( )129210... अङ्कानां वामतो गति।।

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
12 Jul 2024 - 12:16 am

स्वगतः
१.मला मॉडर्न्स सायन्स/ मॅथेमॅटिक्स मधील संकल्पना आपल्या तत्वज्ञानाशी जोडायला फार आवडते. एस.क्यु.एल मध्ये इंडेक्सिंग हा प्रकार असतो प्रत्येक रो ला एक इंडेक्स लावली की सगळे सॉर्ट, फिल्टर वगैरे ऑपरेशन्स सुपरफास्ट होतात.
किंवा गुगलने सर्वच इंटरर्नेटवर जे केले आहे तसे इंडेक्सिन्ग. म्हणजे कसं की गोष्टी शोधणे सोपे होते.
किंवा अजुन सोपे उदाहरण म्हणजे आता आपल्या पयथॉन मध्ये डिक्शनरी डेटा टाईप असतो ज्यात key : value अशा पेयर असल्याने कोणतेही सर्च ऑपरेशन सोप्पे होउन जाते.
तसे आपल्या तत्वज्ञानाच्या बाबतीत करता आलं तर मजा येईल. म्हणजे कसे की लॉजिकल अर्ग्युमेंट्न्स ना स्पेसिफिक कीज असाईन करायच्या , "कीज : अर्ग्युमेंट्स" अशा पेयर्स करायच्या , जेणे करुन अख्खे लॉजिकल अर्ग्युमेंट लक्षात राहील स्टार्ट तू एन्ड.

भन्नाट आयडीया. चला ट्राय करु !

२. स्वान्तःसुखाय अ‍ॅज युजुअल !

________________________________________________

( )129210... अङ्कानां वामतो गति।।

० : देव, भक्ती, अध्यात्म, प्रापंचिक निवृत्ती, ज्ञान, साधना , मोक्ष असं काही नाही, थातुर मतुर कल्पना. खाओ पियो ऐश करो . बाकी सर्व निरर्थक आहे. ०

१: विश्व आहे हाच पुरावा आहे कोणीतरी विश्वकर्मा अर्थात निर्माता असल्याचा. तस्मात् एक देव आहे. शिव. बस १.

२: आणि मग जर हा एक निर्माता बाजूला केला की जे उरते, ते जे की निर्माता नाही, ते झालं निर्माणसाहित्य. म्हणजे शक्ती. शिव नाही ते शक्ति. शिव आहे तसेच शक्तीही आहे. शिव आणि शक्ति . २

९: आणि हे शिवशक्ती आपण आजू बाजूला पाहतो त्या छोट्या मोठ्या गोष्टींबाबत नाहीये, समस्त विश्वाबाबत आहे ! सूर्य, चंद्र, तारे युनिव्हर्स , पृथ्वी, देश , राष्ट्र, आपलं घर, लॅपटॉप , इंटरनेट, मिपा, टाईप करणारे आपण , वाचणारे वाचक . सर्वच. बस शिव शक्ती. हे समस्त विश्व आणि त्याही पलीकडे शिवशक्तीचे अर्धनारीनटेश्वर रुपात नृत्य चालू आहे !
कॅन यू सी इट ?
a
https://sreenivasaraos.com/wp-content/uploads/2012/09/ardhanari33.jpg

पण हे म्हणजे संपुर्ण विश्व , चराचर, समस्त झालं , आता हे म्हणजे २ नव्हे, हे म्हणजे ९ झालं!

९ म्हणजे ? ९च का ? अनंत/ इन्फिनिट का नाही?

कारण सामान्य लोकांनां अंक आणि संकल्पना ह्यातील फरक कळत नाही म्हणून. इन्फिनिटी हा अंक नाही, संकल्पना आहे. आणि इन्फिनिटी एक नाही, अगणित आहेत,
इन्फिनिटी ही संकल्पना अकल्प्य आहे, incomprehensible, अप्राप्य आहे.
तस्मात ते सोडा.
समजा, तुम्ही असे जीव आहात की ज्यांना फक्त एकक संख्या समजतात, तर मग तुमच्यासाठी ९ काय असेल ते कल्पना करा. सर्वात मोठ्ठी संख्या ! त्याच्यात सर्वच्या सर्व सामावलं आहे !
तेच दोन अंकी संख्या मोजणाऱ्यासाठी ९९ असेल
आणि ३ अंकी मोजणार्‍या साठी ९९९ .....
आणि ...

पण मुळात सगळे ९ चे अवतार. मूळ एकमात्र ९.

If you can "imagine" this 9, you can "see " what you think as infinity.

२. पण हे ९ असं काही नाहीयेच. कारण दिसत जरी असले अगणित आकार , पदार्थ दिसत आहेत पण मुळात आहेत फक्त दोघंच . शिव शक्ती. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे विश्व विश्व वाटतंय ते सूक्ष्म रुपात पाहिलं तर शिव शक्तीच आहे. बस २.

१. पण मग ह्या शिव शक्ती मधील बाऊंडरी कोणती ? कोठे शिव संपतो अन् कोठे शक्ती सुरू होते ?
जे सत् आहे ते शिव , जे असत् आहे ते शक्ती. जे चित् अर्थात जागृत आहे ते शिव, जे अचित आहे , जड आहे , निर्जीव आहे ते शक्ती. जे आनंद आहे ते शिव. जे जे आनंदाचा अभाव आहे ते ते शक्ती.

