या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ. सकाळी उठून ब्रेकफास्टची तैयारी करते, मा की दाल, राजमा, छोले किंवा भाजी इत्यादिला फोडणी देते आणि कणीक मळून ठेवते. त्या नंतर सौ. चहा करते. सून ही सहाच्या आधी उठते. चहा पिऊन, पराठे, पोळ्या इत्यादि करते. नंतर आंघोळ करून, तैयार होऊन, नाश्ता करून, धावत-पळत आठच्या आधी घरातून निघते. संध्याकाळी सून साडे सात पर्यन्त घरी परतते. त्या आधी सौ. स्वैपाकाची कच्ची तैयारी करून ठेवते. सौ.च्या हातचा चहा पिऊन, सून स्वैपाकाचे काम बघते. त्यामुळे न मागता, मला ही संध्याकाळचा दुसरा चहा मिळतोच. ऑफिस मधून घरी यायला मुलाला ही रात्रीचे 9 वाजतात. रात्री साडे नऊ नंतर जेवण. मग सर्व आटोपता-आटोपता रात्रीचे साडे दहा-अकरा रोजच होतात. दुसर्या शब्दांत म्हणा, लेक आणि सून दोघांचे एका रीतीने यंत्रवत जगणे सुरू झाले आहे. महानगरात जगण्याचा संघर्ष हा यंत्रासारखाच असतो.
एक दिवस संध्याकाळी सात वाजता मित्रांसोबत पार्क पे चर्चा करून घरी परतलो. पाहतो काय सौ.ने भाजीला फोडणी टाकलेली होती आणि पोळ्या करत होती. मी आश्चर्याने तिच्या कडे पाहिले. सौ. म्हणाली सून थकून घरी येते, म्हंटले आज संध्याकाळचा स्वैपाक करून टाकते. मला आपल्या कानांवर विश्वास झाला नाही. मी म्हंटले, खरे सांग, तुला सुनेचा एवढा पुळका काहून आला. सौ. माझ्या कडे पाहत हसत म्हणाली, तुमचा लेकरू आज सकाळी ऑफिस जाताना सुनेला म्हणत होता, त्याने साबण लाऊन आंघोळ केली आहे.
सौ.चे शब्द कानात पडले आणि मी भूतकाळात पोहचलो. मुले शाळेत जाऊ लागली होती. मुलांची शाळा सकाळची होती. मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्शा सकाळी पाउणे सातला यायचा. मला ही सकाळी सातला घरातून निघावे लागायचे. त्याचे कारण बसस्टॉप घरापासून एक किमी दूर होता. या शिवाय त्यावेळी दिल्लीत मेट्रो सुरू झाली नव्हती. बस ने कमीत-कमी दीड तास कार्यालयात पोहचायला लागत असे. आम्ही दोघ सकाळी पाचला उठायचो. चहा पिऊन सौ. सर्वांसाठी सकाळचा नाश्ता आणि तिघांचे डब्बे तैयार करायची. मुलांसाठी सौ.ला दुपारी ही स्वैपाक करावेच लागायचा. या शिवाय घराची साफ-सफाई, कपडे धुणे, भांडे घासणे सर्वच सौ.ला करावे लागायचे. आता किमान झाडू-पोंछा आणि भांडे घासण्यासाठी बाई आहे. मला रोज संध्याकाळी घरी यायला रात्रीचे नऊ किंवा साडे नऊ होत असे. मुले ही रात्री दहा-साडेदहा पर्यन्त अभ्यास करायाची. रोजचे रुटीन आटोपता-आटोपता रात्रीचे 11 व्हायचेच. दिवसभराच्या कामाने सौ. थकून जायची. भारत सरकारात पीएसची नौकरी, त्यात मोठ्या कार्यालयात मोठ्या अधिकार्यांसोबत, असल्याने शनिवार आणि रविवारची सुट्टी क्वचित मिळायची. अश्या बिकट परिसस्थितीत रात्रीच्या नाटकाचा चौथा अंक सुरू करणे जमत नव्हते. शेवटी यावर उपाय काढला. ज्या दिवशी इच्छा अनावर होत असे, सकाळीच आंघोळ झाल्यावर सौ.ला म्हणायचो, आज साबणाने आंघोळ केली आहे. सौ. दिवसाचे काम त्या हिशोबने आटपायची. त्या दिवशी संध्याकाळी बहुधा वरण भात किंवा खिचडी इत्यादि करायची. त्यात वेळ आणि मेहनत कमी लागते. रात्री साडे नऊ होताच, सौ. मुलांवर तोफ डागायची, तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा नसतो. रात्री पुस्तके उघडून बसता आणि सकाळी उठताना नखरे करतात. मी दिवा बंद करते आहे, निमूट पणे जाऊन झोपा आणि सकाळी वेळेवर उठा. मुले झोपली तरच आमचा नाटकाचा चौथा अंक सुरू व्हायचा.
