इव्हेंटफुल रात्र

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
13 Dec 2024 - 6:52 am

प्रसंग क्र. १....

खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती.

चिंताग्रस्त अवस्थेत परत घरात आलो. बिछान्यावर बायको घोरत होती. तीला उठवून विचारण्यात काही अर्थ नव्हता. शेजारील टीपाॅय वरच्या बाटलीतून एक घोट पाणी प्यालो व लगेचच पुन्हा झोप लागली.

________________________________________
प्रसंग क्र-२....

"सापडली,सापडली", झोपेतच जोर जोरात ओरडत उठलो.बायकोची पण झोपमोड झाली होती. बायकोच्या त्रासिक चेहर्‍यावर, "काय मेलं म्हातारचळ लागलाय याला,दोन घटका निवांत झोपून पण देत नाही".(बादवे,रात्री आकरा वाजल्यापासून घोरासुरांची जुगलबंदी चालू होती.

बायकोने गदगदा हालवत विचारले,"आहो, काय सापडले?".

झोपेतून पुर्ण जागा झालो व साखरझोपेत पडलेले स्वप्न आठवून मनात पुरता खजील झालो होतो.
"अगं,काही नाही,झोप तू ".बायकोने पडत्या फळाची आज्ञा घेतली व लगेचच घोरायला सुरवात केली.

टेबलावरचे घड्याळ बघीतले सकाळचे पावणे पाच वाजले होते. भानावर यायला थोडावेळ लागला. उठून दिवाणखान्यात येवून बसलो.(टु बेडरूम च्या हाॅल ला मराठीत दिवाणखाना च म्हणतात ना!).जागृतावस्थेत आल्यावर सर्व उलगडा झाला. मनसोक्त हसलो.
______________________________________

म्हणजे झालं असं की पहिल्या स्वप्नात स्कूटर पार्किंग मधे न दिसल्याने झोपेतच त्यावर विचार चालू झाले होते. झोपेतच पाणी प्यालो,घड्याळ बघीतले वगैरे,वगैरे....

पुढे स्वप्नातच,नवीन लग्न झाल्यावर पहिली खरेदी स्कूटरचीच,त्याच आठवणी सुप्त मनातून उचंबळत होत्या.मी झोपलो होतो पण अंतर्मन विचार करतच होते. १९९० चे साल.बजाजने कावासाकी नावाचे क्युट मोटारसायकलचे माॅडेल बाजारात आणले होते.(बुलेटची बायको वाटायची) ऑफ शो रूम प्राईस एकवीस हजार रूपये. नुकतेच लग्न झाले होते. मित्राच्या जुन्या १९५६ च्या लॅब्रेंटावर १९९०च्या नव्या कोऱ्या माॅडेलला फिरवताना जीव कानकोंडा होत होता. कावासाकी खुणावत होती पण बजेट तंग होते.

शेवटी फंडातून कर्ज काढले.बजाज शो रूम मधे कावासाकी,चेतक इ. नव्या कोऱ्या गाड्या उभ्या होत्या. कावासाकी चित्रपटातील हिरोईन सारखी अप्राप्य गोष्ट,त्यातल्यात्यात चेतक साईड हिरोईन, बजेट मधली,म्हणून तीच कशी चांगली बायकोला पटवून सांगत होतो. तसेही, बॅचलर्स थरार संपुष्टात आला होतो. लवकरच लेकुरवाळा होणार होतो. बायकोचे काहीच म्हणणे नव्हते. स्वताच्या नव्या गाडीवरून मिरवायला मिळणार म्हणून खुश होती.

पांढर्याशुभ्र रंगाची चेतक आर टी ओ कडून नामकरण करून आमच्या घरात आली.बरेच दिवस सेवा केली. आता वय झाल्यामुळे पार्किंग मधे निवांत पडून होती. आजच तीची चोरी झाल्याचे कळाले.वाईट वाटले. अर्थात हे सर्व झोपेतच.

पोलीस कंम्प्लेंट करायला हवी..रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, वाहन परवाना शोधू लागलो.(त्या वेळेस स्मार्ट कार्ड नव्हते. हिरवट कागदाच्या छापील फार्मवर आर टी ओ सही शिक्कामोर्तब करून देत असत.तो जास्त दिवस टिकावा म्हणून त्याला पांढरे जाळीदार कापड चिकटवलेले व तो कागद निळ्या पुठ्ठ्याच्या डायरी वजा आवरणात बांईंड केलेला असे.) बराच वेळ शोधाशोध केल्यावर,एक लोखंडी तुकडा, कागदात लपेटलेला हातात आला. बघतो तर काय,स्क्रॅप सर्टिफिकेट, महिंद्रा ॲण्ड महिंद्राच्या लेटर हेडवर आणी चेसीस नंबरचा लोखंडी तुकडा होता तो....

आणी तेव्हांच माझी झोपमोड झाली व वर लिहील्या प्रमाणे प्रसंग क्रमांक दोन घडला.
_______________________________________
प्रसंग क्रमांक ३.....

सकळचे पाच वाजले होते.दिवाणखान्यात व घरा बाहेर गुफ्फ अंधार होता पण मनात मात्र हास्याच्या उकळ्या फुटत होत्या. एव्हढ्यात मोबाईल वाजला, बघीतले तर बँकेचा मेसेज होता.

"आपल्या खात्यात मधे शुन्य बॅलन्स आहे. रूपये एक हजार त्वरीत भरा अन्यथा आर बी आय च्या नियमानुसार अर्थिक दंड लागेल".

