महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत.
- मिपा व्यवस्थापन
लोकहो,
करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no...
सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे :
१.
रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.
हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ).
२.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :
ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ).
३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.
हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 )
असो.
तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे.
आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया.
१.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/
श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर.
२.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945
हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं.
३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745
रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन.
४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413
आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे.
असो.
हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया.
धन्यवाद !
आपला नम्र,
-गामा पैलवान
प्रतिक्रिया
31 Jul 2022 - 3:55 am | कॉमी
https://www.google.com/amp/s/www.cnbc.com/amp/2022/04/01/myocarditis-ris...
1 Aug 2022 - 9:02 pm | गामा पैलवान
कॉमी,
१.
लस घेतलेले तरुण व तरुणी खेळाडू कशाने मरताहेत? पूर्वी कधी असे हृत्शूलाने मरत होते का? लस घेतल्यावरच कसे मरू लागले? आणि लशीने हृदयविकार होत नसतो म्हणे. हे कोण सांगतं तर CDC. माझ्यासारखं स्वलालधन्य व्हायची CDC ची पात्रता नाही. त्यांनी peer review सादर केले पाहिजेत.
टोरांटोमध्ये क्यांडेस नायमन नावाची एक डॉक्टरीण पूतनामावशी बालकांना लशी ठोकायची. ती स्वत:च मेली लस घेऊन. तिच्या नावाने मातम करायचं का? बातमी : https://torontosun.com/news/local-news/warmington-triathlete-27-becomes-...
टोरांटो ( क्यानडा ) इथले ५ डॉक्टर लशीपायी मेले. इतक्या मोठ्या प्रमाणावर का मरताहेत? कारण की डॉक्टरांना लस घेणं सक्तीचं केलंय. आता बसा बोंबलंत.
२.
तुम्ही दिलेला दुवा :
या लेखात स्पष्ट म्हंटलंय की वय वर्षे १२ ते १७ च्या किशोरांत मायोकार्डीटिस व पेरीकार्डीटिस ची शक्यता कोव्हिड विष्णूचा संसर्ग ( infection ) झाला तर दिसून येते. अंगात नुसता करोना सापडणे म्हणजे संसर्ग नव्हे. हृत्शूल होणार असेल तर मग लस घ्यायचीच कशाला? करोनाची लागण काय लगेच थोडीच होते. मध्ये काही दिवस जातात. त्या काळात आयव्हरमेक्टिन सारखी इतर औषधं वापरून रोग काबूत आणता येतो. लस कशाला हवीये?
३.
हाच न्याय इतर रोगजंतूंना का नाही लावायचा? करोना संगे चरोना, फरोना, टरोना, ढरोना, आणि इतर शेकडो प्रकारचे विषाणू आहेत. प्रत्येकाविरुद्ध नवनव्या लशी टोचून घ्यायच्या का?
असो.
बाकी, Original Antigenic Sin यावर काही वाचन केलंय का तुम्ही? मला वाचन वाढवायला सांगताय, म्हणून विचारलं.
आ.न.,
-गा.पै.
2 Aug 2022 - 7:24 am | कॉमी
तुम्ही यूकेत बसून उंटावरून शेळ्या कशाला हाकताय ? तिथल्या डॉक्टरांनी केलीये तपासणी आणि मांडलाय निष्कर्ष.
हो घ्यायच्या.
कोरोना कितीही थोतांड म्हणा, कमी घटक म्हणा. एकसेस मोरटालिटी बघितली कि तुमचे बोलणे किती आधारहीन आहे हे सहज समजते. लिटरली लाखोंनी जास्त लोक लसी घेण्याआधी मेली आहेत. आणि तुम्ही गप्पा करताय करून थोतांड असल्याची.
को. मुले मायो. होत नाही असे तुमचे साफ चुकीचे आणि अज्ञानदर्शक मत होते तेव्हढ्यापुरते वाचन वाढवा असा सल्ला होता.
बाकी तुम्ही दिलेली संकल्पना वाचली. ती संकल्पना प्रॅक्टिकल आयुष्यात, आकडेवारी मध्ये कशी दिसत नाही ? सरळसरळ लस न घेणारे जास्त प्रोपोर्शन मध्ये मरतायत.
3 Aug 2022 - 12:06 am | गामा पैलवान
कॉमी,
१.
इस्पितळाच्या सक्तीमुळे ५ डॉक्टर लस घेऊन मेले आणि मी इस्पितालावर विश्वास ठेऊ? शिवाय, इस्पितळ क्यानडातल्या टोरांटोत आहे. संयुक्त साम्राज्याशी काय संबंध?
बाकी, उंटावरनं शेळ्या हाकण्याविषयी म्हंटलं तर तेद्रॉस काय करतोय? न्यूयॉर्कमध्ये बसून भारतातल्या शेळ्या कशासाठी हाकतोय?
२.
युरोप व अमेरिकेत फ्ल्यूमुळे हिवाळ्यात मृत्यूदर वाढतोच. त्यावर करोनाचा छाप मारलाय. दुसरं काही नाही.
३.
हा धडधडीत खोटा दावा आहे. करोना अंगात असतांना झालेले मृत्यू म्हणजे करोनामुळे झालेले मृत्यू नव्हेत.
४.
करोनापूर्व काळी फ्ल्यूमुळे मायोकार्डिटिस झाल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणजेच करोना हा फ्ल्यूसारखा तात्कालिक आजार आहे. लशीचं प्रवर्तन करण्यासाठी करोनास फुकटचं डोक्यावर चढवून ठेवलं आहे.
५.
टोरांटोत लशीच्या सक्तीपायी ५ डॉक्टर मेले आणि तुम्ही हा दावा कशाच्या आधारे करताय? आणि ते लशीपायी जखमी होणाऱ्यांचं VAERS विदागार का फुगतंय दररोज?
६.
याचा अर्थ तुम्हांस लशीवरील अवलंबन वाढवायचंय. जे मला आजीबात नकोय. तुम्ही औषधी आस्थापनांचे हस्तक आहात.
असो.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की जगभरात करोनाच्या लशीपायी जखमी होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला सुरुवात झाली आहे. बातमी : https://www.theepochtimes.com/covid-vaccine-injuries-quietly-being-compe...
सदर बातमीचा पडताळा :
https://www.gov.uk/vaccine-damage-payment
https://www.who.int/news/item/22-02-2021-no-fault-compensation-programme...
याचाच अर्थ लस हानिकारक आहे हे अनेक सरकारांनी मान्य केलंय. जनतेचा उद्रेक थोपवायचा हेतू उघड आहे.
आ.न.,
-गा.पै.
3 Aug 2022 - 7:34 am | कॉमी
तेच तर. तिथे लोक लसींमुळे मेले असा उगाच दावा करताय. तिथले डॉक्टर म्हणतायत लसींचा काही संबंध नाही. म्हणून यूकेत बसून टोरोंटोमधल्या मृत्यूहवालावर कोणत्याही विदा शिवाय टिप्पण्या करण्याचा प्रकार हा उंटावरून शेळ्या हकण्याचा प्रकार आहे.
पुनःश्च. वाचन वाढवा. Excess mortality म्हणजे गेल्यावर्षीपासून लोकसंख्येतले बदल पाहता जितक्या लोकांच्या मृत्यू अपेक्षित असतो त्यापेक्षा जास्त मृत्यू झालेत असा अर्थ आहे. ह्यात हिवाल्यातले फ्ल्यू सुद्धा आले. तुम्हाला युरोपचा माहिन्यानुसार अतिरिक्त मृत्यूचा विदा मिळाल्यास तो सुद्धा पहा.
