एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली.
आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेनने रशियाची मैत्रीपूर्ण संबंध ठेवले असती तरी समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला आणि रशियाच्या मित्र देशांविरोधात अर्थात भारत विरोधी भूमिका ही घेत राहिला. युक्रेनमध्ये रशियन लोकांवर आत्याचार सुरू झाले. नंतर मीडिया आणि पैश्यांच्या मदतीने एका मूर्ख व्यक्तीला युक्रेनच्या सिंहासनावर बसविले. परिणाम रशियाला संपूर्ण रशियन भाषिक प्रदेश युक्रेनपासून तोडण्यासाठी युद्ध करण्यास भाग पाडले. अमेरिकाने 300 बिलियनहून जास्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला दिले. (अर्थात तो पैसा अमेरिकन शस्त्र उत्पादकांना मिळाला). तसेच युरोप ने ही केले. शस्त्र माफिया खुश झाला. रशियावर अनेक प्रतिबंध लावले. तीन वर्ष झाले युद्धाचा काही परिणाम निघलेला नाही. युक्रेनचे काही लक्ष सैनिक युद्धात शहीद झाले. अमेरिकेला अपेक्षित होते तेवढे रशियाचे नुकसान झाले नाही. रशिया ही आपल्या रशियन मूळच्या जनतेला वार्यावर सोडून परत जाणार नाही. जो पर्यन्त आर्थिक क्षमता आहे, नुकसान सोसेल. चीनला या युद्धाचा जास्त फायदा झाला. आफ्रिका आणि दक्षिणी अमेरिकेत त्याचे आर्थिक हस्तक्षेप वाढले. युक्रेन युद्धात जास्त पैसा ओतणे हे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे नाही. हे अमेरिकेला कळून चुकले आहे. आता अमेरिकेला युक्रेन मध्ये खर्च केलेल्या 300 बिलियन डालरच्या मोबदल्यात त्याला युक्रेनची खनिज संपत्ति पाहिजे. युरोप ही त्याच उद्देश्याने युक्रेनला शस्त्र पुरवठा करता आहे. झेलेंस्की आता युरोपला या युद्धात भाग पाडण्याचा विचार करतो आहे. युरोप प्रत्यक्ष युद्धात उतरणार नाही. युरोप फक्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला पुरवीत राहणार. तबाही मात्र युक्रेनची होणार.
प्रतिक्रिया
5 Mar 2025 - 10:31 am | आंद्रे वडापाव
भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर...
पटाईत काकाच एकमेव फक्त ...
जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ...
5 Mar 2025 - 11:06 am | अमरेंद्र बाहुबली
+१
5 Mar 2025 - 1:33 pm | चित्रगुप्त
-- म्हणजे सोव्हिएत युनियनचे ना ?
गेल्या ३- ४ शतकांतला युक्रेन/रशियाचा इतिहास काय आहे तेही या निमित्ताने धागाकर्त्याने अभ्यास करून लिहावे, ही विनंती.
5 Mar 2025 - 3:30 pm | चंद्रसूर्यकुमार
युक्रेनच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी रशियाविरोधी भूमिका घेणे पूर्णपणे समजता येते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात युक्रेन फारच कमी काळ स्वतंत्र राहिला होता. कधी रशियन, कधी पोलिश, कधी लिथुएनियन साम्राज्याचा भाग तो राहिला. युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय? मग संघर्ष अटळ आहेच.