आता मात्र मी पुर्ण जागा होतो. दोन दिवसापूर्वीच बँकेत खाते बंद करण्यासाठी अर्ज,चेक बुक,डेबिट कार्ड जमा करून आलो होतो. बॅंक कर्मचाऱ्याच्या सुचने प्रमाणे चेक देऊन खात्यावर असलेली उर्वरित रक्कम काढून घेतली होती.

कर्मचारी खाते बंद करायचे विसरला पण संगणकाने मात्र चोख काम बजावले.

हसतच स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला. फक्कड चहा बनवला,स्वताच्या कपात दोन चमचे खांडसरी आणी सौभाग्यवतीच्या कपात शुगर फ्री घालून झाकून ठेवला....

काय करणार,वय झालयं ना!!!!

@कंजूस भाऊ यांच्या मागणीनुसार....

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
-सुधीर मोघे

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Dec 2024 - 7:59 am | कंजूस

माझाही विश्वास बसेना.

धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता.
पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का?
माझा विश्वास बसेना.
एकही कविता नाही?

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2024 - 8:46 am | कर्नलतपस्वी

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
-सुधीर मोघे

मुक्त विहारि's picture

13 Dec 2024 - 8:16 am | मुक्त विहारि

आवडले...

मुक्त विहारि's picture

13 Dec 2024 - 8:20 am | मुक्त विहारि

गाडी आणि पैसा,

तुमच्याकडे, ह्या दोन्ही गोष्टी , आयुष्यभर राहतील.

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2024 - 9:56 am | कर्नलतपस्वी

प्धरतिसादा बद्दल धन्यवाद.

स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे.

माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका.

कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे.

भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.

ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला.

सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले.

असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली...

CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे.

राष्ट्र प्रथम...

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Dec 2024 - 12:55 pm | अमरेंद्र बाहुबली

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2024 - 2:06 pm | कर्नलतपस्वी

अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना...

एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते.

दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना...

जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा.

किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2024 - 2:16 pm | मुक्त विहारि

इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे?

पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Dec 2024 - 2:18 pm | अमरेंद्र बाहुबली

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

मुक्त विहारि's picture

13 Dec 2024 - 2:34 pm | मुक्त विहारि

परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद...

वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच.

आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत.

https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-san...

------

अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक...

.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2024 - 2:13 pm | मुक्त विहारि

मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही...

बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम.

बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2024 - 1:56 pm | कर्नलतपस्वी

रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले.

ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Dec 2024 - 2:32 pm | अमरेंद्र बाहुबली

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा.
अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते!
आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता!
.

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2024 - 2:43 pm | कर्नलतपस्वी

चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Dec 2024 - 2:47 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा! मी आल्टो २ वर्षे वापरली! मी सहा फुटाचा आल्टोतून बाहेर आलो की मित्र हसायचे! :(

चौथा कोनाडा's picture

20 Dec 2024 - 8:01 pm | चौथा कोनाडा


जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.

अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही

ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Dec 2024 - 8:40 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त!

विवेकपटाईत's picture

13 Dec 2024 - 10:40 am | विवेकपटाईत

नवीन कायद्याची माहिती अत्यंत मनोरंजक रीतीने तुम्ही वाचकांपर्यंत पोहचविली. वाचताना मजा आली.

शीर्षक वाचून आधी भलतेच काही नजरेसमोर आलें होते ,पण लेख एकदम वेगळा निघाला. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Dec 2024 - 4:12 pm | अमरेंद्र बाहुबली

मलाही! :)
म्हटले साबणाने आंघोळ केली धाग्यावर लोक भडभडा बोलत होते त्याच्याच पुढचा अंक की काय? :)

सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये.

आठवा पावनखिंडीतली रात्र...
आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2024 - 5:03 pm | कर्नलतपस्वी

मेजर कुलबिर सिंग चांदपुरी वाचणे.

वामन देशमुख's picture

14 Dec 2024 - 2:23 pm | वामन देशमुख

धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय.

धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं.

पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला.

---

अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

अगदी,अगदी.

स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती.

व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले.

हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत.

सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले.

कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.

धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

मुक्त विहारि's picture

19 Dec 2024 - 12:54 pm | मुक्त विहारि

आता काही लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबणार...

वामन देशमुख's picture

19 Dec 2024 - 1:31 pm | वामन देशमुख

सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....

सरकारी फी किती लागली?

कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.

सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात.

अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात.

विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.

कर्नलतपस्वी's picture

19 Dec 2024 - 2:34 pm | कर्नलतपस्वी

1000+400+258+300.

टर्मीनेटर's picture

19 Dec 2024 - 10:24 am | टर्मीनेटर

हा वेगळाच लेखनप्रकार आवडला! 'स्क्रॅप' बद्दलची माहिती पण छान.
'ग्रीन टॅक्स' भरण्या संबंधी कोणाला काही माहिती/अनुभव आहे का?

चौथा कोनाडा's picture

20 Dec 2024 - 8:03 pm | चौथा कोनाडा

इव्हेंटफुल रात्र ..... ?

बाबो ...लैच चाळवलो की म्हटलं साबणाची आंघोळ् चा पुढचा भाग आहे की काय ..

चकवा देत देत भारी लिव्हलंय !

कर्नलतपस्वी's picture

20 Dec 2024 - 9:35 pm | कर्नलतपस्वी

नवीन कायदा. दोन ओळीचे लिखाण पण विलासरावांच्या कल्पनेला भरपूर वाव, मग काय उडवला पतंग.

फारच उपयुक्त कल्याणकारी कायदा आहे.