करोना : स्वलालधन्य जाहलो मी

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in काथ्याकूट
5 May 2022 - 8:22 pm
गाभा: 

महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत.

- मिपा व्यवस्थापन

लोकहो,

करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no...

सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे :

१.

रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.

हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ).

२.

आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :

ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ).

३.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.

हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 )

असो.

तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे.

आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया.

१.

करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817

नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/

श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर.

२.

टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945

हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं.

३.

करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745

रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन.

४.

माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413

आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे.

असो.

हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया.

धन्यवाद !

आपला नम्र,
-गामा पैलवान

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

5 May 2022 - 8:26 pm | गामा पैलवान

च्यायला, शीर्षकात स्वलालधान्य झालंय. ते स्वलालधन्य हवं होतं.

संपादक महाशय, कृपया हा बदल करणार का? धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

8 May 2022 - 3:25 pm | गामा पैलवान

नमस्कार संपादक महाशय. शीर्षक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. धान्यवाद नाही बरंका ! ;-)
आ.न.,
-गा.पै.

कंजूस's picture

5 May 2022 - 8:57 pm | कंजूस

आता पुढे काय?

कुठे विसा वगैरे हवा असल्यास लशीची सक्ती होती. ज्यांना जायचं होतं त्यांनी घेयली.

सुक्या's picture

5 May 2022 - 9:49 pm | सुक्या

लस घेण्यासाठी सक्ती केली होती हे मी कुठे वाचले नाही. लस घेणे सगळे ऐच्छीक होते. पण लस न घेतल्यांमुळे जर कुठे अडथळा येत असेल (पक्षी परदेश भ्रमण, कार्यालय, उपहार ग्रुह ई.) तर ते सर्वस्वी आपली जबाब्दारी होती. लोकडाउन नंतर जेव्हा आमच्या गावात उपहार ग्रुह पुन्हा सुरु झाले तेव्हा तिथे फक्त लसवंतांना प्रवेश होता. त्यावर काही व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला वगेरे वगेरे बोलत होते. तेव्हा जर लस न घेणे हे जर एखाद्याचा व्यक्तीगत निर्णय असेल तर त्याला प्रवेश द्यायचा की नाही हा पण त्या आस्थापणेचा निर्णय आहे. त्यात सक्ती करता येत नाही असा निर्णय झाला होता.

असो. या विषयावर खुप चर्वण झाले आहे .. तेव्हा इथेच थांबतो.

sunil kachure's picture

5 May 2022 - 10:12 pm | sunil kachure

लस घेण्याची सक्ती केलीच होती.फक्त सरळ सक्ती न करता वाकड्या मार्गाने केली होती.
इतके निर्बंध टाकले होते की माणसाला लस घेतली नसेल तसे बाहेर पडणे,प्रवास करणे,नोकरी करणे,शॉपिंग करणे,कठीण झाले होते.

सौन्दर्य's picture

5 May 2022 - 11:06 pm | सौन्दर्य

जर संचारबंदी किंवा लॉकडाऊन, टाळेबंदी, लसीकरण, मुखाच्छादन (मास्क), स्वच्छता वगैरे ह्यामुळे कोरोना आटोक्यात आला नाही तर मग तो कशामुळे आटोक्यात आला ?

काही वर्षांपूर्वी क्षय झालेल्या व्यक्तींना आयसोलेटेड जागेत किंवा हॉस्पटिलच्या वॉर्डमध्ये ठेवीत ज्यामुळे क्षय बरा होत होता की नाही ते माहीत नाही पण त्यामुळे रोग जास्त पसरू शकला नाही हे सत्य आहे.

जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व त्यावर रामबाण उपाय काय हे माहीत नसेल तर जे काही माहीत असलेले प्रतिबंधात्मक इलाज करणे, उपचार पाळणे हे गरजेचं आहे असं माझं मत आहे. कोरोना काळात जर माझ्या बाजूला येऊन एखादी व्यक्ती खोकू लागली व तिने मास्क घातला नसेल तर एकतर तिनेच स्व:ताहून दूर जावे किंवा मी तरी दूर व्हावे असं मला वाटतं.

ज्यावेळी रोगावर उपाय माहीत नसेल तर जे काही उपलब्ध ज्ञान आहे त्या जोरावर उपचार करणे गरजेचे आहे. "गो कोरोना, गो" म्हणणे, थाळ्या वाजवणे, घंटा नाद करणे वगैरे फक्त मनाला उभारी देण्याचे काम करू शकतात पण रोग दूर नाही करू शकत ही वस्तुस्थिती आहे.

कोरोना काळात सरकारनी जी काही पावले उचलली ती योग्य होती ह्या मताचा मी आहे.

गामा पैलवान's picture

6 May 2022 - 1:29 am | गामा पैलवान

सौंदर्य,

१.

जर संचारबंदी किंवा लॉकडाऊन, टाळेबंदी, लसीकरण, मुखाच्छादन (मास्क), स्वच्छता वगैरे ह्यामुळे कोरोना आटोक्यात आला नाही तर मग तो कशामुळे आटोक्यात आला ?

करोना हा रोग वा जे काही आहे ते सर्दीपडसे किंवा फ्ल्यू सारखा आजार आहे. त्याची साथ दरवर्षी नेमेची येतेच. आणि तशीच जातेही.

२.

जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व ....

करोना होणे म्हणजे नेमके काय? ८०% लोकांना लक्षणं दिसंतही नाहीत. मग रोग कसला झाला ? करोना खरंच इतका घातक आहे की वारंवार चाचणी करून लोकांना पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय ते .... ?

३.

कोरोना काळात जर माझ्या बाजूला येऊन एखादी व्यक्ती खोकू लागली व तिने मास्क घातला नसेल तर एकतर तिनेच स्व:ताहून दूर जावे किंवा मी तरी दूर व्हावे असं मला वाटतं.

याला सामाजिक स्वच्छता म्हणतात. करोना असो वा नसो ती पाळावी असा दंडक आहे.

४.

"गो कोरोना, गो" म्हणणे, थाळ्या वाजवणे, घंटा नाद करणे वगैरे फक्त मनाला उभारी देण्याचे काम करू शकतात पण रोग दूर नाही करू शकत ही वस्तुस्थिती आहे.

करोनाच्या विषाणूचा अस्सल नमुना आजूनही विलग केलेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. थाळ्या बडवून रोग बरा होत नाही, अगदी त्याप्रमाणेच नुसती बोंबाबोंब केल्यानेही रोग होत नसतो.

५.

कोरोना काळात सरकारनी जी काही पावले उचलली ती योग्य होती ह्या मताचा मी आहे.

तुमच्या मताचा आदर आहे. मात्र माझं मत तुमच्या विरुद्ध आहे. करोनाच्या काळात सरकार मेकॉलेछाप पद्धतीने वागलं. जरा म्हणून स्वत:ची अक्कल वापरायची नाही असा चंग बांधला होता. त्यामुळे हकनाक बळी गेले. सर्वोच्च न्यायालयाचं मत माझ्याशी मिळतंजुळतं आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुक्या's picture

6 May 2022 - 3:45 am | सुक्या

करोनाच्या काळात सरकार मेकॉलेछाप पद्धतीने वागलं. जरा म्हणून स्वत:ची अक्कल वापरायची नाही असा चंग बांधला होता. त्यामुळे हकनाक बळी गेले.

नक्की कुठले सरकार? फक्त भारताचे की यच्च्यावत जगातले सरकार. यात अमेरिका, कॅनडा, युरोप मधले सगळे देश, मध्यपुर्व , चीन, जपान , सौदी अरेबिया , न्युझीलंड , ऑस्ट्रेलिया वगेरे वगेरे आले. नाही म्हणजे सार्‍या जगात लॉकडाउन लावुन जनतेची गोची करणे हे सगळ्या देशांनी एकाच वेळेस केले. हा एक जागतीक कट तर नव्हता ना?

सौन्दर्य's picture

6 May 2022 - 11:31 pm | सौन्दर्य

"करोना हा रोग वा जे काही आहे ते सर्दीपडसे किंवा फ्ल्यू सारखा आजार आहे. त्याची साथ दरवर्षी नेमेची येतेच. आणि तशीच जातेही."

हा जर साध्या सर्दीपडश्यासारखा आजार होता तर जगभरातील जी माणसे अचानक मेली ती नेमक्या कशामुळे मेली ? जर त्याचे नक्की कारण आपल्याला ठाऊक नसेल तर जे काही उपाय सुचवले गेले ते करून पाहायला हरकत काय होती ? ह्या 'साध्या सर्दीपडश्यासारख्या' रोगावर ज्या काही लसींची निर्मिती झाली ती नक्कीच चांगल्या प्रयोगशाळेत झाली असणार, त्यातून फायदा जरी नाही झाला तर नुकसानही झाले नाही.

ज्यावेळी आपले सर्व उपाय थकतात त्यावेळी जीव वाचविण्यासाठी आपण अंगारे-धुपारे, देवाला साकडे वगैरे घालतोच ना ? त्याच प्रमाणे हे सर्व उपचार समजायचे.

देवी, पोलियोची लस घेणे बंधनकारक आहे की नाही ते मला ठाऊक नाही पण आमच्या लहानपणी दार उन्हाळ्याच्या सुट्टीत सरकारी इस्पितळातून डॉक्टर्स प्रत्येक सोसायटीत, शाळेत लस टोचवायला जायचे. त्याला आडकाठी केल्याचे आठवत नाही. सध्या पोलियो फक्त अफगाणिस्तान व एका आफ्रिकन देशात आहे. अफगाणिस्तानात ह्या लसी टोचायला तालिबानने बंदी केली परिणाम स्वरूप आजही पोलियोचे जगातून निर्मूलन झाले नाही.

अमेरिकेत पाय ठेवण्यापूर्वी काही लसी घेणं बंधनकारक होतं त्यामुळे त्या का कू न करता घेतल्या त्याचा काही दुष्परिणाम झाल्याचे जाणवले नाही. आणि तसे पाहू जाता साध्या सर्दी पडश्यावरील औषधांचे दुष्परिणाम वाचेलत तर 'भीक नको पण कुत्रा आवर' म्हणण्याची पाळी येईल. शेवटी ज्या त्या क्षणी जे काही महत्त्वाचे वाटेल ते ते करावे ह्या मताचा मी आहे.

एका वेगळ्या पोस्टमध्ये 'भागो'नी म्हंटल्याप्रमाणे 'वादे वादे जायते तत्वबोध:' हे खरे आहे. पैलवान साहेब तुमच्या ह्या एका पोस्टमुळे खूप माहिती मिळाली. मिसळपावचे हे एका प्रकारे यशच म्हंटले पाहिजे.

चौकस२१२'s picture

9 May 2022 - 7:26 am | चौकस२१२

नक्की कुठले सरकार? फक्त भारताचे की यच्च्यावत जगातले सरकार.
माझा हि हाच प्रश्न आहे पैलवानांना .. निदान गेला बाजार इंग्लंडात जिथे ते राहतात तिथे करोना ने मेलेल्या व्यक्ती चाय नातेवाईकास भेटून हा "करोना थोतांड " पाजण्याची हिंमत ते दाखवतील तर पैलवानांना डम आहे असे आपण म्हणू!
फारच मोठ्या गफल्याचा शोध लावल्या बद्दल नोबेल पुरस्कार द्यावा म्हणतो
आपला सरकारी गुलाम ....

जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व त्यावर रामबाण उपाय काय हे माहीत नसेल तर जे काही माहीत असलेले प्रतिबंधात्मक इलाज करणे, उपचार पाळणे हे गरजेचं आहे असं माझं मत आहे.
सहमत
पन कोन्स्पिरेसि थेओरि वले अनि "व्यक्ति स्वन्त्रय ," वले असेच गळे काधनार !
स्वतः मरणार आणि दुसर्यालाही मारणार
सार्वजनिक आरोग्य हि बाब यांच्या खिचगणतीत हि नसते जणू

आणि गंमत म्हणजे यात २ टोकाची विचार सरणी ची लोक सहमत असतात ( स्ट्रेंज बेडफेल्लोव )
एका तर भरकटलेले डा अनाकरिस्ट किंवा "गॉड आणि गन " वाले अति टोकाचे उजवे !

जेम्स वांड's picture

9 May 2022 - 9:40 am | जेम्स वांड

आणि गंमत म्हणजे यात २ टोकाची विचार सरणी ची लोक सहमत असतात ( स्ट्रेंज बेडफेल्लोव )
एका तर भरकटलेले डा अनाकरिस्ट किंवा "गॉड आणि गन " वाले अति टोकाचे उजवे !

&#128077 &#128077 &#128077

कॉमी's picture

6 May 2022 - 6:48 am | कॉमी

करोना हा रोग वा जे काही आहे ते सर्दीपडसे किंवा फ्ल्यू सारखा आजार आहे. त्याची साथ दरवर्षी नेमेची येतेच. आणि तशीच जातेही.

अमेरिकन आकडे
दरवर्षी फ्ल्यू मध्ये मरणारे लोक- २०,०००-६०,०००
दोन वर्षात अमेरिकेत झालेले कोव्हिड मृत्यू- १०,२३,०००

करोना होणे म्हणजे नेमके काय? ८०% लोकांना लक्षणं दिसंतही नाहीत. मग रोग कसला झाला ? करोना खरंच इतका घातक आहे की वारंवार चाचणी करून लोकांना पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय ते .... ?