२० व्या शतकात १९२२ मध्ये युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर १९३० च्या दशकात स्टालिनने केलेल्या सामुहिक शेतीच्या तुघलकी शेख महंमदी प्रयोगामुळे युक्रेनमध्ये मानवनिर्मित दुष्काळ आला आणि लाखो लोक मारले गेले. स्टालिनच्या अत्याचारांचा वरवंटा युक्रेनमध्ये जोरदार चालला. खरं तर हिटलरने सोव्हिएट युनियनवर हल्ला केला तेव्हा सुरवातीला बर्याच ठिकाणी नाझी सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्थानिक लोकांनी स्वागत केले होते इतके अत्याचार स्टालिनने केले होते. दुसरे महायुध्द संपल्यावरही सोव्हिएट वरवंटा युक्रेनमध्ये चालू होताच. दुसर्या महायुध्दात युक्रेनमध्ये प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे तिथे पुनर्निमाणासाठी मदत म्हणून रशियन लोक युक्रेनच्या पूर्व भागात वसविले गेले. डॉनबास भागात रशियन लोकांची बहुसंख्या दिसते त्याचे कारण ते आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रशियाविरोधी वातावरण असेल तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. मुळात सोव्हिएट युनियन मध्ये जे १५ प्रदेश होते त्यातील एक बेलारूस वगळता बर्याचशा इतर प्रदेशांचे रशियाशी काहीही घेणेदेणे नव्हते. लेनिन आणि त्यापेक्षा मोठ्या स्टालिन या दोन बोक्यांनी ते प्रदेश आपल्या टाचेखाली आणले होते. इस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुएनिया या बाल्टिक देशांना आणि मोल्दोवाला स्टालिनने दुसरे महायुध्द संपताना आपल्याकडे ओढून घेतले होते. अशा देशांमध्ये रशियाविरोधी वातावरण असले तर त्यात नवल काय?
तेव्हा युक्रेन रशियाविरोधी भूमिका घेत होता हे म्हणणे ठीक आहे पण तशी भूमिका तो का घेत होता हे पण बघायला हवे.
5 Mar 2025 - 4:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बरोब्बर. आताही हाच मुद्दा आहे. पुतिन आणी कंपनीचा ईतिहास सर्वाना माहित आहे. फक्त बलाढ्य आहे म्हणुन युक्रेनने शरण जावे असे वाटणे वेडेपणाचे आहे. युक्रेनमधील सरकार अस्थिर करणे, नेत्यांना/सरकारी अधिकार्याना पैसे चारुन व्यवस्था खिळखिळी करणे हे उद्योग पुतिन ह्यांनी अनेक वर्षे आरंभले आहेत. सध्याचे व्हिडियो/अहवाल पाहिलेत तर दिसते की युक्रेनमधील नागरिक मरायलाही तयार आहेत. 'मेलो तेरी बेहत्तर पण रशियाला शरण जायचे नाही' ही तेथील लोकभावना आहे.लोकांना भुकेले ठेउन मारणे, विष घालुन मारणे.. हे प्रकार रशियन सत्ताधार्यांनी अनेक्वेळा केले आहेत व पुतिन ते अनेकवेळा करतात. तेव्हा रशियाला शरण गेलो तर आपली पुढची पिढी पुतिन बरबाद करतील ही भीती नागरिकांना आहे.
5 Mar 2025 - 5:04 pm | आंद्रे वडापाव
तुमचे लाडके ट्रम्प तात्या, बघा काय बोलत आहेत, भारताबद्दल ...
Donald Trump ने अमेरिकी कांग्रेस को संबोधित करते हुए India, Pakistan पर क्या कहा? (BBC Hindi)
#https://www.youtube.com/watch?v=YvHaYiWyCeI
5 Mar 2025 - 6:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे. उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
5 Mar 2025 - 6:34 pm | वामन देशमुख
"बायडेन आमचे, ट्रम्प तुमचे" करणाऱ्या काही भारतीयांसाठी काय धडा आहे?
5 Mar 2025 - 7:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सध्या तरी बायडेन सरकार परवडले असेच सगळे जग म्हणतय ना?. २०१६-२०२० ह्या कालवधीत जेवढा घातला होता त्याहुन अधिक धिंगाणा ट्रम्प घालेल असे दिसतय. अध्य़क्ष झाल्यापासुन त्यानी डझनावारी खोटी विधाने केली आहेत(बर्नी सँडर्स ह्यांचे भाषण ऐका). 'बिनधास्त फेकायचे कारण झेलायला अनेकजण आहेत.'
भविष्यात कळेलच.