सत् चित् आनंद = सच्चिदानंद म्हणजे शिव . त्या व्यतिरिक्त सर्व शक्ती.

पण ज्याला आपण जिवंत म्हणत आहोत, चित् म्हणत आहोत, त्याचे एकेक अवयव, कॉम्पोनंट्स हे निर्जीव केमिकल्सनेच बनलेले आहेत ना ! कार्बन हायड्रोजन ऑक्सीजन... अर्थात सर्वच आचित् आहे, सर्वच शक्ती आहे. अगदी "मी आहे" ही जिवंतपणाची जाणीव देखील अचेतन निर्जीव वस्तुतून आलेली आहे. बाकी सर्वच सर्व शक्ती शक्ती शक्ती आहे. केवल १.

पण मग ही जिवंतपणाची जाणिव आली कुठून ? त्या निर्जीव गोष्टींच्या मधून ? म्हणजे ज्याला आपण निर्जीव समजत होतो त्यात ही "मी आहे" ही जाणीव, ही चेतना होतीच , फक्त आपल्याला लक्षात येत नव्हती , अर्थात सर्वच चित् आहे , सत् आहे, सर्वच केवळ शिव आहे , बास "मी आहे" ह्या जाणिवेचा सार्वत्रिक सार्वकालीन असल्याचे कळल्याचा आनंद आहे. सर्वच शिव शिव शिव. केवल १. अर्थात २ नाहीच बस १ आहे. केवल १.

एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥

सच्चिदानंद केवळ निर्देश करणारा शब्द आहे, अर्थवाही शब्द नाही. हा शब्द केवळ शिवशक्तीकडे तुम्हाला निर्देश करत आहे, शिवशक्ती काय आहे ह्याचा अर्थ सांगत नाहीये.
(तुम्हाला विचारलं की पुर्वदिशा कोणती? तर तुम्ही हाताने दाखवाल अन म्हणाल "ही पूर्व दिशा". पण ती "एक्झॅक्टली पूर्व" असेल का ? आज सकाळी तिथूनच सुर्य उगवला असेल का ? तर नाही . तुमचे उत्तर अर्थावाही नाही, केवळ निर्देशक आहे, दिशा दाखवणारे आहे.  तसे काहीसे.)

०/ (ब्लँक स्पेस)

पण मुळात शिवशक्ती हे द्वैतच नाही केवळ १ आहे असं आपण म्हणतोय पण ज्याला आपण १ म्हणतोय ते "हे एक आहे" हे कोणाला कळणार? तिथं कळणे न कळणे हेही द्वैत नाही.
बस ० आहे....
पण हा अनुभव घेणारा कोण ?
पण ० आहे असे म्हणणारा, अनुभवणाराही ही नाही. मग जर अनुभवताच नसेल तर अनुभव नाही, मग अनुभाव्यही नाही, अर्थात हे ० ही नाही...
बस (ब्लँक स्पेस)

अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें ।
ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥

y
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/3c/Yin_and_Yang_symbol.svg

...000129210 = 12910

...000 ही ही ती (Blank space).

आता तुम्ही बौध्द असलात तर असलात तर शून्य शून्य म्हणा किंवा वेदान्ति असलात ब्रह्म म्हणा म्हणा किंवा शैव असला तर शिव म्हणा....

यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:।
अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।

काय म्हणायचं ते म्हणा. आता काय फरक पडतो.

Now I "See" You.

अरे I आणि you हे नाहीये. आणि "see" हे देखील नाहीये. बस तो तूच आहेस. बस इतकेच .

तुझा तूची देव तुझा तूची भाव फिटला संदेह अन्यातत्वी :)
https://www.youtube.com/watch?v=TMLaPbuB3hc

तत्त्वमसि!

(ब्लँक स्पेस)

( )

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2024 - 1:17 am | प्रसाद गोडबोले

डिक्शनरी

डिक्शनरी = {"इंडेक्स" : "अर्ग्युमेंट",
"०":"अनात्मवाद, इहवाद",
"१":" एककल्ली एकेश्वरवाद",
"२":"अनेकत्ववाद ",
" ९":"विशिष्ठाद्वैतवाद ",
"२":"द्वैतवाद",
"१":"मायावाद, विवर्तवाद",
" (ब्लँक स्पेस)" : "( )"}

गवि's picture

12 Jul 2024 - 6:49 am | गवि

"१" इंडेक्स दोनदा?

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2024 - 9:22 am | प्रसाद गोडबोले

नाही नाही.
१ दिसत जरी दोनदा असला तरी त्यांच्या स्थानात फरक आहे , पहिला १० आहे आणि दुसरा १,००,००० असा आहे. इंडेक्स स्वतंत्रच आहे.
परंतु त्याने लेख अजुन जास्त कॉम्प्लिकेट करायला नको म्हणुन सहज सोप्पे लिहिले. बाकी दोही इंडेक्स ना असाईन केलेल्या अर्ग्युमेंट्स मध्ये फरक आहे !