हो. लक्षणं दिसत नसतानाही विषाणूंचाणप्रसार होऊ शकतो म्हणून हे गरजेचे आहे.

करोनाच्या विषाणूचा अस्सल नमुना आजूनही विलग केलेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. थाळ्या बडवून रोग बरा होत नाही, अगदी त्याप्रमाणेच नुसती बोंबाबोंब केल्यानेही रोग होत नसतो.

SARS-CoV-2 has been isolated and its complete genome has been sequenced

काळात सरकार मेकॉलेछाप पद्धतीने वागलं. जरा म्हणून स्वत:ची अक्कल वापरायची नाही असा चंग बांधला होता. त्यामुळे हकनाक बळी गेले.

बळी गेले ? ते कसे ? कोव्हिड प्रसार जास्त झाला असता तर आणखी बळी गेले असते हे स्पष्ट नाही काय ?
उलटपक्षी कोव्हिड काळात जी थेट मदत गोरगरिबांना करण्यात आली आहे त्याने absolute powerty जगभरात तात्पुरती कमी झाल्याचे दिसत आहे.

नगरी's picture

6 May 2022 - 7:30 am | नगरी

मी तरी तुमच्या विचारांशी पूर्ण सहमत.
खरेतर करोना मुळे किती मेले आणि अँटीबायोटिकसच्या बेसुमार अतिरेकी माऱ्याने किती मेले हे तो देवच जाणे.मी स्वतः लस घेणे खूप टाळले,पण शेवटी नाईलाजाने घ्यावी लागली,लसीचा एकतरी डोस असल्याशिवाय विमानप्रवासास बंदी होती.सुप्रीम कोर्ट काही का म्हणे,ह्यांना जे करायचे ते ह्यांनी केले.

sunil kachure's picture

6 May 2022 - 8:47 am | sunil kachure

1)काहीच लक्षण नसलेल्या व्यक्ती ल पण सरकारी विलागिकरण आणि उपचार केंद्रात भरती केले गेले आणि काहीच त्रास नसताना पण खूप दिवस तिथे ठेवले गेले.अशी उदाहरण मी काही बघितली आहेत.
त्या मुळे जे गंभीर त्रासाने ग्रस्त होते त्यांना प्रवेश मिळाला नाही.
२) कोरोना वर उपचार म्हणून ज्या औषध चा प्रचार,प्रसार आणि त्याच औषधांनी उपचार केले गेले.
काही दिवसानंतर जी औषध जालीम म्हणून प्रसिद्ध केली होती ती किती हानिकारक ठरली ह्याच्या बातम्या येवू लागल्या.
३), ब्लॅक फंगस ची निर्मिती उपचार मधील काही तरी चुकी मुळेच झाली.पण ते कधीच स्पष्ट केले नाही.आज पण भारतात ब्लॅक फंगस
चे रुग्ण अचानक covid काळातच का वाढले ह्या वर कोणी बोलत नाही.अगदी who पण बोलत नाही.

लशीची सक्ती नसावी हे शंभर टक्के योग्य. आणि सर्वच औषधे / उपचार यांबाबत सदैव लागू असणे योग्य.

पण रोग आणि लस हे दोन्ही थोतांड, हा रोग मुळात गंभीर नाहीच आणि लस निरुपयोगी आहे हेही अति टोकाचं वाटतं.

धडधाकट वगैरे अशा सरसकट व्याख्या करणे अवघड आहे. ऐंशी नव्वदचे वृद्ध यातून सहज बाहेर पडताना दिसले आणि डोळ्याला दिसताना रिझनेबली धडधाकट वाटणारे तरुण, व्यायामपटू, मजबूत लोक अनपेक्षितपणे मृत्यू पावताना दिसले. तेव्हा हा आजार अनप्रेडिक्टेबल आहे यात शंका नसावी.

बाकी सक्ती नसण्याबाबत विवेचन योग्यच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2022 - 10:31 am | प्रसाद गोडबोले

अमेरिकन टर्म्स मध्ये :

लस , मास्क आणि लॉकडाऊन ची सक्ती करणारे = डेमोक्रॅटिक

लस , मास्क , लॉकडाऊन ऐच्छिक असावे असे म्हणणारे = रिपब्लिकन

आता भारतातील ह्याचे समान अर्थी शब्द शोधणे काही जास्त अवघड नाही . कारण लोकांना त्यांचे निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असावे असे म्हणाणारा एक ग्रुप होता अन लोकांवर प्र्तयेकवेळी सक्ती करणारा एक ग्रुप होता इथेही !!

अवांतर : ह्या संदर्भाने सी.बी.सी अर्थात कॅनडा ब्रॉडकास्तिंग कॉर्पोरेशनने एक मजेशीर विधान येथे आठवते -

The word freedom has become common among far-right groups, experts say.

=))))

कॉमी's picture

6 May 2022 - 10:46 am | कॉमी

पण,
लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी माहिती पसरवणारे, लस घेण्यापासून बऱ्याच लोकांना परावृत्त करणारे- रिपब्लिकन्स. हे फक्त कोव्हिड लसीबाबत नाही. एकूणच लसीकरण नको म्हणतात हे. बऱ्याच लसी यापूर्वीही अमेरिकेत बंधनकारच होत्या.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2022 - 10:59 am | प्रसाद गोडबोले

लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी माहिती

तुम्हाला कसे ठाऊक की ती माहीती खोटी आहे ?

लसी केवळ एक वर्षात विकसीत करण्यात आलेली आहे , त्याचे लाँगटर्म स्टडी उपलब्ध्द आहेत का ? तुम्ही लसींच्या परिणामकते वरच्या डबल ब्लाईंडेड वगैरे स्टॅस्टिस्टिकल टेस्ट्स पाहिल्या आहेत का ? फार्मासुटीकल कंपन्यांनी ह्या प्रकारात किती पैसे कमावले ह्यावर तुमच्याकडे काही डेटा आहे का ? आणि मास्क मॅण्डेट्स हे कोव्हिडचा प्रचार थांबवण्यात अक्षरशः निरुपयोगी होते असे रीसर्च यायला लागले आहेत आता. आपण सर्च करुन पहा - mask mandates were useless.

मला बाकीच्या लसींच्या बाबतीत अमेरिकन लोकांचा मुर्खपणा ठाऊक आहे . पोलिओ , देवी वगैरे रोगांवरच्या लसी उपयुक्त आहेत हे पुराव्याने शाबित करता येते , अनेक दशकांचा डेटा सपोर्ट ला आहे .

पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ भारतच नव्हे तर जगभर जे जे झालं ते सर्व लेफिस्ट विचारसरणीच्या सरकार ने केलेला आतातायीपणा होता हे माझेही ठाम मत आहे !

अवांतर वैयक्तिक : गावी असताना एकदा मंडई घेऊन येत असताना "विनाकारण फिरणे" हे कारण सांगुन एका पोलिसाने माझ्याकडुन ५०० रुपायची पावती फाडली अन त्याचे टारगेट पुर्ण करायचा प्रयत्न केला हे मी कधीही विसरणार नाही .

बाकी कशाविषयी काही म्हणणे नाही पण..

mask mandates were useless.

.. सर्च करुन पहा...

याबद्दल मात्र असे म्हणेन की गूगलचा मोठा प्रॉब्लेम असा आहे की विशफुल सर्च टर्म्सना तो नेहमीच पावतो. त्यातून benefits of smoking , global warming is a myth, covid virus useful अशा कोणत्याही सर्चने कुठलेतरी पबमेडमधले किंवा तत्सम संशोधन बाहेर टाकले जातेच. गूगल अत्यंत उपयोगी असलं तरी हा भाग त्यातला मोठा वीकनेस. गूगल मस्ट वर्क ऑन इट नेक्ष्ट. तेही एक दिवस होईल. वेटेज, जनरल consensus या बाजूने किती आहे असा काहीतरी tag आला पाहिजे. ते वेटेज वाढले/ घटले पाहिजे.

याविषयी सुन्दरशी एकदा चर्चा करायची आहे. ;-)

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2022 - 12:07 pm | प्रसाद गोडबोले

विशफुल सर्च टर्म्स

तुम्ही विशफुल सर्च टर्म्स म्हणत आहात , ठीक आहे . आपण अजुन रीसर्च येण्याची वाट पाहु. माझ्या माहीती नुसार तरी अजुन पर्यंत कोणताच सबस्टॅन्शियल इव्हिडन्स नाहीये की मास्क मुळे कोव्हिड प्रसार थांबवण्यास मदत झाली. अजुन रिलायेबल रीसर्च आले की मी लिन्क्स टाकेन.

बाकी तुम्ही सुचवलेले तीन्ही विशफुल सर्च मी करुन पाहिले , मला तरी काही एक सपोर्टिंह सापडले नाही त्यावर ! त्यातल्या त्यात global warming is a myth असे सर्च केल्यावर ज्या लिन्क्स सापडल्या त्या बहुतांश प्रश्णार्थक आणि हे मतखंडन करणार्‍याच होत्या. असो.

बाकी तुम्ही सुंदर सरांशी चर्चा जरुर करा , पण त्यातुन काही साधेल असे वाटत नाही. ट्विटर ने हेच करायचा प्रयत्न केला , विरोधी मत दिसले की दाब , ऊडव ट्वीट , कर अकाऊंट ब्लॉक ! शेवटी ट्विटरचे काय झाले आपण पाहिलेच ! विरोधी/ आपल्याला न पटणार्‍या मतांचा आवाज दपडुन सत्य लपुन रहात नाही !

कोंबडा झाकला म्हणुन सुर्य उगवायचे रहात नाही की कोंबडी अंडे द्यायचे रहात नाही !!

=))))

नाही नाही. न पटणारा आवाज दाबणे किंवा पटणारा आवाज लाऊडस्पीकरवर लावणे असा उद्देश नाहीच.

विशफुल हा शब्दही कामकाजातून वगळूया तूर्त. तो तांत्रिक भाग होता.

कोणताही कीवर्ड टाकला की सर्व प्रकारचे रिझल्ट येतात.

"मास्कची परिणामकारकता"

आणि

"मास्क उपयुक्त असल्याचे सिद्ध"

"मास्क कुचकामी ठरला"

यातील काहीही टाकलं तरी त्याच्याशी संलग्न काही रिसर्च येतोच.

कोणतेही शारिरीक लक्षण सर्च करा.

मग तेच लक्षण + cancer असं सर्च करा.

अगदी चक्कर, खोकला, निद्रानाश, बद्धकोष्ठ, नखावर डाग, पुरळ यातले काहीही लक्षण कर्करोगाशी नेऊन जुळवणारे निकाल मिळतीलच.

त्यामुळे वेटेज ही कल्पना मांडली.

काहीही उडवायचे / दाबून टाकायचे नाही. फक्त वेटेज द्यायचे. (त्यातही वेटेज वाढवणारी सिस्टीम उभी राहू शकते, value added service म्हणून वेटेज वाढवून मिळू शकते या शक्यता आल्याच)

उदा. पृथ्वी चौकोनी आहे अशी मांडणी करणारे एक संशोधन आहे. आगोदर त्याचे वेटेज शून्यवत असेल. हळुहळू अधिक अभ्यास/ पेपर्स याला पाठबळ देतील तसे तसे वेटेज वाढत जाईल. "पृथ्वी गोल" याचे सध्याचे 100% वेटेज तेव्हा कमी होत जाईल.

इत्यादि.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2022 - 12:53 pm | प्रसाद गोडबोले

ओह. ओके.

आत्त कळले तुम्हाला काय म्हणायचे होते ते !

लस शक्य तितक्या लवकर देणे हे उद्दिष्ट चुकीचे आहे काय ? तुम्ही म्हणताय तो अभ्यास व्हावाच कि, पण उपलब्ध माहितीनुसार तरी लसी फायदेशीर आहेतच ना ? हॉस्पिटलायझेशन, गंभीर आजार आणि मृत्यू- तिन्हीपासून लसीने संरक्षण दिलेच कि. मृत्युदर लसीकरण न घेतलेल्या लोकांमध्ये जास्त आहे हे दिसून आले आहे.
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/vaccines/effectiveness/work.html

इतके सोडा, ट्रम्पला मत देणाऱ्या भागांमध्ये मृत्युदर जास्त आहे हे सुद्धा दिसले आहे.
https://www.npr.org/sections/health-shots/2021/12/05/1059828993/data-vac...
मग लस घेणे धोकादायक आहे असे पुश करणारे रिपब्लिकन आणि फॉक्स न्यूज वैगेरे पिद्दे जबाबदार नाहीयेत का या गोष्टीसाठी ? लस घेण्याची जबरदस्ती होऊ नये हे फेअर होते, पण लस घेण्यापासून परावृत्त करणारे बोलणे अत्यंत बेजबाबदार पणाचे होते.

फार्मासुटीकल कंपन्या पैसे कमावतात ह्याचा संबंध काय ते समजले नाही. लस जर तुम्हाला मरण्यापासून वाचवण्याची शक्यता वाढवत असेल तर फार्मा कंपन्या श्रीमंत होतात का नाही हे बघायचे काय ? बरं, फार्मा कंपन्यांवर नियंत्रण आणावे हे रिपब्लिकन्सना मान्य नाही. बाजूचा कॅनडा इन्शुलिन इतक्या स्वस्तात विकतो, आपल्या इथे प्राईस कॅप लावा म्हणून बरणी घसा कोकलून ओरडतो तेव्हा त्याला सोशालिस्ट कम्युनिस्ट म्हणतात. मग आज पांडेमिक आल्यावर लोकांच्या जीवाशी खेळताना फार्मा कंपन्यांची तुंबडी भरतीये हे कसे आठवते ?