5 Mar 2025 - 7:30 pm | आंद्रे वडापाव
"बायडेन पण तुमचे, ट्रम्प पण तुमचे"
आमचे आहेत "पंडित नेहरू"..
5 Mar 2025 - 7:33 pm | चंद्रसूर्यकुमार
बरं मग?समजा एच-१ ची मुदत संपली, रिन्युअल होत नसेल आणि तरीही संबंधित मनुष्य अमेरिकेतच राहात असेल तर अशा व्यक्तीविषयी अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते? एच-१ व्हिसा हा मर्यादित कालावधीसाठी कायदेशीर स्टेटसवर काम करण्यासाठी परदेशी नागरीकांना दिलेला व्हिसा असतो ना? तसा व्हिसा मिळणे हा काय भारतीयांचा जन्मसिध्द अधिकार आहे का? व्हिसाची मुदत संपत असेल तर अशा परदेशी नागरीकांनी आपण होऊन निघून जावे अशी अपेक्षा अमेरिका सरकारची असेल तर त्यात काय चूक आहे? व्हिसाची मुदत संपल्यावरही परदेश सोडून न जाणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना अमेरिका सरकारने का म्हणून सहानुभूती दाखवायची?
जाता जाता- मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहिलो आहे. आणि तिथे भारतीय विद्यार्थी नोकर्या मिळवायला कसले एकेक जुगाड करतात हे अगदी जवळून बघितले आहे. आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, अगदी माझ्या मित्रांनीही ते जुगाड केले आहेत. असले जुगाड करून देणारे कन्सलटन्ट्स असतात. ते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीव्ही बनवून देतात. त्या विद्यार्थ्यांना आपलाच सीव्ही बघितला तर त्यातील नाव वगळता काहीही परिचयाचे दिसायचे नाही कारण सीव्ही बनविताना ते खोटा अनुभव दाखवतात, एखाद्या क्षेत्रात (समजा जावा) काम करायचा अनुभव शून्य असेल तरी चार वर्षे त्यात काम केले आहे असे सीव्हीवर दाखवतात. असा खोटा अनुभव दाखविताना ज्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी चांगला आहे असा रेफरन्स देणारे कन्सल्टन्टचे लोक पेरलेले असतात त्याच कंपनीचा अनुभव दाखविला जातो. ते विद्यार्थी ओपीटीवर असताना कन्सलटन्ट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जाळ्यातून पूर्वी गेलेल्यांकडून ट्रेनिंग देतात आणि इंटरव्ह्यू पार पाडता येईल इतके बाळकडू देतात. तो विद्यार्थी कागदावर त्या कन्सलटन्टकडे नोकरीला असतो आणि तो कन्सलटन्ट त्यांना क्लाएंट साईटवर कुठेतरी पाठवतो. क्लाएंटला जितके बिलिंग करतात त्याच्या ५०-६०% रक्कम विद्यार्थ्याला दिली जाते आणि उरलेली तो कन्सलटन्ट स्वतः ठेवतो. त्यावर जॉब सपोर्ट म्हणून आणखी एक प्रकार असतो. एखाद्याने चार वर्षाचा खोटा अनुभव दाखवला तर त्याच्याकडून ज्या पातळीचे काम केले जाईल ही अपेक्षा असेल ती कशी पूर्ण होणार? मग एखादा कठीण प्रश्न आला की फक्त I will get back to you on this tomorrow असे म्हणायचे आणि कन्सलटन्टच्या जॉब सपोर्टवाल्यांना फोन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आणि दुसर्या दिवशी ते द्यायचे. असला सगळा जुगाडू प्रकार चालू असतो. अशातून तरून गेलेले लोक ओपीटीवरून एच-१ वर गेले आहेत. हा सगळा गोलमाल करणार्यांचे समर्थन का करायचे? ते भारतीय आहेत म्हणून? आता ट्रम्पतात्यांचे सरकार असले प्रकार करणार्या कन्सलटन्ट लोकांवर उठले आहे असे दिसते. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/international-... त्यात तात्यांचे काहीही चुकले असे वाटत नाही. असला खोटारडेपणा करून अमेरिकेत राहणारे परदेशी लोक त्यांना नको असतील तर अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे नक्की काय चुकले? वरील बातमीत आणखी एक गोष्ट दिली आहे. असले प्रकार करून ओपीटीवरून एच-१ वर पूर्वी गेलेल्या काहींना भारत भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना विमानतळावरच प्रवेश नाकारला गेला. त्यात तात्यांच्या सरकारचे नक्की काय चुकले? शेवटी चोरी ती चोरीच ना? अशी चोरी पकडली जाईल तेव्हा शिक्षा दिली तर काय चुकले? इतकी वर्षे आम्हाला शिक्षा दिली नाही आणि आता कशी देता असा बचाव चोर करू शकतो?
