'माय ' (my)मराठी!
कालच 'टाइम्स'मधे वाचलं की आफ्टर ऑल मराठी लॅंग्वेज ला तो 'अभिजात का काहीतरी' लॅंग्वेजचा स्टेटस मिळाला.
थॅंक्स एवरीबडी .द गवर्मैट, ऍंड आल द कन्सर्नड.
आय एम व्हेरी हॅपी ऍंड एक्साइटेड.धिस इज वेरी प्राउड मुमेंट फॉर अस. काही झालं तरी इट इज अवर मदर टंग यू नो!
यू सी आता मराठी च प्रोग्रेस एकदम फास्ट होईल.बट फॉर दॅट, वी मराठी पिपलं शुड आल्सो कॉंट्रीब्यूट इन वन वे ऑर आदर. आता एवढं स्टेटस मिळाला आहे तर आपली पण ऍज मराठी स्पिकिंग पिपल म्हणून काही रिस्पॉन्सिबिलीटी आहेच नं!
मी तर इमिजीएटली सोसायटचे प्रेसिडेंटला सांगितले की आपल्या सोसायटीत मंथली एक दिवस 'मराठी लॅंग्वेज डे 'सेलेब्रेट केला पाहिजे .त्या दिवशी एक कल्चरल इवेंट ऑरगनाइज करता येइल. एखाद्या मराठी रायटर किंवा पोएट ला बोलवायचे .त्याचे स्पिच ठेवायचे .ऍन्ड दॅट वील बी फॉलोड बाय सॉंग्ज ऍंड डान्सेस कॉम्पिटीशन.
प्राइझेस ठेवायचे. म्हणजे एवरीबडी वील पार्टीसिपेट.त्यात काही मराठी सॉंग्ज पण ठेवायचे.आणि देन डिनर. सो एवरीबडी ,इनक्लुडींग नॉनमराठी पिपल कॅन एंजॉय.आणि दॅट टाइम वीइ कॅन प्राउडली टेल देम की बाबांनो, सी धीस इज स्टेटस ऑफ आवर लॅंग्वेज ऍंड यू शुड आल्सो लर्न एंड स्पिक मराठी .
नॉट धीस ओन्ली पण आय एम थिंकिंग टू रिझर्व्ह वीकली वन डे फॉर मराठी इन हाउस आल्सो.ऑन दॅट डे स्ट्रिक्टली मराठी .नो आदर लॅंग्वेज वील बी युज्ड फॉर कम्युनिकेशन.इव्हन डॉगी शी पण!
बट बिफोर दॅट सोसायटीच्या जवळपास मिसेस आणि मुलांसाठी 'मराठी स्पिकिंग कोचिंग क्लासेस' कुठे आहेत का सर्च करावे लागेल. कारण मराठी स्पिकिंग इज बीग प्रॉब्लेम फॉर देम. सो बिगीन फ्रॉम होम फर्स्ट. आणि टू बी व्हेरी फ्रंक मला पण रिफ्रेश करावेच लागेल.यु नो नाउ ए डेज आय एम आल्सो नॉट इन टच ऑफ मराठी नो!
बट लेट अस बिगीन.ऍंड आय एम शुअर वी वील सक्सीड. सो जय मराठी. थ्री चिअर्स! -नीलकंठ वसंतराव देशमुख
प्रतिक्रिया
7 Oct 2024 - 1:56 pm | वामन देशमुख
मराठी लँग्विज् सेव् करा !
10 Oct 2024 - 1:13 pm | नीलकंठ देशमुख
ऑफ कोर्स आमचे आटेम्पट चालू आहेत....
7 Oct 2024 - 4:39 pm | dadabhau
लेख आवडला...फँन्टॅस्टीक....आधी तर आय थॉट बॅग भरुन निकलायला सांगणारं संडे लोकसत्तातलं advertorial च रीड करतोय की काय?
10 Oct 2024 - 1:14 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद.मी कधी ते वाचलं नाही.आताआवर्जून वाचणार. माझी मराठी वोकॅब्युलरी ,इंप्रूव्ह होईल
10 Oct 2024 - 1:54 pm | कंजूस
लोक भिंती चालवत आहेत फेसबुकावर हां झुक्याच्या कृपेने.सपोर्ट करा.
11 Oct 2024 - 5:41 pm | नीलकंठ देशमुख
माऊलीचे वंशज..भिंती चालवणारी! थोबाडाला( पक्षी) फेस ला फेस येईपर्यंत..
10 Oct 2024 - 8:07 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
भेसळ तर होत राहणारच ,,, भाषेचा प्रवाहो तो !
अवस्था .... अशीच अवस्था आहे ... पण आपण हरायचं नाही ... ठासून अस्सल मराठी शब्द लिहायचे, बोलायचे !
लोकं पिझ्झा बर्गर भारी म्हटलं तरी आपण चटणी भाकरी, पुरणपोळी ऐटीत मिरवायची !
जय मराठी, अभिजात मराठी
अटकेपार झेंडे फडकवणारी मायबोली मराठी !
11 Oct 2024 - 5:45 pm | नीलकंठ देशमुख
प्रवाह आहे. ठीक.पण ,'असुनि खास मालक घरचा.',अशी मुंबई तल्या मराठी माणसासारखी मराठी शब्दांची व पर्यायाने भाषेची अवस्था झाली आहे..
11 Oct 2024 - 8:13 pm | चौथा कोनाडा
ते तर आहेच.. पण आपणा जास्तीत जास्त मराठीत संवाद साधायचा... मराठी बाणा सोडाययचा नाय
13 Oct 2024 - 11:05 am | मुक्त विहारि
ॲक्च्युअली तसेच बोलल्या जाते...
17 Oct 2024 - 4:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अभिजात म्हणजे ह्यापुढे बोलताना 'आ*ला, च्या *ला,मा * ला" म्हणायचे नाही असे कोणीतरी लिहिल्याचे आठवते.