कोव्हिड हा नवीन रोग आहे.मेडिकल मत बदलणे हे समजण्यासारखे आहे. पण प्रत्येक बदलाचे GOP ने भांडवल केले आणि लोकांचा अविश्वास वाढवला हे खरे आहे. मास्क बद्दल सुद्धा. तेव्हाचे कन्सेन्शस होते ना मास्क काम करतो तर घाला ना! इतके रडण्याभेकण्यासारखे त्यात काहीही नव्हते.

पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ भारतच नव्हे तर जगभर जे जे झालं ते सर्व लेफिस्ट विचारसरणीच्या सरकार ने केलेला आतातायीपणा होता हे माझेही ठाम मत आहे !

जे झालं म्हणजे काय झालं ?कशाबद्दल बोलत आहात ? गरीबातली गरीब लोक absolute poverty मधून बाहेर राहू शकली उलट कोव्हिडमध्ये.

पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ भारतच नव्हे तर जगभर जे जे झालं ते सर्व लेफिस्ट विचारसरणीच्या सरकार ने केलेला आतातायीपणा होता हे माझेही ठाम मत आहे !
१०० % तसे म्हणता येणार नाही
ऑस्ट्रेल्या = उजवे सरकार , सुरवातीला कडक निर्बंध
सिंगापुर = एकाच सरकार "परोपकारी उजवे" तरी निर्बंध

प्रसाद गोडबोले's picture

9 May 2022 - 1:09 pm | प्रसाद गोडबोले

ऑस्ट्रेलिया , सिंगापुर मध्ये उजव्या विचारसरणीचे सरकार आहे ? हे मला माहीत नव्हते , तपासुन पहातो .

बाकी तसे तर भारतातही उजव्या विचारसस्रणीचे सरकार आहे , त्यांनीही "मित्रों " म्हण्त आतातायी लॉकडाऊन लावला होताच पण नंतर देशाच्या ईकॉनॉमीला घोडा लागतोय ही अक्कल आल्यावर निर्बंध बिर्बंध राज्यसरकारांवर जबाबदारी झटकुन रिकामे झाले . =))))

चौकस२१२'s picture

10 May 2022 - 8:05 am | चौकस२१२

ऑस्ट्रेलिया ,मध्ये उजव्या विचारसरणीचे सरकार आहे ?
नक्की तपासा

तिथे डावे = लेबर ( मजूर ) आणि हिरवे ( ग्रीन = पर्यवर्णवादी पण तशी कमी )
उजवे लिबरल + नॅशनल ( जास्त उजवे म्हणू हवे तर )
सिंगापुर बद्दल म्हणू मिश्रण उजवे असे म्हणले

बर समजा दाव्याची हि फायदा तर खाजगी लस निर्मात्यांना आणि इतर उतपादने पुरवणाऱ्यांना !
मग असे कसे ?

sunil kachure's picture

6 May 2022 - 12:51 pm | sunil kachure

अधिकृत संस्थे चे निष्कर्ष मान्य करावेत!!!!!
बाह्य दबाव प्रचंड असतो अशा संस्थेवर ह्या सत्याकडे डोळे झक करून पण.
कारण शेवटी तेच अधिकृत सत्य असते.
का विचार करू नये असे पॉइंट.
१)जगात मानवाच्या उत्पत्ती पासून आज पर्यंत अनेक साथीचे आजार येवून गेले असणार.
अर्थात च सर्व आपल्याला माहीत नाहीत.

पण साधीचे आजार समुद्राच्या लहरी सारखे असतात.
भरती म्हणजे पीक पॉइंट वर आणि त्या नंतर ओहोटी म्हणजे विषाणू,जिवाणू कमजोर होवून साथ निघून जाते.
आणि हे नैसर्गिक रीत्या घडते.
Covid बाबत पण तेच घडले असेल.लसी नी फक्त वेळ कमी केली असेल.
२) रोगविषयी डेटा माझ्या मते दोन प्रकार चा असावा.
एक संशोधन करणाऱ्या संस्था नियंत्रित वातावरणात ठराविक लोकांचा अभ्यास करून मिळालेला डेटा.
हा खूप कमी लोकांचा अभ्यास करून आणि नियंत्रित वातावरणात डेटा मिळवून त्या वर निष्कर्ष काढले जातात.
हे सर्व जगाला ,विविध स्थिती मध्य राहणारी लोक,विविध जीवन शैली असणारी लोक,विविध आहार. घेणारी लोक .विविध वंशाची लोक ह्यांना लगुच होईल असे काही नाहीं.
लस अशाच डेटा वर बनवली आहे आणि ती किती परिमाण कारक आहे ह्याचा निष्कर्ष पण ह्याच प्रकार च्या डेटा वर आधारित आहे.
दुसरा डेटा हा विस्तृत असतो.
जगभरातील रोग ग्रस्त लोकांची स्थानिक संस्था नी जमा केलेली माहिती वर आधारित असतो.
आणि हाच डेटा सत्य सांगू शकतो
पण असा डेटा जमा करण्याचे guiide लाईन सरकार ठरवतात.
त्या मुळे चाकोरी बद्ध च माहिती गोळा होते.

गामा पैलवान's picture

6 May 2022 - 11:07 pm | गामा पैलवान

कॉमी,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

हो. लक्षणं दिसत नसतानाही विषाणूंचाणप्रसार होऊ शकतो म्हणून हे गरजेचे आहे.

अशा असंख्य बिनलक्षणी विषाणूंचा सतत 'प्रसार' होत असतो. प्रत्येकासाठी निर्बंध घालंत बसलं तर जगणं अशक्य होऊन बसेल.

२.

SARS-CoV-2 has been isolated and its complete genome has been sequenced

या लेखात क्लिनिकल इन्फेक्शन ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. ज्याला लागण झालेलीच नाही अशा माणसाच्या नमुन्यात काहीबाही विषाणू सापडला तर त्या माणसाला बाधित म्हणून घोषित करायचा ....? हे कसलं वैद्यक ? लागण ( = क्लिनिकल इन्फेक्शन ) आधी होत असते आणि बाधाकारक जीवाणू/विषाणू नंतर शोधला जातो. करोनाच्या बाबतीत प्रवास बरोब्बर उलटा आहे.

म्हणून मी करोनास थोतांड म्हणतो.

३.

बळी गेले ? ते कसे ? कोव्हिड प्रसार जास्त झाला असता तर आणखी बळी गेले असते हे स्पष्ट नाही काय ?

माझ्यासारख्या हृदयविकारी लोकांना करोनापासून खरंच भीती आहे. मला जर काही झालं तर माझ्यासाठी रुग्णालयात खाट मोकळी हवी. त्याऐवजी जर इतर धडधाकट लोकं खोगीरभरती झालेले असतील तर माझी काय हालत होईल? माझ्यासारख्या अनेक केसेस आहेत. करोनाचं निरर्थक अवडंबर आणि करोनाच्या नावाखाली विपरीत उपचार यांमुळेच बळी गेले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

असंख्य बिनलक्षणी विषाणूंचा सतत 'प्रसार' होत असतो. प्रत्येकासाठी निर्बंध घालंत बसलं तर जगणं अशक्य होऊन बसेल.

क्लिअरली कोव्हिड इतक्या झपाट्याने आणि कोव्हिड इतक्या डिस्त्रक्टीव्ह रोगाचा होत नाही. तुम्ही आता जे म्हणता ते प्रत्येग रोगाच्या वेळेस म्हणायचे काय, प्लेग आणि कॉलरा एकेकाळी जितके संहारक होते तश्या रोगांना सुद्धा ?
मग कुठेतरी लाईन आखली जातेच ना- हि स्वीकारार्ह रिस्क आहे आणि हि अस्वीकारार्ह रिस्क आहे.

लेखात क्लिनिकल इन्फेक्शन ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. ज्याला लागण झालेलीच नाही अशा माणसाच्या नमुन्यात काहीबाही विषाणू सापडला तर त्या माणसाला बाधित म्हणून घोषित करायचा ....? हे कसलं वैद्यक ? लागण ( = क्लिनिकल इन्फेक्शन ) आधी होत असते आणि बाधाकारक जीवाणू/विषाणू नंतर शोधला जातो. करोनाच्या बाबतीत प्रवास बरोब्बर उलटा आहे.

गामा, तुम्ही आधी म्हणत होता की कोव्हिडचा विषाणू विलग केलेला नाहीये. त्यासाठी तो दुवा होता. विलग केला आहे.

मी काही डॉक्टर नाही. पण इतके तर समजते कि नमुन्यात विषाणू सापडला तर त्याला बाधित म्हणायचे कारण तो व्यक्ती पुढे विषाणू पसरवू शकतो. तो बाधित आहे म्हणजे आजारी पडेल असे नाही. पण इतरांना विषाणूंची बाधा त्याच्या संपर्कात राहून होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तक्रार नक्की कशाबद्दल करत आहात कल्पना नाही.

माझ्यासारख्या हृदयविकारी लोकांना करोनापासून खरंच भीती आहे. मला जर काही झालं तर माझ्यासाठी रुग्णालयात खाट मोकळी हवी.

सध्या तरी तशी कसलीही भीती नाही.

गामा पैलवान's picture

7 May 2022 - 11:29 pm | गामा पैलवान

कॉमी,

१.

क्लिअरली कोव्हिड इतक्या झपाट्याने आणि कोव्हिड इतक्या डिस्त्रक्टीव्ह रोगाचा होत नाही.

करोना खरंच इतका घातक आहे का? लोकांना तर वारंवार चाचणी करून पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून.

२.

तुम्ही आता जे म्हणता ते प्रत्येग रोगाच्या वेळेस म्हणायचे काय, प्लेग आणि कॉलरा एकेकाळी जितके संहारक होते तश्या रोगांना सुद्धा ?

प्लेग, कॉलरा वगैरे साथी स्वच्छतेमुळे आटोक्यात आल्या. लशीकरणाच्या बऱ्याच आधीपासून साथी मंदावल्या होत्या.

३.

.... नमुन्यात विषाणू सापडला तर त्याला बाधित म्हणायचे कारण तो व्यक्ती पुढे विषाणू पसरवू शकतो.

हे एकांगी मूल्यमापन नव्हे काय? मला म्हणायचंय की जर एखाद्या निरोगी माणसाच्या अंगात करोना आढळला तर त्यास बाधित म्हणू नये. करण की त्याची प्रतिकारशक्ती विकसित झाल्याने तो करोनास दाद देत नाहीये. मग असा माणूस प्रतिकारशक्तीचाही वाहक आहे ना? त्याला केवळ रोगवाहक या वर्गात का म्हणून ढकलायचं? अशा प्रकारच्या पसरणाऱ्या प्रतिकारशक्तीस परिचयकाठीण्य म्हणजे herd immunity म्हणतात.

करोना अंगात सापडणे अतिशय किरकोळ बाब आहे. तर मग करोनाचा रुग्ण म्हणजे नेमकं काय? करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे हे पाच स्वतंत्र वर्ग आहेत ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066627#comment-1066627 ).

आ.न.,
-गा.पै.

करोना खरंच इतका घातक आहे का? लोकांना तर वारंवार चाचणी करून पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून.

गामा, दोन वर्षांमध्ये कोव्हिडचे ६० लाख बळी गेलेत. WHO चे म्हणणे मानले तर १.५ करोड बळी गेलेत. कॅन्सर दरवर्षी १० लाखाच्या आसपास बळी घेते. यू मेक द कॉल. मी म्हणेन कोव्हिड घातक आहे.

प्लेग, कॉलरा वगैरे साथी स्वच्छतेमुळे आटोक्यात आल्या. लशीकरणाच्या बऱ्याच आधीपासून साथी मंदावल्या होत्या.

देवी घ्या. माझा मुद्दा आहे की लक्षावधी लोकांना मारणारा संसर्गजन्य रोग- Novel Corona Virus- जास्त विनाशकारी आहे ना ? प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी निर्बंध घालायचे का- हा प्रश्न कोव्हिडच्या परिणामांना फार कमी लेखतोय असे मला वाटते. कोव्हिड माझ्या आयुष्यातील तरी सर्वात भयानक रोग आहे.

हे एकांगी मूल्यमापन नव्हे काय? मला म्हणायचंय की जर एखाद्या निरोगी माणसाच्या अंगात करोना आढळला तर त्यास बाधित म्हणू नये. करण की त्याची प्रतिकारशक्ती विकसित झाल्याने तो करोनास दाद देत नाहीये. मग असा माणूस प्रतिकारशक्तीचाही वाहक आहे ना? त्याला केवळ रोगवाहक या वर्गात का म्हणून ढकलायचं? अशा प्रकारच्या पसरणाऱ्या प्रतिकारशक्तीस परिचयकाठीण्य म्हणजे herd immunity म्हणतात.

