कृष्णाच्या गोष्टी-९

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
18 Aug 2024 - 11:17 pm

***धर्मराज्य हरपले
युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली. महाभारताच्या सभापर्वातील वेदव्यासांचे ते उद्गार काळाची पावले ओळखणारे आहेत.

त्वामेकं कारणं कृत्वा कालेन भरतर्षभ। समेतं पार्थिवं क्षत्रं क्षयं यास्यति भारत। ९२॥ स्वस्ति तेऽस्तु गमिष्यामि कैलासं पर्वतं प्रति।अप्रमत्तः स्थितो दान्तः पृथिवीं परिपालय ।१३।।
(महाभारत, सभापर्व ४६)
'विकारवश न होता अत्यंत सावधपणाने राज्याचे संरक्षण कर'
व्यासांचा आणि कृष्णाचा इशारा ध्यानी घेऊन तेरा वर्षे पर्यंत संकट टाळण्यासाठी युधिष्ठिराने आपल्या वागण्याची ठरविलेली पद्धत, बंधूंना अगर कुणा राजालाहि कठोर न बोलण्याचा केलेला निश्चय, सर्वांच्या अनुमतीने कुठलेहि कार्य करण्याची केलेली प्रतिज्ञा, आणि सर्वांशी कसोशीने चांगले वागण्याचा आणि बोलण्याचा केलेला निश्चय, त्याला आणि त्याच्या बंधूंना येणाऱ्या महासंकटापासून वाचवू शकला नाही. राजाने अधर्मसंयुक्त आणि अनर्थसंयुक्त व्यवहार टाळलेच पाहिजेत. ही गोष्ट राजा असूनहि पुढल्या काही वर्षांत तो विसरला. आणि द्यूताचा तो अनर्थ घडला.

***द्युत
A
राजसूय यज्ञानंतर सर्व राजेरजवाडे ऋषीमुनी आपापल्या स्थानी परतले तरी दुर्योधन हस्तिनापुराला त्वरित परतला नाही. युधिष्ठिराच्या वैभवाने त्याला दिपवले होते. मयसभेत फिरताना झालेल्या त्याच्या फजितीला द्रौपदी हसल्यामुळे त्याचे विलक्षण द्वेषात रूपांतर झाले होते. त्या द्वेषाग्नीने जळत, चडफडत तो हस्तिनापुरी परतला. मार्ग शकुनीने त्याला सुचविला म्हणाला युद्धाशिवाय वैभव मिळविल्याना एकच मार्ग आहे. दुर्योधना तो म्हणजे छूट, फाशांचा खेळ। सम्राट युधिष्ठीराला द्युत आवडते, पण त्यातले बारकावे समजत नाहीत. द्वंद्वाचे आव्हान द्युताचे अगर द्युताचे निमंत्रण क्षत्रियाला नाकारता येत नाही. युवराजाने, राजा धृतराष्ट्राजवळ तो विषय काढला. तेव्हा सत्ता आणि वैभव यांचा लोभी असलेल्या धृतराष्ट्रानेहि त्या गोष्टीस मान्यता दिली.
" हस्तिनापुराच्या उपनगरात, द्युतासाठी एक खास सभागृह दुर्योधनाने बांधून घेतले. मयसभेशी तुलता येण्यासारखे ते नसले तरी त्याची बांधणी डोळ्यात भरण्यासारखी होती. या सभागृहाचे नाव 'जयंतसभा' ठेवण्यात आले. वागण्याच्या आपल्या नव्या धोरणाप्रमाणे कौरवांना दुखवायचे नाही म्हणून युधिष्ठिर आपल्या चारहि बंधूंसह, द्रौपदी व कुंतीसह हस्तिनापुरात हजर झाला जयंतसभागृहात राज्याच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत द्यूताला सुरवातहि झाली. युधिष्ठिर एकामागून एक डाव हरत होता. संपत्ती, हिरे, पाचू अलंकार, सोने, राज्य एकामागून एक डावांवर लावून, तो ही सारी संपत्ती हरला. कौरवांच्या गोटांत जल्लोष चालला होता. राजा धृतराष्ट्रहि त्यात सामील झाला होता, तो अंध राजा 'काय झाले? 'काय हरले? असे पुन्हा पुन्हा विदुराला विचारीत होता. विदुर, राजाला हा अनर्थ थांबविण्याची विनंती करीत होता. पण धृतराष्ट्राला जणू विदुराचे म्हणणे ऐकूच येत नव्हते. आपली सारी, भौतिक संपत्ती आणि राज्य हरल्यानंतर द्यूताची धुंदी चढलेल्या युधिष्ठिराने एकामागून एक आपले बंधू डावावर लावले आणि ते डावहि तो हरला. अखेर शेवटी स्वतःला डावावर लावूनहि युधिष्ठिर हरला आणि महापराक्रमी बलदंड पांडव दुर्योधनाचे दास झाले. मजा म्हणून सुरू झालेल्या डावातून महाभयंकर अनर्थ उभा राहिला.. शकुनीने धर्मराजाला साम्राज्ञी द्रौपदीची आठवण देऊन तिला डावावर लावायचे सुचविले, आणि भीमसेनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. खेळाची धुंदी चढलेल्या युधिष्ठिराने द्रोपदीला डावावर लावले आणि तो डावहि तो हरला. भारताची सम्राज्ञी कौरवांची दासी झाली!
A