चित्रगुप्त's picture

12 Jul 2024 - 5:51 am | चित्रगुप्त

म्हणजे जगभरातली सगळी 'फिलॉसॉफी' अर्थशून्य/अनावश्यक आहे असे म्हणावे का?

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2024 - 9:30 am | प्रसाद गोडबोले

सगळी 'फिलॉसॉफी' अर्थशून्य/अनावश्यक

हरकत नाही.
पहिलं ० शुन्य , एकक स्थानाचे शुन्य त्याविचाराचेच इंडेक्स आहे. तुम्हाला ते पटत असेल तर तिथं थांबा. ते पटेनासे झाले तर पुढील इंडेक्स वर या! जे कळेल जे पटेल जे सुलभ वाटेल तिथं थांबा !

सर्व स्वान्तःसुखाय आहे हे :)

( )१२९२१०

तत्वज्ञान व एस्क्यूएल् सारखे विदासंच यांची सांगड घातलेली आवडली.

---

मा पामराला आत्ताच comprehend होत नाहीय, पण चित्तचक्षुवेधक वाटत आहे. अजून विचार करून मग लिहीन.

---

चर्चा वाचत आहे. वर गविंना पडलेला प्रश्न मलाही पडलाय, दिलेले उत्तर काही समजले नाही.

---

अवांतर: प्रत्यक्ष जगातील नैसर्गिक वा मानवी माहिती / ज्ञान / अनुभव यांचा spectrum अमर्यादित आहे. कोणत्याही भाषेतील datatypes हे मर्यादित आहेत. म्हणून माहिती / ज्ञान / अनुभव हे विदासंचात साठवताना typecasting करावी लागते. त्यात मग ती माहिती / ज्ञान / अनुभव इत्यादींच्या काही छटा गळून पडतात.

चला. कोणाला तरी तशाच शंका पडल्या हे वाचून हुरूप आला.

आता आणखी एक.

नऊपर्यंतच समजेल, सिंगल डिजिट, ९९ डबल डिजिट वगैरे हे उदाहरणसुद्धा एका विशिष्ट गृहीतकावर आधारित आहे.

हातांची बोटे, दशमान यात एक डिजिट, दोन डिजिट असे संभवते. समजा बायनरी आकलन आहे, तर एक किंवा शून्य. संपला विषय. समजा काही कारणाने माझ्या जगात हेक्झा डेसिमल बेस असेल तर पूर्ण वेगळे चित्र होईल.

तेव्हा त्यात न जाता अन्य काही मांडणी हवी का?

इतरही अनेक विचार मनात येतात. आणि हेच गोडबोल्यांचे यश. वास्तविक शून्य हेच सत्य आहे हे कळलेले असूनही अशा जगात पनोरमिक टूर अरेंज करून, भरपूर स्थलदर्शन करवून आणतो असे म्हणत म्हणत शेवटी त्याच शून्य जागी नेऊन पोचवणारा अध्यात्मिक केसरी टूर आयोजक. महाडांबिस मनुष्य. ;-)

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2024 - 11:31 am | प्रसाद गोडबोले

९ हे केवळ उदाहरण म्हणुन वापरलं आहे. लोकं परमेश्वराला अनंत / इन्फायनाईट म्हणतात पण हे विधान मॅथेमॅटिकली रिगरस नाही. ( मॅथेमॅटिकल रिगर : https://en.wikipedia.org/wiki/Rigour)

कारण इनफिनिटी म्हणजे नक्की कोणती इनफिनिटी. इनफिनिटी काही एक नाही. अनेक आहेत . इनफायनाईट इन्फिनिटी आहेत . काही छोट्या इनफिनिटी आहेत काही मोठ्ठ्या इनफिनिटी आहेत. तस्मात इनफिनिटी हा शब्द वापरणे मला भोंगळ वाटले.

पण ९ अंकाचे तसे नाही. तुम्ही एकक जाणणारे असलात तर ९ एकच आहे, आणि तो तुम्ही समजुन घेऊ शकता. its not incomprehensible. तेच दोन अंकी संख्यात गेलात तर ९९ होईल . तीन अंकी मध्ये ९९९ . RGB सिस्टीम मध्ये गेलात तर (255,255,255) , hexadecimal मध्ये FFFFFF.
But you understand what I am trying to say here? It's "Everything" but It's not infinity !

शिवाय तसेही इन्डेक्स म्हणुन आपल्याला अंक वापरायचा आहे आणि इनफिनिटी हा अंक नाही, केवळ संकल्पना आहे. ज्याला इन्फिनिटी इन्फिनिटी असं म्हणत आहेत त्याचे प्रॉपर रिप्रेझेंटेशन ९ हे आहे. म्हणुनच कदाचित ९ ला संकृतसाहित्यात ब्रह्मसंख्या असे म्हणतात !

वास्तविक शून्य हेच सत्य आहे

तुम्ही स्टेपबाय स्टेप इन्डेक्स, लॉजिकल अर्ग्युमेंट्स सह फॉलो करत गेलात तर ते एकक स्थानातलं शुन्य आणि ( )१२९२१० ह्यातल्या १ लाखाच्या अलिकडे असलेलं शुन्य / ब्लँक स्पेस ह्या दोहोत फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल !

They are different ... And once you see it, you can not "un-see" it!

