"तुम्हाला आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क्स विषयी माहीत आहे का पंत ?"
"माहीती आहे पण खुप डिटेल्स्ड असं नाही"
"बेसिक कन्सेप्ट्स माहीत आहेत ना , हां तेवढं पुरेसे आहे , हा एक इन्टरेस्टिंग प्रश्न ऐका :"
समजा एखाद्या न्युरल नेटवर्कला वेगवेगळा डेटा न देता , केवळ एकच डेटा पॉईंट वारंवार दिला , तर ते न्युरल नेटवर्क काय लर्न करेल ? काय बनेल ?
https://clevertap.com/wp-content/uploads/2019/04/Neural_Network_Brain_Mi...
"ह्या न्युरल नेटवर्क ला वेगवेगळे एक्स १ एक्स २ असे इनपुटस न देता एकच डेटा पॉईंट इनपुट (आणि तोच आउटपुटही) दिला तर ?"
"तर काय , त्याला पुरेसा डेटा नसल्याने काहीच शिकता येणार नाही . सर्वं शुन्यं शुन्यं ."
"नक्की का ? कारण बाकी काहीही शिकत नसले तरी ते न्युरल नेटवर्क एक गोष्ट नक्की शिकत आहे - कि सगळ्या ट्रेनिंग डेटासेट मध्ये केवळ एकच पॅटर्न आहे . किंबहुना हा एकच पॅटर्न हाच सगळा डेटा आहे !"
"करेक्ट."
"आता त्याच न्युरल नेटवर्क ला टेस्टिंग करताना त्या डेटा पॉईंट व्यतिरिक्त दुसरा डेटा पॉईंट दिला तर ?"
"तर त्या न्युरल नेटवर्क ला काही कळणारच नाही आणि तो एरर दाखवेल ."
"आणि समजा एरर करेकशन मध्ये try: except मध्ये एक्सेप्टला देखील सेम आउट्पुट - अर्थात तोच सिंगल डेटा पॉईम्ट अॅज ऑटपुट असे लिहिले असेल तर ?"
"तर काय , ते न्युरल नेटवर्क सवर्च डेटा पॉईंट्सला सेम डेटा पॉईंट समजेल आणि तोच ओरिजिनल डेटा पॉईंट आउअटपुट म्हणुन देईल !
"एक्झॅक्टली !"
"आता आजुन एक छोटासा फॉलोअप प्रश्न : त्या न्युरल नेटवर्क साठी सर्वच डेटा पॉईंट्स हे ओरिजिनल सिंगल डेटा पॉईंट आहेत तर मग त्या न्युरल नेटवर्कला "त्या न्युरल नेटवर्कचे अस्तित्व" हाच एक डेटा पॉईंट अॅज अ इनपुट म्हणुन दिले तर ?"
"तर काय ? ते खुद्द न्युरल नेटवर्क देखील डेटा पॉईट म्हणुन पाहिले तर वेगळ्या डेटा स्ट्रक्चर मध्ये असेल पण ह्या न्युरल नेटवर्कसाठी तर तेही तेच सेम ओरिजिनल डेटा पॉईंट आहे ! त्यामुळे तेच आऊटपुट म्हणुन येईल ! "
"वॉला !! आता हे पहा :
https://nkbmeditation.org/images/image/673f53292807800f0202fbb0/image.png
"हे काय आहे ?"
"महाराजजींचे हस्ताक्षर !"
"मग ?"
"Don't you see it ! He is feeding his Neural Network , "A single Data point " over and over again !!"
" ओह !"
"नॉट ओह "
"राम"
"हां , येस , .... राम"
"अरे एवढं लांब कशाला जायला पाहिजे - हे पहा - "
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची।।
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण।।
ठायीचं बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा।।
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ।।
याविण आणिक असता साधन । वाहतसे आन विठोबाची।।
तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे।।
"राम"
"अजुन हे पहा :"
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशील झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं ।
तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥ ज्ञानेश्वरी - अध्याय १२
"अजुन "जवळंच" उदाहरण पहा हे आता"
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।।
"ओह माय गॉड ! थोडक्यात काय तर all you need to do is - to train your neural network on this one data point "राम". And so the Neural network will be !" And so you too will be ! "
म्हणोनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं ।
येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥
just train your network with one data point - "राम" and you will be so !