***द्रौपदी वस्त्रहरण
साऱ्या सभेलाच तो जबरदस्त धक्का होता. त्याने सारी सभा दिङ्मूढ झाली. दुर्योधनाने उद्दामपणे विदुराला, द्रौपदीला सभागृहात आणण्याची आज्ञा केली. 'हे करणे उचित नव्हे. सम्म्राज्ञी दासी झालेली नाही. कारण युधिष्ठिर दास झाल्यानंतर त्याने तिला डावावर लावले आहे.', असे सांगण्याचा निष्फळ प्रयत्न विदुराने चालविला. पण त्याकडे दुर्लक्ष करून दुर्योधनाने द्रौपदीला सभेत आणण्यासाठी प्रतिहारीला पिटाळले. पण तो लगेच परत आला. द्रौपदीने त्याला, सम्राटाने स्वतःला आधी डावावर लावले की सम्राज्ञीला? असा प्रश्न विचारला होता. दुर्योधन भयंकर संतापला. म्हणाला, 'जा तिला म्हणावे इथे येऊन काय तो प्रश्न विचार ? पण प्रतिहारी जागचा हलेना, तो थरथर कापत उभा रहिला. तेव्हा दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीच्या महाली जाऊन ती जशी असेल तशी तिला फरफटत सभागृहात आणण्याची आज्ञा केली.
S
आपण एकवस्त्र आहोत, रजस्वला आहोत, अशा स्थितीत सभागृहात येणे उचित नाही असे दुःशासनाला सांगण्याचा तिने प्रयत्न केला. पण तो नृशंस ऐकेना. द्रौपदीने त्याच्या हातून सुटून गांधारीच्या महाली जाण्याचा प्रयत्न केला. पण त्या उद्दाम माणसाने तिचे लांबसडक केस पकडले. आणि तिला खेचीत फरफटत तो सभागृहात घेऊन आला. द्रौपदी रडत होती. संतापली होती.
पण सभागृहात येताच सारी सभा तटस्थपणे, दुःशासनाने चालविलेली आपली विटंबना पहात स्तब्ध असलेली पाहून संतापाने तिचे अश्रू आटले. क्रोधभरल्या धरधरत्या आवाजात तिने सभागृहाला प्रश्न केला, 'खरेच मी दासी झाले आहे का? सभेतील कुरुवृद्धांच्या माना खाली गेल्या. पितामह भीष्मांनीहि तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची टाळले. त्यांचे उत्तर धर्माधर्माची व्यर्थ चिकित्सा करणारे होते. 'युधिष्ठिराला त्याच्या मनाविरुद्ध कपटपटू शकूनीबरोबर दूत खेळायला लावण्यात व्याय होता का? जिथे युधिष्ठिर जिंकण्याची कधीच शक्यता नव्हती तो कपटी खेळ सभागृहातील कुरुवृद्धांनी थांबवायला नको होता का?, जे उचित बोलत नाहीत ते वृद्धच नव्हेत, ज्यात सत्याचा अंश नाही ते उचित नव्हे, आणि जे अविचाराला प्रवृत्त करते ते सत्य नव्हें.सारी सभा किंकर्तव्यमूढ झाली होती.
एकट्या विकणनि द्रौपदीची बाजू घेतली, 'ती दासी झालेली नाही, असे ठणकावून सांगितले. पण सभेत सारी वडीलधारी आणि वयस्क मंडळी हजर असताना आपले शहाणपण पाजळणाऱ्या विकर्णाची राधेयाने चेष्टा केली. आपल्याहून वडील माणसांपुढे बोलू नये हे सुद्धा त्याला कळत नाही असे तो म्हणाला. त्याच्या मते एका ऐवजी पाच नवऱ्यांना वरणारी द्रौपदी एक निर्लज्ज स्त्री होती. दास झाल्यानंतर पांडवांना, अगर तिला अंगावर राजवस्त्र ठेवण्याचा हक्कच नव्हता. राधेयाने दुःशासनाला पांडवांची राजवस्त्रे काढून घेऊन ती दुर्योधनाच्या स्वाधीन करण्याची सूचना केली. अधिक विटंबना नको म्हणून पांचहि पांडवांनी आपली राजंवस्त्रे काढून ठेवली. आणि उघड्या अंगाने ते सभेत बसले!
द्रौपदी रजस्वला होती. एकवस्त्रा होती. दुःशासन तिचे वस्त्र फेडू निघाला. आपल्या राणीची अब्रू वाचवायला ते असहाय्य होतेः या विवित्र परिस्थितीतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने कृष्णाचा धावा सुरू केला.
आकृष्यमाणे वसने द्रौपद्याश्चिन्तितो हरिः। गोविंद द्वारकावासिन् कृष्ण गोपीजनप्रिय ।।४१ कौरवैः परिभूतां मां किं न जानासि केशव। हे नाथ हे रमानाथ व्रजनाधार्तिनाशन। कौरवार्णवमग्नां मामुद्धरस्व जनार्दन ।।४२ कृष्ण कृष्ण महायोगिन् विश्वात्मन् विश्वभावन। प्रपन्नां पाहि गोविन्द कुरुमध्येऽ वसीदतीम् ।।४३ (म. भा. स. प. अ. ६८)
आणि अहो आश्चर्यम्। दुःशासनाने तिच्या वस्त्राला हात घातला, ते फेडूत बाजूला टाकले, तर बारा वेगळ्या रंगाचे दुकूल तयार। दुःशासन द्रौपदीची वस्त्रे एकामागून एक फेडीत होता. आणि द्रौपदीच्या जणू शरीरातून नवनवी विविधरंगी वस्त्रे तयार होत होती. दुःशासन रागारागाने नवनवीन वस्त्रे खेचीत होता. त्याच्या पलीकडे वरांचा ढीग पडला, तरी द्रौपदीला विवस्त्र करणे त्याला शक्य झाले नाही. दमून तिच्या वस्वहरणाचा प्रयत्न सोडून दिला आणि तो आपल्या आसनावर बसला.
R
संतापलेल्या भीमाने चढ्या स्वरात द्रौपदीच्या अपमानाची भरपाई करण्यासाठी युद्धात दुःशासनाची छाती फोडून त्याचे रक्त पिण्याची प्रतिज्ञा केली. दुःशासन हसला. राधेयाने त्याला द्रौपदीला दासीवशात पाठवण्याची सूचना केली. त्यावर दुर्योधन पुढे म्हणाला, 'बघ, तुझ्या नवऱ्यांनाहि तू दासी झालेली नाहीस असे वाटत नाही. आता तू राधेय म्हणाला त्याप्रमाणे आम्हा कुणालाही पसंत करून त्याच्या बरोबर राहायचे ठरव.' आणि भीमाला चिडवण्यासाठी त्याने आपली डावी मांडी उघडी करून द्रौपदीला दाखविली. 'हीच तुझी डावी मांडी माझ्या गदेने फोडून युद्धात मी तिचे चूर्ण करीन.' अशी भीमाची महाभयंकर दुसरी प्रतिज्ञा सभेने ऐकली.
पाठोपाठ राधेयाचा युद्धात वध करण्याची अर्जुनाची प्रतिज्ञा, गांधाररान शकुनीला ठार मारण्याची सहदेवाची प्रतिज्ञा, शकुनी-पुत्र उलूकाला मारण्याची नकुलाची प्रतिज्ञा सभेत ऐकू आली आणि आंधळा धृतराष्ट्र अस्वस्थ झाला. द्रौपदीला सहानुभूती दाखवीत त्याने तिची स्तुती केली. आणि आपल्या पुत्रांती केलेल्या तिच्या अवमानामुळे आपल्याला अतीव दुःख झाल्याचेहि त्याने तिला सांगितले.
आणि 'हवा तो वर मागून में असे सुबविले. द्रौपदीने धृतराष्ट्राजवळ बुधिष्ठिराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला. राजा, आणखी एक वर माग असे म्हणाला, तेव्हा तिने इतर चारही पांडवांची मुक्तता करून घेतली. अन्यायाचे परिमार्जन करावे म्हणून 'आणखी एक वर मार्ग असे जेव्हा तो द्रौपदीला म्हणाला, तेव्हा तिने तिसरा वर मागणे धर्म्य नाही आणि माझे पती स्वतंत्र झाल्यानंतर जरूर तर पृथ्वीचे साम्राज्यहि ते स्वपराक्रमाने उभे करतील,असे ती त्याला म्हणाली. धृतराष्ट्राच्या या अचानक उद्भवलेल्या औदार्यामुळे दुर्योधन, दुःशासन,राधेय व शकुनी गोंधळून गेले. तरी सुद्धा राधेयाने पांडवांना 'बायकोच्या पुण्याईने बाचगारे भाग्यवान् आहात' असा टोला मारायला कमी केले नाही.

