मित्रानो
साहित्य चोरी हा प्रकार महाराष्ट्रात पार तुकाराम महाराज असल्यापासून लोकांना माहीत आहे
ऑनलाईन विश्वात तर कॉपी पेस्ट लगेच शक्य असता
फेसबुक आधी फक्त गुगल आणि ऑर्कुट ला शोधून आपले लिखाण चोरी शोधतात येत होती पण आता १७६० social नेटवर्किंग मुळे ते पण अवघड झाले
परत कोणी साहित्य चोरी केली तर लोक आपापल्या वाल वर त्याच्या नावाने खडे फोडून ठणाणा करतात
आतापर्यंत मराठी विश्वात तरी एखाद्या साहित्य चोराला चोरी खाली अटक किंवा जेल झाल्याचे ऐकिवात नाही
२ वर्ष आधी एका कविता चोरी प्रकरणी पोलीस कम्प्लिन्ट ची कॉपी वायरल होत होती तोच सर्वात मोठा पराक्रम
इथे वर्षानुवर्षे खून ,बलात्कार ,दरोडे लोकांना शिक्षा मिळत नाही त्यामुळे सगळ्याचा उत्साह मावळत जातो
पोलीस स्टेशन ची पायरी शहाण्याने चढू नये असे म्हणतात
तर एक साधा सरळ उपाय पण आधी साहित्य चोरांचे वर्गीकरण
काही लोक हौशी असतात ,एक दोन लेख उचलतात सोडून देतात ,त्यांना दुर्लक्ष करावे
अट्टल चोर
१) जे ब्लॉग किंवा फेसबुक पेज मोनेटाईझ करतात
२) जे लायकस व शक्यतो ऑनलाईन मुलींना इंप्रेस करायला लेख छापतात
दोघानं एकाच उपचार आहे ,साधा
आधी मी काय केले ते नमूद करतो
तर माझा नोकरी संदर्भ ब्लॉग होता जिथे फ्रेशर आदी इत्यादी जॉब पोस्ट करत होतो
एकाने सरळ माझी rss फीड उचलायाला सुरु केले
मला कल्पना होती जॉब पोस्टिंग ला copyright एवढे सोपंय लागू होत नाही व पोलीस यंत्रणा आधीच खूप ताणा खाली आहे
मी अर्धे rss feed fulltext जागी शॉर्ट करून बघितले तरी त्याचा कॉपी चालू ,नंतर कळलं कि इंटरनेट वर शॉर्ट फीड ला पण फुल्ल करून मिळते ते पण ऑटोमॅटिक
rss फीड काढून पण उपयोग नाही ,scraping च्या १७६० स्क्रिप्ट आहेत ,साध्य वेब पेज ला पण rss कॉन्व्हर्ट करून मिळते
साधा उपाय
मी आधी माझे adsense ब्लॉग वरून बंद केले
मी मुद्दाम माझ्या कन्टेन्ट मध्ये असे काही शब्द टाकले कि जे ऍडसेन्स मध्ये banned आहेत , गांजा ,मर्डर वगैरे
त्याने स्क्रिप्ट ने कॉपी केले असल्याने त्याला कळले नाही ,सरळ कॉपी केले ,
मी त्याचे adsense अकाउंट रिपोर्ट मारून टाकले
सहसा होस्टिंग dmca असले तरच बंद करतात ,पण जर असला भयानक कन्टेन्ट असला तर नॉन dmca पण रिपोर्ट करतात
माझे कोणी शत्रू नसल्याने व माझे शब्द मी हाइडे करून टाकल्याने माझा ब्लॉग मात्र सेफ राहिला
हाईड करायची पद्धत पण सोपी होती , माझा ब्लॉग चा बॅकग्राऊंड पांढरा असल्याने मी ह्या शब्दांना सेम कलर दिला ,शब्द दिसेनासे झाले,त्याचा ब्लॉग मात्र काळा असल्याने लगेच शब्द दिसले
नंतर त्याचा ब्लॉग उडाला कि गुपचूप माझे ऍडसेन्स चालू केले व धोकादायक शब्द रेमोव्ह केले ,ह्याला फक्त १-२ दिवस लागतात
जास्त नुकसान नाही
त्याच् पूर्ण होस्टिंग अकाउंट ,डोमेन अकाउंट आणि ऍडसेन्स उडाले ,परत आले नाही
तुमचा पण कन्टेन्ट कोणी सारखा सारखा चोरत असेल तर तो कन्टेन्ट पूर्ण वाचायची शक्यता कमी ,
मुद्दाम असा hidden कन्टेन्ट टाका ,समजा त्याचा घर माहीत असेल तर त्याच्या आजू बाजूच्या एखाद्या छोट्या राजकीय नेत्यावर /गुंठा मंत्रींवर टीका hide करून टाकली तरी चालेल ,कार्यकर्ते त्याच्या दारी नक्की जातील
बघा प्रयत्न करून एखादा तांत्रिक मुद्दा कळला नाही तर खुशाल विचार ,ट्रॉल दुर्लक्ष करण्यात येतील
प्रतिक्रिया
11 Mar 2025 - 5:47 pm | कर्नलतपस्वी
हायला,भारीच टेक्निकल आहे. बरेच कळाले नाही पण प्रगतशील तंत्रज्ञ्यांना नक्कीच समजले असेल.
11 Mar 2025 - 6:32 pm | विवेकपटाईत
साहित्य चोरी करून ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचतात. एका रीतीने उत्तम काम करतात. मी लक्ष देणे कधीच सोडून दिले.
11 Mar 2025 - 10:30 pm | Bhakti
खुप तांत्रिक मुद्दे आहेत.निवांत समजून घेते.
12 Mar 2025 - 4:13 pm | अनन्त अवधुत
वेल डन.
12 Mar 2025 - 5:01 pm | कंजूस
बरोबर.