"किती जवळ होता हा उपाय ! स्पेसमध्येही ... देहु आळंदी सज्जनगड.... आणि टाईममध्येही ... फक्त ३००-७०० वर्षं जवळ ! पण आपल्याला हे कळायला कित्ती वर्षं लागली !"
"राम"
"हा हा हा. अरे अजुन ह्याही पेक्षा कितीतरी जास्त जवळ होता हा उपाय ! तू अजुन पाहिलं आहेस कुठे तु ! हे पहा :
https://shrigondavalekarmaharaj.org/images/add/1.jpg
"राम"
_____________________________
प्रतिक्रिया
10 Feb 2025 - 3:56 am | चित्रगुप्त
आधुनिक/पाश्चात्य ज्ञान आणि प्राचीन भारतीय परंपरा/ज्ञान यांचा अद्भुत मेळ घालण्याची तुमची हातोटी जबरदस्त आहे पंत.
10 Feb 2025 - 6:11 pm | प्रसाद गोडबोले
राम
_/\_
10 Feb 2025 - 8:27 am | युयुत्सु
न्युरल नेटची अध्यात्माशी सांगड वाचून गंमत वाटली. पण यातला तथ्याचा भाग थोडा वेगळा आहे. "राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.
आपले मन स्थिर राहणे निसर्गाला अभिप्रेत नाही. मन जर स्थिर राहीले तर आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारे धोक्यांची जाणीव अमिग्डाला पर्यंत पोचणार नाही आणि त्या जीवाचे अस्तित्व धोक्यात येईल ( वाल्या मुंग्यांच्या वारूळात गाडला गेला तसेच) .
शेवटी तारतम्य महत्त्वाचे...
10 Feb 2025 - 6:09 pm | प्रसाद गोडबोले
असेलही , पण मला माहीती नाही !
असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे :
योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥
म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥
न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ ||
ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ ||
नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ ||
हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ ||
अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच !
ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !!
माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो !
इत्यलम
राम
10 Feb 2025 - 9:58 am | माईसाहेब कुरसूंदीकर
माहितीपूर्ण. आणखी येऊ द्या.
नविन ओ.सी.आर(ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन्)मध्येही ह्या पद्धतीचा वापर केला आहे का ? किंवा Long Short-Term Memory (LSTM) ह्या रिकरंट न्युरल नेटवर्कचा वापर केलेला असतो.
10 Feb 2025 - 10:54 am | Bhakti
सहज गुगल केलं...बाकी काही नाही :)
10 Feb 2025 - 6:29 pm | प्रसाद गोडबोले
एक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली !
व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा !
एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर !
राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"
टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
तात्पर्य इतकेच की - ह्या सार्याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल !
अर्थात ही बुध्दी देणाराही रामच !
राम
11 Feb 2025 - 11:45 am | युयुत्सु
Enlightenment ही कल्पना वैज्ञानिक पातळीवर समजाऊन घेता येईल का असे बरेच दिवस मनात घोळत होते. वरील विधानाने याला परत एकदा चालना मिळाली म्हणून ए०आय्०लाच साकडे घातले -
प्रश्न० "How the concept of enlightenment can be explained from the perspective of neuroscience?"
उत्तर - १. Enlightenment, often described as a profound spiritual awakening or a deep sense of interconnectedness, has been a subject of interest in neuroscience, particularly in the field of neurotheology. Researchers aim to understand the neural correlates of such transformative experiences.