काय म्हणायचे - बाधित म्हणायचे का आणि काय- मला इतके ह्त्वाचे वाटत नाही. टेस्ट करण्यामागचा हेतू काय- तर माणूस आजारी नसला तरी तो वाहक असेल तर ओळखणे आणि त्याला लोकांच्यात काही दिवस मिसळू नकोस इतके सांगणे. मग नावे काहीही दिली तरी चालतील.
प्रतिकारशक्ती वाहक हा प्रकार काय ? व्यक्ती अ ची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि ब ची वाईट. अ कडून ब ला प्रसाद मिळाल्यावर प्रतिकारशक्ती नाही, फक्त कोव्हिड मिळणार. हर्ड इम्युनिटी म्हणजे जास्तीत जास्त लोकांना तो रोगलागण किंवा लसीकरण झाले असल्यास येणारी प्रतिकारक्षमता. हर्ड इम्युनिटी नावाप्रमाणे हर्डला- समाजाला येते. एकेका व्यक्तीला नाही. लागण जास्त लोकांना झाल्यावर आधी जास्त लोकं मरून मग उरलेल्ल्यांना हर्ड इम्युनिटी मिळते. ती रोगातून मिळणेपेक्षा लसीतून मिळणे प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलेच असते. त्यामुळे 'पसरणारी प्रतिकारशक्ती' हे धडधडीत चुकीचे आकलन आहे असे मला माझ्या अल्प समजातून वाटते. डॉ. खरे किंवा कुमार सरांनी शंका निरसन केल्यास आभारी राहीन.

करोना अंगात सापडणे अतिशय किरकोळ बाब आहे. तर मग करोनाचा रुग्ण म्हणजे नेमकं काय? करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे हे पाच स्वतंत्र वर्ग आहेत ( संदर्भ :

वाहक, रुग्ण आणि गंभीर रुग्ण असे विभाग होऊ शकतात.

गामा पैलवान's picture

9 May 2022 - 2:17 am | गामा पैलवान

१.

दोन वर्षांमध्ये कोव्हिडचे ६० लाख बळी गेलेत. WHO चे म्हणणे मानले तर १.५ करोड बळी गेलेत.

हा आकडा फसवा आहे. हे करोना अंगात असतांना झालेले मृत्यू आहेत. करोनामुळे झालेले नाहीत.

२.

माझा मुद्दा आहे की लक्षावधी लोकांना मारणारा संसर्गजन्य रोग- Novel Corona Virus- जास्त विनाशकारी आहे ना ?

आजीबात नाही. करोना सर्दीपडशासारखा आजार आहे. फारतर फ्ल्यूसारखा म्हणता येईल. तो धड्द्त माणसासाठी जीवघेणा असूच शकंत नाही.

३.

टेस्ट करण्यामागचा हेतू काय- तर माणूस आजारी नसला तरी तो वाहक असेल तर ओळखणे

या 'वाहक' थियरीवर माझा आक्षेप आहे. रोगाचा वाहक असू शकतो, नाही असं नाही. पण करोना हा सर्वत्र आढळणारा विषाणू आहे. अगदी नळाच्या पाण्यावरही पीसीआर चाचणी केली तरी तिथेही आढळून येतो. अशा वेळेस कुण्या एका माणसाला वाहक बनवण्यात काय अर्थ ?

४.

.... हर्ड इम्युनिटी मिळते. ती रोगातून मिळणेपेक्षा लसीतून मिळणे प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलेच असते.

लशीतनं कुठल्याही प्रकारची इम्युनिटी मिळायची कसलीही खात्री नाही. विशेषत: नवी लस प्रस्थापित व्हायचा कालखंड १० वर्षेही असू शकतो. लशीमुळे रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एक उदाहरण सांगतो. गोवराच्या दूषित लशीमुळे लहान मुलांना होणारा गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला आहे.

५.

'पसरणारी प्रतिकारशक्ती' हे धडधडीत चुकीचे आकलन आहे असे मला माझ्या अल्प समजातून वाटते.

'पसरणारी प्रतिकारशक्ती' हिची पुढील आवृत्ती म्हणजे स्वप्रसारित लस. कृपया हा लेख पाहणे ( इंग्रजी दुवा ) : https://www.nationalgeographic.com/science/article/the-controversial-que...

जर जंतूंचा प्रसार होतो, लशीचा प्रसार होतो, तर प्रतिकारशक्तीचाची प्रसार व्हायला हरकत नसावी.

आ.न.,
-गा.पै.

हा आकडा फसवा आहे. हे करोना अंगात असतांना झालेले मृत्यू आहेत. करोनामुळे झालेले नाहीत.

चूक. मृत्यूच्या एकापेक्षा जास्त कारणांपैकी एक कोव्हिड आहे असे डॉकटर सर्टिफाय करत असतील तरच कोव्हिड मृत्यू म्हणून गणला जातो. तुम्ही कोव्हिड पॉझिटिव्ह असताना गाडीचा अपघात होऊन मेला तर त्यास कोव्हिड मृत्यू म्हणत नाहीत. तर्कसुसंगतच आहे. आपल्या वर लक्ष देणाऱ्या फिजिशियननेच लिहायचे असते मृत्यूचे कारण.
इथे कोव्हिड मृत्यू नोंदण्याची सविस्तर प्रोसिजर दिली आहे.

बर, आणि जगात इतकी जास्त लोकं मेली, कोव्हिड पांडेमिकच्या पीक महिन्यांमध्येच मेली. तरी तुम्ही कसे म्हणू शकत कि ६० लाख सुद्धा मेले नाहीत ? Excess mortality नुसार जगभरात १.५ करोड लोक मेले आहेत असे WHO म्हणतेय.

नळाच्या पाण्यावरही पीसीआर चाचणी केली तरी तिथेही आढळून येतो. अशा वेळेस कुण्या एका माणसाला वाहक बनवण्यात काय अर्थ ?

अर्थ कसा नाही ? वाहक बनवण्याचा प्रश्न नाही, तुम्ही वाहक व्याख्येनुसार आहातच ना ?
नळाच्या पाण्याला सुद्धा जमत असेल तर आयसोलेट करा!

लशीतनं कुठल्याही प्रकारची इम्युनिटी मिळायची कसलीही खात्री नाही. विशेषत: नवी लस प्रस्थापित व्हायचा कालखंड १० वर्षेही असू शकतो. लशीमुळे रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एक उदाहरण सांगतो. गोवराच्या दूषित लशीमुळे लहान मुलांना होणारा गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला आहे.

कोव्हिड ची लस काम करते. मृत्यू, गंभीर आजार आणि हॉस्पिटलायझेशन तिन्ही गोष्टींपासून संरक्षण मिळते.

'पसरणारी प्रतिकारशक्ती' हिची पुढील आवृत्ती म्हणजे स्वप्रसारित लस. कृपया हा लेख पाहणे ( इंग्रजी दुवा ) : https://www.nationalgeographic.com/science/article/the-controversial-que...

जर जंतूंचा प्रसार होतो, लशीचा प्रसार होतो, तर प्रतिकारशक्तीचाची प्रसार व्हायला हरकत नसावी.

लेख वाचला. तो एक्सपिरिमेन्टल लसींबद्दल आहे. त्यात लिहिले आहे-

'“We can't even get people to take a vaccine in a global pandemic. The idea that you would be able to surreptitiously vaccinate the population with a virus without causing riots is just, you know, it's stuff of fantasy. It will never be used in humans,”.

बरं, आणि अशी पसरणारी लस नैसर्गिक रित्या नाही होत, प्रयोगशाळेत बनवावी लागते. कोव्हिडबाबत याचा संबंध येतच नाही- अशी ल्स बनवलीच नाहीये.

जर जंतूंचा प्रसार होतो, लशीचा प्रसार होतो, तर प्रतिकारशक्तीचाची प्रसार व्हायला हरकत नसावी

हरकत काहीच नाही, पण तसे होताना दिसत नाही. लसीचा प्रसार हि फक्त फॅन्टसी आहे, सध्या चर्चेत स्थान असायचे काही कारण नाही.

मुद्दा काय- हर्ड इम्युनिटी म्हणजे पसरणारी प्रतिकारशक्ती होत नाही, रोगासोबत प्रतिकारशक्ती पसरते असा कोणताही पुरावा दिसत नाही, तसे असते तर इतकी लोकं मेली नसती, पसरणारी लस कोरोनासाठी तरी अस्तित्वात नाही.

sunil kachure's picture

9 May 2022 - 1:06 pm | sunil kachure

पाश्चिमात्य देश,अमेरिका,ह्या देशांना च corona नी सर्वात जास्त फटका दिला.
इटली,ब्रिटन,अमेरिका.आणि बाकी देश.
आरोग्य सेवा उत्तम,स्वच्छता तरी हेच देश सर्वात जास्त बाधित.
स्वच्छता आणि covid प्रसार ह्याचा संबंध कसा लावणार.
Omicron. जो नंतर आला.पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिका .
त्यांच्या आकड्या वर मी लक्ष ठेवायचो.
खुप कमी लसीकरण झालेला देश आहे दक्षिण आफ्रिका.गरीब तर आहेच,आरोग्य सुविधा पण जास्त नाहीत.
काहीच दिवसात amiycron नी दक्षिण आफ्रिकेतून काढता पाय घेतला.
आणि सर्वात जास्त लसीकरण झालेले देश,सर्वात उत्तम आरोग्य सुविधा असलेले देश,स्वच्छता मध्ये पुढे असणारे देश.
ह्यांना 440 volt च झटका omiycron नी दिला.
लसीकरण काही कामाला आले नाही.
बिल गेट्स,आणि असे दिग्गज लसी उद्योगात आहेत.
हा पॉइंट हल्ल्यात घेऊ नयेत

sunil kachure's picture

9 May 2022 - 1:06 pm | sunil kachure

पाश्चिमात्य देश,अमेरिका,ह्या देशांना च corona नी सर्वात जास्त फटका दिला.
इटली,ब्रिटन,अमेरिका.आणि बाकी देश.
आरोग्य सेवा उत्तम,स्वच्छता तरी हेच देश सर्वात जास्त बाधित.
स्वच्छता आणि covid प्रसार ह्याचा संबंध कसा लावणार.
Omicron. जो नंतर आला.पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिका .
त्यांच्या आकड्या वर मी लक्ष ठेवायचो.
खुप कमी लसीकरण झालेला देश आहे दक्षिण आफ्रिका.गरीब तर आहेच,आरोग्य सुविधा पण जास्त नाहीत.
काहीच दिवसात amiycron नी दक्षिण आफ्रिकेतून काढता पाय घेतला.
आणि सर्वात जास्त लसीकरण झालेले देश,सर्वात उत्तम आरोग्य सुविधा असलेले देश,स्वच्छता मध्ये पुढे असणारे देश.
ह्यांना 440 volt च झटका omiycron नी दिला.
लसीकरण काही कामाला आले नाही.
बिल गेट्स,आणि असे दिग्गज लसी उद्योगात आहेत.
हा पॉइंट हल्ल्यात घेऊ नये

sunil kachure's picture

9 May 2022 - 1:22 pm | sunil kachure

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.stati...

Covid मुळे झालेल्या मृत्यू ची टक्केवारी बघा .
गरीब मागास देशात कमी आहे.श्रीमंत देशात जास्त आहे.
लस विकत घेण्याची ज्या देशाची जास्त ताकत होती त्याचा देशात covid ची भीती मीडिया मार्फत पसरवली

चीन मध्ये उगम.जिथे उगम त्या लॅब चे भागीदार जगातील श्रीमंत देश आणि लोक.
लस निर्माण करणारे तेच,who त्यांचीच, उपचार काय करा हे सांगणारे तेच.
आणि सर्वात जास्त बाधित पण त्याच देशात.
काय योगायोग आहे.

गामा पैलवान's picture

10 May 2022 - 2:19 am | गामा पैलवान

चौकस२१२,

१.

नक्की कुठले सरकार? फक्त भारताचे की यच्च्यावत जगातले सरकार.

भारत सरकार.

२.

निदान गेला बाजार इंग्लंडात जिथे ते राहतात तिथे करोना ने मेलेल्या व्यक्ती चाय नातेवाईकास भेटून हा "करोना थोतांड " पाजण्याची हिंमत ते दाखवतील तर पैलवानांना डम आहे असे आपण म्हणू!

माझ्यात दम नाही. अर्थात, या चर्चेत दमाचा संबंधही येत नाही.

३.

फारच मोठ्या गफल्याचा शोध लावल्या बद्दल नोबेल पुरस्कार द्यावा म्हणतो

नोबेल पुरस्कार घेऊन मी काय करू? तो फारंच बोअरिंग आहे. त्यापेक्षा आपण समर्पक प्रश्न विचारायचा सराव करूया.

४.

जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व त्यावर रामबाण उपाय काय हे माहीत नसेल तर जे काही माहीत असलेले प्रतिबंधात्मक इलाज करणे, उपचार पाळणे हे गरजेचं आहे असं माझं मत आहे.

हे उपचार कोणी ठरवले? आणि लस कोणी विकसित केली? ही लस निर्माण करतांना पूर्वीच्या चुका परत तर केलेल्या नाहीत ना? हे कोणी तपासून पहायचं?

उपायाचं म्हणाल तर आयव्हरमेक्टिन हा रामबाण उपाय आहे. पण निरर्थक व घातक लशी पुढे रेटण्यासाठी तो दडवून ठेवला आहे.

५.

स्वतः मरणार आणि दुसर्यालाही मारणार

दुसऱ्याला मारणार ते कसं? लस घेतलेले फुटबॉलपटू मैदानावर तडफडून मेले ते मी ( किंवा माझ्यासारख्या पर्यायी दृष्टीकोनवाल्यांनी ) मारलेत असं तुमचं म्हणणं आहे का?

६.

सार्वजनिक आरोग्य हि बाब यांच्या खिचगणतीत हि नसते जणू

कारण की ती जबाबदारी आरोग्य खात्याच्या खिजगणतीत आहे. तिला मी माझ्या खिजगणतीत ठेवल्याने असा काय थोर उजेड पडणारे?