ह्यालाच माऊली "अधिक देखणे तरी निरंजन पाहणे " असं म्हणतात ! किंव्वा अमृतानुभवात अजुन सुंदर उपमा देतात माऊली - शिवदर्शनाचा सोहळा !

येहवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा ।
भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥

काय बोलु , काय एक्स्प्लेन करणार , कसं करणार वर्णन !

किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥

:)

कर्नलतपस्वी's picture

12 Jul 2024 - 10:45 am | कर्नलतपस्वी

लागे जन्मावे पुन्हा...

दोन तीन वेळा वाचतो,प्रतिसाद वाचतो काही उमजले तर बोलेन अन्यथा....

मुकवाचक.

मला पण काहीही कळले नाही. पण आपली बौद्धिक कुवत तेव्हढीच आहे असे स्वयंसांत्वन करून गप्प बसलो आहे.

.जर माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर माझा इन्डेक्स नंबर एक शुन्य बाजीराव.(चिं त्र्य खानोलकर)..

ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग |
तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग ||
कबीरदास.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2024 - 12:03 am | प्रसाद गोडबोले

नमस्कार कर्नल सर ,

एक शून्य बाजीराव हे काय आहे मला माहीती नाही.

माझ्या लेखात मी भारतीय अध्यात्मिक दर्शनशात्रात जे अद्वैत वेदान्त आहे (जे सांगते की तत्वमसि! ) त्याचे लॉजिकल प्रूफ लिहिण्याच्या प्रयत्न केला आहे.
()१२९२१० ह्यातील प्रत्येक संख्या माझ्या करिता एकेक तार्किक विधान आहे , आणि संस्कृत मध्ये अंक डावीकडुन मोजतात/ वाचतात. तस्मात ० अर्थात चार्वाकाचा नास्तिक निरिश्वरवाद पासुन एकेक विधान करत मागील विधान कसे अपुरे / असत्य आहे ह्याचे पुरावे देत देत शेवटी () अद्वैताचा अनुभव कसा घेता येईल ह्याची लाईन ऑफ अर्ग्युमेंट्स दिलेली आहे.
बस्स. इतकेच.
तुम्ही कबिराचा दोहा उधृत केला , पण त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे काही त्या दोह्यातुन कळत नाही , खुद्द कबीरच म्हणतोय की जाग सके तो जाग. मी माझ्या लेखात कसे जागता येईल ह्याची प्रोसेस लिहिली आहे.
ह्या पेक्षा अजुन सोप्पं करुन मला तुर्तास तरी लिहिता येत नाहीये. जमेल तेव्हा प्रयत्न करेन च.
कारण - Once you see it you can't unsee it . :)
इत्यलम.

रिकामी जागा वेगळी आणि 'शून्य' वेगळे.

कारण 'तिथे काही नाही' हे स्पष्ट म्हणणे म्हणजे शून्य. रिकामी जागा म्हणजे तिथे आपण जाऊन पाहिलंच नाही की तिथे काय आहे.

उदाहरणार्थ - पचमढीला किंवा माथेरानला आपण फिरत आहोत. वाटेत कुणीच नाही. प्रत्येक { व्ह्यू} पॉइंटला जाऊन पाहतो तो कसा आहे. पाहिल्यावर आपण म्हणतो १/२/३/.../९/१० आहे. पण एखाद्या ठिकाणी उतरून पाहून आलोच नाही तर () रिकामी जागा. Null . पण पाहून आल्यावर वाटतं की उगाच वेळ गेला ,नाही गेलो तर ठीक झालं असतं. म्हणजे 'शून्य'. आणखी एक शक्यता असते ती म्हणजे त्य वाटेने परत येणारे भेटतात व सांगतात की काही नाही पाहण्यासारखे. म्हणजे शून्याची आयती अनुभूती घेतली. आपला निर्णय होतो की जायचे नाही.

शून्याचा अनुभव देणारे अगदी ऐन वेळेला भेटले तर ? नाही भेटले तर? थांबू नका. असाही वेळ वाया जाईलच.

Bhakti's picture

12 Jul 2024 - 11:45 am | Bhakti

सुपर्ब प्रगो!
मज पामरासाठी तो अंकप्रवास ९२१०१९० असा आहे ;) 😀

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2024 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले

अंकप्रवास ९२१०१९० असा आहे

ग्रेट.
प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळे.
आपला आपण मार्ग चालायचा. आपले आपणच दीप व्हायचं. अत्त दीप भव!

चरैवति चरैवाति!

सोत्रि's picture

27 Jul 2024 - 4:48 am | सोत्रि

प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळे

प्रवास वेगळा understanding वेगळं हे ठीक पण गंतव्य कसे काय वेगळे?

- (मुमुक्षू) सोकाजी

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2024 - 8:00 am | प्रसाद गोडबोले

गंतव्य कसे काय वेगळे?

कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे. कित्येक जण नास्तिक मते मानणारे आहेत जे ० शुन्य वर थांबले आहेत.
काही जण फक्त १ च मी म्हणतो तो देव खरा बाकी सब झुट ह्या मतावर ठाम आहेत ते आपण पाहतोच आसपास.
कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी || असे म्हणणारे सावतामाळी हे पॅनथेईस्ट अर्थात ९ वर थांबले आहेत असे म्हणाता येईल.
बाकी अनेक भारतीय भोळे भाबडे भाविक जे 'अनेक इश्वर असले तरी मुळात एक आहे' अन मी दुसरा ह्या द्वैतावर , २ वर थांब्ले आहेत. आमचे एक अत्यंत जवळचे मित्र सगळं वाचुन समजुन देखील शेवटी द्वैतच सत्य आहे , द्वैतच जास्त भावते असे मानणारे आहेत. बहुतांश भारतीय सम्प्रदाय इस्कॉन बिस्कॉन वगैरे ह्यात मोडतात.
बाकी बहुतांश संत आणि विशेषकरुन मराठी संत अद्वैती आहेत ते १ , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणुन त्याच्याही परे गेले आहेत.
मला स्वतःला अद्वैत जे मी ( ब्लँक स्पेस) ने इंडेक्स केले आहे ते भावते.
तुकोबांच्या शब्दात -

जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥
मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥
ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥
देखोनि न देखें प्रपंच दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥
तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तो सीण वाटतसे ॥४॥

आवड ज्याची त्याची ! म्हणुन म्हणालो , प्रत्येकाचे गंतव्य वेगळे !

सोत्रि's picture

28 Jul 2024 - 6:21 pm | सोत्रि

कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे.

मग तो थांबा होणार नाही का गंतव्याच्या मार्गावरचा?

मोक्ष, निर्वाण, निब्बाण, जजमेंट डे, कयामत हे गंतव्य आहे, हे सर्व मनुष्यप्राण्यांसाठी सेमच असेल, वेगळे नाही.

- (मार्गस्थ) सोकाजी

प्रसाद गोडबोले's picture

28 Jul 2024 - 8:38 pm | प्रसाद गोडबोले

नाही, हे सत्य नाही.
तुमच्या विचारसरणी नुसार तुमची मोक्षाची व्याख्या बदलते.
द्वैत वाद , विशिष्ठडवैत , अद्वैत प्रत्येक धारणेत मोक्षाची व्याख्या वेगळी आहे. बौद्ध ज्याला निब्बान म्हणतात ते अजून तिसरे वेगळे आहे.
मला मध्वाचार्य, रामानुज , शंकराचार्य आणि बौद्ध तिघेही त्यांच्या व्याख्यानेऊसर मोक्षाप्रत पोहचलेले वाटतात.

मोक्ष हा एकच असू शकतो हा विचार एकांगी आहे. १.

संस्कृत मध्ये अंक डावीकडुन मोजतात/ वाचतात.
तर मग हा प्रवास ९२१०१९० ऐवजी ०९१०१२९ असा होईल.

नठ्यारा's picture

24 Jul 2024 - 2:57 am | नठ्यारा

प्रगो,

लेख रोचक आहे. पण आवर्तन कसं दाखवायचं तुमच्या इंडेक्सात? अनंतत्व ( = इन्फिनिटी ) म्हणजे काय हे आवर्तनाच्या सहाय्यानेच समजू शकते. ज्याला ब्रह्मसंख्या ९ म्हणतात ती आवर्तनाची शेवटची कडी आहे. त्याच्या पुढे १ आणि ० घेऊन १० लिहावे लागतात. षोडशमान पद्धतीत F नंतर १० लिहावे लागतात. अष्टमान पद्धतीत ७ नंतर १० येतात. दशमानात ९९ नंतर १०० लिहावे लागतात, तर षोडशमानात FF नंतर १०० येतात. अशा रीतीने पुढील आवर्तन सुरू होते

एकंदरीत ब्रह्मसंख्या ही पहिल्या आवर्तनाची शेवटची कडी आहे. ती कुठे बसवायची?

आ.न.,
-ना.न.

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2024 - 8:03 am | प्रसाद गोडबोले

माफ करा , पण तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते मला कळलं नाही .

नठ्यारा's picture

29 Jul 2024 - 6:29 pm | नठ्यारा

पुनरपि जननं पुनरपि मरणं ही आवर्तनं आहेत. ती खंडणारा किंवा पुढील आवर्तन सुरू करणारा अंक ९, ९९, ९९९, .... , इत्यादि. बस इतकंच. षोडशमान पद्धतीत F, FF, FFF, .... , इत्यादि. अष्टमानात ७, ७७, ७७७, .... , इत्यादि.
-नाठाळ नठ्या

प्रसाद गोडबोले's picture

26 Jul 2024 - 11:50 pm | प्रसाद गोडबोले
सोत्रि's picture

28 Jul 2024 - 6:16 pm | सोत्रि

हे स्वांतसुखाय आहे असं म्हटल्यामुळे माझं डिक्शनरीबद्दलचं मत माझ्या आकलनानुसार मांडतो.