***पुनर्द्युत
1
युधिष्ठिराने चुलत्याची आज्ञा मिळताच बंधूसह आणि द्रौपदीसह त्वरित इंद्रप्रस्थी परतण्याचा निर्णय घेऊन हस्तिनापूर सोडले. पण दुर्योधनाने, राजा धृतराष्ट्राचे मन परत बळवून पुनर्द्युतसाठी युधिष्ठिरप्रमुख पांडवांना हस्तिनापुरी परत पाचारिले. 'युधिष्ठिराने, शकुनी बरोबर द्युताचा एकच निर्णायक डाव खेळावा' अशी त्याला विनंती करण्यात आली. या डावात जो हरेल त्याने, बारा बर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारावा. अज्ञातवासाच्या वर्षात जेत्याने जिताला शोधून काढल्यास, त्याने पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा, आणि या अवधीत नेत्याने सम्राटपद भोगावे अशी बोली ठरली.
दुर्योधनाच्या वतीने या वेळीहि गांधारराज शकुनीने फासे टाकले, डाव जिंकला. त्यामुळे दुर्योधनाच्या पदरी साम्राज्य अलगद पडले. आणि पांडवांच्या नशिबी बारा वर्षांचा दुर्दैवी वनवास आला.

***शाल्व वध
पांडवांवर आणि त्यांच्या साम्राज्यावर हा उत्पात कोसळत असताना कृष्ण कुठे होता? आपल्या द्वारकेवर कोसळलेल्या शाल्व नामक एका पर्यकर संकटाशी झुंजण्यात तो गुंतला होता. शाल्व कृष्णद्वेष्टा होता. शिशुपालाचा आणि जरासंधाचा मित्र होता.. त्यासाठी त्याने घोर तपस्या करून शंकराला संतुष्ट केले. आणि त्याच्या कडून 'सौभ' नावाचे एक खास वाहन मिळविले. हे वाहन खूप मोठे होते. त्यात अनेक प्रकारची शस्त्रात्रे ठेवता येत. हे वाहन शस्त्रास्त्रासह हवेत उडू शकत असे आणि जमिनीप्रमाणे पाण्यावरूनहि चालू शकत असे.