काही क्षणात मी भानावर आलो, च्यायला, आपला परवलीचा शब्द मुलांना माहीत आहे. आज तोच शब्द लेकराने वापरला. याचा अर्थ आपले गुपित सुनेला ही माहीत झाले असेल. मी हसत सौ.ला म्हणालो, अब पोल तो खुल चुकी है, आज अपुन भी सोने से पहले साबण लगाकर आंघोळ करेगा. तुमच्या जिभेला काही हाड...... काहीही म्हणा, सौ. लाजल्यावर या वयात ही सुंदरच दिसते.
प्रतिक्रिया
2 Dec 2024 - 5:06 pm | चांदणे संदीप
किमान या विषयात तरी समंजसपणा दाखवला सासूबाईंनी याचे कौतुक. कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे.
सं - दी - प
3 Dec 2024 - 6:37 pm | अमरेंद्र बाहुबली
कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे.
चांगलं आहे की. आधीच लोकसंख्या किती झालीये? लोकसंख्या आटोक्यात आणायला अश्या सासवाना सरकारने प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा. लाडकी सासूबाई योजना आणायला हवी.2 Dec 2024 - 5:27 pm | रामचंद्र
महानगरी जीवनाचा सूचक आढावा!
2 Dec 2024 - 10:45 pm | नठ्यारा
साबण लावून आंघोळ करायची आयडिया लई भारी. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे दडून अनेक भ्रष्टाचारी मनसोक्त चरंत होते. त्यामुळे मनमोहनसिंगांना रेनकोट घालून आंघोळ करणारे म्हणायचे. त्या धर्तीवर साबण लावून आंघोळ करणे म्हणजे काय ते चतुर वाचकांच्या सहज ध्यानी यावे.
-नाठाळ नठ्या
3 Dec 2024 - 6:35 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदींचा तो प्रयत्न सूर्यावर थुंकण्याचा होता. कुठे तो अर्थशास्त्री नी कुठे …
6 Dec 2024 - 8:22 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
3 Dec 2024 - 4:48 am | कंजूस
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत .
तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिक. ते नेहमी दूध डाळीचं पीठ/ बेसन लावूनच आंघोळी करत असणार. पण त्यांत काही केमिकल असतात कळल्याने नवीन साबणाकडे वळले की काय. तसा घरात फतवाही निघाला असेल. सगळ्यांनी अमुक ( मेडिमिक्स?) साबणानेच अंघोळ करायची. यमुनेचे पाणी हल्ली दूषीत होत चाललं आहे किंवा दिल्लीच्या वाईट हवेसाठी हाच पर्याय आहे. दूध बेसन सर्वांनीच वापरलं तर महागाई वाढेल.
.
.
.
पण लेख आता वाचला आणि समजलं की नवीन पिढीकडे कोणता वारसा हस्तांतरीत झाला आहे. अब पुराना किला नये किल्ले को कुछ करना चाहता है.