आ.न.,
-गा.पै.

चौकस२१२'s picture

10 May 2022 - 8:13 am | चौकस२१२

माझ्यात दम नाही. अर्थात, या चर्चेत दमाचा संबंधही येत नाही.
जगातील सरकार आणि वैदयकिया लोकांना " करोना हे थोतांड आहे " सांगण्याचा दम असतेल्याना उघडपणे हे आव्हान खरे तर स्वीकारता आले पाहिजे !
मग केतेल तुम्हाला किती गंभीर बातुम्ही बी बाबत आपण कॉन्स्पिरसी थेअरी दामटवताय ते !

गामा पैलवान's picture

10 May 2022 - 7:08 pm | गामा पैलवान

कॉमी,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

मृत्यूच्या एकापेक्षा जास्त कारणांपैकी एक कोव्हिड आहे असे डॉकटर सर्टिफाय करत असतील तरच कोव्हिड मृत्यू म्हणून गणला जातो.

मृत्यूची कारणं साधारणत: एकापेक्षा जास्तच असतात. फक्त करोनामुळे कोणी मृत्यू पावंत नसतो. आणि मग करोनासोबत इतर विषाणू सापडले अंगात तर ते ही मृत्यूचे कारण म्हणून धरणार का?

२.

तुम्ही कोव्हिड पॉझिटिव्ह असताना गाडीचा अपघात होऊन मेला तर त्यास कोव्हिड मृत्यू म्हणत नाहीत. तर्कसुसंगतच आहे.

प्रत्यक्षांत परिस्थिती नेमकी उलट आहे. कायझाद कापडिया हृदयविकारी झटक्याने वारला. तरी त्याची नोंद करोनामृत्यू अशी झाली होती. संदर्भ ( इंग्रजी दुवा ): https://henryclubs.com/kaizad-kapadia-fitness-expert-and-founder-of-k11-... असे अनेक मृत्यू करोनाच्या नावाखाली खपवण्यात आले आहेत. असल्या विदाची विश्वासार्हता शून्य आहे.

३.

नळाच्या पाण्याला सुद्धा जमत असेल तर आयसोलेट करा!

यापेक्षा करोना हे थोतांड आहे हे समजायला सरळ व सोपं आहे.

४.

कोव्हिड ची लस काम करते. मृत्यू, गंभीर आजार आणि हॉस्पिटलायझेशन तिन्ही गोष्टींपासून संरक्षण मिळते.

हा केवळ बिनबुडाचा दावा आहे. यांस कुठलाही आधार नाही. अनेक ठिकाणी लस घेतलेले लोकंच रुग्णालयात परतून दाखल होताहेत. दर वेळेस विषाणूत जरा काही बदल घडला की नवी लस घ्यावी लागते. याचाच अर्थ असा की जुनी लस टाकाऊ ठरली आहे.

५.

लेख वाचला. तो एक्सपिरिमेन्टल लसींबद्दल आहे.

आज घडीच्या ( दिनांक १० मे २०२२ ) करोनाच्या सर्व लशीही प्रायोगिकच आहेत.

आ.न.,
-गा.पै.

फक्त करोनामुळे कोणी मृत्यू पावंत नसतो. आणि मग करोनासोबत इतर विषाणू सापडले अंगात तर ते ही मृत्यूचे कारण म्हणून धरणार का?

मी वर दिल्याप्रमाणे- फक्त कोव्हिड पॉझिटिव्ह असणे हा निकष नसतो. कोव्हिडचे मृत्यूत योगदान असेल तरच कोव्हिड मृत्यूचे कारण म्हणून गणले जाते.

प्रत्यक्षांत परिस्थिती नेमकी उलट आहे. कायझाद कापडिया हृदयविकारी झटक्याने वारला. तरी त्याची नोंद करोनामृत्यू अशी झाली होती. संदर्भ ( इंग्रजी दुवा ): https://henryclubs.com/kaizad-kapadia-fitness-expert-and-founder-of-k11-... असे अनेक मृत्यू करोनाच्या नावाखाली खपवण्यात आले आहेत. असल्या विदाची विश्वासार्हता शून्य आहे.

श्वास घेण्यास त्रास होऊन अत्यंत कमी वेळात अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. माझ्या व्यक्तिगत ओळखीच्या २-३ व्यक्तींचा सुद्धा असाच मृत्यू झाला आहे. त्यांना ह्रदयविकार नव्हता, टेस्ट पॉझिटिव्ह होती आणि अचानक श्वास घेण्यात त्रास होऊन काही करायच्या आत मृत्यू झाला.

ICMR च्या गाईडलाईन्स वर इतक्या वरवरच्या बातमीने टिप्पणी करणे मला तरी भयंकर धाडसाचे काम वाटते बुवा.

आणि गेल्या वर्षीच्या ट्रेंड प्रमाणे जितके मृत्यू अपेक्षित होते त्यापेक्षा इतके जास्त मृत्यू कसे झाले ? आणि कोव्हिडच्या पीक महिन्यांमध्येच कसे झाले- ह्याचे तुमच्यापाशी काय एक्सप्लेनेशन आहे काय ?

हा केवळ बिनबुडाचा दावा आहे. यांस कुठलाही आधार नाही.

अर्थातच आहे !
हॉस्पिटलायझेशन-लस घेतलेलं वि. न घेतलेले

During October–November, unvaccinated persons had 13.9 and 53.2 times the risks for infection and COVID-19–associated death, respectively, compared with fully vaccinated persons who received booster doses, and 4.0 and 12.7 times the risks compared with fully vaccinated persons without booster doses.

मी मार्कस ह्यांना दिलेल्या प्रतिसादात एक दुवा आहे- त्यात सरळ सरळ रिपब्लिकन मत देणारे लोक- लसी घेत नव्हते- त्यामुळे जास्त मेले असा दावा आहे. तुम्ही त्यात अमेरिकेच्या एकन एक कौंटीची माहिती काढून बघू शकता. तिथे सरळ ट्रेंड दिसतोय कि ट्रम्प ला मत देणारे- लसी घेत नव्हते- जास्त मेले (वयाची अडजस्टमेंट करूनसुद्धा)

अनेक ठिकाणी लस घेतलेले लोकंच रुग्णालयात परतून दाखल होताहेत.

विदा पाहता तुमचे विधान चूक आहे. लस न घेतलेले जास्त हॉस्पिटलायझेशन करावे लागत आहेत. त्यांचा धोका कित्येक पट जास्त आहे.

दर वेळेस विषाणूत जरा काही बदल घडला की नवी लस घ्यावी लागते. याचाच अर्थ असा की जुनी लस टाकाऊ ठरली आहे.

टाकाऊ नाही. नव्या व्हरायन्ट्स समीर लस कमी प्रभावी असली तरी, वर लिहिल्याप्रमाणे- हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू पासून संरक्षण देते.

आज घडीच्या ( दिनांक १० मे २०२२ ) करोनाच्या सर्व लशीही प्रायोगिकच आहेत.

गामा, माझा मुद्दा होता की पसरणारी लस हि सध्या फक्त आणि फक्त संकल्पना आहे. एक्सपिरिमेन्टल शब्द चुकलाच म्हणायचा, पसरणारी लस हि चालू घडीला शुद्ध फॅन्टसी आहे आणि चर्चेत तिचा उल्लेख निरुपयोगी आहे. पसरणारी प्रतिकारशक्ती, प्रतिकारशक्ती पसर्वणारी लस ह्या दोन्ही गोष्टी केवळ फॅन्टसी आहेत.

~आ. न.,
कॉमी.

गामा पैलवान's picture

11 May 2022 - 3:32 am | गामा पैलवान

कॉमी,

१.

हॉस्पिटलायझेशन-लस घेतलेलं वि. न घेतलेले

During October–November, unvaccinated persons had 13.9 and 53.2 times the risks for infection and COVID-19–associated death, respectively, compared with fully vaccinated persons who received booster doses, and 4.0 and 12.7 times the risks compared with fully vaccinated persons without booster doses.

उपरोक्त लेखात खाली एक विधान सापडलं :

.... the influence of the Omicron variant on COVID-19–associated deaths by vaccination status in December could not be evaluated. Substantial case rate increases were recorded among unvaccinated and vaccinated persons when Omicron became the predominant variant in December ....

याचा अर्थ करोनाच्या ओमायक्रॉन आवृत्तीसमोर आधीची लस कुचकामी ठरते आहे. मग डेल्टा आवृत्तीची आकडेवारी कालबाह्य आहे. लस जर टिकणार नसेल तर तिचा उपयोग काय?

शिवाय ही आकडेवारी अमेरिकेतली आहे. भारताशी हिचा काय संबंध?

२.

.... रिपब्लिकन मत देणारे लोक- लसी घेत नव्हते- त्यामुळे जास्त मेले असा दावा आहे. तुम्ही त्यात अमेरिकेच्या एकन एक कौंटीची माहिती काढून बघू शकता.

तूर्तास मला भारतातल्या परिस्थितीत अधिक रस आहे. पण वेळ मिळाल्यास नंतर हि आकडेवारी पाहीन. अर्थात, रोग्यांचा डेम/रिप आदि कृत्रिम वर्गीकरणावर माझा विश्वास नाही.

३.

लस न घेतलेले जास्त हॉस्पिटलायझेशन करावे लागत आहेत.

इथे जवळंच उत्तर आयर्लंडात उलट परिस्थिती आहे. लस घेतल्याने काही फरक पडत नाही. असं निदर्शनास आलं आहे.

कृपया पान क्रमांक ९ वरील आलेख पाहणे : https://www.health-ni.gov.uk/sites/default/files/publications/health/doh...

https://i.imgur.com/zRzmCyk.jpeg

ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एक अहवाल प्रकाशित झालाय. त्यानुसार लस घेतलेले अधिक प्रमाणावर रुग्णालयात भरती होताहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.ox.ac.uk/news/2021-09-20-vaccinated-groups-highest-risk-covi...

४.

.... पसरणारी लस हि चालू घडीला शुद्ध फॅन्टसी आहे ....

करोनाचा विषाणू विलग झालेला नसतांना विकसित केलेली कुठलीही लस ही देखील एक फ्यांटसीच आहे.

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

11 May 2022 - 9:03 am | कॉमी

पहिला मुद्दा- चुकीचे वाचन.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एक अहवाल प्रकाशित झालाय. त्यानुसार लस घेतलेले अधिक प्रमाणावर रुग्णालयात भरती होताहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.ox.ac.uk/news/2021-09-20-vaccinated-groups-highest-risk-covi...

सदर दुवा वाचला असता तुम्ही धडधडीतपणे चुकीचा आणि लेखात कुठेही न दिलेला निष्कर्ष काढला आहे.
ऑक्सफर्डने जे टूल तयार केले आहे, ते लस घेतलेल्याच लोकांमध्ये कोणते विशिष्ठ गट हॉस्पिटलाइझ होण्याची शक्यता आहे- इतकेच वर्तवणारे आहे. त्यातून लस घेतलेले लोक न लस घेतलेल्यांपेक्षा अधिक रुग्ण म्हणून भरती होतायत असा आजिबात अर्थ निघत नाही!

सदर लेखात दिलेल्या टूल चा उद्देश आहे-
लसीचे दोन डोस घेऊनही मृत्यूचा धोका संभावणारे गट शोधणे- आणि ते टूल प्रमाणे खालील आहेत-

  • Those who are immunosuppressed as a result of chemotherapy, a recent bone marrow or solid organ transplant, or HIV/AIDS
  • People with neurological disorders, including dementia and Parkinson’s
  • Care home residents, and those with chronic disorders including Down’s Syndrome

तर ह्या लोकांना लस घेऊनसुद्धा मृत्यूचा धोका इतर लस घेतलेल्याच लोकांपेक्षा अधिक संभवतो. लेखात आणखी एक गोष्ट दिली आहे- The researchers report that there were relatively few COVID-19 related hospitalisations or deaths in the group who had received the second dose of any vaccine, meaning that the study lacked the statistical power to determine if the groups listed above are more, or less, at risk following a second vaccine dose compared with following the first dose.

आणि वरील जे गट आहेत- ते वेगळे करणे का गरजेचे आहे- तर त्यांना बूस्टर वैगेरे गोष्टी प्रायोरिटी ने मिळाव्यात.

सदर लेखात लस न घेतलेल्या लोकांचा दुरान्वये संबंध येत नाही. त्यामुळे लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेल्यांना जास्त धोका आहे असा निष्कर्ष तुम्ही दिलेल्या लेखातून आजिबात निघत नाही.

ती माहिती तुमचे इथे पाहू शकता-
Monthly age-standardised mortality rates (ASMRs) for deaths involving coronavirus (COVID-19) have been consistently lower for all months since booster introduction in September 2021 for people who had received a third dose or booster at least 21 days ago, compared with unvaccinated people and those with a first or second dose.

हि अतिशय बेसिक लोच्या टाईप गोष्ट असल्याने देतोय. उरलेल्यावर सावकाश प्रतिसाद देईन.

गामा पैलवान's picture

11 May 2022 - 11:47 pm | गामा पैलवान

कॉमी,

त्यामुळे लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेल्यांना जास्त धोका आहे असा निष्कर्ष तुम्ही दिलेल्या लेखातून आजिबात निघत नाही.