इंद्रप्रस्थाहून परतल्यावर काही महत्त्वाच्या कामासाठी रामकृष्ण आनर्त देशाला गेले असता, शाल्वाने द्वारकेला वेढा घातला. आनर्तामध्ये रामकृष्णांना जेव्हा द्वारकेवरील हल्ल्याची बातमी समजली तेवहा ते त्वरित द्वारकेला यायला निघाले. पण तो पर्यंत शाल्व माघारी गेला होता. शाल्वाचा उद्दामपणा पाहून कृष्णाला खूप राग आला. त्याने त्वरित यादव सैन्य सुसंघटित करून शाल्वाच्या मर्तिकावत नावाच्या राजधानीवर जोरदार हल्ला चढविला. कृष्णसैन्याला तोंड देणे शाल्वाला कठीण झाले. त्याने सौभात बसून समुद्राकडे पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णाने त्याचा पाठलाग करून सुदर्शनाच्या साहाय्याने त्याचे ते खास बाहन मोडून तोइत टाकले. समोरासमोरची लढाई न खेळता शाल्वाने मायावी युद्धाचा आश्रय घेतला. आणि कृष्णाला अनेक प्रकारे चकविण्याचा व फसविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी कृष्णाने एका तीक्ष्ण बाणाने शाल्याचे शिर घडावेगळे केले.
जाहीरपणे कृष्णाशी बैर करणाऱ्या कंस, जरासंध, पौंड्रक, शिशुपाल या माळेतील शेवटचा दुष्ट यमसदनाला गेला.सौभपती शाल्व आणि कृष्ण यांच्या युद्धाची कथा अलौकिक पद्धतीने सांगितलेली असली तरी त्यात ऐतिहासिकता आहे, यात शंका नाही. याचे कारण पांडवांच्या वनवासाची बातमी कळताच त्यांना भेटण्यासाठी कृष्ण काम्यक बनात गेला असता, आपण शाल्वाशी लढण्यात गुंतलेले नसतो आणि द्यूताची बातमी आपल्याला समजली असती तर आपण हे अन्याय्य द्यूत होऊच दिले नसते. असे कृष्ण म्हणतो.
इथे एक प्रश्न उभा राहातो की द्यूताची हकिकत कृष्णाला माहीतच नव्हती तर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तिने त्याचा घांवा केला असता कृष्णाने तिला वस्त्रे पुरवून तिची लाज राखली, या गोष्टीची संगती कशी लावावी? म्हणजे पुन्हा बंकिमचंद्रांच्या पद्धतीने, ती कथा अलौकिक, अनैसर्गिक म्हणून त्याज्य ठरवायची, तर सम्राज्ञीचे भर सभेत वस्त्रहरण करून तिला नग्न करू पहाणारा दुःशासन, का, कसा आणि केव्हा थांबला? हे कळणे कठीण होते. माणसाची सद्विवेकबुद्धी त्याला, त्याच्या नीतिमत्तेच्या कडेलोटाच्या क्षणीच अडवते. त्याच्यातील नृशंसपणावर मात करते हेच खरे!
धर्मराजाचे धर्मसाम्राज्य प्रस्थापित झाले होते. शाल्याच्या वधाने कृष्णाचा शेवटचा शत्रु संपला होता. पण द्युतामुळे कृष्णाची सफलता क्षणजीवी ठरली.द्युत आणि पुनर्द्युत खेळण्याच्या बेड्या लहरीमुळे, कृष्णाने मोठ्या प्रयासाने घातलेली धर्मराज्याची घडी क्षणांत गडगडली.