..
मी पण साबण शोधायला जाणारच होतो पण रात्रीचा प्रहर उलटून रस्त्यावर पाववाला ओरडत सायकलने फिरायची वेळ झाली आहे.
3 Dec 2024 - 11:20 am | टर्मीनेटर
अगदी अगदी... मी पण आज थोडा बिचकतच धागा उघडला आणि सुखद धक्का बसला!
समोसा पुराणानंतरची ही साबणाने केलेली आंघोळ वाचुन मजा आली हो पटाईतकाका... 👍
3 Dec 2024 - 11:56 am | विवेकपटाईत
धन्यवाद टेर्मीनेटर साहेब. बाकी माझ्या दृष्टीने औषधी आयुर्वेदिक किंवा एलोपथि नसतात. सर्वच त्या फक्त जैविक, खनिज आणि रसायन आधारित असतात.
3 Dec 2024 - 12:37 pm | वामन देशमुख
काय हे पटाईत काका! तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक मिपावर असं काही लिहू लागले तर आमच्यासारख्या कनिष्ठांनी काय करायचं?
हघ्याहेवेसांन
---
बाकी, प्रौढ मिपा दिवाळी अंकानंतरचा हा लेख आवडला. प्रत्येक दाम्पत्यांची अशी काही गुपिते असतातच; घरोघरी साबणाच्या आंघोळी, दुसरं काय?
---
घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे!
;-)
3 Dec 2024 - 4:31 pm | विवेकपटाईत
घरोघरी नाटकांचे चौथे-पाचवे अंक जोरदार व्हावेत आणि त्यात मुलांच्या जागे राहण्याचा अडथळा येऊ नये म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन सरकारने मुलांच्या मोबाईलवर वापरावर बंदी घातली आहे म्हणे!
यात तथ्य असण्याची संभावना जास्त. महानगरात जिथे कार्यालयात जण्या येण्यात तीन ते चार तास लागतात. तिथे या समस्या आहेत. बहुतेक एक जुना चित्रपट बहुतेक नाव मबईचा जावई अशीच समस्या दाखविली आहे.
4 Dec 2024 - 11:40 am | विवेकपटाईत
यातली समस्या वास्तविक आहे. महानगरीय तरुणांना मार्गदर्शनासाठी लिहलेली.
3 Dec 2024 - 8:10 pm | Bhakti
ओएमजी ;)
परवलीचे वाक्य,किस्सा वाचून हसून हसून वाट लागली.
म्हणूनच रात्रीला 'खिचडी' हे भारतीय समीकरण इतकी वर्षे हीट आहे तर ...हा हा!
4 Dec 2024 - 1:50 pm | यश राज
काय काय परवलीचे शब्द असायचे.
5 Dec 2024 - 10:53 am | वामन देशमुख
हायला!
कुणी सकाळी साबणांघोळ करतं, कुणी रात्री खिचडी लावतं तर कुणी अजून काय काय करतं!
चला मिपाखरांनो, आपापले परवलीचे शब्द सांगा पाहू.
सर्वोत्तम मिपाखराचा काय सत्कार करायचा ते विवेकपटाईत साहेब सांगतीलच.
5 Dec 2024 - 7:58 pm | नठ्यारा
हा परवलीचा संभाव्य वाक्प्रचार होऊ शकेल का ? :- खुंटा हलवून बळकट करणे.
जाणकारांची भाष्ये अभिप्रेत.
-नाठाळ नठ्या
6 Dec 2024 - 7:21 am | गवि
ई ई.. काय हो हे?
6 Dec 2024 - 11:48 am | टर्मीनेटर
"खुंटा हलवून बळकट करणे" वरून स्व. दादा कोंडकेंच्या 'पांडू हवालदार' चित्रपटाच्या सुरुवातीचे अॅनिमेशन आठवले....