युरोपचे माहित नाही. भारतात तर एप्रिल मे मध्ये इतके जास्त (Excess) मृत्यू झालेत (लस न घेता बरका.), कि कोणत्याही सुद्न्य किंवा तार्किक माणसाला कोरोना आणि थोतांड हे शब्द एकत्र वापरावे वाटले नसते. कोव्हिड चा ग्राफ बघा, त्यात पीक जेव्हा आहे तेव्हा अतिरिक्त मृत्यू किती नोंदवलेत ते पहा.
तुम्ही कोण लागून गेलात ते मृत्यू लसीपायी झालेत म्हणायला ? तिथले डॉक्टर म्हणतायत लसींचा काडीमात्र संबंध नाही.
दावा कशाच्या आधारावर ? Are you kidding ?
VAERS चा शंभर टक्के विदा खरा मानला तरी अत्यंत टायनी मायनोरीटी लोकांना लसीमुळे त्रास झाला असा निष्कर्ष निघतो. त्याउलट, मृत्यूचा ग्राफ पहिला कि लस न घेणारे किती जास्त प्रमाणात मरतात हे समजेल.
पटरी बदलली. कोव्हिड मुले मायो होत नाही असे शंभर टक्के चुकीचे मत उघडकीला आल्यावर "कोव्हिड मुळे पण मायो होतो आणि फ्ल्यू मुळे पण मायो होतो त्यामुळे दोन्ही रोग एकसारखे" असे अत्यंत बालिश तर्क लढवायचे.
फ्ल्यूमुळे अमेरिकेत दरवर्षी ६०,००० पर्यंत मृत्यू होतात. त्याच अमेरिकेत कोव्हिडचे आतापर्यंत १० लाख मृत्यू झालेत. काही लोकांच्या फॅन्टसी मेट्रिक मध्येच कोव्हिड आणि फ्ल्यू एकसारखे आजार आहेत.
बाकी किती लोकांना सदर लसीमुळे झालेल्या डॅमेजचे पैसे दिलेत हे सांगा बघू.
3 Aug 2022 - 7:48 am | कॉमी
गामांची कोरोना बाबत वादशैली All rhetoric, no substance अशी आहे.
11 Aug 2022 - 10:04 am | आग्या१९९०
संपादक मंडळ, लक्ष द्यावे.
आरोग्याच्या बाबतीत असे उलटसुलट दाव्यांमुळे नुकसान होऊ शकते.
कोविड हा विषाणूवर संशय, RT PCR चाचणीवर संशय. कोविडमुळे मृत्यू होत नाही असा दावा. वैद्यकीय क्षेत्रातील मिपाकरांनी हे सर्व दावे खोडूनही रोज तेच तेच दळण चालूच आहे. खरंच काहीतरी नियम करा अशा आरोग्य धाग्यांसाठी.
11 Aug 2022 - 5:33 pm | गामा पैलवान
कॉमी,
१.
मिसळपाव हे संकेतस्थळ म्हणजे वैद्यकीय सुविधा नव्हे. मेकॉलेछाप शिक्षणाने मेंदू बथ्थड झाला असल्यास नुकसान होऊ शकते. मिसळपाववरील चर्चेने नाही.
२.
तुमचे हे विधान म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील मतभिन्नता नाकारणे आहे. तुमची वागणूक सकलनियंता ( totalitarian ) पद्धतीची आहे.
सार्स-कोव्ह-२ नामे विषाणू अस्तित्वात नसल्याचे छातीठोकपणे सांगणारे अनेक तत्ज्ञ जगभरात आहेत. त्यापैकी एकीचं चलचित्रं पुढे दिलं आहे.
३.
आरोग्य धाग्यांपुरता नियम केला तर तो पुढे वाढवून त्यातनं मेकॉलेछाप स्कोअरची प्रणाली निर्माण केलेली बरी पडावी. ती सर्वसमावेशक म्हणून अधिक उपयुक्त असेल. कुणापासून किती नुकसान संभवतं याचा अंदाज येईल.
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2022 - 5:33 pm | गामा पैलवान
लोकहो,
पूर्णिमा वाघ नामे अमेरिकेतल्या विषाणूतत्ज्ञेने सार्स-कोव्ह-२ नामे कोणताही विषाणू नसल्याचं उघडपणे सांगितलं आहे. संबंधित इंग्रजी चलचित्र ( पावणेसहा मिनिटे) : https://www.bitchute.com/video/aRUYydaFRlYQ/
चलचित्रं चालंत नसल्यास कृपया व्यनि करणे. माझ्याकडील स्थानिक प्रतीचा दुवा पाठवेन.
चलचित्राचा उडता सारांश : बाईंनी CDC कडून रोग्यांच्या रक्ताचे ( की इतर स्रावाचे ) नमुने मागवले. सदर नमुन्याचं पृथक्करण केल्यावर विषाणू सापडला नाही. केवळ पेशीय डबर ( debris ) सापडलं. नंतर हे नमुने काही प्राण्यांना टोचले. ते प्राणीही निरोगी व खुटखुटीत राहिले. बाईंनी CDC शी संपर्क साधून निरीक्षणांची माहिती दिली. त्यावर CDC ने विषाणू सापडल्याचं खोटच दडपून सांगायची सक्ती केली. ती प्रयोगशाळेने नाकारली. तेव्हा FBI ने बाईंच्या प्रयोगशाळेवर धाड घातली. धाडीत बराच ऐवज नेला. पण बाईंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरावे इतरत्र हलवले होते. दरम्यान आपलं संशोधन तपासून पाहण्यासाठी बाईंच्या प्रयोगशाळेने सुमारे शंभरेक विद्यापीठांशी संपर्क साधला. त्यापैकी केवळ ६ विद्यापीठांनी त्यांचं संशोधनकृती परत आचरून निष्कर्ष तपासून पहायची तयारी दर्शवली.
बाईंची इंग्रजीतली पूर्ण मुलाखत ( ऐंशी मिनिटे ) : https://www.bitchute.com/video/MRT2yqyMeiVR/ ( मी आजून बघितलेली नाही. सवडीने बघेन. )
चलचित्रं चालंत नसल्यास कृपया व्यनि करणे. माझ्याकडील स्थानिक प्रतीचा दुवा पाठवेन.
असो. करोना विषाणू अस्तित्वात नाही.
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2022 - 7:03 pm | कॉमी
असे ह्या बाई बोलत आहेत.
पुन्हा एकदा संपादक मंडळास साद घालतो.
कोणत्याही रँडम व्यक्तीचे व्हिडीओ देणे चालू झाले आहे आता.
11 Aug 2022 - 8:27 pm | प्रचेतस
धाग्याच्या सुरुवातीस मिपा व्यवस्थापनाने लाल अक्षरात दिलेली सूचना दिसतेय :)
11 Aug 2022 - 9:11 pm | कॉमी
via GIPHY
14 Aug 2022 - 7:15 pm | गामा पैलवान
कॉमी,
अमेरिकेच्या रोगप्रतिबंध व रोगनिवारण केंद्राने ( CDC ने ) लसवंत व लसविहीन दोघांनाही एकाच तागडीत तोललं आहे. बातमी : https://www.thetimes.co.uk/article/novak-djokovic-given-us-open-hope-as-...
