प्रतिसाद देणार्या त्या कंपूस उद्देशून
(चाल:- प्रतिमा उरी धरोनी)
प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित रहावे
ते लेख निर्मितीचे
विचार करोनी लिहावे
उस्फुर्त भावनानी
स्वप्नात गुंग व्हावे
पुष्पात गंध जैसा
लेखात भाव तैसा
अद्वैत लिखणीचे
त्यां जीवनी असावे
तुम्ही सप्तरंग वाचनाचे
व्हावे अनेक मतांचे
विषय जीवनाचे
चर्चीत कुणी बसावे
का वाचकास वाटे
प्रतिसाद कुणा भावे
ते भावस्वप्न कुणाचे
बेकार कुणी करावे
प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित रहावे
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
14 May 2009 - 11:11 am | कपिल काळे
वा,व्वा !!
14 May 2009 - 11:14 am | जागु
तुम्ही सप्तरंग वाचनाचे
व्हावे अनेक मतांचे
छान.
14 May 2009 - 11:40 am | विसोबा खेचर
श्रीकृष्णा,
सुरेख रे..!
तुझा चाहता,
तात्या.