डिक्शनरी = {"इंडेक्स" : "अर्ग्युमेंट",
"०":"अनात्मवाद",
"१":"एकेश्वरवाद",
" ९":"इतर्_सर्व_वाद"}

  1. सगळे ९ चे अवतार असल्याने २, दशम व त्यापुढील पटीतल्या ११, २२, किंव ९९ सगळे ९ ह्या इंडेक्समधे मांडता येतील.
  2. तुमच्या डिक्शनरीत इहवाद हा शून्य इंडेक्समधे आला होता. तोही ह्या ९ ह्या इंडेक्समधे मोडला आहे. इहवाद आणि अनात्मवाद एकदम वेगळे असल्याने ते एकाच इंडेक्समधे मांडता येणार नाहीत.
  3. काहीच स्थायी नसून सर्व अवकाश आहे हे अनात्मवादचं मूळ आहे त्यामुळे (ब्लँक स्पेस)" : "( ) हे ० इंडेक्समधेच मांडता येतंय/li>

- (मुमुक्षू) सोकाजी

लहानपणी घरच्यांबरोबर बाबामहाराज वगैरे निरूपणकारांना ऐकायला गेलो आहे. ते एकेका ओवीवर दोन दोन तास रसाळ प्रवचन करत. घरच्यांना त्याविषयी अपार आदर वाटे.
नंतर स्वामी चिन्मयानंद, नवीन दयानंद सरस्वती यांचे गीतेवरील ग्रंथ वाचून काही वेळ प्रभावित झालो होतो.
सध्या असे वाटते, की संकल्पनांची वेगळीच मांडणी करून भाषेवरील प्रभुत्वाने काही तरी अगम्य कोणी बोलत असेल, तर तो त्यांचा खेळ किंवा छंद आहे. त्याचा सत्याशी संबंध आहे, या अंधश्रध्देतून बाहेर पडल्यामुळे मोकळे वाटते. बर्याच लोकांना आपल्यावर कोणत्या संकल्पनांचं जोखड आहे याच पत्ताच नसतो, पण चालायचंच.
टीप: समजा एका कारखान्यात मोजपट्ट्या बनवत आहेत आणि आपल्याला त्या किती अचूक आहेत हे मोजायचे आहे. तर त्याच कारखान्यातल्या दुसर्या मोजपट्टीने अचूकता मोजता येत नसते. त्यासाठी व्हर्निअर कॅलिपरसारखे मूलत: वेगळे व अधिक अचूक उपकरण लागते. मानवी जीवनाचे उद्दिष्ट, सार्थकता, कारण, पुढे काय होते इ. मानवाला मोजता येणार नाही असे वाटते.
तळटीप: यामुळे आता मला कोणत्यातरी गट क्रमांकात ढकलण्यात येईल पण त्याचा मला किंवा कुणालाच कसलाही फरक पडणार नाही, हे आधीच नोंदवून ठेवतो.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jul 2024 - 9:18 pm | प्रसाद गोडबोले

आता मला कोणत्यातरी गट क्रमांकात ढकलण्यात येईल पण त्याचा मला किंवा कुणालाच कसलाही फरक पडणार नाही

कोणत्याही गटात कधीही कोणाला ढकलता येत नसतं , गट क्रमांक तुमच्या जन्मापासुनच्या संस्कारांन्नी निर्धारित होत असतात. ज्यांनी स्वामी चिनमयानंद आणि तशाच लोकांकडुन खरेच काहीतरी अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास केला असेल , श्रीमदाद्य शंकराचार्य ह्यांन्नी केलेले बौध्द मत खंडन , द्वैत , शाक्त , शैव , मीमांसक , द्वैतवाद आदि अन्य मतांचे केलेले खंडन वाचले असेल त्यांन्ना वरील लेखात उधृत केलेली विचारसरणी स्टेप बाय स्टेप लॉजिकल अर्ग्युमेंट्स आहेत आणि ते लक्षात रहावेत म्हणुन त्यांन्ना ()१२९२१० हे इंडेक्सिंग केलेले आहे हे नक्कीच लक्षात येईल . ज्याच्या लक्षात येईल त्याचा येईल !

"जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती अंधश्रध्दा , संकल्पनांचे जोखड वगैरे वगैरे" ही कोणत्या गटाची विचारसरणी आहे हे तुमचे तुम्हालाही जाणवत असेलच ! मला तुम्हाला कोणत्या गटात ढकलण्याची गरजच नाही. तुम्ही ऑलरेडीच तिथे आहात !
आणि तुम्ही मला उपरोधिक टीकात्मक बोलत असलात तरी ह्या लेखाच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा गट कोणता हे लक्षात येत आहे ह्यातच मला समाधान आहे !

मला अभ्यास करताना एकदा ऐकण्यात आले होते की ढोबळमानाने की महायान आणि थेरवाद बौध्द मतात एक मोठ्ठा फरक आहे तो म्हणजे -
महायान म्हणतो की एकदा आपल्याला आपलं मुळस्वरुप लक्षात आलं की बाकी सगळं शुन्यच आहे तस्मात आपल्याला काहीच करायची गरज नाही , एकदा आपण बुध्दत्वाला पोहचलो की बस.
आणि थेरवाद मतात - आपण सर्वच बुध्दत्वाला प्राप्त होत नाही तोवर धर्मचक्र परिवर्तन चालु राहिले पाहिजे कारण प्रत्येकाचे निर्वाण महत्वाचे आहे, केवळ आपले निर्वाण साधुन पुरेसे नाही. म्हणुन त्यामध्ये बोधीसत्व ही कन्सेप्ट आहे . किंव्वा व्हाईस-अ-वर्सा. मी काही ह्यातील एक्क्ष्पर्ट नाही.
पण हे जरं असं असेल तर मला स्वतःला महायान विचारधारा भावते.
मला कोणाला काहीही शिकवण्यात रस नाही. लेखन करणे हा माझा छंदच आहे.