वरील बातमीनुसार CDC च्या मते
मग लस घ्यायचीच कशाला?
आ.न.,
-गा.पै.
14 Aug 2022 - 8:20 pm | कॉमी
मृत्यू, गंभीर आजार आणि इस्पितळात भरती होण्याचा धोका टाळण्यासाठी.
19 Aug 2022 - 7:19 pm | सुबोध खरे
@ कॉमी
वाद घालण्याचा आपला संयम सोशिकपणा आणि चिकाटी याबद्दल आल्याला साष्टांग नमस्कार.
पण मी सुरवातीलाच लिहिलं आहे कि
"आकाशातील ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही"
अर्थात मला आपल्याइतका संयम सोशिकपणा अजिबात नाहीच
12 Aug 2022 - 2:35 am | गामा पैलवान
कॉमी,
१.
खास तुमच्या माहितीसारही म्हणून सांगतो. अमेरिकेतील सरकारी संस्था CDC ने ३१ डिसेंबर २०२१ पासून RT-PCR चाचणी आपत्कालीन वापरार्थ ( Emergency use ) बंद करायला सांगितली आहे. सदर वार्ता ( इंग्रजी लेख ) : https://www.cdc.gov/csels/dls/locs/2021/07-21-2021-lab-alert-Changes_CDC...
२.
पूर्णिमा वाघ या रँडम व्यक्ती आहेत का ते वाचकांनी ठरवावं. त्यांची कारकीर्द अशी आहे :
माझ्या मते त्या रँडम व्यक्ती नसून विषाणूतत्ज्ञा ( virologist ) व शरीररक्षायंत्रणातत्ज्ञा ( immunologist ) आहेत.
आ.न.,
-गा.पै.
12 Aug 2022 - 7:16 am | कॉमी
बीएस्सी फायनान्स आणि एमबीए फायनान्स ! बाप्रे !
12 Aug 2022 - 8:21 am | Trump
त्यांनी क्षेत्र बदलले दिसत आहे. पुढील दोन विद्या स्नातक पदव्याही (PhD) पहा.
बाकी चालु द्या.
12 Aug 2022 - 8:42 am | कॉमी
खरंय. वाघ बाईंच्या पात्रतेवर प्रश्न करणे हे चुकीचे ठरेल. मी फार गंभीरपणे तो प्रतिसाद लिहिला नव्हता.
तरीही, बाई वाट्टेल ते बोलत आहेत. "मंकिपॉक्स हा रोग नसून कोव्हिड लसींचा दुष्परिणाम आहे" असे म्हणत आहेत. हे अनेक पातळ्यांवर मूर्खपणाचे विधान आहे.
१. मंकीपॉक्स हा नवा रोग नाही. जुनाच आहे. मंकीपॉक्स जर खरोखर लसीचा दुष्परिणाम असता तर आत्तापर्यंत करोडो लोकांना झाला असता.
२. सध्या तरी मंकीपॉक्स बराचसा समलैंगिक पुरुषांमध्येच पसरताना दिसत आहे, आणि संख्येने कमी लोकांना झाला आहे (लसी घेतलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत.)
तसेच, मी सायंटिफिक कन्सेन्शस मानतो. मी स्वतः व्हायरॉलॉजिस्ट किंवा इम्युनॉलॉजिस्ट नसल्याने प्रत्येक एक आणि एक मतभेद समजून घेउ शकत नाही. आणि, मेन्स्ट्रीम मते मानतो.
12 Aug 2022 - 9:22 am | गवि
अहो, समलैंगिकताही लशीमुळे येत असू शकेल. व्हेअर आर यू? अं ?!!
शोधा म्हणजे सापडेल (एखादा रिसर्च पेपर - कुठे ना कुठे)
12 Aug 2022 - 9:48 am | कॉमी
गामाजींच्या लिगमधला सुप्रसिद्ध अॅलेक्स जोन्स म्हणून माणूस आहे, त्याचे कालातील वक्तव्य आठवले-
THEY ARE TURNING THE FREAKINN FROGS GAY !!!!
Alex Jones Gay GIFfrom Alex Jones GIFs
John Jonah Jameson Lol GIFfrom John Jonah Jameson GIFs
26 Jul 2024 - 10:22 am | कॉमी
इथेही अपडेट.
ह्या वाघ बाई complete थापाड्या आहेत. (Surprise!)
ह्यांची सालीसबरी मधली डिग्री फायनान्स मधली नसून लिबरल आर्ट्स मधली आहे.
त्यांच्या PHD बाबत -
UPDATE: The London School of Hygiene and Tropical Medicine has checked in with the following statement this morning from their press office: “Nobody by the name of Poornima Wagh has obtained a degree from our institution.” We have also received a second confirmation from Roger Watson: “I have it from the dean of Faculty of Infectious and Tropical Diseases at LSHTM, Alison Grant, that nobody of her name has obtained any degree from their institution.”
Update Thursday, September 1: The London School of Hygiene and Tropical Medicine has confirmed: “Nobody with the last name Wagh, including as part of a hyphenated surname or as part of a surname containing the letters in that order, has obtained a degree from this institution.”
पूर्ण लिंक गामा शांतपणे वाचतील अशी आशा आहे.
27 Jul 2024 - 7:18 pm | नठ्यारा
कॉमी,
वाघबाई असोत थापाड्या. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्यांची उत्तरं कोण देणार? इथे त्यांची मुलाखत आहे : https://rumble.com/v1ga1e5-dr.-merritt-interview-with-poornima-wagh-phd-...
पूर्ण मुलाखत २ तासांची आहे. मी पहिला अर्धा तास बघितला. त्याचा धावता आढावा येणेप्रमाणे :
१. १०.०० मिनिटे : पूवा सांगतात अधिकृतरीत्या कॉक्सिडियोडीस इमिटिस नामे बुरशी कसलासा आजार पसरवते. वाघ बाईंना मातीच्या अनेक ( २०० + ) नमुन्यांतून सदर बुरशी विलग करता आली नाही. म्हणून त्यांनी क्यालिफोर्निया आरोग्य समितीस विचारलं. तर समिती म्हणते की म्हणे कधीकधी ही बुरशी सापडंत नाही. ही काय जादूबिदू आहे का? की काही वेळा बुरशी सापडावी आणि काही वेळा गायब? खरंतर ही मिथाईल ब्रोमाईड च्या विषबाधेमुळे दिसणारी लक्षणं आहेत. हा बेकायदेशीर द्रव कालीफोर्नियातले शेतकरी फळांवर सर्रास मारतात.
करोनाचा विषाणूही असाच न सापडणारा नाही हे कशावरून ? बुरशी तर विषाणूच्या मानाने अतिप्रचंड आकाराची असते. ती जर सापडणार नसणारे तर विषाणू काय सापडणार !
२. १५.५० मि. : शैक्षणिक जगतातील अनेक संस्थांनी पूवा यांची माहिती / तथ्ये निष्कर्षनीय नसल्याच्या ( inconclusive ) कारणाखाली नाकारली. तथ्ये नाकारण्यात काय हशील?
