पारनेर -४ (कोरठण खंडोबा)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
2 Oct 2024 - 9:01 pm

A
स्वयंभू खंडोबा म्हाळसा बानू सह तांदळा
1
सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार!
नगर -पुणे सीमारेषेवरचे कोरठण खंडोबा,दरवेळी चकवा देत होतं.
मंदिर गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच एक शिलालेख आहे.
पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक रचपूत यांनी अभ्यास करून या शिलालेखाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. त्यानुसार खंडोबाचे हे पुरातन देऊळ जावजी विश्वासरावांचा मुलगा कुमाजीराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२, १० फेब्रुवारी १५७१ माघ पौर्णिमा प्रमोद संवस्तरे शुक्रवार मघा नक्षत्र व शोभल योग असताना हे बांधले.

श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेशदाराजवळ कोरलेला हा लेख अनेक वर्ष झाकला गेला होता. १९९४ मध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू असताना हा लेख उजेडात आला. अनेक वर्ष झाकला गेला असल्याने लेख चांगल्या स्थितीत असला तरी पहील्या पाच ओळी पूर्ण वाचता येत नाहीत. शेवटच्या चार ओळी मात्र व्यवस्थित वाचता येतात. संपूर्ण लेख नऊ ओळीचा व खोदीव अक्षरांचा आहे.

लेखाचा मुख्य उद्‌देश कुमाजीरावांनी शके १४९२ मधे हे मंदिर बांधल्याची माहीती देणे हा आहे.
क

या लेखाचे वाचन पुढील प्रमाणे ० म्हणजे काय लिहिलंय ते वाचता आले नाही.

१ श्री गणेशाय नमः ०००००००००० पा ह ००० मरन्नी सुत ००० मा सुत २० गौड नायक इति थि तो सदा संमुख भी की तिं ॥१॥ तस्या३ सा सुशीला ००० या ब्राह्मण पोळ ० स्य ना००० स्य निजाम पो वीरवास ० ४० दा ०० ता जना के ना दुर्जय किनीय०० चांदी ०००० बुची ० सीन ०० श्रीद्यानो १० या हि मु० सुमुस्तदीय सुरवात ००० के युगी क० मि ते प्रमेदिते माघे मासेसी तप ६ स्यां ०० दीने सीहगते शरीक ००० राज ००० ६ णा श्रीशके १४९२ प्रमोद स ७ वत्सरे माथ सुद्ध पौर्णमासी सुक्रवासरे मघा नक्षत्रे शोभन नाम योने ००० ८ र सुभदिने श्री जावजी विस्वासराव सुत कुमाजिराव खंडेरायाचे देए
९ तक केळे येणे सु०० श्री भवानि संकर सुप्रसनो भवतु ॥

जावजि विश्वासरावांचा मुलगा कुमाजिराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२ प्रमोद संवत्सर शुक्रवार या दिवशी मघा नक्षत्र व शोभन योग असताना हे मंदिर बांधले.
लेखातील कालोल्लेख सुस्पष्ट व सविस्तर असून सहाव्या व सातव्या ओळीत शक संवत्सर महिना तिची वार नक्षत्र योग या कमाने दिलेला आहे.
माघ शुद्ध १५ शके १४९२ १० फेब्रुवारी १५७१, प्रमोद संवत्सर, शुक्रवार (१), मघा नक्षत्र, शोभन योग लेखात शुक्रवार असा उल्लेख येतो पण पिल्लेजंभीप्रमाणे या दिवशी शनिवार होता.

ओळ क. ३ चे निजामाचा उल्लेख आहे. हा आलेख पहिल्या मुर्तजा निजामशहा या काळात अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता व पहिला मुर्तजा निजामशहा गादीवर होता.

(संदर्भ -कोरठण खंडोबा माहिती फलक)

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

Q
माझ्या कुळाचे आधीचे नाव 'पोळ' आहे (गाव पारनेर मधील जामगाव आहे )याचा या लेखात उल्लेख आहे.पण त्याच्या पुढील वाचता येत नसल्याने काय लिहिलंय ते नीट समजत नाही.

प्रचेतस's picture

3 Oct 2024 - 11:56 am | प्रचेतस

कोरठणचा खंडोबा कुलदैवत असल्याने तिथे खूपदा जाणं झालंय. जवळच दर्याबाईचं मंदिर आहे, तिथले लवणस्तंभ बघण्याजोगे आहेत. तर अणे घाटात गुळुंचवाडीचा शिलासेतू दरीत उतरून बघता येतो. जुनी लेणी/ मंदिरे, नैसर्गिक आश्चर्ये ह्यांनी हा परिसर संपन्न आहे.

वा मस्त... पहिल्यानदाच माहिती मिळाली हि... धन्यवाद

अवांतर :
पारनेर या गावावरून असंख्य आठवणी पुन्हा मनात साद घालतात..

Bhakti's picture

14 Oct 2024 - 1:34 pm | Bhakti

पारनेर या गावावरून असंख्य आठवणी पुन्हा मनात साद घालतात..

माहितेय ओ!

माझं पूर्वजांचे अस्तित्व इथं अनेक पिढ्यांपासुन होते.मला तर पारनेर म्हटलं की रोमांचकारी वाटतं.