श्रीगणेशदर्शन

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
19 Dec 2024 - 7:27 pm

||मोरया ||

काल संकष्टीचतुर्थी होती, श्रीगणेशाचे दर्शन "झालं" का ? नाही झालं ? लक्षात नाही राहिलं ? विसरुन गेलास ?

हरकत नाही , आत्ता करू दर्शन.
____________________________

मुळात शिवशक्ती द्वैत च नाही. जो शिव आहे तीच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे !
हे दोघे भिन्न आहेत असे वाटणे , हे द्वैत आहे , असे वाटणे हा "तुझा" विचार आहे .

आणि हा विचार मायेचा आहे, एकट्या शक्तीचा आहे, फक्त एकट्या शक्तीने घडवलेला आहे. कारण मुळात शुध्द शिवस्वरुपाच्याठायी विचार वगैरे काहीच नाही.

शिवशक्ती भिन्न आहेत हे अज्ञान, मी कोणीतरी भिन्न आहे हा अहंकार , हे द्वैत , हा विचार , हेच ह्या भिन्नत्वाच्या भ्रमाचे मस्तक आहे.

शिवाने तत्काळ हे मस्तक छाटून टाकले अन् त्याजागी अद्वैताचे प्रत्यारोपण केले.
"शिवशक्ती द्वैत नाहीच असा मोठ्ठा विचार कर" ह्या अर्थाने प्रतीकात्मक असे मोठ्ठे हत्तीचे मस्तक लावले.
शिवशक्ती भिन्न नाहीतच , एकच आहेत , अद्वैत आहेत , ही धारणा , हा विचार , हे ह्या एकत्वाच्या , अद्वैताच्या अनुभुतीचे मस्तक ! गजानन !

अरे पण हा द्वैताचा विचार तर तू करत होतास ना, सो ही दुसऱ्या कोणाची गोष्ट नाही ,
ही तुझीच गोष्ट आहे...

तुच तुझ्या द्वैताच्या विचाराचे मस्तक छाटुन त्याजागी अद्वैताचा विचाराचे हे गजाचे मस्तक बसवले.

अर्थात अजुनही विचारांच्या स्तरावरुन पहात असशील तर हा असा तूच गजानन आहेस !

जयास लटिका आळ आला । जो माया गौरीपासूनि जाला ।
जालाचि नाही तया अरूपाला । रूप कैंचें ? || आत्माराम - समर्थ रामदास स्वामी ||  

अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ॥
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ - ज्ञानेश्वरी - अध्याय पहिला

आणि शब्दातीत अनुभूतीच्या स्तरावरुन पहात असशील तर तो शिव तूच आहेस.

सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु । तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ - अमृतानुभव

तत्वमसि

___________________________

झालं दर्शन ?

आता मला सांग - नक्की कोण आहेस तू ?

||मोरया मोरया ||

ganesh

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

फारच सुंदर!असा विचारच केला नव्हता.तुमचा अद्वैताचा अभ्यास खरोखर शुद्ध, शास्त्रोक्त आहे,हे खुप दुर्मिळ आहे.मला ज्यावेळी शिवशक्ती अद्वैत उमगले तत्क्षणी बरेच बदल झाले.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2024 - 11:35 am | मुक्त विहारि

वेगळी अनुभूती...

हा माझा प्रांत नाही, हे तरी उमजले.....

आमचे कपाट वेगळे...

C to C via C हे आमचे कपाट.... (चाणक्य ते चार्ली चॅप्लिन व्हाया Chivas Regal....)