Studies involving advanced meditators have utilized neuroimaging techniques to observe brain activity during deep meditative states. Findings suggest that these individuals often exhibit decreased activity in the brain's default mode network (DMN), which is associated with self-referential thoughts and mind-wandering. This reduction in DMN activity correlates with a diminished sense of self, a common characteristic reported during enlightenment experiences. citeturn0search4
Additionally, research indicates that long-term meditation can lead to structural changes in the brain. For instance, increased connectivity between different brain regions has been observed, potentially reflecting enhanced integration during meditative states. These neural adaptations may facilitate the mental states and skills associated with meditation and enlightenment. citeturn0search6
Neuroscientist Dr. Andrew Newberg has extensively studied the relationship between spiritual experiences and brain activity. His work suggests that enlightenment experiences can lead to permanent changes in brain function, particularly in areas related to self-perception and emotion regulation. citeturn0search4
While these findings provide insights into the neural mechanisms underlying enlightenment experiences, it's important to note that the subjective nature of such states presents challenges in scientific study. The field of neurophenomenology attempts to bridge this gap by combining first-person experiential reports with third-person neuroscientific data to gain a more comprehensive understanding. citeturn0search13
In summary, neuroscience approaches enlightenment by examining how certain practices, like meditation, influence brain activity and structure, leading to transformative experiences. Ongoing research continues to explore these complex interactions between the brain and profound states of consciousness.
For a more in-depth exploration of this topic, you might find the following discussion by Dr. Andrew Newberg insightful:
videoThe Neuroscience of Enlightenment, with Dr. Andrew Newbergturn0search1
२. From a neuroscientific perspective, enlightenment can be viewed as a unique state of consciousness characterized by changes in brain activity, connectivity, and information processing. Here's a simplified explanation:
Neural Correlates of Enlightenment
1. Default Mode Network (DMN) deactivation: The DMN, responsible for self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering, is often deactivated during enlightenment experiences. This deactivation can lead to a sense of self-transcendence and reduced ego-identification.
2. Increased global neural coherence: Enlightenment experiences often involve a sense of unity, interconnectedness, and holistic awareness. This can be reflected in increased global neural coherence, where different brain regions exhibit synchronized activity, fostering a sense of integration and wholeness.
3. Neuroplasticity and rewiring: Enlightenment experiences can lead to changes in brain structure and function, particularly in regions involved in attention, emotion regulation, and memory. This neuroplasticity can result in a reorganization of neural connections, potentially leading to more adaptive and efficient information processing.
Brain Regions Involved
1. Prefrontal cortex (PFC): Involved in attention, emotion regulation, and decision-making.
2. Default mode network (DMN): Involved in self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering.
3. Ventral tegmental area (VTA): Involved in reward processing and dopamine release.
4. Nucleus accumbens (NAcc): Involved in reward processing and pleasure.
5. Amygdala: Involved in stress and anxiety processing.
6. Hippocampus: Involved in memory formation and emotion regulation.
Neurotransmitters and Hormones
1. Dopamine: Involved in reward processing, pleasure, and motivation.
2. Serotonin: Involved in mood regulation, emotional processing, and social behavior.
3. Endorphins: Involved in pain modulation, stress reduction, and feelings of well-being.
4. Oxytocin: Involved in social bonding, trust, and emotional connection.
Theories and Models
1. Integrated Information Theory (IIT): Suggests that consciousness arises from the integrated processing of information within the brain.
2. Global Workspace Theory (GWT): Proposes that consciousness involves the global workspace of the brain, where information from various sensory and cognitive systems is integrated.
3. Neural Darwinism: Suggests that neuronal connections are strengthened or weakened based on experience, leading to changes in brain function and behavior.
While neuroscience can provide insights into the neural correlates of enlightenment, it is essential to acknowledge that the experience of enlightenment is complex, multifaceted, and may not be fully captured by neuroscientific explanations.
11 Feb 2025 - 12:27 pm | धर्मराजमुटके
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
11 Feb 2025 - 1:16 pm | स्वधर्म
तुंम्हाला गट क्र. २ मध्ये टाकण्यात येईल. प्रश्न बाकी एकदम मार्मिक आहे, बघूया काय उत्तर येते.
11 Feb 2025 - 3:14 pm | प्रसाद गोडबोले
होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत.
समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा :
जाले साधनाचे फळ।
संसार जाला सफळ॥
निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ।
अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६)
हिशेब जाला मायेचा।
जाला निवाडा तत्त्वांचा॥
साध्य होता साधनाचा।
ठाव नाही॥ (२०.१०.२७)
साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा !
राम राम राम
आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !!
ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे
माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम ।
राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।।
राम
10 Feb 2025 - 7:27 pm | Bhakti
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.
