूर्यकुमार
बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत.
रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/ar... आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-ban.... असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे.
राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा.

हे सगळे बघितल्यावर राजनविषयी पूर्वी असलेला आदर गेलाच. त्यांच्याच फॉल्टलाईन्स या २०१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात काही तज्ञांविषयी त्यांनी लिहिले आहे की असे लोक बिघडलेल्या घडाळ्याप्रमाणे असतात. म्हणजे काही झाले तरी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतात. मग काही वर्षांनंतर हेच वर्णन त्यांच्याविषयी पण लागू व्हायला लागले असे म्हणायचे का?
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत न येणार्या अनेक गोष्टींवर विनाकारण जाहीरपणे भाष्य केले होते. एक व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून त्यांना स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे. पण अशा मोठ्या पदांवर गेल्यावर त्या पदाशी संबंधित गोष्टींवरच बोलणे अपेक्षित असते. राजन यांच्या पूर्वी कोणत्याही गव्हर्नरने अशी जाहीर वक्तव्ये केली नव्हती. किंबहुना बहुसंख्य लोकांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण हे पण माहित नसायचे. पण राजन आल्यावर मात्र मधून मधून पत्रकार परिषदा, कुठेकुठे अर्थव्यवस्थेतील मोनेटरी पॉलिसीवर वगैरे भाषण असेल तरी मग पुरस्कारवापसी वर वगैरे सरकारला अनाहूत सल्ले देणे वगैरे गोष्टी त्या पदाला साजेशा होत्या असे वाटत नाही.
लॉक डाऊन सुरू झाल्यावर महिन्याभरात ते राहुल गांधींशी दीड-दोन तास गुगल मीटवर बोलले होते. रागाचे सोडून द्या. तो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. पण राजन यांचे काय? असे वरीष्ठ प्रोफेसर कामाच्या वेळेतला दीड-दोन तास असा सहजासहजी देत नाहीत. अशा मोठ्या विद्यापीठातील मोठ्या प्रोफेसरना भेटणे हे त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना पण इतके सोपे नसते. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांच्या फक्त थिसीस डिफेन्सला ते जातात. बाकी त्यांना मार्गदर्शन वगैरे पी.एच.डी चे विद्यार्थी किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्च असिस्टंट करतात कारण या प्रोफेसरना त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळत नसेल इतके ते व्यस्त असतील तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कुठून वेळ मिळणार? तरीही या तथाकथित चर्चेसाठी राजनना दीड-दोन तास मिळाले. आणि त्या चर्चेतून राजनना कसलाही अर्थबोध होणार नव्हता याची त्यांनाच नाही तर सगळ्या दुनियेला खात्री. याचा अर्थ काय समजवा? भविष्यात जर कधी दुर्दैवाने सेक्युलर सरकार आले तर त्यात आपल्याला अर्थमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा? (आणि मनमोहनसिंगांचे जसे पोतेरे झाले तसे आपलेही झाले तरी चालेल असे?) . असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का?
अमेरिकन फेडचे प्रमुख अॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होण्यापूर्वी काही महिने म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये अमेरिकेत वायोमिंग राज्यात जॅकसन होल या छोटेखानी शहरात जगातील महत्वाच्या अर्थतज्ञांची परिषद झाली होती. त्या ठिकाणी मला वाटते दरवर्षी ही मंडळी भेटतात. तर २००५ च्या त्या परिषदेत बाकी सगळे ग्रीनस्पॅनवर स्तुतीसुमने उधळत असताना रघुराम राजन यांनी HAS FINANCIAL DEVELOPMENT MADE THE WORLD RISKIER? हा पेपर प्रसिध्द केला होता. त्यात त्यांनी २००८ चे संकट येईल असे भाकित केले होते असे म्हटले जाते. त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात या पेपरचा उल्लेख वाचला. त्यानंतरही प्रत्यक्ष पेपर वाचायचा दीड-दोन वर्षे आळस केला होता. पण २०१८ मध्ये शेवटी तो पेपर वाचलाच. त्यात पान ४० वर पेपरचे सार म्हणून त्यांनी नक्की काय लिहिले आहे हे इथे कॉपी-पेस्ट करतो---
Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. In such an eventuality, it is possible the losses that emanate from a financial catastrophe cannot be entirely borne by current generations and are best shared with future generations. Some of the mechanisms for sharing such systematic risks with future generations such as (defined benefit) social security are being changed. While there are gains from doing so, and from ensuring their sustainability, we need to ensure that the inter-generational risk sharing mechanism they offer is not overly weakened. We also need to continue improving the intrinsic flexibility of our economies, so as to better ride out the downturns that, almost inevitably, will occur.