'दार हलवा पांडू', 'पार हलवा दांडू' असे अक्षरांचे क्रम बदलत केलेल्या शब्दरचनेतून विनोद निर्मिती करत पुढे ती योग्य क्रमात लावत चित्रपटाचे 'पांडू हवालदार' हे शीर्षक दाखवणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नक्कीच नाही! त्यांच्याबद्दल कोणाची काहीही मते असतील पण दादांसारखा प्रचंड बुद्धिमान माणूसच ते करू शकतो ह्याविषयी मला तरी 'शेण खा' आपलं 'शंका' नाही 😀
6 Dec 2024 - 6:11 pm | रामचंद्र
अनिता पाध्यांच्या पुस्तकात वर्णन केलेला मोरोपंतांच्या आर्येच्या दादांनी केलेल्या फोडीचा किस्साही असाच अफलातून आहे!
6 Dec 2024 - 7:43 pm | चौथा कोनाडा
इथे बरीच चरचा आहे _ https://www.misalpav.com/node/21614 _पण ती आर्या नाहीच सापडली.
मिपाकरांनो कुणीतरी या पामर मिपाकराचे अज्ञ्यान दुर करा हो
9 Dec 2024 - 1:30 pm | गवि
त्या चर्चेतच आर्येचे शब्द आहेत. ते सर्च केले की पूर्ण मिळेलच.
काही नाही. खोकल्यावरचे घरगुती उपाय आहेत.
9 Dec 2024 - 2:33 pm | टर्मीनेटर
ओहो... असे आहे होय...
चौ कोंनी धाग्याची लिंक दिली होती पण त्यावर त्यांना आर्या सापडली नसल्याचे म्हंटले होते म्हणुन मी तो धागा उघडण्याचे कष्ट घेतले नव्हते. पण आत्ता उघडून पाहिला आणि त्यात 'वल्ली' अर्थात प्रचेतेस ह्यांची कॉमेंट वाचल्यावर उलगडा झाला... आणि पूर्वी ऐकली असली तरी शोधकार्यात नव्याने सापडलेली ती आर्या खाली देतो आहे. पण त्याची अशी फोड स्व. दादा कोंडकेंनी केली होती हे मलातरी नव्यानेच समजले... प्रचंड आवडत्या दादां विषयीचा अभ्यास वाढवावा लागेल!
9 Dec 2024 - 2:48 pm | गवि
१. ही खरोखर आर्या आहे?
२. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे?
३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?)
या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि)
ही कविता / रचना ऐकली आहे पूर्वी पण. तरीही त्याच्या अस्सलपणाबद्दल काहीही माहीत नाही. वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.
9 Dec 2024 - 5:54 pm | टर्मीनेटर
काव्य ह्या साहित्य प्रकाराशी कधी नाळ जुळलीच नसल्याने ह्यबद्दल खरंच काही माहिती नाही... आर्या १ आणि आर्या २ हे अल्लु अर्जुनचे दोन चित्रपट आणि ह्या धाग्यावरच्या प्रतिसादांत आलेला तो शब्द सोडल्यास 'आर्या' ह्या नाम/संज्ञेशी माझातरी आजतागायत कधी संबंध आलेला नाही 😀
(बाकी 'आर्या १' पासुन अल्लु अर्जुन वर जडलेली माया 'पुष्पा २ द रुल' पर्यंत तरी टिकुन आहे आणि आगामी 'पुष्पा ३ द रँपेज' पर्यंत ती कायम असेल हे नक्की.)
आता हे मोरोपंत कोण असा प्रश्न विचारावासा वाटतोय पण उगाच आपले अज्ञान कशाला प्रकट करायचे ह्या विचाराने तो प्रश्न विचारणे टाळतोय. इथे कोणी सांगीतले की "ही आर्या मोरोपंतांनी लिहिली नसुन आमरेंद्र बाहुबलींनी लिहिली आहे" तरी मी त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवीन. ह्यावरुन माझ्या काव्य/पद्याबद्दलच्या अज्ञानाची कल्पना येऊ शकेल 😂
हे राम!