10 Feb 2025 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता मात्र अधिक काळजी वाटायला लागली आहे. जपा. काळजी घ्या.
-दिलीप बिरुटे
11 Feb 2025 - 9:57 am | प्रसाद गोडबोले
ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले !
अजामेळ पापी वदे पुत्रकामे।
तया मुक्ति नारायणाचेनि नामें
शुकाकारणे कुंटणी राम वाणी।
मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥
राम
11 Feb 2025 - 10:09 am | प्रसाद गोडबोले
संत चोखोबा :
गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥
नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥
ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्त्री शुद्रा ॥६॥
संत बंका :
पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥
तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥
गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥
बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥
राम
11 Feb 2025 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले !
रामाचं पेटेंट आहे का आपल्याकडे. =))
-दिलीप बिरुटे
11 Feb 2025 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले
कसलं डोंबलाच आलंय पेटंट. =))))
मी म्हणतोय की तुम्ही नामस्मरण करताय हे पाहून मला आनंद होतोय !
तुम्हीच भलता सलता अर्थ काढता तुमच्या पूर्वग्रहदूषित विचारातून.
ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥
सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥
इथे सर्वांना अधिकार आहे - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आणि वेश्याही!
कोणाचे कसलेही पेटंट नाही .
आनंदाने नामाचा गजर करा !
नामाचा गजर ! गर्जे भीमातीर ! असं नामदेव महाराज ह्यांनी म्हणाले आहे तसे काहीसे होऊ द्या !
त्या तिथे कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या ज्ञानोबा तुकोबांनाही आनंदच होईल !
बोला - राम कृष्ण हरी
जय जय रघुवीर समर्थ
11 Feb 2025 - 11:32 am | गवि
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे.
अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
तुम्हाला तुमच्या न्युरल नेटवर्कचे काय करायचे आहे हा तुमचा तुमचा चॉईस.
जाता जाता..
मनुष्याचा मेंदू हा असा सहज सरळ सोपा नाही. न्युरल नेटवर्क हे ओव्हर सिंपलिफिकेशन आहे. साधारण रिकरंट न्युरल नेटवर्क किंवा तत्सम उदाहरण अधिक चपखल ठरेल. काळानुसार राम मध्येही बदल होतील. आधी सूक्ष्म वाटतील. मग variation सापडतील. रामराम अशी जोडी होईल. रा गुरू आणि म लघु असे भेद होतील.
अगदी जन्मतः आंधळा मुका बहिरा असला तरी लर्निंग थांबत नाही. म्हणून तर आपण टिकलो आहोत ना.
शिवाय जरा थांबल्यास शेवटी ती अवस्था कम्पल्सरी प्राप्त व्हायचीच आहे उसकी घाई कायकू? असेही वाटते.
अर्थात वेगळे विचार मांडणारा लेख आवडला हे आहेच.
11 Feb 2025 - 11:51 am | युयुत्सु
ठार मेलो...हसून!
11 Feb 2025 - 3:26 pm | प्रसाद गोडबोले
एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.
म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा !
राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून."
मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!"
हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!)
इतकं सोप्प आहे हे !
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !
It's really mind boggling beautiful !
राम
11 Feb 2025 - 3:33 pm | युयुत्सु
अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.
11 Feb 2025 - 11:28 pm | चित्रगुप्त
-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे.
परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||
11 Feb 2025 - 3:34 pm | आंद्रे वडापाव
11 Feb 2025 - 3:51 pm | युयुत्सु
मालक,
ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.
11 Feb 2025 - 6:47 pm | गवि
अगदी. ओव्हर फिटींग नेहमी वाईट असे नसते. जर ट्रेनिंग डेटापैकीच सबसेट म्हणजे तोच तोच डेटा परत परत समोर येणार असेल तर क्लासिफिकेशनसाठी उलट ओव्हर फिटिंग एक स्ट्राटेजी म्हणून वापरावी. जिथे मानवी श्रम कमी करायचे आहेत आणि जनरलायझेशन फार मोठे नकोय तिथे.