***वनवासातील कृष्ण-पांडवांच्या भेटी
U
पांडवांच्या वनवासाची बातमी ऐकताच कृष्ण काम्यक वनात बलराम, बसुदेव, सात्यकी यांच्यासह त्यांना भेटायला गेला. त्या काळी निरनिराळ्या राज्यांच्या परिसीमेवर काही जंगले होती. ती कुणाच्याच राज्यांना जोडलेली नव्हती. बानप्रस्थात जंगलात जाऊन राहणारे क्षत्रिय, तपश्र्चया करणारे ब्राह्मण, धनगर, गोपाल, काही शिकारी, वनवासी जमाती या जंगलांचा वापर करीत .
कृष्ण पांडवांना भेटायला गेला त्या वेळी त्यांच्या समाचाराला द्रौपदीचा भाऊ घुष्टद्युम्न, चेदिराज धृष्टकेतू, कैकयराज दोघे बंधू अशी पांडवांच्या परिवारातील मंडळी तिथे जमली होती 'द्यूत एक अन्याय होता. आत्ताच यादव पांचालांनी आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी हस्तिनापुरावर बालून जाऊन कौरवांचा पराभव करावा. आणि पांडवांचे राज्य त्यांना पुन्हा मिळवून द्यावे.' असा प्रस्ताव आणि यादव सात्यकी यांनी मांडला असता
युधिष्ठिर म्हणाला, 'नाही मित्रांनो, मी चूक केली आहे. त्याचे प्रायश्चित वनवास भोगून मी केलेच पाहिजे. माझ्या बरोबर माझ्या भावांना आणि माझ्या पत्नीलाहि हे भोगावे लागणार आहे. याचे कारण त्यांची प्राक्तने माझ्याशी जोडलेली आहेत. आम्ही सोसले पाहिजे ही दैवगती आहे आणि ती अटळ आहे.'
. सात्यकीने असेहि सुचविले होते की कौरवांचा पराभव केल्यानंतर पांडवांच्या राज्यावर तात्पुरती योजना म्हणून अर्जुनपुत्र अभिमन्यूला बसवावे. युधिष्ठिराने बंधूसह सत्यधर्माचे परिपालन म्हणून, आपला वनवास संपवून परत आल्यावर पुन्हा राज्यपद ग्रहण करावे. (वनपर्व अ. १२०, श्लोक २३, २४) त्यावर कृष्ण म्हणाला, 'तुझे म्हणणे खरे आहे. सात्यकी, मी ते प्रत्यक्षात आणलेहि असते. पण हा युधिष्ठिर स्वतःच्या बाहुबलाच्या भरवंशावर जी भूमी जिंकलेली नाही तिचा स्वीकार कधीहि करणार नाही. दुसऱ्याच्या भरवशावर तो कधीही राज्य करणार नाही. त्यामुळे 'स्थितस्य गतिः चिंतनीया' या न्यायाने धर्मराज्याची घडी पुन्हा बसविण्यासाठी पांडवांचा वनवास संपेपर्यंत वाट पहाणे आवश्यक आहे.' कृष्णाने सर्वांनाच ते पटवून दिले.
कृष्ण युधिष्ठिराला एवढेच म्हणाला, 'युधिष्ठिरा, नियतीने माझे आयुष्य तुझ्या बरोबर बांधले आहे. त्यामुळे तुझे शत्रू ते माझे शत्रू. मी त्यांचा पुरा नाश करीन. तात्काळ ही गोष्ट करायला नको असेल तर तुमचा वनवास संपल्यानंतर ते करता येईल. त्या सर्वांचा नाश अटळ आहे आणि हा फक्त कालगतीचा प्रश्न आहे.'
I
कृष्ण आणि धृष्टद्युम्न द्रौपदीच्या सांत्वनास गेले तेव्हा राधेय, दुर्योधन, दुःशासन यांनी केलेला आपला अवमान आठवून द्रौपदीच्या अश्रूचा बांघ फुटला. रडत, हुंदके देत ती कृष्णाला म्हणाली,
'कृष्णा बलंदंड पांडवांच्या या राणीकडे पहा. अग्निजांत धृष्टद्युम्नाच्या आणि यादववीर कृष्णाच्या बहिणीला केसांना धरून फरफटत त्या दुष्टाने भर सभेत नेले. कुरू वृद्ध भीष्म आणि धृतराष्ट्र हजर असलेल्या त्या सभेत ते पशू तिला दासी म्हणाले. माझ्या पाची पराक्रमी पर्तीच्या देखत त्या दुष्ट दुःशासनाने माझे वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला. यापेक्षा काही भयंकर असू शकते काय? ते कसे घडले ते मला कळले नाही.

पण कृष्णा, माझ्या पतींनी पत्नीची सोडवूणक करण्यासाठी ते केले नाही. ते माणसे नाहीत,ते पुरूष नाहीत,त्यांच्या पाच मुलांची मी आई आहे पण मला पुत्र नाहीत. मला पतीहि नाहीत. मला भाऊहि नाहीत. आणि जगात माझे कुण्णी कुण्णी नाही!'

कृष्णाने तिच्या पाठीवर हात फिरवीत तिचे सांत्वन केले. म्हणाला 'रडू नकोस द्रौपदी. थोडी थांब. तुझे अश्रू फुकट जाणार नाहीत. कौरवांच्या बायकांना तुझ्याहूनहि अधिक घाय मोकलून रडावे लागेल. मी प्रतिज्ञा करतो. की मी साऱ्या कौरवांचा नाश घडवून आणीन.' म्हणाला, 'धर्मशास्त्राच्या एका नियमाप्रमाणे एक दिवस म्हणजे एक वर्ष. तुम्ही आता तेरा दिवस वनवासात काढले आहेतच, तेव्हा वचनभंग न करताहि तुम्हाला आता कौरवांवर हल्ला करता येईल. जो अन्याय आहे, त्याच्याशी मुकाबला करताना असा युक्तिवाद मांडून त्याचे परिमार्जन करायला हरकत नाही.'
कृष्णाच्या या युक्तिवादावर युधिष्ठिर फक्त विषण्णपणे हसला. काहीच बोलला नाही. कृष्णहि हंसला म्हणाला, 'तुला पटत नाही असे दिसते? ठीक आहे आम्ही सारे तुमचा वनवास संपण्याची वाट पाहू.' असे म्हणून यादवांनी आणि पांचालांनी पांडवांचा निरोप घेतला.
P
वनवासाच्या काळात कृष्ण पांडवांना तीन वेळा भेटला. पहिल्या भेटीचे वर्णन वर आलेच आहे. दुसऱ्या भेटीत सात्यकीने केलेल्या सूचनेचाहि उल्लेख वर आला आहे. तिसरी भेट दुर्वास-भोजनाची आणि सूर्य-थाळीची. पांडवांसाठी भोजन तयार करणारी थाळी देणे, दुर्योधनाने वनांत राहणाऱ्या पांडवांची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी हजारो शिष्यांसह दुर्वासाने सायंकाळी पांडवांकडे जाऊन भोजन मागावे म्हणून त्याला उद्युक्त करणे, सूर्यास्तानंतर थाळी भोजन देत नसल्यामुळे द्रौपदीने कृष्णाचे स्मरण करणे, कृष्णाने तिथे हजर होऊन द्रौपदीजवळ काही खायला मागणे, तिने सूर्य-थाळीला चिकटलले एक पान त्याच्या हातावर ठेवणे, ते खाऊन कृष्णाने तृप्तीचा ढेकर देणे ,आणि मग त्यामुळे दुर्वांसांसुद्धा त्या सर्व शिष्यांची भूकच नाहीशी होणे, ही सगळी अलौकिक कथा अनैसर्गिक म्हणून त्याज्य मानायला हवी.
'सूर्यथाळी हा प्रकार आजकाल वैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या सौर शक्तीच्या साहाय्याने अन्न शिजविणाऱ्या थाळीचाच प्रकार होता का? हा संशोधनाचा विषय आहे. दैवी चमत्कार बाजूला ठेऊन द्रौपदीच्या सूर्यधाळीचे स्पष्टीकरण करायचे असेल तर ते अशाच प्रकारे केले पाहिजे असे प्रस्तुत लेखकाचे मत आहे.