३. १७.३० मि. : नमुना विलग केला तरी त्यामुळेच रोग होतो हे कुठेही सिद्ध होत नाही. ( माझं मत : रोग नमुन्यामुळे होतो हे सिद्ध करायला रोग्याच्या शरीराचा नमुना लागतो. कुठल्याशा पाण्याचा वा मातीचा नव्हे. )
४. १८.३० मि. : हल्ली विषाणूशास्त्र ( व्हायरॉलॉजी), सूक्ष्मजीवशास्त्र ( मायक्रोबायोलॉजी ), रोगशास्त्र ( पॅथोलॉजी) सगळे केवळ जेनॉम मापन करण्यात गुंतले आहेत. प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम करणं सोडून दिलं आहे. कोश चे निकष सरसकट धाब्यावर बसवले जातात.
५. १९.५५ मि. : जैवज्ञापन ( बायो इन्फॉर्मेटिक्स ) हे मापनशास्त्र आहे. ते विषाणूशास्त्र नव्हे.
६. २१.२० मि. : पीसीआर तंत्राचे निकाल बघितले तर सर्व मानवी जेनॉम मिळतो. ( मा.म. : हे खरंय का? खरं असल्यास करोना हा स्वतंत्र जीव नसून मानवी शरीराचा भाग झाला. )
७. २३.३० मि. : क्रिस्पर तंत्राच्या सहाय्याने जनुके कापता येत नाहीत. ( मा.म. : हे खरंय का? )
८. २८.१० मि. : एक विषाणू घ्या. आकार फक्त ८० नानोमीटर्स. तो पोकळ करा, त्यात जनुकीय मालमसाला भरा. हे सगळं शक्य आहे का? असं कोणतं तंत्र सध्या अस्तित्वात आहे? ( मा.म. : विषाणूपासून लसनिर्मिती ही केवळ बडबड आहे का ?)
मला वाटतं एव्हढ्या शंका वाघबाईंची विषयांतली तयारी दाखवतात. भले त्यांच्याकडे कसलीशी पदवी नसेल. तसंही त्या पदवीस विचारतो कोण ! रोकडा अनुभव आणि तंत्रावर हुकमत आहे ना, मग झालं.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
12 Aug 2022 - 9:01 am | रंगीला रतन
कॉमी तुसी ग्रेट हो :=)
what is the secret of your energy?
गामा पैलवान आणी तुमच्यावर एकविरा आईची कृपा कायम राहूदे
14 Aug 2022 - 11:52 pm | गामा पैलवान
लोकहो,
अमेरिकेतील रोगनियंत्रण व रोगनिवारण केंद्राने ( CDC ने ) करोनासंबंधी लसवंत व लसविहीन यांना एकाच प्रकारचं मार्गदर्शन लागू करून करोनाच्या थोतांडावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासंबंधी एक लेख ( इंग्रजी दुवा ) : https://www.zerohedge.com/markets/cdc-says-people-exposed-covid-no-longe...
सदर लेखाच्या शेवटास उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयव्हरमेक्टिन व इतर घटक असलेली आरोग्यथैली जनतेत वितरीत करून करोनाच्या साथीस आवर घातला. कुठलेसे व्हेन्टिलेटर आणि कसलीशी लस टोचण्यापेक्षा हा उपाय अधिक प्रभावशाली ठरला.
गंगेत फेकून दिलेली प्रेते आणि ठिकठिकाणी जळणाऱ्या चिता वगैरे औषध कंपन्यांच्या दलालांनी पसरवलेल्या खोट्या बातम्या होत्या. आयव्हरमेक्टिन या परिणामकारी औषधावर कोणीच काहीही बोलायला तयार नव्हतं. मज्जा आहे, नाही?
आ.न.,
-गा.पै.
17 Aug 2022 - 12:35 pm | विवेकपटाईत
गंगेत प्रेत वाहण्याचा आणि करोंना यांत कुठलाही संबंध नाही. गंगेत जलसमाधी देणे काठावरच्या लोकांची परंपरा आहे. दहा बारा वर्ष आधी एनडीटीव्ही वर एक कार्यक्र्म ही यावर आला होता. जो पर्यन्त लोक गंगेत जलसमाधी देणे बंद करणार नाही गंगा स्वच्छ कशी होईल. दरवर्षी किमान 40 ते 50 हजार प्रेतांना जलसमाधी दिली जाते. बाकी स्मशानातले जळत्या चिता म्हणजे, म्हणजे आता आमच्या जवळचे स्मशान घाट अर्थात पालम गावाच्या स्मशानाचे रात्री चित्र घेतले तर किमान 10 ते 12 चिता जळताना दिसतील. (150 च्या जवळ चिता स्टँड तिथे आहेत). बाकी योगी आदित्यनाथ यांनी त्या काळात राज्यातील सर्वच होस्पिटलांची जातीने भेट घेऊन तिथली व्यवस्था ठीक केली. त्यामुळे उत्तर परदेशात हॉस्पिटल मध्ये मृत्यू दर कमी होती. बाकी उत्तर प्रदेश बिहार इथले लोक करोंना काळात रोज चहात आले, काळी मिरी, तुळशी इत्यादि घेत होतेच.
19 Aug 2022 - 5:41 pm | गामा पैलवान
लोकहो,
चारचार लशी ठोकवून घेऊनही बुरळ्यात करोना सापडलाच. संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.pfizer.com/news/announcements/statement-pfizer-chairman-and-...
आता, करोना सापडला म्हणजे रोग झाला असं धरायचं का ? की क्लिनिकल इन्फेक्शन नाहीये म्हणून रोग झाला नाही असं धरायचं ?
चारचार ढोस घेऊनही अंगात करोना सापडणार असेल तर लस घ्यायचीच कशाला? की लस हाच एक रोग आहे, त्यामुळे वेगळ्या रोगाची गरजच नाही?
आ.न.,
-गा.पै.
19 Aug 2022 - 7:15 pm | बेकार तरुण
आमीर खान, अक्षय कुमार तसेच रणबीर कपूर ने लशीचे ३ ही डोस घेतल्यानेच त्यांचे चित्रपट धडाधड आपटत आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे.....
(लवकरच याविषयी कायप्पा युनि ला लिहुन डॉक्टरेट मिळवेन म्हणतो).......
तरी आपली मते जाणुन घ्यायला आवडतील... (विरोधी मतांना ईग्नोरे करण्यात येईल हे वे सां न ल.....)
19 Aug 2022 - 7:20 pm | सुबोध खरे
हायला
काय हसलोय मी
हा हा हा हा ~~
19 Aug 2022 - 8:14 pm | आग्या१९९०
कोरोनाने मृत्यू होत नाही आणि कोरोनाची लस घेतलेल्यांचा भविष्यात मृत्यू झाला तर तो लसिमुळेच झाला अशी लवकरच WHO घोषित करणार आहे.
19 Aug 2022 - 9:33 pm | गामा पैलवान
अमेरिकेच्या CDC ने ल्स्वंत व लसविहीन दोघांनाही एकाच तागडीत तोलायचं निर्णय का घेतलाय मग? याचाच अर्थ लस बंडल आहे.
-गा.पै.
26 Aug 2022 - 6:52 pm | सुबोध खरे
कोरोनाने मृत्यू होत नाही
हायला
इतक्या लोकांनी आत्महत्याच केल्या म्हणायचं आणि इतर लोकांनी लस घेऊन आत्महत्येचा पर्याय निवडलाय म्हणा कि !