एकूणच तात्या भरपूर रॅश आहेत, आक्रस्ताळे आहेत, मनाला येईल ते वाटेल ते बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. पण ते करत आहेत त्यातील अनेक गोष्टी अमेरिकेच्या (आणि जगाच्याही) हिताच्या आहेत असे दिसते. युएस एडच्या नावाने घाना की बुर्किना फासो मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या ऑपरेशनसाठी पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे? कोणत्या कोणत्या देशात रेजिम चेंजसाठी, मतदान प्रभावित करायला पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे?भारतातही एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्या रिकामटेकड्यांना पिझ्झा काय आणि मसाज काय आणि इतर ऐशोरामांची व्यवस्था केली गेली होती. आता अगदी भगवंत माननेही तथाकथित शेतकरी आंदोलकांवर बडगा उगारलेला दिसत आहे. तिकडून येणारा पैसा आटला म्हणून ते होत आहे की नाही मला माहित नाही. बायडन आजोबा अध्यक्ष असताना एखादा माणूस एल.जी.बी.टी. क्यू + आणि आणखी काय काय नसेल तर त्याच्यात काहीतरी खोट आहे असे वाटावे असे वातावरण निर्माण होत आहे की काय असे एखाद्याला वाटावे. असला प्रकार तात्यांच्या काळात बंद केला जात आहे. दुसर्या महायुध्दापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने इतर अनेक देशात जाऊन काड्या घातल्या आहेत. अगदी गोग्गोड बोलून मोठ्या मोठ्या गप्पा मारणार्या ओबामानेही सिरीया आणि लिबियात काड्याच घातल्या होत्या. बायडनने बांगलादेशात काड्या घातल्या होत्या. महंमद युनूसला प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम ओबामानेच दिले होते. बहुदा त्याच्या काळापासूनच बांगलादेशात काड्या घालायचा प्रयत्न चालू झाला असावा. जगात जिथेतिथे नाक खुपसायची अमेरिकेची घाणेरडी सवय कमी करून आमचे आम्ही बघतो असे कोणी अध्यक्ष करत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्यालाच विरोध करायचा? टॅरीफ वगैरे प्रकरणात तात्या आपल्याला पाहिजे तशी भूमिका घेत नसतीलही. पण कोणीही अमेरिकन अध्यक्ष १००% आपल्याला अनुकूल करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना किंवा व्हिसा संपल्यावरही तिथे राहणार्यांना ट्रम्पतात्या हाकलत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले असे मला तरी अजिबात वाटत नाही.
बाकी कोणी काहीही म्हणो. मी तर ट्रम्पतात्यांचा या घडीला तरी मोठ्ठा फॅन आहे. त्यातून भविष्यात तात्या दुसरे निक्सन किंवा रेगन झाले तर त्यांना पण विरोधच करू. तशी अमेरिकेच्या अध्यक्षांना विरोध करायची एक भारतीय म्हणून आपल्याला सवयच आहे. ट्रम्पतात्या तसेच वागायला लागले तर त्यांनाही विरोध करू. हाकानाका. तसाही आपण विरोध करून किंवा आपण त्यांचे फॅन असून कोणाला घंटा फरक पडतो? व्हाईट हाऊसच्या प्रांगणातील झाडाचे एक पानही त्यामुळे पडायचे नाही.
ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.
5 Mar 2025 - 7:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते?"
ट्रम्पोजीच्या आक्रस्ताळी स्वभावाबद्दल म्हणत आहे. अमेरिकेने व्हीसा मुदत संपलेल्या लोकांवर उपकार करावेत असे कोणीच म्हणत नाही. असो. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोनी अमेरिकेला ऐकवलेच.(https://www.youtube.com/watch?v=wz_42pckM7w&t=159s )
चीनने ही प्रत्युत्तर दिले (https://www.youtube.com/watch?v=RyHbpiOotB8 )
भारतात अजूनही शांतताच पसरली आहे.(कूटनीती इन प्रोग्रेस ?)
6 Mar 2025 - 12:05 am | अमरेंद्र बाहुबली
ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.
अहो मी तर तात्यांचा २०१६ पासून फॅन आहे. तात्या म्हणजे काळीज! मला तात्याभक्त म्हटले तरीही चालेल!7 Mar 2025 - 12:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
डोनाल्ड ट्रम्पास तात्या म्हंटले की गुजरातमधील जवाहिर्यांच्या/कारगिरांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? २ एप्रिलपासुन ट्रम्पाने आयात शुल्क २०% वर नेले की मग आतमह्त्या वाढण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8
7 Mar 2025 - 1:23 pm | चंद्रसूर्यकुमार
अहो माई,
तात्यांनी समजा तसे काही केले आणि समजा त्यामुळे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या ५०-१०० कारागिरांनी आत्महत्या केल्या तर वाईटच. त्याविषयी काहीच दुसरे मत असू शकणार नाही. पण दुसरी बाजू पण लक्षात घे की. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जगात विविध ठिकाणी किती लाख लोकांना मारले होते? जर तात्या इतर देशांमधील अमेरिकेची नाक खुपसायची घाणेरडी सवय कमी करत असतील तर ते चांगले नाही का?५०-१००-५००-१००० कारागिर मारले जाणे वाईटच पण लाखो लोक मारले जाण्यापेक्षा त्या मानाने कमी वाईट नाही का?
7 Mar 2025 - 3:06 pm | अमरेंद्र बाहुबली
माई आपल्या देशात झालेल्या आत्महत्यांना दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा जबाबदार असेल? आपल्या पंतप्रधान जबाबदार असेल ना? आपण कुणाशी संबंध चांगले ठेवले आहेत?
7 Mar 2025 - 3:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत" असे पंतप्रधानच म्हणत होते ना? भारतावर आयात शुल्क आधीसारखेच असेल असे ह्यांनाही वाटले होते. ट्रम्प ह्यांची निवड झाल्या झाल्या जयशंकर ताबडतोब अमेरिकेला रवाना झाले होते.ट्रम्प भारत्,चीन्,कॅनडा ह्यांना एकाच तराजुत तोलत असतील तर मग ईतके दिवस गप्प राहण्याचा आणी तिकडे जाउन 'चर्चा' करण्याचा फायदा काय झाला?
5 Mar 2025 - 6:38 pm | अमरेंद्र बाहुबली
कुणी कुणाचेही असो! तात्या आमचे काळीज आहेत.
-तात्यावादी अमरेंद्र बाहुबली!
5 Mar 2025 - 11:16 pm | धर्मराजमुटके
याच न्यायाने भारतातील पंजाब पाकीस्तानात आणि भारतातील बंगाल बांग्लादेशात जायला हवे काय ?
6 Mar 2025 - 9:45 am | सुबोध खरे
मी उलट म्हणतो,
पाकिस्तानी पंजाब आणि बांगला देश भारतात यायला हवा. कारण हे भाग मूळ भारताचे होते.