म्हणजे काय तर राजन स्वतः २००८ सारख्या घटनेला low probability but highly costly downturn असे म्हणत आहेत. याचाच अर्थ असे काही व्हायची शक्यता कमी आहे पण तसे झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे ते म्हणतात. राजन स्वतःच एखादी गोष्ट व्हायची शक्यता कमी आहे असे म्हणत असतील तर ती गोष्ट होणार याचे भाकित त्यांनी केले होते असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निवाडा वाचकांवरच सोडतो. अर्थात इतर लोक असे काही होईल याची शक्यता शून्य आहे असे म्हणत असतील आणि राजन त्याची शक्यता कमी आहे (म्हणजे शून्यपेक्षा जास्त) असे म्हणत असतील तर इतरांपेक्षा नक्कीच जास्त श्रेय राजनना द्यायला हवे पण तसे काही होणार याचे भाकित त्यांनी केले होते हे म्हणणे कितपत योग्य आहे? दुसरे म्हणजे असे काही झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे राजन म्हणतात ती किंमत किती? तर याच नाही तर पुढच्या पिढ्यांना (अनेकवचनी) पण कदाचित त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल!! हे म्हणणे कैच्याकै नाही झाले का?
प्रत्येक वेळेस रघुराम राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे' हे शेपूट आलेच म्हणून समजायचे. २००८ च्या संकटाचे भाकित करणारे रघुराम राजन हेच एकमेव होते का? तसे अजिबात नाही. २००८ मध्ये नक्की काय चालू आहे हे समजण्याइतकी माहिती मला नव्हती पण नंतरच्या काळात या प्रकरणाविषयी माहिती गोळा केली. तेव्हा समजले की अनेकांनी २००८ चा इशारा आधीच दिला होता. त्यात Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी, पीटर शिफ, मायकेल बरी ही मला माहिती असलेली नावे आहेत. मला माहित नसलेली इतरही अनेक नावे अशी असतील. वर म्हटल्याप्रमाणे २०१३ पासून दरवर्षी 'आता २००८ सारखे संकट परत येणार हो.....' असले लांडगा आला रे आला चे इशारे राजन देत सुटले होते तसे इशारे मायकेल बरी, पीटर शीफ वगैरे देत सुटले होते का? ते रघुराम राजन करत होते. आणि मधल्या वर्षांमध्ये राजन यांची भाकिते चुकल्यानंतर त्यांना त्याविषयी प्रश्न किती माध्यमांनी विचारला? आणि परत राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे...' हे शेपूट आजही येतेच.
२०२३ मध्ये अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बॅंक वगैरे संकटात आल्यावर अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले (प्रत्यक्षात छापले नाहीत तर त्या इलेक्ट्रॉनिक एन्ट्री होत्या) म्हणून आता बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे राजन म्हणत आहेत. त्याच राजननी २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान भारताने काय करावे असा सल्ला दिला होता? तर तो पुढील ट्विटमध्ये बघा-
https://x.com/AbhishBanerj/status/1644159805198675975
असे पैसे छापून कसलीच समस्या सुटत नाही तर उलट महागाईचा भडका उडतो हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. आणि हे मोठे नोबेल मिळवायच्या योग्यतेचे एम.आय.टी मधील पी.एच.डी प्रकांडपंडीत अर्थशास्त्री काय म्हणत होते- तर नोटा छापा. असल्या माणसाच्या तथाकथित विद्वत्तेवर विसंबून राहून मोदींच्या सरकारने नोटा छापल्या नाहीत हे आपले मोठे सुदैव.
काय उपयोग असतो असल्या प्रकांडपंडित लोकांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वत्तेचा? भविष्याबद्दल त्यांनी काही आडाखे बांधावेत तर ते किती वेळा फसले आहेत हे राजन यांच्याच उदाहरणावरून कित्येकदा दिसून आले आहे. म्हणजे भविष्याविषयी यांचे आडाखे इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही सामान्य माणसापेक्षा किती अधिक अचूक असतात? जानेवारी २०२३ मध्ये हे रघुराम राजन रागाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि त्यानंतर म्हणाले होते की २०२२-२३ मध्ये ५% जीडीपी वाढ झाली तरी खूप झाले. आणि प्रत्यक्षात वाढ ७% च्या आसपास झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९ महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान ७ महिन्यांचा विदा हाताशी असताना यांचा अंदाज काय तर ५% वाढ झाले तरी खूप झाले. प्रत्यक्षात आकडे आल्यावर आपला अंदाज चुकला हे मान्य करायचा प्रांजळपणाही त्यांच्याकडे नाही आणि हे जगभर मिरवत २००८ ची झूल अंगावर पांघरून गंडणारी परत नवी भाकिते करणार आणि परत लांडगा आला रे आलाचे इशारे देत सुटणार. जेव्हा प्रत्यक्षात लांडगा आला त्यावेळेस मात्र यांचे इशारे कुठे जातात काय माहित.
