एक युवक अन एक युवती
दोघांची एकदा भेट झाली
एकमेकांच्या तरूण सौंदर्याला भाळली
तिच्या नाजूकपणाची त्याला छाप पडली
त्याच्या धाडसीपणाला ती मोहरली
प्रेम समजून आकर्षणात गुंतली
संसाराच्या स्वप्नात रंगू लागली
विवाहाच्या पिंजर्यात अडकली
एक दोन वर्ष मौजमजेत गेली
तो बाबा अन ती आईही झाली
जबाबदार्यांची ओझी पडली
विचार्-मतामध्ये चिर पडू लागली
अवगुणांची आता छाप पडू लागली
कर्तव्याची उणीव भासू लागली
"माझेच खरे" ह्या शब्दाने उचल खाल्ली
एकमेकांची सोबत नकोशी झाली
घटस्पोटाची नोटीस दारात आली
त्याची तलवार बाळावर पडली
भितीची आसवे गालावर ओघळू लागली
माझे आई बाबा ही जाणिव त्यालाच राहीली
बाबा की आई आवडीची, निवड कोर्टाकडे गेली
आईची कुशी अन बाबांच्या खिश्याची निवड झाली
आई बाबांच्या प्रेमापासुन त्याची वाताहत झाली
आकर्षणाची जागा बाळाच्या कुपोषणाने घेतली.
प्रतिक्रिया
13 May 2009 - 3:06 pm | काजुकतली
हल्लीच्या झटपट प्रेमप्रकरणांचा हा साईड इफेक्ट आहे, जो निरागस जीवांना भोगावा लागतो.. छान लिहिले आहेस.
साधना
13 May 2009 - 3:20 pm | अमोल खरे
सहमत.
13 May 2009 - 8:16 pm | क्रान्ति
बाबा की आई आवडीची, निवड कोर्टाकडे गेली
आईची कुशी अन बाबांच्या खिश्याची निवड झाली
खरंच आहे!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
13 May 2009 - 8:43 pm | मदनबाण
सुंदर कविता...
जागुताई तुमची प्रत्येक कविता मी अगदी आवडीने वाचतो. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
13 May 2009 - 8:45 pm | मराठमोळा
वास्तववादी कविता. छान.
आईची कुशी अन बाबांच्या खिश्याची निवड झाली
ही ओळ एकदम विशेष. (आवडली म्हणता येत नाहिये.)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
13 May 2009 - 9:07 pm | प्राजु
गुड वन!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 May 2009 - 10:38 am | सायली पानसे
+१
13 May 2009 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता !
14 May 2009 - 10:35 am | जागु
काजुकतली, अमोल, क्रांती, मदनबाण, मराठमोळा, प्राजू, डॉ. दिलिप प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.