कराडची मुलगी

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
18 Jan 2025 - 12:37 pm

नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ?

कराडची मुलगी शिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या शहरात आलीय आणि नोकरी साठी धडपड करत एका कंपनीत पोहोचतेय ... आणि " नाव काय तुझं ? असा प्रश्न आला की उत्तर काय द्यायचं देताना मनात हजार कल्लोळ उठतायत.... काय असेल कारण ? हे समजून घ्यायचं असेल तर नुकतीच प्रदर्शित झालेली "नाव काय तुझं ? " ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी ! अल्पवधीत ८१० हजार (810 K Views) प्रेक्षक जिंकण्यात यशस्वी झालेली ही फिल्म लवकरच 1 Million प्रेक्षक संख्या होऊन आणखी घौडदौड करणार यात शंका नाही !

"नाव काय तुझं” : एक अनुभव माईंड रिफ्रेशिंग अनुभव
nktsf001

अतिशय सुंदर स्क्रिप्ट अन त्याची उत्कृष्ट बांधणी या मुळं प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी होते. दिग्दर्शन, अभिनय, संवाद, चित्रण, नेटकं संगीत-संयोजन, एडिटिंग या सर्वच पातळ्यांवर ही फिल्म सरस ठरलीय ! लेखक-दिग्दर्शक बन्सीधर किंकर यांनी चमूकडून जबरदस्त टीम वर्क करून घेतलंय ! त्यांची “शंभरावं स्थळ” ही शॉर्टफिल्म ऑलरेडी सुपरहिट आहे)

दिग्दर्शक बन्सीधर किंकर, मुख्य अभिनेत्री नेहा नाईक यांच्याबरोबर शार्दूल कुलकर्णी आणि टीम
nktsf002

एखादा साधा विषय सुद्धा किती सुंदर पद्धतीने फुलवता येतो हे यात दिसतं ! उमेश कामत सारखा दिग्गज अभिनेता आणि इतर अभिनेते अतिशय सुंदर काम करून जातात. परफेक्ट कास्टिंग हे या फिल्मचं आणखी एक वैशिष्ट्य ! अभिनेत्री नेहा नाईक तिच्या भूमिकेत कमाल करून जाते. तिचे बोलके डोळे आणि अफलातून एक्सप्रेशन्स कराडच्या मुलीला पुरेपूर न्याय देतात ! उमेश कामत आणि नेहा नाईक यांच्या केमिस्ट्रीमुळं स्क्रिप्ट वेगळीच उंची गाठते !

शार्दूल कुलकर्णी उमेश कामत यांच्याशी सिन बद्दल चर्चा करताना
nktsf003
माझ्यासाठी ही विशेष बाब आहे की, आमच्या कला वर्तुळातील शार्दूल कुलकर्णी "नाव काय तुझं” चा प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक ( Chief Assistant Director ) आहे. कलासंबधी कार्यक्रमात आम्ही अनेकदा भेटत असतो.

शार्दूल कुलकर्णी टीमला सूचना देताना.
nktsf004

हार्दिक अभिनंदन शार्दूल & संपुर्ण शॉर्ट फिल्म टीम !

एक वेगळ्या प्रकारची माईंड रिफ्रेशिंग शॉर्ट फिल्म "नाव काय तुझं” आवर्जून पहा.

"नाव काय तुझं” युट्युब लिंक :
https://www.youtube.com/watch?v=Z1sRydO6I-o&t=12s

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

18 Jan 2025 - 6:30 pm | दुर्गविहारी

अप्रतिम शॉर्टफिल्म !!
कराडची मुलगी हे धाग्याचे शीर्षक वाचून नवीन बीड कनेक्शन आणि वाल्मिक आण्णाचा काय मॅटर असे वाटून गेले. मात्र फिल्म आणि विषय खरच सुंदर आहे. धन्यवाद