परंतु भारतात फाळणी हि भाषेवरआधारित झालेली नसून धर्मावर आधारित झालेली आहे
त्यामुळे हे उदाहरण तसे गैरलागू आहे
7 Mar 2025 - 1:06 pm | विवेकपटाईत
अमेरिकेची शत्रुता महागात पडते पण मैत्री विनाशाला कारणीभूत ठरते. अमेरिकेने सुरवातीला शस्त्र मदत दिली नसती तर किमान युक्रेन ने शांततेसाठी रशियाची वाटाघाटी केली असती.
https://www.facebook.com/share/v/17TtUzNXxN/
7 Mar 2025 - 1:19 pm | आंद्रे वडापाव
व्वा काका , एक तर फेसबुक च्या लिंक देताय ...
तुम्हाला एक सुचवणी करू का ?
तुम्ही थोडा इतिहास वाचा किंवा जाणून घ्या , या भागाचा ... मग तुम्ही मत व्यक्त कराल का ?
तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्याच सांगण्यावरून युक्रेनला आण्विक शस्त्र सोडून द्यावी लागली
कारण त्याबदल्यात अमेरिका सुरक्षा छत्र देणार होता ..
7 Mar 2025 - 1:22 pm | आंद्रे वडापाव
Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but gave up its weapons for this reason
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-...
Ukraine made a significant move in 1994 when it signed the Budapest Memorandum. The United States, the United Kingdom, and Russia were also signatories. Ukraine agreed to remove all its nuclear weapons in return for a guarantee of sovereignty and territorial integrity of the country. The memorandum also provided that these three nations would not attack Ukraine militarily and would request the UN to intervene in case of any threat to the sovereignty of the country.
#https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-...
7 Mar 2025 - 3:10 pm | अमरेंद्र बाहुबली
युरोपात असुनही मूर्ख राहिलेला युक्रेन हा एकमेव देश असावा!
13 Mar 2025 - 8:08 pm | सुबोध खरे
@आंद्रे वडापाव
There were several important reasons that led Ukraine towards nuclear disarmament. First of all, although it had the weapons at its disposal, it was unable to launch them on its own. The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent.
आपण दिलेला दुवा आपणच वाचलेला दिसत नाही.
युक्रेन कझाखस्तान सारख्या सोव्हिएत युनियनच्या देशांनी आपली अण्वस्त्रे परत केली ते काही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर
त्याचा वापर त्यांना करणे अशक्य होते म्हणून
आणि
ठेवल्या जागी गंज लागला तर त्यातून होणार किरणोत्सार भीषण असतो. यामुळेच अण्वस्त्रे म्हणजे काही सोने नव्हे कि काही ना करता तिजोरीत ठेवले तर तसेच राहते.
त्यांची वेळोवेळी देखभाल करावीच लागते. हे सर्व सव्यापसव्य करणं युक्रेनला अशक्य होतं.
बाकी झेलेन्स्की आम्ही शांततेचे दूत असून शांततेसाठी अण्वस्त्रे परत केली असे कधी म्हणाल्याचे आठवत नाही.
अण्वस्त्रधारी देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष आपल्याबरोबर काही हौसेनं ब्रिफ केस घेऊन फिरत नाहीत.
त्यात या अण्वस्त्रांची आणि ती धारण केलेल्या क्षेपणास्त्रांची कोड त्यांच्या कडे सुरक्षित असतात.
एखादा माथेफिरू लष्करी अधिकारी सहज दुसऱ्या देशावर अण्वस्त्रे डागेल अशी शक्यता शून्य असते.
बाकी तुमचं चालू द्या
13 Mar 2025 - 11:24 pm | आंद्रे वडापाव
कदाचित आपल्याला कल्पना नसेल,
अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते.
अण्वस्त्रां आणि त्याचे तंत्रज्ञान अवाच्या सव्वा किमतीला हसत हसत खरेदी इच्छुक इराण आणि इराक सारखे जगात खूप आहेत/होते.
असो लेख मी पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया देतो...
पण आपणास लेखाचा मुद्दा समजला नाहीये बहुदा..
बाकी चालू द्यात...
19 Mar 2025 - 8:14 pm | सुबोध खरे
The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent.
हे आपणच दिलेल्या दुव्यात आहे. माझे ज्ञान नाही.
