जानेवारी ०५ - परमहंस योगानंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने..
तीन वर्षांपूर्वी मी लॉस अँजेल्स ला शिफ्ट झालो. हळू हळू माझी इथे असणाऱ्या योगानंद परमहंसांच्या self realization fellowship आणि क्रिया योगाची ओळख झाली.
https://www.quora.com/Which-famous-people-got-inspired-by-the-book-Autob...
https://yogananda.org/
कोलकात्याचे परमहंस योगानंद जवळपास १०० वर्षांपूर्वी लॉस एंजेलिस ला आले. इथे येऊन त्यांनी भारतीय संस्कृती, योग, व प्रामुख्याने ध्यानसाधनेचा (क्रिया योग) प्रसार केला. आज अख्य्या जगात योगानंदांचे अनुयायी पसरलेले आहेत.
८० वर्षांपूर्वी योगानंदांनी लिहिलेले ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी’ हे पुस्तक जगविख्यात आहे. आजवर ५० हून अधिक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. स्टीव्ह जॉब्स, विराट कोहली आणि अनेक इतर मान्यवरांवर या पुस्तकाचा खोलवर प्रभाव होता/आहे. जीवनाला कलाटणी देणारं पुस्तक अशी याची ओळख आहे. खूप 'addictive' असे हे पुस्तक आहे.
श्री कृष्ण -> महावतार बाबाजी -> लाहिरी महाशय -> स्वामी युक्तेश्वर -> परमहंस योगानंद अश्या गुरु-शिष्य परंपरेतून घडलेल्या योगानंदांची कथा हे पुस्तक उलगडून सांगते. हे पूर्ण पुस्तक क्रिया योगा वर आधारित आहे असेही म्हणता येईल.
योगानंदांनी स्थापन केलेलेय ‘self realization fellowship (srf)’ चे मुख्यालय ही लॉस एंजेलिस मधेच आहे. भारतात हीच संस्था योगोदा सोसाइटी च्या नावाने काम करते.
लॉस एंजेलिस मधे योगानंदांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर आहेत. पूर्ण अमेरिकेत, बऱ्यापैकी सगळ्याच महत्वाच्या शहरात srf चे सेंटर्स आहेत.
srf ची तीन महत्वाची ठिकाणं लॉस एंजेलिस मधे आहे -
१. लेक श्राइन - योगानंदांनी १०० वर्षांपेक्षाही आधी स्थापन केलेला आश्रम. खूपच सुंदर आहे.
जागोजागी ध्यान करण्यासाठी जागा बनवल्या आहेत.
योगानंदांना जगभरातून भेट म्हणऊन मिळालेल्या वस्तूंचे प्रदर्शन आहे.
महात्मा गांधींच्या अस्थी पण आहेत.
https://lakeshrine.org/
२. मदर सेंटर - इथे १५ वर्ष योगानंद वास्तव्याला होते. माउंट वॉशिंग्टन मधे हे भव्य असे सेंटर आहे.
https://yogananda.org/locations-international-headquarters
३. योगानंदांची समाधी (crypt) - मदर सेंटर पासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यांच्या बाजूला मायकल जॅक्सन ची कबर आहे.
https://devotee2devotee.com/wordpress/index.php/paramahansa-yoganandas-f...
मागील २ वर्षात मी या सगळ्या जागांवर जाऊन आलो. त्यांची शिबीरं पण अटेंड करतोय. अमेरिकन लोकांचा फॉलोविंग खूप आहे. त्यामुळे थोड्या चर्च स्टाइल च्या पूजा इकडे होतात. (म्हणजे चर्च मधील संडे मास सारखं)
---------------------------------------
भारतातील ३० वर्षांच्या वास्तव्यात मला योगानंद परमहंस आणि क्रिया योग विषयी कधी काही वाचण्यात, ऐकण्यात आले नाही याचा मला नंतर खूप आश्चर्य वाटलं. आणि माझ्या कक्षा किती रुंद आहे याची जाणीव पण झाली.