Now you understand what do I mean by - "हे सगळं स्वांन्तःसुखाय आहे. "

तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

मनःपुर्वक धन्यवाद :)

स्वधर्म's picture

31 Jul 2024 - 4:14 am | स्वधर्म

गुरुदेव,
तुकाराम महाराजांच्या
वेदांचा तो अर्थ| आंम्हासीच ठावा|
येरांनी व्हावा| भार माथा||
या ओवीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे गंध उभे लावावे की आडवे यावरही आपल्याकडे एका गाढवावरुन जाणार नाहीत, इतके ग्रंथ आहेत, पण त्यांचा काय उपयोग? असे म्हटलेच होते. त्यामुळे थांबावे, हे ठीक.
हिमालयातल्या गुरुजींनी म्हटलेच होते, की त्यांना कळायला वीस वर्षे लागली पण तुमची गोष्टच वेगळी! हजारांत एखाद्याला असतो, तेवढा आत्मविश्वास तुंम्नेहाला आहे, त्यांचे नेहमीच कौतुक वाटते. त्याबद्दल अभिनंदन.
टीप: मी पण उपहासाने नाही म्हणत.
तळटीप: मागच्या तळटीपेचा उपयोग झाला नाही, पण तुंम्ही गट गट खेळायला माझी कसलीच हरकत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2024 - 7:40 am | प्रसाद गोडबोले

पर्फेक्ट !

बाकी काही नसेल पण गट १ आणि २, आणि त्यांची विचारसरणी ही मी केलेली मांडणी तुम्हाला आता व्यवस्थित कळते हे पाहुन मला समाधान झाले.
किमान एक तरी विचार तुमच्या पर्यंत पोहचला ह्यातच मला आनंद आहे !

बाकी कसल्याच तळटीपांचा मला आता उपयोगच होत नाही आता .
यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके। तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।।

त्यामुळे मी आता फक्त खेळतच आहे !

मनःपुर्वक धन्यवाद !
:)

अवांतर : बाकी आगरकरांचे सोडुन द्या , शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांचे पुर्ण नावही माहीत नसेल कोणाला. =))))
आगरकर, साने आणि भावे ह्यां तिघांच्यात टफ कॉम्पिटिशन आहे भाऊ =))))

कॉमी's picture

30 Jul 2024 - 11:02 pm | कॉमी

सध्या असे वाटते, की संकल्पनांची वेगळीच मांडणी करून भाषेवरील प्रभुत्वाने काही तरी अगम्य कोणी बोलत असेल, तर तो त्यांचा खेळ किंवा छंद आहे. त्याचा सत्याशी संबंध आहे, या अंधश्रध्देतून बाहेर पडल्यामुळे मोकळे वाटते. बर्याच लोकांना आपल्यावर कोणत्या संकल्पनांचं जोखड आहे याच पत्ताच नसतो

असेच वाटते.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2024 - 1:18 am | प्रसाद गोडबोले

असेच वाटते.

पर्फेक्ट !

धन्यवाद कॉमी. तुम्ही लेखातील किंव्वा त्यावरील अन्य प्रतिसादातील कशावरही काहीही प्रतिसाद न देता न चुकता गट. क्रमांक. २ मधील लोकांचा जो विचार असेल असे ज्या प्रतिसादातुन स्पष्ट जाणवते त्यावरच प्रतिसाद दिलात. तुमचं "असेच वाटतं" असे म्हणणे ह्याचा अर्थच "माझा मेंदुही अशाच प्रकारे विचार करतो" असा आहे ! आणि माणसांचे विचार हे जन्मापासुन झालेल्या संस्कारांनी ठरत असल्याने जन्मापासुनच तुमचा गट निश्चित होत जातो, (गट बदलता येत नाहीच अशातला भाग नाही , पण गट बदलणे वाढत्या वयाबरोबर दुरापास्त होत जाते. )

मी वरच म्हणलो त्याप्रमाणे - कोणी कोणाला कोणत्याही गटात ढकलु शकत नाही, आपला गट हा आपल्या जन्मापासुन आपल्यावर झालेल्या संस्कारांमधुन आपोआप ठरत असतो. आपला गट कोणता हे ज्याने त्याने आपले आपण समजुन घ्यायचे असते . Its a process of self discovery.

मला मनापासुन आनंद आहे की मी तुमचा गट क्र. २ अगदी व्यवस्थित ओळखला आहे ! आणि हा एक प्रकारे पुरावाच आहे की मला माझा गट क्र.१ व्यवस्थित कळालेला आहे !

बाकी तुम्हाला अजुन काही वाटत असल्यास आवर्जुन सांगा. This is actually very very helpful. (No sarcasm intended at all.)

मनःपुर्वक धन्यवाद !

कॉमी's picture

31 Jul 2024 - 7:11 am | कॉमी

वेलकम. नक्की सांगेन.

विश्व आहे हाच पुरावा आहे कोणीतरी विश्वकर्मा अर्थात निर्माता असल्याचा. तस्मात् एक देव आहे. शिव. बस १.