+१०००
मी त्या बाबतीत अगदीच अनाडी आहे! पण दादांबद्दलचा अभ्यास वाढवावा लागणार आहे हे ह्या निमित्ताने मला समजले आहे आणि ह्या महान कलवंताच्या येत्या जयंती/पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांचावर एखादा लेख लिहावा असेही वाटु लागले आहे!
9 Dec 2024 - 12:39 pm | टर्मीनेटर
दादांचे बरेच धमाल किस्से ऐकले आहेत, वाचले आहेत... पण ह्या आर्येचा किस्सा काही आठवत नाहीये, वर चौ को म्हणाले आहेत त्याप्रमाणे काही क्लू दिलात तर तो किस्सा आठवायला मदत होईल!
6 Dec 2024 - 11:42 am | टर्मीनेटर
परवलीच्या शब्दावरून "वॉशिंग मशीन चालू आहे का? की आज पण हातानेच कपडे धुवावे लागतील" वाला जुना चावट विनोद आठवला 😀
6 Dec 2024 - 12:01 pm | वामन देशमुख
काय हे मिपाखरांनो! खुंटा काय, वॉशिंग मशीन काय, सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का?
काहीतरी कामाचं शिका; चला सैपाक करायला शिका पाहू. घ्या पहिला धडा - कणिक चांगली तिंबली की मग पदर चांगले सुटतात.
- (शिकाऊ मिपाखरु) द्येस्मुक् राव्
6 Dec 2024 - 1:11 pm | चौथा कोनाडा
चावट अन सुचक विधान.
6 Dec 2024 - 1:49 pm | यश राज
वाशिंग मशिन बद्दल ऐकले आहे पण कणकेबद्दल पहिल्यांदा ऐकले.
6 Dec 2024 - 1:57 pm | टर्मीनेटर
आमच्या सारख्या साध्या, सरळमार्गी, सज्जनांनी निरागसपणे काही लिहिले की लगेच त्यात काहितरी चुकीचा/चावट अर्थ शोधुन प्रस्थापितांकडुन टवाळी केली जाते ह्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो... 😀
"मसल मसल के कडक किया... थुक लगाके डाल दिया... बोलो क्या?"
असे एक हिंदी भाषेत कोडे आहे... परंतु त्यातही काहितरी चावटपणा शोधण्याचा प्रयत्न इथले काही 'शैतानी दिमाग' वाले लोक करणार ह्याची खात्री असल्याने मी त्याचे उत्तर पण सांगुन टाकतो..
ह्या कोड्याचे साधे, सरळ, निष्पाप उत्तर 'सुई में धागा डालना' असे आहे 😂
5 Dec 2024 - 8:10 pm | कंजूस
मुंबईत व्यापारानिमित्त येऊन जागा पक्की केलेल्या समाजात व्यवसायाची जागा मुख्य आणि राहण्याची गौण धरली. त्यांच्याकडे रीतसर टाईमटेबलच असते - कुणी आंघोळ कधी करायची, कुणी देवदर्शनाला जायचं, कुणी कधी तीर्थयात्रा पर्यटनाला जायचे.
6 Dec 2024 - 11:30 am | चौथा कोनाडा
आप्ल्या नावातच पटाईत आहे, त्यामुळं क्लूप्त्या काढण्यात तुम्ही पटाईत असणारच ! :)
ही " साबणाने आंघोळ केली " केली आयडिया लै आवडली.
लिहित रहा .. छान ओघवतं लिहिता, वाचायला मजा येते.
6 Dec 2024 - 8:30 pm | मुक्त विहारि
लग्ना नंतर १९९२ ते १९९८ , आम्ही दोघे राजाराणी असल्यानं "कोड वर्ड" वापरायची वेळ आली नाही.