11 Feb 2025 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले
Lol
पण टेक्निकली स्पीकिंग, ह्या न्यूरल नेटवर्क मॉडेल ची accuracy अल्मोस्ट 0% आहे कारण ते प्रत्येकालाच राम म्हणत आहे, राम असे प्रेडिक्ट करत आहे .
मला आनंद ह्यासाठी आहे की ज्याने हे मॉडेल बनवले त्याने स्वतःच हा स्टँडर्ड सेट केला आहे "मॉडेल व्यवस्थित ट्रेन झाले" असे म्हणायला !!
हे पहा -
यावन्न पश्येदखिलं मदात्मकं
तावन्मदाराधनतत्परो भवेत् ।
श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो
यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८॥
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥
11 Feb 2025 - 4:26 pm | आंद्रे वडापाव
11 Feb 2025 - 11:57 am | कर्नलतपस्वी
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. संतांनी प्रापंचिकाना जे मार्गदर्शन केले आहे ते मात्र भावते.पुढे काय होणार हे पण माहित नाही पण नामस्मरणाने प्राप्त परिस्थितीत कठीण काळात आत्मबळ वाढते यावर विश्वास जरूर आहे. यात आत्मबळावर आलेल्या प्रसंगी ठामपणे उभे रहाता येते मग परिणाम काहिही होओ त्याने काही फरक पडत नाही. अर्थात हा माझा अनुभव, मत आहे.
11 Feb 2025 - 7:22 pm | सुबोध खरे
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही.
बाडीस
मी म्हणजे शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस) .
अध्यात्म काय न्यूरल नेटवर्क काय सारखे गहन विषय समजत नाहीत आणि मेंदूला पेलतही नाहीत.
अशा विषयाची गहन चर्चा करणार्यांना साष्टांग नमस्कार
11 Feb 2025 - 12:04 pm | आंद्रे वडापाव
"इमिटेशन गेम्स" या चित्रपटात ...
"हाईल हिटलर" असे केवळ २ शब्दांच्या पोझिशनवर ... संपूर्ण मेसेज डिक्रीप्ट करण्याचे
असाध्य काम केले गेले त्याची आठवण आली ...
सुंदर लेख ...
11 Feb 2025 - 1:46 pm | मुक्त विहारि
हातात हात तरी गवसत आहे असे म्हणता म्हणता परत मनातून काही तरी निसटून जात आहे...
गम्य अगम्य....
तुमची विचारसरणी वेगळी आहे...
आम्ही आपले, टीचर्स, ओल्ड मंक, जॉनी वॉकर ह्यांच्या साथीने, कधी व्हाईट हॉर्स पकडणार तर कधी किंग फिशर तर कधी गोल्डन ईगल तर कधी ब्लॅक डॉग पकडणार...
पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना ..
11 Feb 2025 - 2:40 pm | वामन देशमुख
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६।।
असे सध्या सोप्या शब्दांत विचार मांडणारे तत्व विवेचन आवडले.
पहाटे रामनाम स्मरण करणे हा पारंपारिक हिंदू संस्कृतीचा किती अविभाज्य भाग आहे हे "रामप्रहर" या शब्दातून दिसून येते. त्या नामस्मरणातून मिळणारी शक्ती किती अजिंक्य आहे हे "रामबाण" या शब्दातून दिसते!
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम् ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥
---
अर्थात या (आणि तुमच्या इतरही अश्या) लेखांतील गहन आशय समजण्याइतकी माझी तेवढी अध्यात्मिक उंची नाही तरीही वाचायला आवडते. खवचट प्रतिसादांकडे यथोचित दुर्लक्ष करत लिहीत राहावे.
11 Feb 2025 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले
श्रीराम !
12 Feb 2025 - 1:31 am | राघव
मायला ह्या ऑरेलियस बाबाच्या... अरं कुठल्या कुठल्या संकल्पना कुठच्या कुठं आणून ताडून पाहत बसतंय..!
हे बघ बाबा, तुझं ते जड विज्ञान आणि ते अध्यात्म मला बुवा काही म्हणजे काहीही आकळत नाही.