आणि आहेतच इथले युयुत्सुंसारखे लोक नुसती एम.आय.टीची डिग्री दिसली की राजन म्हणेल ती पूर्वदिशा मानणारे.
4 Apr 2025 - 2:22 pm | युयुत्सु
श्री० चंद्रसूर्यकुमार,
प्रदीर्घ आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
क्षणभर आपण तुम्ही म्हणता ते सर्व १००% सत्य आहे, असे मानू या. पण मी वेगळा विचार करणारा माणूस आहे. आता हेच बघा- तुमच्या दाव्याप्रमाणे प्रा० राजन यांची भाकीते दणदणीत आपटली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते.
पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!
त्या अर्थी सत्य काही तरी वेगळे असले पाहिजे... सध्या तरी ते शोधणे मला शक्य नाही.
4 Apr 2025 - 4:52 pm | चंद्रसूर्यकुमार
त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही.
दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार?
दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.
4 Apr 2025 - 5:44 pm | युयुत्सु
4 Apr 2025 - 5:44 pm | युयुत्सु
4 Apr 2025 - 5:45 pm | युयुत्सु
4 Apr 2025 - 5:45 pm | युयुत्सु
4 Apr 2025 - 5:47 pm | युयुत्सु
हे मुद्दे (सध्या तरी) पटण्यासारखे आहेत...
4 Apr 2025 - 6:34 pm | सुबोध खरे
जगातले सर्व ज्ञान हि केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या काही संस्था आहेत.
आणि तेथे तुम्ही crème de la crème आहेत असे विद्यार्थ्यांवर ठसवलेहि जाते.
त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.
त्यामुळे आपल्याला सगळ्यातले सगळेच कळते किंवा आपण सर्वज्ञ आहोत असा गैर समज होणे साहजिक असते.
आणि मग आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिथला प्रत्येक विद्यार्थी तितकाच हुशार आहे असाही कित्येक लोकांचा (गैर) समज होतो.
पण म्हणून वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही.
3 Apr 2025 - 12:05 pm | सुबोध खरे
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचंचा भाग दाखवलेला आहे.
तर तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला हे का विचारले नाही कि हा जर भारताचा भाग आहे तर चीन चा China-Pakistan Economic Corridor मधला काराकोरम महामार्ग या भागातून कसा जातो?
अक्सई चीन या भागाबद्दल सुद्धा न वाचताच येथे टिप्पणी केली
आपले पूर्वग्रह असे उघडे पडण्यापूर्वी एवढा निष्काळजीपणा दाखवणे आपल्या अफाट बुद्धिमत्तेला शोभत नाही.
कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाला हरवू शकत नाही हेच खरे
असो
3 Apr 2025 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली
कुणी ऐकतय का?
गोबरयुगात कुणीही ऐकत नाही!4 Apr 2025 - 10:54 am | सुबोध खरे
भुजबळ बुवा
तुमची पट्टी हिरवी अर्धी
उगाच काळी पाच मध्ये कशाला सूर लावताय?
4 Apr 2025 - 10:36 am | चंद्रसूर्यकुमार
भारताला एकाहून एक विज्ञाननिष्ठ पंतप्रधान मिळाले होते- जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंग वगैरे. त्या काळात शेणावर संशोधन होत नव्हते आणि भारतातील सामान्य लोकही बाहेर पडताना बॅगेत दोन-चार नोबेल पारितोषिकाची पदके बरोबर घेऊनच बाहेर पडायचे. काय वेळ आली आहे देशावर गेल्या ११ वर्षात.
4 Apr 2025 - 9:18 pm | Vichar Manus
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य सेन यांना काहीच कळत नाही, खरे अर्थ तज्ञ म्हणजे नोटबंदी चा सल्ला देणारे बोकील, शक्तीकांत दास आणि आपल्या सन्माननीय अर्थमंत्री