लैच हसलो बघा
3 Jul 2024 - 7:58 pm | नठ्यारा
घ्या, नेचर प्रकाशनाने प्रसिद्ध केलंय की mRNA लशीमुळे हृदयविकार ( myocarditis and pericarditis ) होतात : https://www.nature.com/articles/s41541-024-00893-1
हॉंगकॉंगच्या डॉक्टरांनी याच तथ्यावर प्रकाश टाकलाय : https://www.cell.com/med/fulltext/S2666-6340(24)00080-1#%20
एकंदरीत करोनाची लस थोतांडी असून जीवघेणीही आहे.
-नाठाळ नठ्या
3 Jul 2024 - 10:28 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद....
3 Jul 2024 - 11:02 pm | रामचंद्र
आपण स्वतः करोनाप्रतिबंधक लस घेतली होती का?
3 Jul 2024 - 11:08 pm | नठ्यारा
दुवा गंडल्यामुळे हॉंगकॉंगमधल्या डॉक्टराचा लेख परत उद्धृत करतो आहे :
https://www.cell.com/med/fulltext/S2666-6340(24)00080-1#%20
सदर डॉक्टर हिंग-वै-झांग ( Hing Wai Tsang ) यांचे इतर लेख व परिचय : https://www.researchgate.net/profile/Hing-Wai-Tsang
-नाठाळ नठ्या
3 Jul 2024 - 11:09 pm | नठ्यारा
रामचंद्र,
आपण स्वतः करोनाप्रतिबंधक लस घेतली होती का?
आजिबात नाही. म्हणूनंच तर मी जिवंत आहे. :-)
-नाठाळ नठ्या
3 Jul 2024 - 11:42 pm | रामचंद्र
व्यावहारिकदृष्ट्या संपूर्णपणे अविचारी वाटूनही आपण आपल्या विचाराशी ठाम राहिलात याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच. कारण मोठमोठे देशी उपचारांचे पुरस्कर्ते जिवावर बेतले की चट प्रचलित ॲलोपॅथिक उपचार (गुपचूप) घेतात. मात्र असे करताना कुटुंबीय/सहकारी/सरकारी यंत्रणेतील कर्मचारी यांचेसमवेत आपण कसे जमवून घेतले असेल, याविषयी कुतूहल आहे.
4 Jul 2024 - 10:37 pm | नठ्यारा
रामचंद्र,
प्रशंसेबद्दल आभार! :-) इथे इंग्लंडात लशीविषयी शंका विचारणारे बरेच आहेत. शिवाय रुग्णांचे अधिकार बरेच काटेकोरपणे सांभाळले जातात. तसेच मला हृदयविकार आहे. त्यामुळे लशीची सक्ती करता येत नाही. परंतु अनेक नातेवाईकांनी लस घेतली. त्यांच्या बाबतीत प्रार्थना करणे इतकंच माझ्या हातात होतं. ते मात्र नेटाने केलं.
बाकी, उपचारांचं म्हणाल तर जे आपला जीव वाचवतील ते सारे आयुर्वेदिक. असा माझं मत आहे. मग ते आलोपथिक असले तरी आयुर्वेदिकच म्हणायचे. कारण की ते माझं आयुर्मान वाढवणारे आहेत. आणि आजूनेक गंमत म्हणजे करोनावर फक्त आयव्हरमेक्टिन हा एकमेव उपचार आहे. मला जर संसर्ग झाला असता तर सरळ आयव्हरमेक्टिन घेतलं असतं. मामला खतम.
-नाठाळ नठ्या
5 Jul 2024 - 4:47 am | चौकस२१२
आपला तर आपल्या येथील सरकार वर भरोसा आहे बावा ... सरकार ने ज्या काही लशी दिल्या त्या घेतल्या
सरकार ने ३-४ वर्षे देशाबाहेर जायला बंदी घातली ती पाळली
तो नाठाळ जोकवीच लस ना घेता टेनिस खेळायला बघत होता त्याला हाकलून दिले सरकारने ,, आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला
जे सरकार रक्ताच्या चाचणी पासून एम आर आय फुकट देते त्यावर का विश्वास ठऊ नये माणसाने !
आणि "सर्व थोतांड " कॉन्स्पिरसी वाल्यांपेक्षा सरकार बरे , सरकार कडे जबाबदारी असते ,, कॉन्स्पिरसी वाले कोणती जबाबदारी उचलतात
4 Jul 2024 - 2:04 pm | टर्मीनेटर
सेम पिंच गा.पै.
"आपल्याला तर माहितीच आहे ना इम्युनिटी कशी वर्क करते ,मग या घाईघाईत बनवलेल्या लसीचे गिनीपिग कशाला व्हायचे?"
ह्या भक्तींच्या दुसऱ्या एका धाग्यावरील प्रतिसादातील त्यांच्या मित्राच्या विचाराशी माझे विचार १००% जुळत असल्याने मी पण 'नाही म्हणजे नाहीच घेतली' ही लस!
4 Jul 2024 - 2:11 pm | टर्मीनेटर
आणि हो, वरच्या प्रतिसादात आपल्याप्रमाणे 'करोना' आणि 'लसी' विषयी त्यांना थेट 'थोतांड' वगैरे म्हणण्याएवढे माझे टोकाचे विचार नाहीत हे नमुद करायचे राहुन गेले आहे 😀
5 Jul 2024 - 12:05 am | रामचंद्र
गा.पै./ना.न. आणि टर्मिनेटर या खऱ्याखुऱ्या तत्त्वनिष्ठ (पण अनुकरणीय? ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर!) महोदयांचे मनापासून अभिनंदन!
5 Jul 2024 - 6:15 am | गवि
या सर्वात हे लक्षात घ्यायला हवे की जी जोखीम लस घेण्यात आहे तीच जोखीम (हृदयविकार रिस्क) ही (अधिक जास्त, निश्चित आणि तीव्र स्वरूपात) प्रत्यक्ष कोविड विषाणूचा संसर्ग होण्यामध्ये देखील आहे.
ते इन्फ्लेमेशन आणि हृ वि झ शक्यता ही लस किंवा प्रत्यक्ष विषाणू या दोन्हींत आहे. आणि विषाणूचे थेट इन्फेक्शन होऊन लस घेतली नसल्यास जो तुलनेत तीव्र आजार होतो त्यात तर ही हृदयाला रिस्क अनेक पट जास्त आहे. तेव्हा जरी लस घेण्यात काहीसा वाढीव धोका असला तरी लस न घेतल्याने तो टळतो असे समाधान चुकीचे वाटते. हां जर कायम निर्जंतुक खोलीत कोंडून घेऊन कोविड संसर्ग टाळणार असाल तर मग लस टाळणे समजून घेता येईल. पण हा संसर्ग टाळणे अशक्य आहे.
5 Jul 2024 - 10:22 am | सुबोध खरे
दोन्ही दुवे पूर्ण वाचले
एम - आर एन ए लशी मुळे हृदयविकार ( myocarditis and pericarditis ) होतात.
पण भारतात हि लस न देता पूर्ण विषाणू ची लस दिलेली होती. (कोव्हीशील्ड अथवा कोवॅक्सिन). या लसीमुळे असे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत.
तेव्हा नठ्यारा यांचे एकंदरीत करोनाची लस थोतांडी असून जीवघेणीही आहे. हे वक्तव्य अर्धवट माहितीवर आधारित, गैर समज पसरवणारे आणि दिशाभूल करणारे आहे.
