रेलवेच्या आठवणी
असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो...
भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.)
गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती...
दोन दिवसानंतर दिवाळी होती.
म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती...
आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती... दुसरया दिवशी संध्याकाळपर्यंत घरी पोचतील...
हबीबगंजहून (आता रानी कमलापति) गाडी वेळेवर, म्हणजे संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांवर सुटली.
गाडी सुटल्यानंतर सीटवर सामान ठेवलं...
आम्ही आपल्या बर्थवर होतो... मी, मैडम आणि आमची छकुली रश्मि. आई पुढे जबलपुरहून आम्हाला ज्वाइन होणार होती...
मैडम नीट बसल्या आणि आमची छकुली रश्मि डब्यांत जनसंपर्काला निघाली...
तिच्या मागे- मागे फिरत असतांना इटारसी कधी आलं ते कळलंच नाही...
इटारसीहून गाडी सुटली... (इथे इंजिनचा साइड चेंज होतो.)
इटारसी नंतर तवा नदी येते. त्यादिवशी नदीवरील पुल पार करून लगेच सुरू होणारया बोगद्यामधे गाडी उभी झाली. ती सुरूच होईना.
असं कळलं की इंजन फेल झालंय...
पाऊण तासानंतर इंजनची शिटी ऐकू आली आणि गाडी पुढच्या बागरातवा स्टेशनावर थांबली...
गाडी प्लेटफार्मवर नसून त्या शेजारच्या लाइनीवर उभी होती.
तर...
सात वाजत होते...
शेजारी बसलेले मुलं-मुली आपसात कुजबुजत होते ‘यार गाडी मिस हो जाएगी... कल शाम को पहुंच जाते... अब पता नहीं कब पहुंचेंगे...!’
हे ऐकून मी त्यांना सहज म्हणालो- ‘पीछे से जो भी गाडी आ रही है उससे चले जाओ... जबलपुर से आपकी गाडी आपको मिल जाएगी.’
ते सगळे एकदम दचकले...
त्यांनी विचारलं- ‘ऐसा कैसे हो सकता है... अपनी गाडी तो पता नहीं कब जाएगी... कनेक्टिंग गाडी तो निकल जाएगी.’
मी म्हणालो- ‘चलो देखते हैं क्या हो सकता है...’
त्यापैकी चाैघे माझ्यासोबत उतरले... आम्ही फलाटावर पोचलो...
जे समजलं ते असं की पुढच्या पिपरिया स्टेशनावर एक इंजन आहे. ते येतंय ते आमचं इंजन काढून साइडिंगला टाकेल... नंतर तेच इंजन आमची गाडी घेऊन पुढे जाईल... त्यात दोन-अडीच तास लागणार होता...
इतक्यात एनाउंसमेंट ऐकू आली... ‘XXXXXX सुपर फास्ट गाडी एक नंबर प्लेटफार्म पर आ रही है...’
हे ऐकून मी म्हणालो- ‘चलाे एसएम के पास चलते हैं...’
आम्ही स्टेशन मास्टरच्या ऑफिसमधे गेलो...
तिथे ही गर्दी...
तो फोनवर बोलत होता...
फोन ठेवतांना त्याने पोर्टरला सांगितलं- ‘देखो गाडी आ रही है... थ्रू है...’
तो पोर्टर गेला.
मी त्याला विचारलं- ‘क्या स्थिति है सर, अमरकंटक की... कितनी देर लगेगी...’
तो म्हणाला- ‘पिपरिया से इंजन आ रहा है... वह शंटिंग करके आपकी गाडी का इंजन काटकर के साइडिंग में रखेगा... फिर आपकी गाडी लेकर आगे जाएगा...’
मी त्याला म्हणालो- ‘सर, इस गाडी में ये बच्चे हैं... इन्हें जबलपुर से इस्पात नगरी पकड़नी है... अमरकंटक के भरोसे रहेंगे, तो इनकी गाडी छूट जाएगी...’
तो माझ्याकडे बघत म्हणाला- ‘मैं क्या कर सकता हूं...’
मी म्हटलं- ‘कंट्रोल को फोन पर बताइए ना कि अमरकंटक में सवार कुछ पैसेंजर को जबलपुर से इस्पात नगरी पकड़नी है... वे कह रहे हैं कि पीछे जो XXXXX सुपरफास्ट आ रही है उसे कुछ देर यहां रोकने की अनुमति दें ताकि ये पैसेंजर उसमें चढ़कर जबलपुर वाली अपनी गाडी पकड़ सकें...’
आणि चमत्कार झाला...
त्याने समोर ठेवलेला लावला... आणि कंट्रोलला इकडची परिस्थिती सांगितली आणि मग तो फोनवर ऐकू लागला... पाच-सात मिनिटानंतर त्याने माझ्याकडे बघितलं.
काय म्हणाला असेल तो...
तो म्हणाला- ‘जाइए सर, XXXXX सुपरफास्ट एक नंबर पर रूक रही है... जबलपुर वाले उससे जा सकते हैं...’
माझ्या सोबत असलेल्या मुलांना पहिले तर समजलंच नाही... मग ते एकदम आपापलं सामान घ्यायला पळाले आमच्या गाडीकडे...
मी एसएमला ‘थैंक्यू...’ म्हणून बाहेर आलो...
तर समोर ती सुपरफास्ट गाडी मी ज्या प्लेटफार्म वर उभा होतो, त्यावर येत होती.
