बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
23 Feb 2025 - 11:06 am

बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा
=========================

मंडळी

मागील आठवड्यात जे नकारात्मक चित्र युयुत्सु-नेट ने दाखवले त्या प्रमाणे परत एकदा मार्केटने आपला मगदूर दाखवला. या आठवड्यात मात्र चित्र वेगळे आहे. बाजारात अजून करेक्शन येणं बाकी आहे असं तज्ञ मंडळी सांगत असताना मॉडेल मात्र चढा-सूर आळवत आहे. कदाचित या खेपेस युयुत्सु-नेट याखेपेला नक्की गंडेल असे वाटते.

त्यामुळे माझी उत्सूकता किंचित ताणली गेली आहे. प्रामाणिक रिपोर्टींगमध्ये जे दिसते ते मांडणे आवश्यक असते म्हणून जसे चित्र दिसते तसे आपल्यासमोर मांडले आहे.

बर्‍याच वेळेला अमूक होणार असं मनाला एक वाटत असलं तरी दुसरंच घडतं...

त्यामुळे कृपया सावधगिरी बाळगा...


टीप -युयुत्सु-नेटवर डोळे झाकून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. बाजारातले ट्रेड्स स्वत:च्या जबाबदारीवर करावेत.

गुंतवणूकमाहिती

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

23 Feb 2025 - 12:53 pm | आंद्रे वडापाव

सोन्याच्या भावाचे असे आठवडी अंदाज सुद्धा द्यावे ही विनंती...

युयुत्सु's picture

23 Feb 2025 - 2:07 pm | युयुत्सु

तुमची सूचना चांगली आहे. सोन्याचा डेटा मला माझ्या मेंबरशिपमध्ये मिळत नसल्याने मला त्याचा समावेश करता येणार नाही. माझ्या मेंबरशिपमध्ये मला फक्त एन्०एस०इ० आणि बि०एस्०इ० चा दिवस अखेरीचा डेटा मिळतो. सोन्याच्या भावांचा समावेश करता आला असता तर मॉडेल अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनले असते.

अरेच्चा! माझ्या मेंबरशिपमध्ये सोन्याचा डेटा पण मिळतो असे ल़क्षात आले आहे. पण अगोदर थोडे प्रयोग करून बघावे लागतील.

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2025 - 2:37 pm | प्रसाद गोडबोले

नमस्कार !

बाकी इतर विषयांवर पटो न पटो , पण मला आपले हे लेखन फार आवडते !

आपण अन्यथा घेणार नसलात तर काही नम्र सुचना (सजेशन्स) देऊ इच्छितो ... आपले ग्राफ हे इन्टर्प्रेट करायला काहीसे अवघड आहे, आपणे निफ्टीची किंवा बी.एस.ई ची संभाव्य रेंज आणि त्याची शक्यता (प्रोबॅबिलिटी) असे काहीसे सोपे प्रेडिक्शन लिहिल्यास आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजायला सोप्पे जाईल

लिहित रहा !

युयुत्सु's picture

23 Feb 2025 - 3:08 pm | युयुत्सु

श्री० प्रसाद गोडबोले

प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सूचनेबद्दल आभार! बाजाराचा नुसता कल ओळखणे हे खूप मोठ्ठे आह्वान असल्याने सध्या मी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हळूहळु तुमच्या सूचनेचा अवश्य विचार करीन.

माझे आलेख सुरुवातीला समजायला अवघड वाटणे अवघड स्वाभाविक आहे. पण थोडक्यात समजावतो. उच्च न्यायालयाचे जसे खंडपीठ असते तसे मी १० किंवा २० मॉडेल्सचे खंडपीठ तयार करतो. मग या खंडपीठातील प्रत्येक मॉडेल आलेल्या डेटाचे विश्लेषण करून भाकीत करते. भाकीत वर जाणार असेल तर हिरव्या बार ने दाखवले जाते. बाजार खाली जाणार असेल तर लाल रंगाने दाखवले जाते. वरील "खण्ड्पीठ" वीस मॉडेलचे असल्याने २० बार दाखवले आहेत.

जाता जाता - बाकीचे मतभेद असले तरी आपल्याबद्दल बेसिक आदर नक्की राहील. चिंता नसावी.