त्यांनीच दिलेल्या दुव्यामधले हे वाक्य उद्धृत करत आहे. Available evidence shows that COVID-19 mRNA vaccination is associated with an increased risk of myocarditis, but at a much lower level than the risk associated with COVID-19 infection, reiterating a clear positive benefit/risk ratio for COVID-19 mRNA vaccines
मुळात किती लाख लोकांना एम आर एन ए लस दिली होती आणि त्यातील किती टक्के लोकांना हृदयदाह झाला हे प्रमाण फारच अल्प आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
आपण स्वतः करोनाप्रतिबंधक लस घेतली होती का?
आजिबात नाही. म्हणूनंच तर मी जिवंत आहे. :-)
-नाठाळ नठ्या
मी डोळे मिटून रेल्वे लाईन पार केली तरी मी जिवंत आहे
म्हणजेच रेल्वे लाईन पार करताना डोळे उघडे ठेवायची गरज नाही.
याच तर्हेचा भंपक युक्तीवाद आहे हा.
5 Jul 2024 - 11:42 am | गवि
+१
हे माझे वाचलेल्या, ऐकलेल्या माहितीवर आधारित म्हणणे वर लिहिले होते. त्यात कितपत तथ्य आहे?
म्हणजे लस न घेता थेट विषाणू लागण झाली तर तो विषाणूच हृदयाला हानीकारक ठरू शकतो हे बरोबर आहे का?
5 Jul 2024 - 12:19 pm | सुबोध खरे
बरोबर
कोव्हीड च्या विषाणूंमुळे हृदयाच्या स्नायूंचा दाह ( MYOCARDITIS) होऊन कित्येक रुग्ण मृत्यूच्या दारात गेलेले मी पाहिलेले आहेत.
सुरुवातीला हा हृदयविकार आहे का अशी डॉक्टरांना शंका येत असे.
यात एक माझा स्वतःचा मावस भाऊ होता.
केवळ त्याचे सुदैव आणि एकंदर कोणतेंही व्यसन आणि आजार नसणे, मिताहार आणि सडपातळ शरीर यामुळेच तो त्यातून बाहेर आला. आजार इतका होता कि रुग्णालयातून घरी पाठवले तेंव्हा एक जिना सुद्धा चढण्याची शक्ती त्याच्यात उरली नव्हती.
पण पूर्ण बरा होण्यासाठी त्याला जवळ जवळ एक वर्ष लागले.
6 Jul 2024 - 1:23 am | नठ्यारा
सुबोध खरे,
वरीलपैकी एका दुव्यात हे लिहिलेलं आहे :
म्हणजे कसलीही माहिती नसतांना काटेरी प्रथिनं रक्तात सोडणे व बनवणे कितपत सुरक्षित आहे?
आता तुमची एकेक विधाने पाहूया.
१.
आजवर करोनाचा विषाणू विलग ( isolate ) केलेला नाहीये. मग लस कुठून बनवणार?
२.
आयव्हरमेक्टिन हे नाव तुम्ही ऐकलं असेल. ते घ्यायचं असतं, करोना किंवा फ्ल्यू ची शंका आल्यावर. प्रतिबंधासाठी ते योगी आदित्यानाथांनी वाटलेलं उत्तर प्रदेशात. याबद्दल माहिती : https://www.livemint.com/news/india/covid19-australian-mp-praises-uttar-...
बेभरवशाच्या लशीपेक्षा आयव्हरमेक्टिन कितीतरी बरं.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
6 Jul 2024 - 12:39 pm | सुबोध खरे
@नठ्यारा
तुमच्या गृहीतकांचा डोलारा मुळातच असत्यावर आधारित असल्यामुळे त्यावरील इमारत ही पोकळ आणि तकलादू झालेली आहे.
SARS-CoV-2 has been isolated and its complete genome has been sequenced
By Reuters Fact Check
https://www.reuters.com/article/fact-check/sars-cov-2-has-been-isolated-...
25 Jul 2024 - 2:24 am | नठ्यारा
सुबोध खरे,
क्लिनिकल इन्फेक्शन झालेल्या रोग्यापासून विषाणू मिळवला आहे का? तसं दिसंत तरी नाही. तुम्ही दिलेला लेख मार्च २०२१ मधला आहे. इथे इंग्लंडच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने ऑक्टोबर २०२१ मध्ये म्हंटलंय की विषाणू विलग केल्याचा विदा आमच्याकडे नाही : https://www.ons.gov.uk/aboutus/transparencyandgovernance/freedomofinform...
काय खरं धरायचं?
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
25 Jul 2024 - 10:33 am | सुबोध खरे
We do not hold any data on the isolation or extraction of the COVID-19 virus relating to any questions in your request. Your request may be better placed with the lighthouse lab at Glasgow or with the UK Health Security Agency (UKHSA). They can be contacted via email at enquiries@ukhsa.gov.uk or via FOI email at InformationRights@UKHSA.gov.uk.
सांख्यिकी विभागाला विचारा, मुंबईत किती मल्याळी आहेत?
ते सांगतील आमच्याकडे विदा नाही
म्हणजे मुम्बैत मल्याळी नाहीतच का?
absence of evidence is not the evidence of absence.
26 Jul 2024 - 9:54 am | कॉमी
सामान्य माणूस समोर आलेल्ली माहिती वाचतो. त्यावर प्रश्न आले कि इतर माध्यमातून माहिती मिळवतो. ही माध्यमे जनरली विदा गोळा करणाऱ्या संस्था, पिअर रिवयू झालेले संशोधन ही असतात.
सदर धागालेखक व त्यांची समविचारी लोकं आधी मत बनवतात. ह्या मतांचा स्रोत त्यांच्या समाजमाध्यमांचा बुडबुडा असतो. मग त्या मताला सिद्ध करण्यासाठी ही लोकं रिसर्च शॉपिंग साठी इंटरनेट वर येतात. त्यातलेही धड वाचून समजावून घेण्याची सहनशक्ती नसते. एखादे वाक्य अर्धवट वाचून तेव्हा सगळीकडे चिकटवत फिरायचे!
26 Jul 2024 - 1:39 pm | मुक्त विहारि
absence of evidence is not the evidence of absence.
----
6 Jul 2024 - 12:44 pm | पॅट्रीक जेड
लसीकरणानंतर मला माझ्यात दोन फरक जाणवलेत. धाप लागते वार चढलो की आणी नखे प्रचंड वेगाने वाढताहेत.
26 Jul 2024 - 3:20 pm | कर्नलतपस्वी
नखे झपाट्याने वाढत आहेत,तर मग वाढवा ना....
गिनीज बुक मधे नाव नमूद होईल, विश्वविक्रम आपल्या नावावर होईल. मिपाकरांची मान उंचावेल व भारताचा झेंडा त्रिखंडात पोहोचेल.
लोक म्हणतील पुत्र व्हावा
ऐसा ज्याच्या लांब नखांचा गवगवा....
26 Jul 2024 - 4:00 pm | मुक्त विहारि
२००
30 Jul 2024 - 8:57 am | कॉमी
A large meta-analysis found that the relative risk of COVID-19 vaccine-associated myocarditis was two compared to 15 for COVID-19 infection-associated myocarditis, a seven-fold increase in risk for infection associated myocarditis
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9967770/#B68-vaccines-11-00362
31 Jul 2024 - 1:32 am | नठ्यारा
चित्रगुप्त,
अक्षरश: नशीबवान म्हणून जिवंत आहात. तुमच्या वाढलेल्या वयामुळे चयापचय मंदावला आहे. माझ्या मते त्यामुळेच तुम्ही वाचलात. तरुण असतात तर अचानक हृत्शूल ( हार्ट अॅटॅक ) होऊन परलोकवासी झाला असतात. लस घेतलेले असंख्य तरुण ( खेळाडू वगैरे ) अचानक हृत्शूलाने मेलेले आहेत.