***कृष्णजीवनातील शांततेचा काळ
पांडवांचा बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास, ही तेरा वर्षे पार पाडली. त्याच्या जाहीर शत्रूचे पारिपत्य त्याने केले होते किंवा इतरांकडून करविले होते. त्यामुळे द्वारकेला सुबत्तेचा आणि शांततेचा काळ उपभोगता आला. कृष्णाने आता आपल्या आयुष्याची सत्तरी गांठली होती. त्यामुळे हा शांततेचा काळ वानप्रस्थी जीवन जगण्यात त्याने घालविला.
अनेक ज्ञानी ब्राह्मण, मुनी, यती, ऋषी यांना द्वारकेत पाचरण करून त्याने योग आणि तत्वज्ञान या संबंधीच्या चर्चा त्यांच्याशी केल्या. कर्म, अकर्म, ज्ञान, तपश्चर्या असे विविध विषय यातून चर्चिले गेले. घोर अंगिरसासारख्या ज्ञानी ऋर्षीकडून त्याने उपनिषदांचे सार आत्मसात केले.
बालपणी उत्कृष्ट मल्लयुद्ध खेळणारा एक मल्ल म्हणून कृष्णाची ख्याती होती.
तरूणपणी एक ख्यातनाम धर्नुधर लढवय्या म्हणून आणि जाणकार राजकारणी, आणि धोरणी मुत्सद्दी म्हणून आपली प्रतिमा त्याने प्रस्थापित केली होती.
आयुष्याच्या उतरणीच्या या काळी एक मोठा तत्वज्ञ, नीतिज्ञ, धर्मज्ञ, योगी, योगयोगेश्वर कृष्ण म्हणून तो ओळखला जाऊ लागला.