तुमचं बरोबर आहे. पण मी असा निष्कर्ष का काढला ते सांगतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा दुवा आता चालंत नाही. तो जनतेस बंद केला आहे. मात्र त्यातील संशोधन इतरत्र उपलब्ध आहे. त्यानुसार मूळ लेख British Medical Journal मध्ये प्रकाशित झाला होता. त्या मूळ लेखाचा दुवा असा आहे : https://www.bmj.com/content/374/bmj.n2244

या मूळ दुव्यात लशीकृत माणसांच्या रुग्णालयात दाखल होण्याविषयी अंदाज व्यक्त केले आहेत. तसंच हे अंदाज व्यक्त करायची गरज का पडते हे ही सांगितलं आहे. हे विश्लेषण जाम गोलमटोल भाषेत आहे. त्यानुसार लस टोचल्यावर काही जणांना गंभीर प्रतिक्रिया उमटू शकते. पण अशांच्या चाचण्या केलेल्या नसल्याने गंभीर प्रतिक्रियांसंबंधी नक्की धोके कोणते ते आजूनही माहित नाही.

मग लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा कशाच्या हवाल्याने दिला जातोय? उत्तर : कसल्याही नाही. हा निर्वाळा हवेतला इमला आहे.

आता तुम्ही दिलेला दुवा पाहूया : https://www.ons.gov.uk/peoplepopulationandcommunity/birthsdeathsandmarri...

या दुव्यावर गेलं की Deaths by vaccination status, England नामे दुवा दिसतो : https://www.ons.gov.uk/peoplepopulationandcommunity/birthsdeathsandmarri...

या दुव्यावर एक *.xlsx धारिका आहे : https://www.ons.gov.uk/file?uri=%2fpeoplepopulationandcommunity%2fbirths...

ही धारिका मी गूगल ड्राईव्ह वर चढवली : https://docs.google.com/spreadsheets/d/1EO9dTmqiQpkA5Xo5-K4QIm0AFH91zNRx...

Table3 मध्ये लशीकृत व लसविहीन मृत्यूंची नोंद आहे. दोन्हींत फारसा फरक नाही. मग लस घ्यायचीच कशाला? असाच काहीसा कल बाकी तालिकांत आढळून येतो. एक्सेल चाळणी ( data fileters ) लावून विदा तपासून पाहता येईल.

इंग्लंड मध्ये ८० % ते ९० % लोकांचं लशीकरण झालेलं आहे ( संदर्भ : https://www.bbc.co.uk/news/health-55274833 ). तरीही रुग्णालयात दाखल व मृत्यूंमध्ये लसीकृत व लसविहीन सारख्याच प्रमाणात म्हणजे ५० % आहेत. म्हणजेच लशी एका प्रकारे निरर्थक आहेत.

असो.

माझ्या मते काय घडलं ते सांगतो. लस हेच मृत्यूस कारण आहे. कारण की ते प्रतिकारयंत्रणेत मोडतोड घडवून आणतं. म्हणून लसीकृत लोकं परत परत रुग्णालयात दाखल होतात. नुकताच फेब्रुवारीत अमेरिकेतला एक ७ वर्षांचा मुलगा फायझरची लस घेतल्यावर हृत्शूलाने ( = हार्ट अॅटॅक ने ) मृत्युमुखी पडला. लस सोडल्यास दुसरं काय कारण आहे? बातमी : https://expose-news.com/2022/05/10/7-year-old-boy-dies-from-pfizer-injec...

हे घ्या इंग्लंडमधील बाळहत्येचे आवाहन : https://i.imgur.com/KWzgONK.jpeg
https://i.imgur.com/KWzgONK.jpeg

प्रतिकारयंत्रणेची मोडतोड लपवण्यासाठी विषाणूत उत्परिवर्तन झाल्याची खोटी किंवा खरी हाकाटी पिटली जाते.

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

12 May 2022 - 1:27 pm | कॉमी

https://www.bmj.com/content/374/bmj.n2244

या मूळ दुव्यात लशीकृत माणसांच्या रुग्णालयात दाखल होण्याविषयी अंदाज व्यक्त केले आहेत. तसंच हे अंदाज व्यक्त करायची गरज का पडते हे ही सांगितलं आहे. हे विश्लेषण जाम गोलमटोल भाषेत आहे. त्यानुसार लस टोचल्यावर काही जणांना गंभीर प्रतिक्रिया उमटू शकते. पण अशांच्या चाचण्या केलेल्या नसल्याने गंभीर प्रतिक्रियांसंबंधी नक्की धोके कोणते ते आजूनही माहित नाही.

सदर लेख वरवर वाचला असता, त्यात वरिल लेखाचेच आणखी शास्त्रिय भाषेतले रुप आढळले. त्यात लसी नंतर उमटणार्या प्रतिक्रियेबद्द्ल वरकरणीतरी काही उल्लेख दिसला नाही. त्यातल्या स्पेसिफिक भागात असल्यास उपकृत करावे.
लस घेतल्यावर सुद्धा कोणते गट धोक्यात असू शक्तात हे शोधणे महत्वाचे आहेच. तेच या दोन्ही लेखांमध्ये दिसले.

Table3 मध्ये लशीकृत व लसविहीन मृत्यूंची नोंद आहे. दोन्हींत फारसा फरक नाही. मग लस घ्यायचीच कशाला? असाच काहीसा कल बाकी तालिकांत आढळून येतो. एक्सेल चाळणी ( data fileters ) लावून विदा तपासून पाहता येईल.

विदा पाहिला. लस घेतलेल्या लोकांचा (किमान एक डोस) कोव्हिद मृत्युंमधला वाटा- ४१.६७%
लस न घेतलेल्या लोकांचा वाटा- ५८.३३%
किमान १ डोस घेतलेले युके मध्ये ९२% लोक आहेत. ८% लोकसंख्या पूलमधून ५८% मृत्यु होतायत हा आकडा बरेच काही बोलून जातो.

जेव्हा १००% लसीकरण होइल तेव्हा १००% मृत्यु लसिकरण झालेल्या गटातूनच असणार आहेत.
म्हणजे सगळ्यांचे लसीकरण झाल्यावर एक माणूस मेला तर १००% मृत्यु लसीकरण झालेल्यांचेच आहेत म्हणत तुम्ही "लस घेउन आम्हाला काय फायदा झाला ?" असा तर्कदुष्ट सवाल करणार.
जसे जसे दुसरा डोस, तिसरा/चौथा डोस- पुढे पुढे जाता तसे एकूण मृत्युमधला वाटा कमी होत जातो आणि मृत्युदर देखील कमी होतो.
आणि ज्या डेटावरुन टिप्पणी होत आहे त्याच डेटावरुन त्याच संस्थेने लसीकरण झालेल्या गटांमध्ये मृत्युदर कमी आहे असे सांगितले आहे. लसीकरण वाढल्याने एकूण मृत्यु सुद्धा घटले आहेत.

लस हेच मृत्यूस कारण आहे. कारण की ते प्रतिकारयंत्रणेत मोडतोड घडवून आणतं. म्हणून लसीकृत लोकं परत परत रुग्णालयात दाखल होतात. नुकताच फेब्रुवारीत अमेरिकेतला एक ७ वर्षांचा मुलगा फायझरची लस घेतल्यावर हृत्शूलाने ( = हार्ट अॅटॅक ने ) मृत्युमुखी पडला. लस सोडल्यास दुसरं काय कारण आहे? बातमी : https://expose-news.com/2022/05/10/7-year-old-boy-dies-from-pfizer-injec...

तुमचे मत निराधार आहे. इतकेच नव्हे ते तर्कदूष्ट सुद्धा आहे. लस घेण्याअधी इतके लोक मेले आहेत. लस घेणार्यातले १% सोडा, ०.०००००१% सुद्धा लसीमुळे रिअ‍ॅक्शन येऊन मेले नाहियेत. कोण कुठला हा एक्ष्पोसे पेपर- काय ती शेंडा व बुडखा नसलेली बातमी. मुलाचे नाव नाही, वैद्यकिय तज्ञांचे मत नाही, लस आणि मृत्यु मध्ये संबंध काय तर १३ दिवसांचे अंतर इतकेच. VAERS हा आजिबात विश्वसनीय स्त्रोत नाहिये. त्यात कोणीही काहिहि लिहू शकतं.

बर, तुम्हाला भारतातली परिस्थीती हवी होता ना- ही बघा.
Unvaccinated account for 92% Covid deaths in 2022: ICMR

विवेकपटाईत's picture

18 Jun 2022 - 9:53 am | विवेकपटाईत

Unvaccinated account for 92% Covid deaths in 2022: ICMR
भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा. माझ्या घरी सर्वांना लस घेतल्या नंतर करोंना झाला.
अधिकान्श लोक चुकीच्या औषधी घेतल्याने मेले करोंनाने नाही.

आता पुन्हा करोंना लाट येत आहे. पूर्वी सारखी घातक नसेल तरीही यावेळी स्वस्त आयुर्वेदिक औषधी घेणे अधिक उपयुक्त. (गिलोय तुळशी काढा घेतली तरी चालेल). पतंजलि शिक्षण संस्थान करोंना काळात एक ही दिवस बंद झाले नाही त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त हाच काढा दिला होता आणि रोज एक तास योग आणि व्यायाम.

कॉमी's picture

18 Jun 2022 - 3:53 pm | कॉमी

भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा.

पटाईटजी तुमचे ते योगा बिगा, आयुर्वेद बियुर्वेद काय आळवायचे ते आळवा. पण उगाच मुद्दामून चुकीचे वाचन करू नका. नीट वाचा.

भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा. माझ्या घरी सर्वांना लस घेतल्या नंतर करोंना झाला.
अधिकान्श लोक चुकीच्या औषधी घेतल्याने मेले करोंनाने नाही.

ICMR ने केलेला दावा- "2022 मध्ये मृत्यू झालेल्यांपैकी 94% लस न घेतलेले होते." डिसेंम्बर 2021ला लसीकरण टक्का होता 89 %. उगाच फेकफेकी करून दिशाभूल करू नका.

विवेकपटाईत's picture

27 Jul 2022 - 10:01 pm | विवेकपटाईत

पटाईटजी तुमचे ते योगा बिगा, आयुर्वेद बियुर्वेद काय आळवायचे ते आळवा. पण उगाच मुद्दामून चुकीचे वाचन करू नका. नीट वाचा.

ज्यांनी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली ते जिवंत राहिले विज्ञाननिष्ठ औषध फक्त आयुर्वेद जवळ होते. योग आणि आयुर्वेदाने आपल्या देशात कोट्यावधी लोकांचे रक्षण केले हेच सत्य आहे. तथाकथित मॉडर्न ???जवळ औषधे नव्हतेच. नुकताच एका औषधाचा 1000 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे.

कॉमी's picture

27 Jul 2022 - 10:22 pm | कॉमी

भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा.

हि थाप मारली तुम्ही, त्याकडे आता लक्ष आजिबात दिले नाही. असो.

ज्यांनी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली ते जिवंत राहिले विज्ञाननिष्ठ औषध फक्त आयुर्वेद जवळ होते. योग आणि आयुर्वेदाने आपल्या देशात कोट्यावधी लोकांचे रक्षण केले हेच सत्य आहे. तथाकथित मॉडर्न ???जवळ औषधे नव्हतेच.

via GIPHY

इतके तथ्यहीन आणि भंपक विधान आहे की मी काही न लिहिता सुद्धा सगळ्यांना फोलपणा समजेल.

हैद्राबाद मधे आमचे एक जुने ओळखिचे आहेत. ते कुंडली बघुन भविष्य, घर बघुन वास्तु, हात बघुन अवलक्षण, आपलं ते भविष्य वगेरे वगेरे करतात.
त्यांनी म्हणे (म्हणे च बरंका) कित्येकांची कुंडली बघुन त्याला कोरोना होइल की नाही हे सांगीतले होते. वर कोरोनाचे निदान पण केले होते. आहात कुठे?

त्यांनी म्हणे (पुन्हा म्हणे च बरंका) एक ईलेक्ट्रोनिक डीवाईस शोधले आहे जे वैदीक प्रींसिपल नुसार घरात पॉसिटीव एनर्जी रेडीएट करते. (हायला मराठीत कसे लिवायचे हे सारे). किंमत फकस्त २०० डॉलरा. दोन घेतले तर ३०० डॉलरा . . जितके जास्त घ्याल तितके जास्त डॉलरा सुट . .
एजन्सी घावी म्हणतो. . .

त्यांनी म्हणे (पुन्हा म्हणे च बरंका) एक ईलेक्ट्रोनिक डीवाईस शोधले आहे जे वैदीक प्रींसिपल नुसार घरात पॉसिटीव एनर्जी रेडीएट करते. (हायला मराठीत कसे लिवायचे हे सारे).

त्यांनी म्हणे एक विजाणू उपकरण शोधले आहे जे वैदीक तत्वानुसार घरात सकारात्मक उर्जा विकीरीत करते.

नगरी's picture

11 May 2022 - 4:42 am | नगरी

प्रतिसाद वाचून मस्त करमणूक झाली. अरे तो काही मायक्रोन्स चा किडा त्याला मास्क वापरून कसे थोपवणार? असो सूर्याच्या रेडीएशनला नाही का आम्ही हॅट किंवा टोपी घालून थोपवतो.

नगरी's picture

11 May 2022 - 5:16 am | नगरी

पृथ्वी चौकोनी नाही,त्रिकोणी आहे.
सांगतो कसे ते, सूर्य असा फिरला की उन्हाळा , थोडा अजून फिरला की पावसाळा आणि थोडा अजून फिरला की हिवाळा.
त्रिकोणीच आहे.