असो.
माझ्या मते गुठळ्या रक्तातून पसरल्या त्यासोबत काटेरी प्रथिनेही शरीरभर पसरली. त्यांच्यामुळे तुमच्या फुफ्फुसांत रक्स्तसराव झाला. रक्त पातळकीची औषधे घेतल्याने गुठळ्या विरघळल्या, पण काटेरी प्रथिनांच्या उच्चाटनास थोडा वेळ लागेल. यथावकाश ती निघून जातील. कृपया घाबरू नये. आणि कोणतीही अपरिचित लस घेऊ नये.
जीवेत: शरद: शतम् !
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
31 Jul 2024 - 2:48 am | रामचंद्र
म्हणजे आपल्या मते करोनाची लस घेतलेल्या कोणालाही हा धोका उद्भवू शकतो आणि धडधाकट, चयापचय क्रिया अर्थात हालचाल भरपूर असलेल्यांना तर अधिकच, असंच ना? खरंच असं झालं तर करोनापेक्षाही लसबळींची संख्या मोठी होईल.
31 Jul 2024 - 7:15 am | चित्रगुप्त
तुम्ही म्हणता तसे झालेही असेल परंतु त्याचा विदा उपलब्ध होणे कठीणच आहे. रक्तात गुठळ्या होण्याच्या विविध कारणांपैकी ते एक असू शकेल. आणखीही अनेक कारणे असतात. मला इस्पितळातून जी कागदपत्रे दिली आहेत, त्यात ते सांगितलेले आहे. हवे तर वाचून नंतर कळवू शकतो. सुरुवात बहुतांशी पायापासून किंवा हातांपासून होते म्हणे. पण हात पाय दुखत आहेत म्हणून कोणी सिटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड वगैरे करवत नाहीत. काही महिन्यांपासून माझा एक पाय सतत दुखत होता. शेवटी छातीत कळा यऊ लागल्या, तेंव्हा इस्पितळात गेलो.
3 Aug 2024 - 9:59 pm | नठ्यारा
रामचंद्र,
नेमकं हेच म्हणायचं होतं मला. लसबळींची संख्या बरीच आहे. ती 'अचानक मृत्यू' वा तत्सम कारणाखाली दडपलेली आहे.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
31 Jul 2024 - 7:29 am | चित्रगुप्त
सगळे नशीबच. या अनुभवातून आता आणखी सावधगिरीने वागले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली आहे.
आधी पायात रक्त साकळून गुठळी/गुठळ्या झाल्या, मग त्याचे तुकडे होऊन ते फुफ्फुसात पहुचले असे रिपोर्टात लिहीलेले आहे.
-- दुसरे म्हणजे अमेरिकेत मुलासोबत असल्याने ताबडतोब इलाज करता आला. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे 'इमर्जन्सी' सदरात गणल्या जाणार्या व्याधींसाठी इन्शुरंस नसला, किंवा अजिबात पैसे नसले, तरी ताबडतोब उत्तम इलाज केला जातो. याउलट भारतात आम्ही दोघेच असल्याने मुळात आधी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रिक्षा वगैरे करून जाणे, इस्पितळ, डॉक्टर वगैरेंबद्दल काहीही माहिती नाही (तशी आवश्यकता कधी पडली नव्हती) अशा परिस्थितीत काय झाले असते कुणास ठाऊक.
'काटेरी प्रथिने' याबद्दल खुलासा करावा ही विनंती.
31 Jul 2024 - 7:47 am | गवि
सर्व ठीक झाले असते. आधी पैसे घेऊन या वगैरे हिंदी सिनेमात असते फक्त. भारतात इतके वाईट नाहीये वैद्यकीय बाबतीत. किमान शहरी भागात.
3 Aug 2024 - 9:57 pm | नठ्यारा
चित्रगुप्त,
काटेरी प्रथिने म्हणजे Spike Proteins. त्याविषयी इंग्रजीत इथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Spike_protein
तर अधिकृत मत काय ते सांगतो. तत्ज्ञांच्या मते करोना विषाणूच्या पृष्ठभागावर काटेरी प्रथिने असतात. तर ही प्रथिने ओळखण्याचे प्रशिक्षण आपल्या रक्षाप्रणालीस ( इम्यून सिस्टीम ) नसते. म्हणून लशीद्वारे काटेरी प्रथिने मुद्दाम टोचण्यात येतात, जेणेकरून रक्षाप्रणालीस त्यांची 'ओळख' व्हावी. मग जेव्हा करोना शरीरात घुसतो तेव्हा त्यास 'ओळखायचं' प्रशिक्षण आधीच पार पडलेलं असतं. मग रक्षाप्रणाली करोनास चटकन हुडकून काढते व त्याचा नाश करते.
आता या कथनीत अनेक कच्चे दुवे आहेत. लशीतून किती प्रमाणावर काटेरी प्रथिने सोडवीत, यावर काहीच मार्गदर्शन उपलब्ध नाही. प्रत्येकाचं शरीर निरनिराळं असतं, तदनुसार रक्षाप्रणाली वेगवेगळी असते. सगळ्यांना एकंच लस कितपत प्रभावी ठरेल हे कोणाशी माहीत नाही. शिवाय करोना हा काही गंभीर आजार नाही की ज्यामुळे माणसं मरावीत. सहव्याधी असल्या तरंच करोना घातक आहे. अन्यथा नाही. मग धडधाकट माणसास लस टोचून काय फायदा?
शिवाय व्हायरस म्हणजे नेमकं काय हे ही गुलदस्त्यातच आहे. हा विषाणू आजवर विलग केला गेलेला नाहीये. मग अस्तित्वात नसलेल्या विषाणूसाठी लस कशाला हवीये? तसेच लशीतून इतर अनर्थकारी पदार्थ घुसवले जात नाहीय, याचा काय भरवसा?
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
4 Aug 2024 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटी ? लशीचे धोके संपलेत का ? हायेत अजून ?
-दिलीप बिरुटे
5 Aug 2024 - 9:22 pm | नठ्यारा
प्राडॉ,
हा घ्या आजूनेक लसबळी ! माजी क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प परलोकवासी. बातमी : https://www.bbc.co.uk/sport/cricket/articles/c06kkkkjmz6o
पंचावन्नाव्या वर्षी वारण्यासारखी याची प्रकृती का बिघडली? त्रेपान्नाव्या वर्षी त्रास सुरू होऊन दोनेक वर्षांत चक्क मृत्यू?
आ.न.,
-ना.न.
6 Aug 2024 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा लसबळीच आहे हे कशावरुन ?
-दिलीप बिरुटे
7 Aug 2024 - 10:34 am | सुबोध खरे
नठ्यारा साहेब सान्गताहेत म्हणून
8 Aug 2024 - 1:16 pm | नठ्यारा
मी करोनाची लस अनन्यस्थ ( by default ) दोषी धरणार आहे. कारण की मला जिवंत राहायचं आहे. The corona vaccine is poisonous until proven otherwise. स्वत:स जिवंत ठेवण्यासाठी हा सर्वात सोपा व सुटसुटीत पर्याय आहे.