अण्वस्त्रे नेणारी क्षेपणास्त्रे तयार करणे आणि ती उत्तम स्थितीत ठेवणे हि आपण म्हणता तशी भाजी आणण्यासारखी बाजारात पैसे टाकून आणण्याची वस्तू नाही.
तसे असते तर इराण ने आतापर्यंत इस्रायल वर अणुहल्ला करून त्याचा विध्वंस केला असता.
किंवा
इंग्लंड सारखा एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या आणि जगावर राज्य करणाऱ्या देशाने अमेरिकेचे ट्रायडेंट हे क्षेपणास्त्र आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवले नसते.
""अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते.""
नक्की का?
मग भारताचे राजकारणी आणि शास्त्रज्ञ मूर्ख असावेत. कारण भारताने १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट केला.
पृथ्वी हे आपले पहिले क्षेपणास्त्र याचा प्रकल्प १९८३ मध्ये चालू झाला आणि पहिले सफल परीक्षण १९८८ साली झाले.
तेजस अणुबॉम्ब नेऊ शकेल का याबद्दल मला माहिती नाही.
परंतु अणुबॉम्ब नेण्यासाठी भारत मिराज २०००, जग्वार सुखोई ३० आणि आता राफेल या परदेशी विमानांवर अवलंबून आहे
बाकी आपण सर्वज्ञ आहात तेंव्हा यावर मी अधिक बोलू इच्छित नाही
10 Mar 2025 - 11:38 am | विवेकपटाईत
मला इतिहास ही माहीत आहे आणि सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे. कारण मी प्रत्यक्ष काम केलेले आहे. बाकी अमेरिकेने बुटक्याला शस्त्र दिले आणि त्याला राक्षसा विरुद्ध सोडले. हे सर्वांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अफगाणिस्तान असो वा विएतनाम अमेरिका तेथे अमेरिकेच्या तालावर नाचणार्या सत्ताधार्यांना वार्यावर सोडून अमेरिकेने माघार घेतली होती. हा इतिहास बहुतेक तुम्ही वाचला नसावा. युक्रेनच्या जनतेने अमेरिका आणि युरोप प्रायोजित झेलेंस्कीला निवडले त्याचे परिणाम युक्रेनची जनता भोगणार.
10 Mar 2025 - 11:48 am | आंद्रे वडापाव
अहो काका त्याच्याच मुळे आधी लिहिलय ...
भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर...
पटाईत काकाच एकमेव फक्त ...
जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ...
कारण जी काय अक्कल आहे ती आपल्यालाच आहे , असा गंड मला तरी नाही ...
16 Mar 2025 - 7:37 pm | विवेकपटाईत
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन न्यूनगंड नाही. फक्त तुमच्या प्रतिक्रियेचे उत्तर दिले. बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.
17 Mar 2025 - 9:17 am | आंद्रे वडापाव
हेच मी तुम्हाला सान्गत होतो वरती .. पण फक्त अप्रत्यक्श्पणे
7 Mar 2025 - 3:12 pm | अमरेंद्र बाहुबली
यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत! रशियाच्या संगतीने गरीब राहणे किंवा अमेरिका/युरोपच्या नादी लागून रशियाविरोधात जाऊन मरणे!
माझ्यामते गरीब राहणे मारण्यापेक्षा चांगले आहे.
10 Mar 2025 - 2:36 pm | आंद्रे वडापाव
तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा -भक्त व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही....
पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये डंकापती सारखे मत व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "युक्रेनची भु राजकीय सामरिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः शासनात भलेही, उंदीर मारायच्या विभागात नोकरीला होतो, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.
युक्रेनची भु राजकीय सामरिक स्थिती - ठोका...
23 Mar 2025 - 1:31 pm | निनाद
रशिया-युक्रेन युद्धाच्या पैलूंचे चांगले विश्लेषण.
या युद्धामध्ये माहिती युद्धाचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांचा वापर करून जनतेची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण सर्व त्याचे बळी आहोत. विचारप्रवर्तक लेखन आहे. ऐतिहासिक संदर्भ, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणाम यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.