काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला.
तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता.
तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता.
मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती.
पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली.
त्याच्या पालकानी पुस्तक दाखवल्यावर त्याने थेट मला फोन लावला.त्या मुलाच्या पालकाना माझ्याशी बोलायचे होते.
त्या मुलाला कोणीतरी दोसतार पुस्तक भेट म्हणूण दिले होते. मुलाचे पालक सांगत होते की मुलगा इअंग्रजी माध्यमात शिकतो आणि त्याला मराठी वाचनाची फारशी आवड नाही.
पण दोसतार पुस्तक मिळाल्यापासून तो ते पुस्तक नेहमी वाचत असायचा. वाचताना गालात हसत असायचा. त्या मुलाने दोसतार कादम्बरी तीन चार वेळा वाचली असेल.
पालकानी कुतूहल म्हणून दोसतार वाचले. आणि म्हणाले "मी पुस्तकाच्या प्रेमात पडलो" महत्वाचे म्हणजे माझ्या पिढीने अनुभवलेल्या गमती जमती माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणार्या मुलाला देखील आवडल्या. त्या मुलाचे पालक हे सांगताना इतक्या उत्साहाने बोलत होते की फोनवरून ऐकतानाही त्यांचा चेहरा मला समोर दिसत होता.
दोसतार ज्या काळात घडले तो माझ्या लहानपणीचा काल आजच्या नव्या पिढीला ही आवडतो हे ऐकून खूप सुखावलो. मला हा एक आश्चर्याचा सुखद धका होता.
थँक्स टंप्या , एल्प्या आणि विन्या ग्यांग. तुम्ही माझ्या मनात आहात तसेच लहान रहा. तुमच्यातला निरागसपणा जपत रहा.
प्रतिक्रिया
11 Mar 2025 - 7:44 pm | विजुभाऊ
https://www.misalpav.com/node/47099
11 Mar 2025 - 8:36 pm | धर्मराजमुटके
छान !! आवडले.
12 Mar 2025 - 7:46 am | सौंदाळा
भारीच
मोठ्या बक्षिसापेक्षा हे अनुभव जास्त आनंद देऊन जातात.
12 Mar 2025 - 10:18 am | वामन देशमुख
व्वा! क्या बात है!
मिसळपावची दोस्तार लेखमाला व त्यानंतर आलेले छापील पुस्तक, दोन्हींच्या आठवणी ताज्या झाल्या.
12 Mar 2025 - 1:55 pm | दीपक११७७
अभिनंदन ।
बादवे,
मित्रा साठी नवीन मित्र जूना मित्र असे वर्गिकरण केले जाते तसे मुलांच्या बाबतीत केले जात नाही
जसे हा माझा नवीन मुलगा हा माझा जूना मुलगा
14 Mar 2025 - 2:15 pm | चौथा कोनाडा
व्वा ..... भारीच की !
लेखणीची कमाल .... कथानक आपल्याशीच मेळ खातंय ... किती मोठं यश लेखकाचं !
हार्दिक अभिनंदन विजूभाऊ !