-नाठाळ नठ्या
8 Aug 2024 - 1:07 pm | नठ्यारा
प्राडॉ,
पंचावन्नाव्या वर्षी वारण्यासारखी याची प्रकृती का बिघडली? त्रेपन्नाव्या वर्षी त्रास सुरू होऊन दोनेक वर्षांत चक्क मृत्यू? या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं? अस्तित्वात नसलेल्या विषाणूवर लस टोचून घ्यायचीच कशाला?
एक संभाषण आठवलं.
पावणं : काय हो गाववाले हे लई ड्येंजार वळण हाये. हितं रस्त्याला कसलीशी चिठ्ठीचपाटी लावाया नगं?
गाववाले : आवो लावली व्हती की. पन सा म्हैनं आक्षीडंट झालाच नाय. म्हून काढून टाकली.
करोना खरंच अस्तित्वात आहे का? म्हणून लशीला चिठ्ठी लावावी म्हणतो. शिर सलामत तो लशी पचास.
आ.न.,
-ना.न.
23 Aug 2024 - 12:55 am | रामचंद्र
ऐन करोनाकाळात कितीतरी कुठल्याही सहव्याधी नसलेल्या तरुण व्यक्ती, बहुतांश लस घेतलेल्या पण काही न घेतलेल्याही अगदी तडकाफडकी गेल्याची उदाहरणे आहेत. त्यापैकी कित्येकांना खूप प्रयत्न करूनही ऑक्सिजन/व्हेंटिलेटर मिळू शकला नव्हता. तरुण वय आणि बऱ्यापैकी निरोगी असे हे रुग्ण त्या वेळी अगदी तीनचार दिवसांत मृत्युमुखी पडले. यापैकी गा. पैं. च्या म्हणण्यानुसार बहुतांश जर लस घेतल्यामुळे गेले, तर मग न घेतलेले कशामुळे गेले असावेत?
23 Aug 2024 - 1:02 pm | कॉमी
हा प्रश्न मी हि विचारला होता. एक्सेस मोर्टॅलिटी लस घेण्या आधीपासून खुप वर आहे.
25 Aug 2024 - 3:50 pm | नठ्यारा
रामचंद्र,
गरज नसतांना उपचार केले तर ते विषासमान असू शकतात. माझ्या माहितीत धडधाकट मृत्यूची एकही घटना नसल्यामुळे अशांच्या मृत्यूचं कारण मी ठामपणे सांगू शकंत नाही. खरंतर ते डॉक्टरांचं काम आहे. पण इथे तर असंख्य डॉक्टरंच डोळे मिटून प्रचारावर विश्वास ठेवताहेत. त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे.
आता डॉक्टरांकडे बोटं दाखवून झाल्यावर मी माझा स्वत:चा अनुभव मांडतो.
ऑगस्ट २०१९ ची गोष्ट आहे. हृद्रोहिणीत अडथळा आल्याने चिकित्सा ( angiogram ) व संभाव्य विस्फारजाळी बसवण्यासाठी ( possibly angioplasty ) रुग्णालयात हृदयविकार विभागात दाखल होतो. हा विभाग अतिदक्षता ( ICCU ) पातळीच्या एक पायरी खालचा आहे. तेव्हा नेमका मला फ्ल्यूचा ताप आला. तापात छातीत वेदना होऊ लागल्या. बहुतेक हृत्कोषास ( pericardium ) सूज आलेली असावी. पण मला माहीत नव्हतं व विचार करायची शक्तीही अंगी नव्हती. रात्री ०१०० च्या सुमारास परिचारिकेस बोलावून काय होतंय ते सांगितलं. तिने फक्त पराशीतमाल ( paracitamol ) दिली. पण वेदनांना आराम पडला नाही. मी ०१३० च्या सुमारास परत विनंती केली. तरीही तिने ती मानली नाही. कारण बहुधा माझी आरोग्यमापे ( health parameters ) व्यवस्थित होती. ती २४ तास निगराणीखाली होती. त्यांच्यात काही घसरण दिसंत नसल्याने परिचारिकेने फक्त एक जास्तीची पराशीतमाल दिली. इतर काही कार्यवाही केली नाही. पण माझ्या वेदनांना उतार पडंत नव्हता. शेवटी ०२०० च्या आसपास किंचित घाम आला व ताप उतरल्यासारखा वाटला. केव्हातरी वेदना कमी झाल्या. मग झोप आल्याने मी तसाच झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रक्त गोळा करून पृथक्करण केलं गेलं. त्यात बहुधा ट्रोपोनिन सापडलं. रात्रीच्या घटनांची नोंद होतीच. त्यावरून मला खरोखरंच अंजायनाचा झटका आला असावा असं निदान केलं गेलं. मात्र मला याची काहीच कल्पना दिली नव्हती. त्या दिवसापासून रक्तपातळकीचं अतिरिक्त इंजेक्शन पोटावरील चरबीत द्यायला सुरुवात झाली. यथावकाश दोनेक दिवसांनी हृच्चिकित्सा व विस्फारजाळीरोपण यशस्वीपणे पार पडलं.
आता हाच प्रसंग जर एक वर्षाने म्हणजे ऑगस्ट २०२० साली घडला असता तर काय झालं असतं माझं, या विचाराने जिवाचा थरकांप उडतो. फ्ल्यूचा ताप असला तरीही त्यावर उपचार करीत बसायचे नसतात. आजार हृदयाचा आहे. हृदयावर आणि हृदयावरंच उपचार झाले पाहिजेत. फ्ल्यूवर कोणी उपचार करीत नसतं. करोना फ्ल्यूसारखा विकार आहे. करोनावर उपचार करायचा नसतो. जर हाच प्रकार २०२० च्या ऑगस्टांत घडता तर डॉक्टर लोकं करोनावर उपचार करीत बसले असते. आणि मी गचकलो असतो. सर्व आरोग्यमापे बेतात असतांनाही मी का बरं गचकलो? उत्तर करोना आहे. तेच उत्तर माझ्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर आलं असतं.
हा माझा अनुभव आहे. इतर धडधाकट लोकांचे अनुभव वेगळे असू शकतात. काय ते समजून घ्या. बाकी, श्वासोत्तेजक ( ventilator ) हा उपचार नाही. ही अतिरिक्त मदत आहे. आसन्नमरण मनुष्यास तगावण्याची धडपड आहे.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
25 Aug 2024 - 10:44 pm | रामचंद्र
आपलं उत्तर वैद्यकीय तज्ज्ञांना बहुतेक पटणार नाहीच. पण अन्य काही विकाराने आजारी रुग्णाला त्यातच करोना झाल्यास फक्त करोनावरच उपचार केंद्रित केल्यामुळे त्या अन्य व्याधी बळावून रुग्ण दगावू शकतो, ही शक्यता आपण चांगली स्पष्ट केली आहे.
26 Aug 2024 - 7:30 pm | नठ्यारा
रामचंद्र,
नेमका हाच तर मुद्दा आहे. माझं उत्तर डॉक्टरांना न पटणारं असलं तरी चालेल. फक्त मला पटायला हवं जेणेकरून माझा जीव वाचेल.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
11 Sep 2024 - 5:11 pm | नठ्यारा
घ्या, आजची ताजी खबर : एमारेने लशीपायी बालक व तरुणाचे ( वय वर्षे ५ ते १५ ) हृदय व्रणग्रस्त होते. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.msn.com/en-gb/health/other/covid-19-mrna-vaccine-linked-to-m...
घ्या, डोंबलं आपटून.
-नाठाळ नठ्या