सुक्या's picture

12 May 2022 - 12:47 am | सुक्या

पृथ्वी चौकोनी नाही,त्रिकोणी आहे.

पृथ्वी चौकोनीच आहे. तुमची माहीती चुकीची आहे. फेडरल गव्हर्नमेंट आम्हाला कोपर्‍यावर जाउ देत नाही. तिथे जौ द्या आम्हाला .. लगेच आम्ही दुध का दुध पाणी का पाणी करतो का नाही ते बघा ..
:-)

जगात खूप साऱ्या गोष्टी मानवास खूप हानिकारक आहेत.
१) रासायनिक कारखाने,शहरांचे सांडपाणी पिण्याच्या पाण्याचे सोत्र प्रदूषित करत आहेत
२)विविध हायब्रीड बियाणे,जेनेटिक बदल केलेले अन्न धान्य मानव जात संपवू शकतात..३) वायू प्रदूषण खूप तीव्र आहे पृथ्वी चे हवामान बदलून मानव जात पृथ्वी वरूनच नश्ट होईल
त्या बाबत मीडिया सरकार हुशार लोक जास्त बोलत नाहीत .covid चा विषय असेल तर जगातील सर्व सरकार,हुशार लोक,मीडिया ह्यांना भलती चिंता लागलेली असते.
Covid माणसाचे वरील तीन गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करणार नाही .होवू ध्या covid काही त्याला थांबवायची गरज नाही.
उगाच हायपर होण्याची काही गरज नाही.
मी तर म्हणतो होवू सर्वांना covid.
उगाच स्व स्वार्थ साधण्यासाठी इश्यू करू नका.
लोकं मारायला तयार आहेत.

गामा पैलवान's picture

13 May 2022 - 2:23 am | गामा पैलवान

कॉमी,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

यात लसी नंतर उमटणार्या प्रतिक्रियेबद्द्ल वरकरणीतरी काही उल्लेख दिसला नाही.

नाहीच दिसणार. कारण की तो लेख रुग्णालयप्रविष्ट व मृतांची सांख्यिकीय चिकित्सा करणारा आहे. त्यामागील वैद्यकीय कारणं शोधणारा नाही.

२.

८% लोकसंख्या पूलमधून ५८% मृत्यु होतायत हा आकडा बरेच काही बोलून जातो.

ही टक्केवारी सर्वसाधारण जनतेची नसून फक्त रुग्णालयात प्रविष्ट झालेल्यांची आहे. म्हणून हिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला पाहिजे. जर ९२ % लसीकरण पूर्ण झालं असेल तर ४२ % इतक्या मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण भरती व्हायला नकोतंच मुळातून. लशीत काहीतरी गडबड आहे.

३.

जसे जसे दुसरा डोस, तिसरा/चौथा डोस- पुढे पुढे जाता तसे एकूण मृत्युमधला वाटा कमी होत जातो आणि मृत्युदर देखील कमी होतो.

नेमक्या याच बळजबरीस माझा आक्षेप आहे. एकदा का लशीचा पहिला ढोस घेतला की पुढचे घ्यावेच लागतात.

४.

म्हणजे सगळ्यांचे लसीकरण झाल्यावर एक माणूस मेला तर १००% मृत्यु लसीकरण झालेल्यांचेच आहेत म्हणत तुम्ही "लस घेउन आम्हाला काय फायदा झाला ?" असा तर्कदुष्ट सवाल करणार.

असा सवाल करायलाच पाहिजे. तो मरणारा माणूस नेमका मीच असलो म्हणजे? समजा जर मी लस घेतली तर माझ्या संरक्षणाची कसलीही हमी नाही. वर माझ्या प्रतिकारयंत्रणेची मोडतोड सहन करायची. आणि हे दुष्टचक्र सतत चालूच राहणार. एका ढोसात काम थोडंच भागणार आहे.

५.

जसे जसे दुसरा डोस, तिसरा/चौथा डोस- पुढे पुढे जाता तसे एकूण मृत्युमधला वाटा कमी होत जातो आणि मृत्युदर देखील कमी होतो.

हे या विदातून कुठेही स्पष्ट होत नाही. उलट लस घेऊन मेलेल्यांचं प्रमाण ४२ % इतकं अतिप्रचंड आहे.

६.

लस घेणार्यातले १% सोडा, ०.०००००१% सुद्धा लसीमुळे रिअ‍ॅक्शन येऊन मेले नाहियेत.

हे विधान तुम्ही कोणत्या विदाच्या वा पुराव्याच्या आधारे केलं ते कळेल काय?

७.

कोण कुठला हा एक्ष्पोसे पेपर- काय ती शेंडा व बुडखा नसलेली बातमी. मुलाचे नाव नाही, वैद्यकिय तज्ञांचे मत नाही, लस आणि मृत्यु मध्ये संबंध काय तर १३ दिवसांचे अंतर इतकेच. VAERS हा आजिबात विश्वसनीय स्त्रोत नाहिये. त्यात कोणीही काहिहि लिहू शकतं.

VERS हे लसहानी ( vaccine injury ) च्या नोंदी ठेवण्यासाठी अमेरिकी सरकारने खोललेलं संकेतस्थळ आहे. तुम्ही कोणत्या आधारे त्यास अविश्वसनीय स्रोत ठरवंत आहात ? मेलेल्या मुलाचा VERS क्रमांक २१५२५६० ( = 2152560 ) आहे व तो या धारिकेत सापडतो : https://vaers.hhs.gov/eSubDownload/index.jsp?fn=2022VAERSVAX.csv

मृताचा नावगाव वगैरे तपशील उघड करायचा नसतो असा सरकारी कायदा आहे. मृत्यू १३ दिवसांनी झाला म्हणून काय झालं? लस टोचल्यावर लगेच मरायला हा काय हिंदी सिनेमा आहे का?

८.

बर, तुम्हाला भारतातली परिस्थीती हवी होता ना- ही बघा.
Unvaccinated account for 92% Covid deaths in 2022: ICMR

हा जुना ०४ मार्च २०२२ चा दुवा आहे. त्यानंतर व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. तत्संबंधी दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/

असो.

लस हाच विषाणू आहे. लशीबद्दल प्रश्न विचारायला हवेतंच हवेत.

आ.न.,
-गा.पै.

जर ९२ % लसीकरण पूर्ण झालं असेल तर ४२ % इतक्या मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण भरती व्हायला नकोतंच मुळातून. लशीत काहीतरी गडबड आहे.

लस संपूर्ण संरक्षण देत नसली तरी जिवंत राहाण्याचे आणि गंभीर रित्या आजारी न पडण्याचे प्रमाण लस घेतलेल्यांमध्ये जास्त आहे.

हे विधान तुम्ही कोणत्या विदाच्या वा पुराव्याच्या आधारे केलं ते कळेल काय?

VAERS relies on healthcare providers, vaccine manufacturers and vaccine recipients to submit reports of adverse events following vaccination. Those events are not called “symptoms” or “side effects” because events reported to VAERS are not all verifiably linked to the vaccines, as the CDC says on its website.

जून 2021 पर्यंत तरी केवळ 3 कन्फर्म लसीमुळे झालेले मृत्यू होते. VAERS वरचे सगळे मृत्यू खरे मानले तरी 0.00१८ % होतात.
https://covid-101.org/science/how-many-people-have-died-from-the-vaccine...

हा जुना ०४ मार्च २०२२ चा दुवा आहे. त्यानंतर व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. तत्संबंधी दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/

गैरसमज आहे.हेडलाईनच्या पुढे वाचा- हे जे पॉल आहेत ते भारत सरकारच्या ४-५ लाख मृत्यूंना फुगवलेले म्हणत नाहीयेत (ज्यावर वरील ९२% आकडा आधारित होता) तर ते लॅन्सट मध्ये एक्सेस मोर्तलिटी वर जो चाळीस लाख आकडा प्रकाशित झाला (पुढे जो WHO ने वाढवून ५४ लाख केला आणि ज्याबद्दल तुम्ही टिप्पणी करत नाही आहात) त्याबद्दल बोलतायत. ४८९००० मेले ह्याबद्दल नीती आयोगाचे पॉल ह्यांना आक्षेप नाहीये. मी ९२% आकडा दिलाय तो त्याच गव्हर्नमेन्ट अकड्यांवरच आहे.

कॉमी's picture

13 May 2022 - 7:42 am | कॉमी

गामाजी,
तुमच्या मुद्द्यांना शक्य तितके काउंटर केले आहे. यापुढेही काही रोचक आणि चुकीचा दावा दिसल्यास करीन. पण तुमचे मुद्दे ग्रीक दंतकथांमधल्या हायड्रा राक्षसासारखे आहेत.

एक डोकं कापलं कि तात्काळ दुसरं डोकं उगवतं.
कापलेले डोके सुद्धा हळूच पुन्हा वर येते.

उदाहरणार्थ- विषाणू आयसोलेट केलेला आहे, पूर्ण जिनोम सिक्वेन्सीन्ग उपलब्ध आहे असा पुरावा दिल्यावर विषाणू आयसोलेट केलेला आहे ह्यावर तुम्ही अजिबात मत प्रदर्शित करत नाही, त्या लेखातल्या तिसऱ्याच गोष्टींवर टिप्पणी करता. आणि पुढच्या प्रतिसादात पुन्हा- विषाणू विलग केलेला नाही असा दावा करता.

काही लेखांचे चुकीचे इंटरप्रिटेशन करून टाकले होते.
ऑक्सफर्डचा असो किंवा आत्ताचा ताजा निधी आयोगाचे पॉल काय म्हणले तो असो.

मी शक्यतो तुमच्या एकन एक मुद्द्यांना ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, पण मला तसे तुमच्याकडून होताना दिसत नाही. म्हणजे कोव्हिड पॉजीटीव्ह झालेल्या लोकांच्या गटात, लसीकरण झालेल्या गटात मृत्युदर आणि हॉस्पिटलात भरती होण्याचा दर कमी, आणि तोच दर लसीकरण न झालेल्यांच्यात काही पटीने जास्त आहे आहे याकडे साफ दुर्लक्ष करत तुम्ही फक्त एकूण मृत्यूमध्ये लसीकरण झालेले ४२% आहेत यावर आडून बसला. त्यावर मी शक्य तितके स्पष्टीकरण दिले आहे, पण तुम्ही त्यावरच अडून आहात.
बरं, जगात इतके जास्त लोक मेले आहेत- १.५ करोड. करोना थोतांड असेल तर इतके लोक मेले कसे काय ? आणि जे मेले ते बरोबर कोव्हिड ज्या वेळेस उच्चस्तरावर होता त्यावेळेतच कसे मेले ? त्या एक्सेस मॉर्टलिटी वर सुद्धा काहीच टिप्पणी नाही.

बरं आता चर्चेत ANECDOTES आणायचे नसतात म्हणून मी थांबलेलो. पण सांगतोच. लस येण्याच्या आधी- पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत माझे ३ विविध वयाचे नातेवाईक/मित्र गेले. त्यांना रातोरात श्वास घ्यायला त्रास झाला आणि गेले. त्याहून संख्येने कित्येक जास्त ओळखीचे गंभीरपणे आजारी होते, त्यांना ऑक्सिजनवर ठेवावे लागलेले. लस आल्यानंतर पुढे जी ओमीक्रोनची तिसरी लाट आली त्यात जवळपास दिसेल तो माणूस पॉझिटिव्ह अशी परिस्थिती होती. नुसता पाझिटिव्ह नाही तर माईल्ड आजारी सुद्धा- खोकला, ताप. पण (बहुदा) लसीकरणामुळे कोणालाही हॉस्पिटलमध्ये पायसुद्धा ठेवावा लागला नाही.

सध्यापुरता तरी विराम.

- आ. न.,
कॉमी.

सुबोध खरे's picture

13 May 2022 - 10:38 am | सुबोध खरे

@कॉमि

आकाशातील ग्रहांची शांती करता येते

दुराग्रहाची नाही.

गा पै यांचे मत टोकाच्या दुराग्रहाचे असल्यामुळे त्यांच्याशी वितंडवाद घालण्याचे मी केंव्हाच सोडून दिले आहे.

माझ्या mbbs वर्गाचा व्हॉट्स अँप ग्रुप आहे (सदस्य १२५) यातील लोक जगभर विखुरलेले आहेत इंग्लंड अमेरिका मध्यपूर्व युरोप इ

तसेच माझ्या कॉलेजचा ( AFMC) चा मुंबैतील डॉक्टरांचा पण ग्रुप आहे.( २२०)

तसेच आय एम ए चा मुलुंड (२५६)आणि मुंबई (१७०)असे दोन ग्रुप आहेत.

या सर्व ग्रुपवरील अतिदक्षता विभागात काम केलेल्या सर्वच डॉक्टरांचे स्वतःचे अनुभव असे आहेत कि जेवढे मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते.

मृत्यू होणार्यात अमेरिकेत सर्वात जास्त लोक लठ्ठ आणि मधुमेहाने किंवा हृदयविकाराने पीडित होते.

बाकी आकडेवारीने एक सोडून कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते.

ती एक गोष्ट म्हणजे सत्य

काजव्याणे सूर्याची बरोबरी करणे हा मूर्खपणाच पण गिर्र अंधारात काजव्यांचा प्रकाश पण सूर्य प्रकाश पेक्षा खूप जास्त किमतीचा असतो
लस लस लस.