आणि
१९९८ ते आजतागायत, "डोळ्यात वाच माझ्या..." हीच भूमिका दोघांचीही आहे.
7 Dec 2024 - 10:02 pm | कानडाऊ योगेशु
चावट काका!
मीनाक्षी सुंदरम ह्या चित्रपटात ह्यासाठी डॉक्टर डॉक्टर खेळ ही संज्ञा वापरली आहे असे पाहिल्याचे आठवते.
माझी झैरात.
8 Dec 2024 - 6:35 am | चित्रगुप्त
सुरुवतीला एवढे डीटेलवार रूटीन सांगण्याचे कारण शेवटी समजले. मस्त. दिवस गेले ... सॉरी... गेले ते दिवस.
विवेकपंत, या खुसखुषीत लेखाबद्दल आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट.
रसिक मिपाकरांसाठी हे साबण खरेदी करण्यासाठी दुवा:
https://www.etsy.com/in-en/listing/1157895761/penis-shaped-soap-penis-so...
8 Dec 2024 - 6:08 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
किती कवटाळून बसल्यात ...
.. आता म्हैनाभर आंगुळ नाय !
9 Dec 2024 - 11:43 am | टर्मीनेटर
साबण काय.... केक काय... कलाकार मंडळी विविध क्षेत्रात आपल्या 'कलाकारी'चे दर्शन घडवत आहेत... बघा आणि मजा घ्या 😀
बाकी पुर्वी बॅचलर पार्टीज पुरता मर्यादीत असलेला हा प्रकार मागे पवईच्या चर्च मध्ये एका व्यक्तीच्या ६१ व्या वाढदिवशी पाहिल्यावर उडालोच होतो 😂
त्यावर एक सविस्तर प्रतिसादही लिहिला होता इथल्या एका धाग्यवर...
9 Dec 2024 - 5:49 pm | चौथा कोनाडा
केक पण .... !
चिगुंनी दिलेल्या फोटोत मेणाची आलिंगने आहेत ..
इथं पण मेणबत्ती कामी आली म्हणायची .. हा .... हा .... हा .... !
(मुलींचे वगॄ, लाईट जाणे अन मेणबत्ती चा जुना ज्योक आठवला !
9 Dec 2024 - 6:48 pm | विवेकपटाईत
साबणाच्या जोडीचा सप्रेम स्वीकार करतो. बाकी अजून आमच्या सौ. हा लेख वाचलेला नाही. "यथार्थ" हॉस्पिटल ग्रेटर नोएडा सहा किमी दूर आहे.
8 Dec 2024 - 11:18 am | कर्नलतपस्वी
हा हा हा
9 Dec 2024 - 7:28 pm | वामन देशमुख
कठिण कठिण कठिण किती
पुरुष ह्रदय बाई
कठिण कठिण कठिण किती
हे गीत आठवले.
9 Dec 2024 - 9:00 pm | चित्रगुप्त
काही वर्षांपूर्वी पॅरिसात असलेले Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) बघितले होते. तिथे पुष्कळ फोटोही काढले होते. त्यावर सचित्र लेख लिहायचे राहून गेलेले आहे.
या लेखाच्या निमित्ताने जालावर धांडोळा घेता ते नोहेंबर २०१६ मधे बंद करण्यात आल्याचे समजले.
ते जुने फोटो हुडकून आता तो राहून गेलेला लेख लिहीला पाहिजे. त्यातली भारतियांच्या दृष्टीने स्फोटक अशी एक वस्तु म्हणजे गणपतीबाप्पाची रतिमुद्रेतली मूर्ती.
Museum of Eroticism (French: Musée de l'érotisme) was a sex museum in Paris devoted to the erotic art collections of antique dealer Alain Plumey and French teacher Jo Khalifa. It closed its doors on November 7, 2016.