रीडर's picture

19 Jan 2025 - 12:30 am | रीडर

फारच विनोदी आहे फिल्म

चावटमेला's picture

19 Jan 2025 - 2:48 am | चावटमेला

एकदम बरोब्बर. कै च्या कै आहे. कुठली आय टी कम्पनी आहे बाबा ही? असं काम होत नसतं कुठेही, थोडा रिसर्च करत जा.. अजून जॉईनिंग नाही, आय डी तयार नाही, आणि डायरेक्ट मॅनेजर चा स्वतःचा लॅपटॉप देतोय वापरायला, वर कुठल्याश्या कागदावर पाहून हिला लगेच प्रोजेक्ट कळतो आणि ही मुलगी लगेच इनपुट्स पण देते. ते आमच्या तासगावकर बाई म्हणतात हे ऐकून तर अक्षरशः फुटलो. बादवे त्या प्रोजेक्ट प्रेझेंटशन मध्ये एच आर कशाला हवीये? आयला अशा प्रोजेक्ट मीटिंग मध्ये पण एच आर बसायला लागले तर लागलीच की वाट प्रोजेक्ट ची पण. एकदम बाळबोध आहे फिल्म, एखाद्या स्कूल प्रोजेक्ट सारखी

अनुस्वार's picture

22 Feb 2025 - 11:15 am | अनुस्वार

अजिबात आवडली नाही.

प्रचेतस's picture

19 Jan 2025 - 7:45 am | प्रचेतस

खूपच मस्त.
मात्र ह्यावेळी तुम्ही लिहिण्यात हात आखडता घेतला असल्याचे जाणवले.

मुक्त विहारि's picture

20 Jan 2025 - 4:22 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद..

बघितली फिल्म. सुसाईड नोट लिहून ठेवलेल्या मुलीची फाईल सापडली की कराडची मुलगी हडबडून जाईल की मैत्रिणीशी मस्त गप्पा मारत दोघी मिळून शेवटी त्या मुलीच्या जागी हिने जावे असे ठरवू शकतील? त्या मुलीने खरेच जीव दिला असेल आणि आपण तिच्या नावाने कुठेतरी ऑफिसात गेलो तर केवढ्या लफड्यात सापडू याचा विचार देखील शिवू नये म्हणजे फारच निरागस बुवा. अशा वेळी धीट असेल तर पोलिसात जाऊन फाईल देईल किंवा सामान्य घाबरट असेल तर फाईल तिथेच सोडून काढता पाय घेईल.

असो.

बाळबोध फिलम वाटतेय, अशाप्रकारचया बरयाच रहसयकथा पूरवी वाचलयात. फकत थोडासा धकका बसतो. ऊमेश कामत बॉस तयाला माहित असूनही तिचया ईनोसनट दिसणयामङळे किवा खरेच presentention मुळे attract होतो का व महणून नोकरी देतो असे वाटते. याहून धककादायक फिलमस् खूप पाहिलयात. ठीक आहे अशी फिलम्.

धर्मराजमुटके's picture

11 Feb 2025 - 12:35 pm | धर्मराजमुटके

खुप छान फिल्म ! जगात निरागसता आणि बाळबोधपणा जिवंत आहे हे ह्या फिल्म मुळे कळाले. इथे निगेटिव्ह रिप्लाय देणार्‍यांना फाट्यावर मारा. रोजमर्रा च्या जिंदगी च्या कश्मकश मधे त्यांचा इनो(संट)चंटपणा जळून गेला आहे.

श्वेता२४'s picture

12 Feb 2025 - 11:02 am | श्वेता२४

पटली नाही. नुकताच ऑफीसमधील माहितीच्या व्यक्तीने सुसाईड अटेम्ट केल्याची बातमी कळली तेव्हा काय अवस्था होते त्याचा अनुभव घेतलाय. त्यामुळे खोटेपणाची चीड असणारा उमेश कामत मीत्राच्या बहिणीच्या या अवस्थेत कोणी अन्य फायदा घेतेय हे माहित असूनही इतका शांत कसा हे पटलेले नाही. बाकी ते प्रोजेक्ट प्रेझेंटेशन खरंच बाळबोध वाटलं. काम करणारे कलाकार उत्तम असल्याने एकूण प्रभाव चांगला पडत असला तरी .........मुलगी कराडची नाही तर पुण्याची वाटतेय....