आग्या १९९० यांच्या मागणीनुसार सोन्याच्या दराचे पुढील आठड्यासाठी (केवळ प्रयोगात्मक) भाकीत

सोने खाली येते तेव्हा स्टॉक वर जातात या सार्वकालिक तत्त्वाचा युयुत्सुनेट ने आदर केलेला दिसतो.

मुक्त विहारि's picture

23 Feb 2025 - 7:20 pm | मुक्त विहारि

रोचक माहिती....

Probability आणि Fuzzy Logics ह्या दोघांचे मिश्रण वाटत आहे.

युयुत्सु's picture

24 Feb 2025 - 12:03 am | युयुत्सु

मंडळी

श्री० गोडबोले यांनी मला मार्केट्ची संभाव्य रेंज आणि त्याची संभाव्यता (प्रोबॅबिलीटी) देण्याबद्दल सुचवले. आत्ताच मला मी स्वतः विकसित केलेल्या "क्लेमास्पेस डायग्रॅमची आठवण झाली त्यात मला मार्केट वर किंवा खाली जायची शक्यता किती या प्रश्नाचे उत्तर देता येते. पुढील आठवड्यासाठीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम असा दिसतो. पिवळा धमक दिसणारा 'डोळा' मार्केटला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतो. याचे गणित इथे आणि मराठीत देणे अवघड आहे.

तर या तंत्राप्रमाणे पुढच्या आठवड्यात निफ्टी वर जायची शक्यता ८१.४ % इतकीआहे.

पण मला दर वेळेला क्लेमास्पेस डायग्रॅम इथे डकवणे जिकीरीचे आहे. त्यामुळे मी फक्त प्रोबॅबिलीटी चे आकडे इथे देईन.

आंद्रे वडापाव's picture

24 Feb 2025 - 9:57 am | आंद्रे वडापाव

हो, चालेल...
फक्त प्रॉबेबिलिटी चे आकडे दिले तरी चालतील...
पण कृपया दोन्ही चे द्यावे

१, नी ५०
२. गोल्ड

युयुत्सु's picture

24 Feb 2025 - 10:25 am | युयुत्सु

ओके. देइन...

युयुत्सु's picture

25 Feb 2025 - 8:36 am | युयुत्सु

क्लेमास्पेस डायग्रॅम हे मी माझ्या स्वतःच्या काही गरजा पूर्ण करणयासाठी विकसित केलेले एक गुणी तंत्र आहे. :) परवा हा आलेख मी जेव्हा काढला तेव्हा बाजार वर जायची संभाव्यता ~८१% होती. कालच्या घसरणीमुळे ही शक्यता आता ~९५% पर्यंत वाढली आहे. मग आता मार्केट वर जाणार की खाली जाणार?

तर वर दिलेल्या आलेखात निळी रेघ कालचे मार्केट कुठे होते दाखवते. निळ्या रेघे खाली भूतकाळात मार्केट गेलेले दिसत आहे, पण ते तिथे जाऊन उलट फिरले आहे. त्यामुळे अजुन एका डुबकीची शक्यता नाकारता येत नाही.

थोडकयात शेवटच्या थेंबापर्यंत चिपाड चरकातून काढणार...

तसेच वरील आलेखाचा एक चुलतभाऊ पुढे दिला आहे. त्यात तांबंडा बिंदू मार्केट सध्या कुठे आहे ते दाखवत आहे. मार्केट पिवळ्या डोळ्याकडे सतत झेपावत असते. हा "पितनेत्र " तांबड्या बिंदूचच्या डाव्या बाजूला असल्याने आणखी विक्री होऊन मग मार्केट परतीचा रस्ता काही कालावधी साठी पकडेल, (नवीन अर्निंग सिझन) असे वाटते.

दीपक११७७'s picture

25 Feb 2025 - 2:03 pm | दीपक११७७

कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे मला चार्ट दिसत नाहीये, माझ्या पीसीमध्ये काही सेटिंग समस्या आहे का की या धाग्या सोबत कोणताही चार्ट जोडलेला नाहीये.

युयुत्सु's picture

25 Feb 2025 - 2:16 pm | युयुत्सु

मला सगळे चार्ट्स दिसत आहेत.