मी पटकन खाली उतरून आपल्या गाडी मधे आलो... आणि दारावर उभा होऊन बघू लागलो...
ती सुपर फास्ट उभी झाली आणि तिच्या डब्यांच्या दारावर ही हॉस्टलर मंडळी तुटून पडली... माझ्यासमोर असलेलं दार होतंं... आम्ही आवाज देऊन ते दार उघडायला सांगितलं... आणि मुलं पटकन गाडीत चढली.
समोरच्या एका डब्यातून टीसीचा आवाज ऐकू आला... ‘सुपरफास्ट गाडी में कैसे चढ़ रहे हो...’
मी आपल्या जागे वरून ओरडलो... ‘कंट्रोल ने परमीशन दी है... इनको जबलपुर से कनेक्टिंग गाडी पकड़नी है...’
तो चुप झाला...
इतकं होईस्तोवर त्या गाडीच्या इंजनची शिटी ऐकू आली... आणि ती गाडी गेली सुद्धा...
मी खूप मोठं काम केलं... या थाटात आपल्या बर्थवर परतलो...
तर तिथे काही मुलं-मुली बसलेले दिसले.
मी विचारलं- ‘तुम्ही लोकं नाही गेला...’
ते म्हणाले- ‘सामान ज्यादा था... नहीं चढ़ पाये...’
एवढयात परत एनाऊंसमेंट ऐकू आली- ‘जनशताब्दी एक नंबर प्लेटफार्म पर आ रही है...’
हे ऐकताच मी म्हणालो- ‘चला परत एसएम ऑफिसला जाऊ या... तुम्ही सगळे तयार रहा... ही संधी वाया घालवू नका...’
मी निघालो... परत फलाटावर चढलो... एसएम ऑफिस गाठलं...
मला परत बघून तो दचकला. म्हणाला- ‘चले गए कनेक्टिंग गाडी वाले...’
मी म्हणालो- ‘हां, लेकिन सबको पता देर से चला इसलिए बहुत से लाेग रह गए... सर, प्लीज इस जनशताब्दी को भी रोकने की परमीशन लीजिए ना कंट्राेल से...’
त्याने परत फोन लावला... आणि परिस्थिति सांगितली.
आणि परत म्हणाला- ‘जल्दी जाइए, गाडी पहुंच रही है...’
या वेळेस मी त्याला म्हणालो- ‘सर, जरा एनाऊंसमेंट कर दीजिए ना की जनशताब्दी यहां रूक रही है... जिन्हें जबलपुर से आगे इस्पात नगरी से यात्रा करनी है वे इस गाडी में चढ़ सकते हैं...’
त्याने माझ्याकडे एकदा बघितलं... आणि मग माइकवर एनाऊंसमेंट केलं...
मग विचारलं- ‘ठीक है जी...’
मी थैंक्यू म्हटलं.
तर त्याने विचारलं ‘आपको कैसे पता कि ऐसा करने से गाडी रूक जाएगी...’
मी त्याला सांगितलं मी देखील एका रेलवेकर्मीचा मुलगा आहे... माझे वडील स्व. दत्तात्रय लक्ष्मण तेलंग, बिलासपुरला लोको शेड मधे सीनियर मेंटनेंस फोरमेन होते... तसंच मी स्वत: स्टीम इंजनवर फायरमेन होतो... कंट्रोलची माहिती आहे...
मग मी त्याला आमच्या गाडी बद्दल विचारलं...
तो म्हणाला ‘दो-तीन घंटे लग जाएंगे... उससे पहले कुछ नहीं हो सकता...’
जनशताब्दी येण्यापूर्वी मी परत आपल्या कोच मधे होतो...
जनशताब्दी आली... माझ्या समोरचं दार उघडतच नव्हते... त्या कोच मधला टीसी म्हणत होता- ‘इसमें जनरल टिकट वाले नहीं बैठ सकते... यहां स्टॉपेज नहीं है...’
मी ओरडून सांगितलं- ‘अमरकंटक का इंजन फेल हो गया है. कुछ सवारियों को जबलपुर से इस्पात नगरी पकड़नी है... हमने कंट्रोल से बात की है... तब जाकर तुम्हारी गाडी यहां रूकी है... इन लोगों के लिए ही गाडी यहां रूकी है इन्हें अंदर आने दो...’
त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने बघितलं... अंधारात नक्की काहीच दिसलं नसणार... पण त्याने दार उघडलं... आणि ते हॉस्टलर गाडीत चढले.
जनशताब्दी गेल्यानंतर मी बर्थवर परतलो... मैडमना सांगितलं... ‘आराम करा... गाडी सुटायला दोन-अडीच तास तरी लागतील...’
तसंच झालं...
रात्री अडीच-पावणे तीनला गाडी जबलपुरला पोचली... आई आली...
सकाळी सवा पाचला पोचणारे आम्ही दुपारी पावणे चार वाजता बिलासुपरला पोचलो...
त्या हॉस्टलर मुलांना मदत केल्याचं समाधान होतं मनात...
प्रतिक्रिया
26 Dec 2024 - 3:13 pm | सौंदाळा
भारीच
स्टेशन मास्तर देव माणुसच म्हणायला पाहिजे.
तुमचे कन्व्हींसिंग स्किल्स पण भारीच असणार हे नक्की.
26 Dec 2024 - 3:26 pm | अथांग आकाश
किस्सा मस्त आहे!
26 Dec 2024 - 10:02 pm | महामाया
किस्सा नाही स्वानुभव आहे...