***पांडवांचा वनवास
बारा वर्षांच्या काळात युधिष्ठिराने भेटायला येणाऱ्या ऋषिमुनींकडून खऱ्या धर्माचे स्वरूप शिकून घेतले. तर अर्जुनाने इंद्राकडून आणि शंकराकडून पाशुपतास्त्रासारख्या खास अस्त्रांची प्राप्ती करून घेतली. जंगलातील जीवनात देणाऱ्या अनंत अडचणीपासून सवचि संरक्षण करण्याचे काम भीमसेनाने घेतले .वनांत आलेल्या दुर्योधन, दुःशासन, राधेय, आणि शकुनी यांची चित्रसेन गंधर्वाहाती झालेली विटंबना, त्यांना सोसावी लागलेली कैद, भीमार्जुनाहाती युधिष्ठिराने चित्रसेनाच्या हातून त्यांची केलेली सुटका आणि ते करीत असताना 'वयं पंचाधिकं शतं म्हणून घेतलेली उदार भूमिका, यामुळे पांडव खिजवले जाण्याऐवजी त्यांच्या किर्तीत भरण पडली.
याच काळात पिता धृतराष्ट्र आणि जेष्ठ युधिष्ठिर जिवंत असता, राधेया हातून दिग्विजय करून युवराज असलेल्या दुर्योधनाने भ्रष्टपणे केलेला राजसूय यज्ञ आणि सिंधूपती जयद्रथाने द्रौपदीला पळवून नेण्याचा केलेला उद्दामपणा आणि नंतर भीमाहाती त्याची झालेली विटंबना या साऱ्या पांडवांच्या वनवासी जीवनातील महत्वाच्या घटना म्हणून उल्लेख करायला हवा.
याच काळात घडलेली आणखी एक घटना म्हणजे 'मृत्युडोह' राखणाऱ्या यक्षाकडून चार पांडवांचा मृत्यू, आणि यक्षप्रश्नांना युधिष्ठिराने उत्तरे दिल्यानंतर त्यांना निळालेले जीवदान. ही घटना तशी अलौकिक. तो यक्ष प्रत्यक्ष यमधर्म असणे हेहि विचित्र आणि अनैसर्गिक. भांडारकर इंन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीकृत महाभारताच्या प्रतीत 'यक्षप्रश्न' हा प्रसंग प्रक्षिप्त ठरविला आहे. प्रस्तुत लेखकही त्या मताशी सहमत असून हा भाग युधिष्ठिराच्या समर्थनाकरिता आला असावा असे त्याचे मत आहे.
D
अज्ञातवासाचे तेरावे वर्ष पांडवांनी मत्स्यनरेश विराट याच्या राजधानीत काढले. वेष बदलून विविध व्यावसायिक म्हणून ही मंडळी तिथे वावरत होती. युधिष्ठिर कंक म्हणून, भीमसेन 'बल्लव' नावाचा आचारी म्हणून, अर्जुन 'बृहन्नला' म्हणून, नकुल 'दमग्रंथी' नामक अश्वपरीक्षक आणि अश्वशिक्षक बनला तर 'तंतिपाल' या नावाने सहदेव पशुवैद्य म्हणून विराटाच्या गोशाळेत दाखल झाला. द्रौपदी 'सैरंध्री' या नावाने राणी सुदेष्णेची वेषभूषा आणि केशभूषा करणारी दासी बनली.
सैरंध्रवर, राज्यात सेनापतीच्या हुद्यावर असलेल्या कीचक नामक सुदेष्णेच्या भावाची नजर पडली. द्रौपदीच्या मागे तो लागल्याने भीमाला गुप्तपणे त्याला मारावे उन्मत्त कौरवांनी उत्तरेच्या बाजूने आणि दक्षिणेच्या बाह विराटाच्या गौळबाजातील गाई पळविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विराटन उत्तराचे सारस्थ करणाऱ्या बृहनलेने अज्ञातवासाचे वर्ष संपले आहे हे लक्षात येताच 'अर्जुन' म्हणून प्रकट होऊन, गाई पळविणाऱ्या कौरवांचा धुव्वा उडविला, विराटाच्या गाई सोडवून आणल्या.
त्याने पांडवांची माफी मागून वर्षभर बृहन्नलेच्या वेषात राजकन्या उत्तरेला नृत्य शिकविणऱ्या अर्जुनाला तिच्याशी विवाह करण्याची विनंती केली. पण अर्जुनाने मुलीसारख्या उत्तरेशी विवाह न करता, सून म्हणून तिचा स्वीकार करण्याचे मान्य केले. अर्जुनसान्निध्यात एक वर्ष काढलेल्या राजकन्येची सामाजिक प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने ते आवश्यक होते.

***उपप्लाव्य
राजधानी जवळच्या उपप्लाव्य नगरात सम्म्राट युधिष्ठिराची ' वनवासी राजधानी' प्रस्थापित करण्यात आली. विराटाने खरे तर सारे मत्स्यराज्यच युधिष्ठिराला देऊ केले होते. (मत्स्यदेश म्हणजे हल्लीचे भरतपूर, नाभा, अलवार हे प्रदेश) पण युधिष्ठिराने आपल्या पुढील हालचालीसाठी उपप्लाव्य नामक या एका नगराचाच स्वीकार केला. उत्तरा अभिमन्यूचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.
विवाह समारंभ उरकताच राजा द्रुपदाच्या पुढाकाराने जमलेल्या राजांची एक सभा आयोजिण्यात आली. पांडवांचा वनवास आणि अज्ञातवास संपला. पुढे काय? हा प्रश्न सभेपुढे विचारार्थ ठेवण्यात आला.
K
कृष्णाने द्यूत, अनुद्युत, द्रौपदी वस्त्रहरण, बारा वर्षे वनवास, अपमानित जिण्याचा एक वर्षाचा अज्ञातवास या साऱ्या घटनांचा आढावा घेऊन, कपट द्यूतानंतर पांडव त्वरित कौरवांचे पारिपत्य करू शकले असते, ही वस्तुस्थिती मांडून, केवळ धर्मनिष्ठेमुळे पांडवांनी हे सर्व अग्निदिव्य सोसले आहे असे सांगितले. आणि पांडवांनी आपले राज्य परत मागण्यासाठी, धृतराष्ट्राच्या दरबारात आपला कुणी वकील पाठवावा या राजा द्रुपदाच्या सूचनेला दुजोरा दिला. धृतराष्ट्राने अगर दुर्योधनाने अन्यायाने गिळंकृत केलेले युधिष्ठिरांचे राज्य सामोपचाराने परत करण्यास नकार दिल्यास युद्ध अरेल, असेही तो म्हणाला. (म. भा. ज. प.१५)
उद्योगपर्वाच्या पहिल्या अध्यायातील कृष्णाचे हे भाषणे खरेतर मुळातूनच वाचायला हवे. कृष्णाच्या यशस्वी आणि दैदीप्यमान मुत्सद्दीपणा राजकारणी महणून त्याचे श्रेष्ठत्व उद्योग पर्वातस दिसत असल्यामुळे 'भारते सारमुद्योगम् असे म्हटले जाते.
तेरा वर्षात कौरवांनी इतर राजांशी आपले संबंध दृढ केले असल्याने, विद्यमान बहुसंख्य राज्यसत्तांचे साहाय्य त्यांना मिळणार, तेरा वर्षे समाजाच्या दृष्टिपथातून दूर असलेल्या पांडवाना इतके सहाय्…दोष देण्यात अर्थ नाही. आपल्या नम्रपणे मधुर शब्दांनीच दुर्योधनाशी जे काय बोलणे करायचे असेल ते केले पाहिजे.' (म. भा. ३.५.अ.२-१९.१२) वनपर्वांतील आणि उद्योगपतील बलरामाच्या बोलण्यात केली विसंगती आहे?
ही विसंगती कुणी निर्माण केली? दुर्योधन, धृतराष्ट्र, भीष्म गांना एकेकाळी पापात्ये म्हणून संबोधणारा बलराम, पांडव-पक्षपाती म्हणून कृष्णाला दोष द्यायला तयार होतो, आणि आपल्या मनांत दुर्योधनाला साहाय्य करायचे आहे असे बोलूनही दाखवितो. फक्त बंधुप्रेमाने कौरव पांडवांत युद्ध उभे राहिले असता तटस्थ राहायचे ठरवून तीर्थयात्रेला निघून जातो. याचे मर्म तेरा वर्षाचा दीर्घ कालावधी हेच होय
सात्यकीने आणि द्रुपदने बलराम दादाच्या भाषणातील सुराला विरोध दर्शविला.
पण दुर्योधन युद्धाशिवाय पांडवांचे राज्य कधीहि परत करणार नाही ही आपली अटकळ व्यक्त करून राजा द्रुपदाने युद्धासाठी मदत मागण्यासाठी पांडवांनी आपले दूत विविध देशींच्या राजांकडे त्वरित पाठवावेत असा प्रस्ताव मांडला. कारण युद्धाकरता ज्याच्याकडून प्रथम निमंत्रण येईल त्याला युद्धात साहाय्यभूत होण्याचा रिवाज त्या काळी राजमंडळात होता. या बाबतीत आपण दुर्योधनावर मात केली पाहिजे असे द्रुपदाचे म्हणणे होते.
द्रुपदाचे भाषण आणि सूचना ऐकून कृष्ण म्हणाला 'पांडवांच्या हिताची सर्व जिम्मेदारी राजा द्रुपदाने उचलल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार खूपच हलका झाला आहे. हृपदासारख्या महारथ्याने पुढची सर्व पावले उचलावीत. आपण म्हणाल तेव्हा पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी यादव हजर होतील.'
आणि कृष्णाने बलरामासह द्वारकेकडे प्रयाण केले. ** *
संदर्भ -शोध कृष्णाचा प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक- प्रा डॉ राम बिवलकर