अरे, ज्यानं केवळ जप केला.. कारण न समजता केला.. जपानं नक्की काय फरक पडतो स्थूल/सूक्ष्म शरीरात, ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.. किंबहुना त्याची तेवढी पात्रता, ईच्छा, गरजच नव्हती.. पण भाव मनीचा केवळ एवढाच होता की "ब्वॉ गुरुंनी सांगितलंय, त्यांना आवडतं" म्हणून केला.. तर त्याची आत्मोन्नती होईल की नाही?
जर उत्तर हो असेल तर, बाकी सर्व जाऊं देत ना चुलीत..!
कशाला ते विज्ञान आणि अध्यात्म वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्नही करायला जायचं.. अरे जे मुळातच स्वयंसिद्ध आहे ते उगाच कशाला सिद्ध करायला घ्यायचं?
विवेकानंद म्हणतात तसं "माणसाचा तर्क जिथे संपतो, तिथे खरं अध्यात्मिक साधन सुरु होतं". आता आपण आपला तर्क किती वेळ उगाळत बसतो यावर आपलं साधन कधी सुरू होणार ते अवलंबून आहे. ज्याला करायची बुद्धी होईल, त्याचं काम सुरू होईल.
बाबा रे, एकदा सांगतो.. बघ पटलं तर..
एखादा आपल्या म्हणण्यानुसार साधनांत लागला तर त्याचं गुरुपण आपल्याकडे येतं. ते घेण्याची पात्रता आपली असते का? कारण त्या पदासोबत येणारी जबाबदारी किती मोठी आहे ते मी तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे माझी तुला मनःपूर्वक विनंती आहे की, तू साधनांत मस्त आहेस.. तेच कर. उगाच या फाफटपसार्यात कशाला कुणाला शिकवायच्या, सांगायच्या फंदात पडायचंस. तुझ्या साधनेत ज्यानं आणिक मज़ा येईल अशी संगत बघ! ते जास्त संयुक्तिक ठरेल!
12 Feb 2025 - 12:28 pm | प्रसाद गोडबोले
नमस्कार राघव.
आपला प्रतिसाद मनापासून आवडला.
कोठेतरी लिहिले आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करावी, आचरणात आणावी हे मला कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्ट सतसत्विवेक बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहिल्याशिवाय माझे मन माझी बुद्धी मान्य करायला तयारच होत नाही.
कदाचित हे माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे !
गुरू प्रचिती , ग्रंथ प्रचिती ह्यापेक्षाही आत्मप्रचिती ही कैक पटीने श्रेष्ठ मानतो मी.
हां अर्थात ह्या मुळे गोष्टी कळायला वेळ लागतो, कष्ट पडतात , पण जेव्हा कळतं तेव्हा वळतं देखील !!
त्यात साधार असे समर्थांचे श्लोक आठवून थोडं हायसे वाटते !
घालोनी अकलेचा पवाड! व्हावे ब्रह्मांडाहोनी जाड !
तेथे कैचे आणिले द्वाड ! करंट पण !!
मी आधी म्हणालो तसे हा बुद्धीच्या सामर्थ्यावरील अतोनात विश्वास नसता तर कदाचित हे सारे 30 वर्षांपूर्वी च कळले असते ! नामसाधना विषयी फार पूर्वी पासून माहिती आहे पण त्यातील तर्क माहीत नसल्याने कधी त्या मार्गाला गेलोच नव्हतो, आता कुठं उमजायला लागलं आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग !
मी लिहितो तेही केवळ माझ्या आकलनातील गॅप्स मला कळाव्यात म्हणून. सर्वावस्थांमध्ये रामाचे स्मरण ठेवणे हीच एक साधना. आता इथे कोणाचा प्रतिसाद पाहून मन उद्विग्न होत असेल तर तिथेच रामाला आणून बसवलं पाहिजे, त्या माणसामध्ये राम पाहता आला पाहिजे, त्याच्या विक्षिप्त वागण्यात, वाकड्या प्रतिसादात, ही रामाची इच्छा असे पाहता आले पाहिजे, रादर हाही राम आहे असे पाहता आला पाहिजे.
हीच साधना !
आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही लिहूच नये, बोलूच नये असे तरी कुठे !
आता बस आपण आपणच आहे , मग ते ते पुनः पुनः उपभोगू की !!
आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी ।
ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥
12 Feb 2025 - 1:12 pm | मुक्त विहारि
प्रचंड सहमत...
कुणाला नामसाधना तर कुणाला प्रदक्षिणा...
मार्ग वेगळे, ध्येय एक...
12 Feb 2025 - 12:26 pm | Bhakti
त्याला लिहू द्या की ओ...
😂 मला वाचायचं असतं, कुठे मराठीत असं वाचायला मिळत नाही 😊
12 Feb 2025 - 1:13 pm | मुक्त विहारि
अगदी...अगदी ..
12 Feb 2025 - 7:03 pm | प्रचेतस
नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी.
साक्षात भगवंतच सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, आत्मसंयमाचा उपदेश करून अक्षरब्रह्माचा उपदेश करताना म्हणतो
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥
खुद्द तुकोबांनीही केवळ नामस्मरण न करता प्रपंच करून परमार्थ जोडला
नामा घेता लाभ कयाचा । नेले बैल बैलाचा ॥
करितो तो न मिळे काही । मग फुकाचे नामा कांही ॥
उभा काठेवरी नाम घेई ।
पडे पाण्यामधी तरी मरे ॥
तुका म्हणे नेणे वेड ।
आता कैसा देईल बुड ॥
तर समर्थ इये देशी जनजागृती करत फिरले.
नेणे नामस्मरण । म्हणोनी सोडू नये साधन ।
करिता सकळ कारण । तोचि सिध्द होय ॥
जोडोनिया धनु। धन्य धन्य म्हणो।
तयाचे लवलेशु। न लाभे ॥
काय करील नाम । जो न चालवी पाय ।
सिद्धीचा उपाय । करा जे ॥
म्हणे फुकाचे नाम। हाचि खरा धर्म।
अशाने पाविजे ब्रह्म। ते बुडाले॥
13 Feb 2025 - 9:21 am | प्रसाद गोडबोले
वाह वल्ली सर , मनःपुर्वक धन्यवाद !
ह्यासाठी मला मिसळपाववर यायला, लिहायला आवडतं ! तुमचा प्रतिसाद पाहुन मी माझा लेख परत एकदा वाचला ! मी कुठेच म्हणालेलो नाहीये की हाती असलेले वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेले कर्म त्यागुन नामस्मरण करा !! विहित कर्म करत असताना नामस्मरण करा , सर्वांभुती, सर्वावस्थां मध्ये सर्व कर्मात रत असताना नामस्मरण करा , तुमच्या न्युरल नेटवर्क ला सर्वावस्थेत राम पहायला ट्रेन करा असेच मला म्हणायचे आहे !
इये विषयी वामन पंडीतांचा सुश्लोक आहे -
अहो येता जाता उठत बसता कार्य करता
सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळीता ।
घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी
समस्ताची लज्जा त्यजून भगवत् चिंतन करी ।।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
भगवंतालाही हेच अभिप्रेत आहे - माझे नाव घेऊन माझे स्मरण करुन युध्द कर !
प्रपंच सोडुन नुस्तं हरि हरि करा असा मी कोठेच म्हणालेलो नाही , तसा कोठे अर्थ निघत असेल तर चुकीचाच आहे. नामस्मरण हे वर्णाश्रम धर्माला ओव्हरराईड करत नाही , उलट सह्हाय्यच करते !
बाकी तुम्ही म्हणालात ह्या "नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी." ह्या विधानाला मला तरी काही आधार सापडाला नाही. तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर इथे उध्दृत करावा अशी विनंती करतो !
नामस्मरण सर्व मार्गांवर चालत असताना , सर्व कर्मे करत असताना, सर्व उपभोग घेत असताना , आयुष्याच्या पहाट सकाळ माध्यान्ह दुपार अशा सर्व काळी , जेणेकरुन संध्याकाळ होई पर्यंत नाम हीच वृत्ती बनुन गेलेली असेल , अजपाजप झालेली असेल ! तेव्हा, आयुष्याच्या संध्याकाळी काहीच करायची गरज नाही , तेव्हा बस एन्जोय करायचे आहे !
13 Feb 2025 - 12:42 pm | मुक्त विहारि
आणि
नामजप कधीही केला तरी चालतो.