आज जानेवारी ०५, योगानंदाच्या जन्मदिन च्या निमित्ताने लिहिण्याचा थोडा प्रयत्न करतोय. वाचणाऱ्यांपैकी अगदी एकानेही नव्याने ऑटोबीओग्राफी वाचलं, तरीही या लेखाचं सार्थक झालं असा समजेन मी. धन्यवाद.
प्रतिक्रिया
6 Jan 2025 - 11:04 am | श्रीरंग_जोशी
या लेखनासाठी विशेष धन्यवाद कारण परमहंस योगानंद यांचेविषयी या लेखामुळे प्रथमच कळले.
आमच्या स्थानिक ग्रंथालयात 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' हे आत्मचरित्र उपलब्ध आहे. संधी मिळताच वाचतो.
6 Jan 2025 - 11:15 am | Bhakti
'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी'(मराठी भाषांतरित) हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वीच मिळालं होतं.२५ टक्के तेव्हा वाचून झालं होतं.यावर्षी पूर्ण वाचून काढणारच आहे.
6 Jan 2025 - 1:13 pm | श्रीगुरुजी
हे आत्मचरित्र माझ्या संग्रही आहे. अनेक वेळा वाचलंय. अमेरिकेत काही काळ सॅन दिएगोजवळील कार्लस्बाड गावात असताना एक दिवस मित्रांसोबत डेल मार समुद्र किनाऱ्यावर जाताना अचानक एन्सिनिटास या शेजारील गावात सेल्क रिअलायझैशन फेलोशिप हा फलक दिसला. हे नाव परिचित असल्याने एकदम आनंद झाला. मित्राला विचारून तेथे कोणत्या बसने जायचे हे समजून घेतले. नंतर ४-५ वेळा तेथे जाण्याचा योग आला.
हा आश्रम प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर पण उंचावर आहे. परमहंस श्री श्री योगानंदांनी हा आश्रम सुमारे ९० वर्षांपूर्वी स्थापन केला आश्रमाच्या इमारतीभोवती अत्यंत सुंदर उद्यान आहे. अतिशय शांत वातावरण असते. वृक्षाखाली बसून डोळे मिटून साधक ध्यान करतात. अत्यंत शांतता, निसर्गरम्य उद्यान व उद्यानातून प्रशांत यहासागराचे विहंगम दृश्य दिसते. या आश्रमात स्वामी योगानंदांचे सुमारे १५ वर्षे वास्तव्य होते. आपले आत्मचरित्र येथेच त्यांनी लिहिले. त्यांचे शयनगृह, भोजनकक्ष, अभ्यासिका त्यांच्या वेळी असलेल्या स्वरूपातच ठेवली आहे.
या अत्यंत पवित्र आश्रमात ४-५ वेळा जाण्याचे सद्भाग्य मला लाभले होते.
6 Jan 2025 - 1:38 pm | कर्नलतपस्वी
आणी वाचले आहे.
6 Jan 2025 - 7:57 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद...
6 Jan 2025 - 9:26 pm | कंजूस
मी आठ वर्षांपूर्वी वाचले होते.
-----------------------------
अवांतर सुरू
बाबा लोकांचे त्यांना येणारे साक्षात्कारी अनुभव हे त्यांच्यापुरतेच असतात हे माझे मत. ते अनुभव इतरांना येतीलच किंवा कसे घ्यायचे आणि का घ्यायचे यांचे काही सूत्र नसते. मी एक उत्सुकता म्हणून बाबा लोकांची चरित्रे वाचून काढतो. आतापर्यंत साठ तरी चरित्रे वाचली असतील. इतरांना अनुभव येत असतील त्यांतून दिशा मिळत असेल तर मला काहीच आक्षेप नाही, नसतो. अवांतर समाप्त.
7 Jan 2025 - 8:38 pm | जुइ
या आश्रमाची ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद! भेट देण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.
8 Jan 2025 - 11:11 pm | अर्धवटराव
हे आत्मचरित्र म्हणजे निव्वळ एक फेण्टसी बुक वाटावं इतकं चमत्कृतींनी भरलं आहे. भारताबद्द्ल काहिच माहिती नसणार्या माणसाने जर हे पुस्तक वाचलं तर त्याला भारत म्हणजे एक जादुनगरी वाटेल.
इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो... आपले विचार आणि कर्म, दुसरं काय...