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

Bhakti's picture

18 Aug 2024 - 11:23 pm | Bhakti

है कथा संग्राम की
विश्व के कल्याण की
धर्म अधर्म आदि अनंत
सत्य असत्य कलेश कलंक
सार्थ की कथा परमार्थ की

शक्ति है भक्ति है
जन्मों की मुक्ति है
जीवन का ये सम्पूर्ण सार है
युग युग से कण कण में
सृष्टि के दर्पण में
वेदों की कथा आपार है

कर्मों की गाथा है
देवों की भाषा है
सदियों के इतिहास का प्रमाण है
कृष्णा की महिमा है
गीता की गरिमा है|
https://youtu.be/5YjPstrR2OI?si=pXbFzD4yI5nAy4v2
महाभारताचे हे गीत भारतीयांसाठी एक मैलाचा दगड आहे.
श्रीकृष्णार्पणमस्तु|

कर्नलतपस्वी's picture

19 Aug 2024 - 6:30 am | कर्नलतपस्वी

यांनी रश्मिरथ नावाचे महा काव्य लिहीले आहे. महाभारतातील कर्ण,दुर्योधन ही व्यक्तिचित्रे वास्तवाच्या जवळची वाटतात. पांण्डव, कृष्ण, भीष्म इ. अवास्तव, त्रैलोक्य जिंकण्याची ताकद असताना द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस षंढ सारखे बसून राहीले?
धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का?

किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले. आजच्या परिप्रेक्षात या सर्वाचेच वेगळे अर्थ निघतात.

रश्मिरथ मधील दोन प्रसंग ,

इंद्र कर्ण संवाद...

'हाँ, पड़ पुत्र-प्रेम में आया था छल ही करने को,
जान-बूझ कर कवच और कुण्डल तुझसे हरने को,
वह छल हुआ प्रसिद्ध किसे, क्या मुख अब दिखलाऊंगा,
आया था बन विप्र, चोर बनकर वापस जाऊँगा.

विश्वरूप दर्शन

अम्बर में कुन्तल-जाल देख,
पद के नीचे पाताल देख,
मुट्ठी में तीनों काल देख,
मेरा स्वरूप विकराल देख।
सब जन्म मुझी से पाते हैं,
फिर लौट मुझी में आते हैं।

लेखमाला छान चालू आहे.

धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का?

हाच तर मोठा प्रश्न अनादी काळापासून चालत विचारला आहे.

किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले.
आजचे राजकारणी काही वेगळे आहेत का? मला विचाराल तर फरक एवढाच आहे त्या काळी कमी अधर्मी होते आणि अधिक धर्माने चालणारे आता पूर्ण उलटे!अधर्मीच अधिक विलासी जगतात,धर्माने चालणारे पिचत राहतात.