जर प्रत्येक गोष्टीचा त्या गोष्टीपेक्षा वेगळा निर्माता असतो हे गृहितक मानले तर कोणतेही special pleading न करता विश्वानिर्मात्याचा निर्माता कोण हा प्रश्न उभा राहतो.

कॉमी,

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विश्वनिर्मात्याचा कोणीतरी निर्माता असणारंच. अशा परमनिर्मात्यास स्वयंसिद्ध, अपौरुषेय, इत्यादि विशेषणे लावली जातात. तो दिसंत नाही, पण त्याच्यामुळे डोळे पाहू शकतात. त्याचा आवाज येत नाही, पण कान त्याच्यामुळे आवाज ऐकू शकतात. वगैरे वगैरे.

आपला नम्र,
-नाठाळ नठ्या

स्वयंसिद्ध हे स्पेशल प्लिडींग झाले. गृहीतक आहे प्रत्येक गोष्टीसाठी निर्माता आहे.

नठ्यारा's picture

1 Aug 2024 - 5:55 pm | नठ्यारा

कॉमी,

स्वप्न खरं की जागृतावस्था खरी? स्वप्न खरं धरलं तर त्याचा निर्माता कोण? स्वप्न स्वयंसिद्ध आहे का? स्वप्न पडतांना तर ते स्वयंसिद्धच वाटंत असतं. पण जागृतीमुळे त्याला बाधा येते. उद्या जागृतावास्थेसही कशावरून इतर काही अवस्थेची बाधा होणार नाही?

आ.न.,
-ना.न.

स्वप्नावस्था केवळ आपल्या मेंदूत असते. आता तिला खरे म्हणायचे कीं खोटे हे तुमच्या शब्दकोशात खरे म्हणजे काय ह्यावर अवलंबुन आहे. हा. पण "मुंबईत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान आहे" हे जितके खरे आहे तितके खरे स्वप्नात काही नसते. आपण ज्या अर्थे खरे किंवा खोटे हे शब्द जनरली वापरतो त्या प्रमाणे स्वप्न खोटी असतात.

नठ्यारा's picture

3 Aug 2024 - 10:05 pm | नठ्यारा

म्हणूनंच स्वयंसिद्ध हे स्पेशल प्लीडींग उत्पन्न झाले आहे. त्याचा अर्थ ते स्वप्नासारखे बाधित होत नाही.
-ना.न.

स्वयंसिद्ध गोष्टी असू शकतात तर "उत्पन्न झालेल्ल्या प्रत्येक गोष्टीचा निर्माता असतो" हे गृहीतक खोटे पडले.

आणि मग जर हा एक निर्माता बाजूला केला की जे उरते, ते जे की निर्माता नाही, ते झालं निर्माणसाहित्य. म्हणजे शक्ती. शिव नाही ते शक्ति. शिव आहे तसेच शक्तीही आहे. शिव आणि शक्ति

हे केवळ रुपकात्मक, कवितेचे मटेरियल वाटते. ह्याचा खरोखर सत्याशी काही संबंध आहे असे वाटतं नाही.

बाकी उर्वरित विचारांबाबत. शिव शक्ती हि द्वयी घेऊन शेवटी सगळीकडे चेतना असण्याची शक्यता असल्याने सगळे शिव आहे हे वाचायला छान आहे, विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे. लेखनाचा फ्लो छान आहे.

पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते. सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.

पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते.

सहमत, शाब्दिक पातळीवर कितिही चर्चा केली तर ती शब्दबंबाळच होणार.

सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.

त्याचे ज्ञान होणे शक्य आहे. ध्यानमार्गाचा अवलंब केल्यास ते शक्य आहे हे ध्यानमार्गाच्या स्वानभुवावरून सांगू शकतो.

- (ध्यानमार्गी) सोकाजी

पण माझा तो प्रश्न नाही. तसे ज्ञान झाल्याने सुद्धा काय फरक पडतो? म्हणजे मी ऑलरेडी मानतो कीं सगळे प्राणी कार्बन बेसड लाईफ फॉर्म आहेत. पण म्हणून काय मी सगळे कार्बन बेस्ड लाईफ फॉर्म हे एकच आहेत असे म्हणायला जातं नाही. कोंबडी आणि माणूस हे एकच होष्टीचे बनले असले तरी भिन्न entity आहेत. Made of the same stuff आणि non dual ह्या भिन्न कल्पना आहेत.

विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे.

एवढेच महत्वाचे आहे कारण आपण फक्त विचारच करू शकतो या विषयावर.

सुरुवात, शेवट , निर्मिती करणारे कोणीतरी, बाऊंडरी वगैरे असलीच पाहिजे ही आपल्या विचारांची मर्यादा आहे. कारण आपण सुरुवात आणि शेवट असलेले आहोत. कुंपणे असलेले आहोत. आपण या खेरीज कल्पनाच करू शकत नाही.

कोणीतरी ईषणा केल्याशिवाय काहीतरी "अस्तित्वात" येऊच शकत नाही अशी घट्ट समजूत ही आपल्या मर्यादित परीघाची देणगी. आणि तो तोडून आपण जगू शकणार नाही.