ह्या वर चर्चा चालू आकडे वारी फेकली जात आहे.
पण साथीच्या रोगांचे जीवन चक्र हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे.
जसे सुरवंट पासून फुल पाखरू बनते ते एक चक्र आहे.
साथीचे रोग.
लागण,उच्च पातळी,कमजोर होणे .आणि शेवटी नष्ट होणें

Covid जर साथी चा रोग असेल तर तो काही वरील नियमाला अपवाद असू च शकत नाहीं.
पहिली लाट लागण.
दुसरी लाट उच्च पातळीवर.
तिसरी लाट सौम्य.
आणि नंतर नष्ट.
Covid बाबत हेच घडले आहे .प्रथम फक्त लागण झाली होती .नंतर दुसऱ्या लाटे मध्ये मृत्यू वाढले.आणि तिसऱ्या लाटेत omiycron.विषाणू सौम्य झाला.
लस नसती घेतली तरी हेच घडले असते.
हे नैसर्गिक आहे.

लस घेतलेल्या लोकांपेक्षा लस न घेतलेली लोक जास्त गंभीर होती.

जी लस न घेतलेली लोक जास्त गंभीर होती त्यांना पहिली covid ची लागण झाली होती की नव्हती.
ह्याची माहिती अती म्हणजे खूप महत्वाची आहे.
कोविड लाटेत कधी मृत्यू वाढले.
ह्याचे उत्तर पण खूप महत्वाचे आहे...
निसर्ग नियमानुसार साथीचा covid साथ उच्च पातळीवर होती तेव्हाच ना?
ह्याचे उत्तर जरुर दिले जावे.
.लस उपलब्ध नसती तर आज काय स्थिती असती ह्या वर मत व्यक्त करावे.
माझ्या मतानुसार काही फरक पडला नसता.फुकट abjo रुपये फुकट गेले आहेत .
सर्व शक्यता गृहीत धरून आकडे वारी द्यावी.
ती उपलब्ध असणारं च नाहीं
पूर्ण खात्री आहे.

sunil kachure's picture

13 May 2022 - 1:19 pm | sunil kachure

ज्यांचा bmi जास्त होता आणि ज्यांना जनुकीय बिघाड झाल्यावर जो रोग होती तो मधुमेह हा रोग झाला होता
त्या लोकांचा मृत्यू अमेरिकेत covid मुळे जास्त झाले आहे असे dr खरे दावा करत आहेत.
रोगप्रतिकार यंत्रणा त्या यंत्रणेची कुवत,क्षमता आणि bmi म्हणजे लठ्ठ पना ह्याचा काही ही कुठून पण लांबून तरी संबंध आहे का?
हे स्पष्ट करावे.

संदर्भ : लोकसत्तामधील बातमी (दुसरा दुवा)

लोकसत्ता दि ७ मार्चच्या अंकातली बातमी - राज्यातील सुमारे एक कोटी ६४ लाख लोकांनी कोव्हिड लशीची एक मात्रा घेतली पण दुसरी मात्रा घेतलेली नाही. समजा यातील निम्याहूनही अधिक (साधारण एक कोटी म्हणू) लोकांचे दुसरी मात्रा न घेण्याचे कारण बेफिकिरी, दिरंगाई , वैयक्तिक अडचणी यापैकी काही असेल असे मानले तरी उरलेल्या किमान साठ लाख लोकांनी दुसरी मात्रा का बरं घेतली नसेल ? तेही शासकीय केंद्रात मोफत उपलब्ध असताना ? साधारणपणे कोव्हिड लस पुर्णतः सुरक्षित असाच प्रचार प्रसारमाध्यमांतून केला गेला आहे. आणि कोव्हिड लस न घेणे म्हणजे अडाणीपणा, हेकटपणा किंवा कुठल्यातरी अंधविश्वासातून उपजलेला विरोध असेच समजले जात आहे. पण एक मात्रा घेवून झाल्यानंतर दुसरी मात्रा न घेणारे लोक तसं केवळ कुठल्यातरी चुकीच्या व अवैज्ञानिक विचारप्रवाहात अडकून करत असतील असे मानणे योग्य होईल का ?राज्यातील हे साठ लाखांहून अधिक लोक स्वतःला किंवा निकटच्या लोकांना अनुभवास आलेल्या लशीच्या दुष्परिणामामुळे तर दुसरी मात्रा घेण्याचे टाळत असतील असे तर नाही ना ? कोव्हिड लस (वा लसीकरणाची पद्धत) संपुर्णतः सुरक्षितच आहे , म्हणजे लशीचे काही दुष्परिणाम असणाची शक्यताही पुर्णपणे नाकारणे हे विज्ञानाच्या तत्वांना कितपत धरुन आहे ? एकुणातच एखाद्या गोष्टीत त्रुटी असण्याची शक्यताही नाकारणे म्हणजे सुधारणेची कवाडे स्वतःहून बंद करणे.

मी एका आरोग्यविषयक व्हॉट्स अ‍ॅप समूहाचा सदस्य आहे. या समूहाच्या अ‍ॅडमिन असलेल्या एक आयुर्वेदतज्ज्ञ फक्त त्या समूहात पोस्ट करतात. एका पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले होते की "कोविड होऊन गेल्यानंतर, किंवा कोविडसाठी लसीकरण केलेल्या रुग्णांमध्येही आम्लपित्ताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे" . दुर्दैवाने बहुतांशी डॉक्टर मात्र अशा प्रकारे लशीच्या विपरित परिणामाबद्दल उघडपणे बोलताना दिसत नाहीत.

माझी भूमिका लसीकरणाच्या विरोधी नाही पण लशीच्या परिणामांचा अधिक विस्ताराने व खोलवर अभ्यास व्हावा असा माझा आग्रह आहे.
खरेतर देशात कोट्यावधी लोकांनी लस घेतलेली असताना लशीच्या बर्‍या वाईट परिणामांचा मोठा विदा अगदी सहज गोळा होवू शकला असता. या विदाचा उपयोग करुन लस वा लस घेण्याची पद्धत (दोन मात्रांमधील अंतर , मात्रा घेण्यापुर्वी व नंतर घ्यावयाची विशेष काळजी , पूरक औषधे, आवश्यकतेप्रमाणे जीवनसत्वांच्या गोळ्या ई.) या सगळ्यात अधिक सुधारणा करता आली असती. पण लस उत्पादक कंपन्या वा सरकारही याबाबत उत्साही आहेत असे दिसत नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही. प्रसारमाध्यमांतून जाहिराती करुन संपर्काची विविध माध्यमे उपलब्ध करुन देत याबाबतचा विदा गोळा केला जावू शकतो. डॉक्टर्स व पॅथॉलॉजी लॅब्स यांनाही प्रोत्साहित करुन अधिकाधिक विदा गोळा केला जावा आणि या विदाच्या आधारे येणार्‍या काळात लसीकरण अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2022 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटच्या उता-यातील विचारांशी तंतोतंत सहमती.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

14 May 2022 - 8:04 pm | सुबोध खरे

"कोविड होऊन गेल्यानंतर, किंवा कोविडसाठी लसीकरण केलेल्या रुग्णांमध्येही आम्लपित्ताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे"

हे आम्लपित्त कोव्हीड आजारामुळे झालं कि लसीमुळे झालं कि घरात बसून राहिल्यामुळे झालं?

आम्लपित्त होण्याचे प्रमाण कोव्हिडची लस उपलब्ध होण्याच्या अगोदरच प्रचंड प्रमाणात वाढलेलं होतं.

याची अनेक कारणे आहेत.

१) घरातल्या घरात बसून राहणे

२) प्रचंड भीती आणि काळजी मग हि रोगाची असो किंवा आपल्या नोकरी धंद्याची असो किंवा आपल्या वयस्कर मातापिता किंवा नातेवाईकांची

३) टीव्ही/ संगणक/ भ्रमणध्वनी सोडला तर बाकी कोणताही करमणुकीचा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे आणि पूर्ण वेळ घरात असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी आपले लक्ष सुग्रास खाण्यावर आणि बनवण्यावर केंद्रित केला होतं यामुळे एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार सर्रास दिसून आला.

४) हातावर पोट असणारे सोडुन बाकी सर्वांचे वजन वाढले. आमच्या स्वयंपाकाला येणाऱ्या बाई सुद्धा बाकी सर्वानी तात्पुरते कामावरून काढले असल्यामुळे भरपूर वजन वाढवून फुगल्या होत्या. कारण वेगवेगळ्या घरी जाण्यासाठी त्यांना रोज ४-५ किमी चालावे लागत होते. आता परत कामे चालू झाल्यावर त्यांचे वजन कमी होऊन पूर्ववत झाले आहे.

४) अतिरिक्त खाण्यामुळे यकृतात अतिरिक्त चरबी दिसून येणे हा प्रकार गेली दोन वर्षे मी स्वतः सोनोग्राफी करताना पाहत आलो आहे.

तेंव्हा केवळ अनुमान धपक्यावर अवलंबून राहण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

गामा पैलवान's picture

15 May 2022 - 2:03 am | गामा पैलवान

सुबोध खरे,

हाच न्याय करोनासही लागू पडतो ना? आम्लपित्त लशीने होत नसून इतर कारणं आहेत. तर याच धर्तीवर असाही प्रश्न विचारता येतो की जीव गेला तो करोनामुळे की सहव्याधींमुळे? निरोगी तरुणांना हार्ट अॅटॅक येतात ते mRNA लसीने प्रथिननिर्मितीत हस्तक्षेप केल्याने की आपोआप?

आ.न.,
-गा.पै.

तार्किक वाटत आहे

माझ्या आईला, वय वर्षे 78, करोनाची लागण झाली होती . ऑक्सीजनची पातळी 55% च्या आसपास होती, पण ती वाचली ... तिला, मधुमेह, किडनी ट्रबल आणि हृदयरोग न्हवता

माझ्या ओळखीतील अजून चार लोकांना, करोनाची लागण झाली होती आणि त्यांना देखील, इतर कुठल्याही प्रकारची शारिरीक व्याधी न्हवती. ते वाचले.

माझ्या एका मित्राला करोनाची लागण झाली आणि नंतर देवाज्ञा झाली. त्याला मधुमेह होता...

अजून डाटा मिळाला तर, इतर शारिरीक व्याधी असतील तर, करोनाची लागण, अशा रुग्णांच्या जीवावर देखील येऊ शकते का? हे नक्कीच बघता येईल ....

एक वैयक्तिक अनुभव सांगतो . माझ्या कुटुंबातील सदस्य, रोज मोरावळा खातात. आणि आम्हाला कुणालाच करोनाची लागण झाली नाही. आवळ्यातील आम्ल, करोना प्रतिबंधक असू शकेल का? ह्याचे उत्तर मिळाले तर फारच उत्तम ...

<माझ्या कुटुंबातील सदस्य, रोज मोरावळा खातात. आणि आम्हाला कुणालाच करोनाची लागण झाली नाही. आवळ्यातील आम्ल, करोना प्रतिबंधक असू शकेल का? ह्याचे उत्तर मिळाले तर फारच उत्तम ...>

यावर तज्ज्ञ, जाणकार काय म्हणतात?

तेंव्हा केवळ अनुमान धपक्यावर अवलंबून राहण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

आधी म्हंटल्याप्रमाणे सदर विधान हे एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप मधले आहे. हे ग्रुप एक आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टर चालवतात व फक्त त्या स्वतःच त्या ग्रुपमध्ये पोस्ट करतात. सर्व पोस्ट त्यांच्या स्वतःच्या असतात (प्रत्येक पोस्टच्या खाली त्यांचे नाव , आयुर्वेदतज्ज्ञ ही उपाधी व शहराचे नाव लिहिलेले असते). त्यामुळे सर्व पोस्ट्स जबाबदारीने लिहिलेल्या असतात, ढकलपत्र नव्हे. त्यामुळे त्यास अनुमान धपक्याने असे मी तरी म्हणू शकणार नाही .. बाकी तुमची मर्जी.

गेली दोन वर्षे मी स्वतः सोनोग्राफी करताना पाहत आलो आहे.

जसे तुम्ही तुमच्या (पर्यायाने तुमच्या रुग्णांच्या ) अनुभवावर आधारित लिहिले आहे तसेच त्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांच्या अनुभवावरुन लिहिले असेल , नाही का ?
असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2022 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निकाल वाचला त्या दिवशी तुमची आठवण झालीच होती. लशीच्या थोतांडाच्या धाग्याचा मी तर फॅनच होतो. त्यामुळे आपल्या मताशी सहमती आहेच. सालं देशात आणि जगात माणसाला मरणाची इतकी भितीच घातली गेलेली होती की, लशी टोचून नै घेतल्या तर आपली इहलोकाचा कार्यकाळ भरला इतकी ती दहशत होती. मिडिया, वृत्तपत्रे यांचा तर त्यात वाटा होताच. रुग्णांनी भरलेले दवाखाने, मृतांचे आकडे, व्हायरल होणा-या चित्रफिती, त्यात मित्रो, आज रात्री आठवाजेपासून यंव बंद आणि त्यंव बंद, हे उघडं ते बंद. सालं जगण्यासाठी लशीशिवाय पर्यायच नाही, असे ते वातावरण करुन टाकलं होतं. कितीतरी रुग्ण नुसते भितीने गेले असावेत इतकी ती दहशत. एकदाच्या लशीचा शोध लागला आणि आपण सर्वांनी हुश्श केलं. आता काय नै, एकदा लशीचा डोस घेतला की झालो अमर, असे वातावरण होते. लस टोचून घेण्यासाठीचे ते जुगाड, ती गर्दी, विकत-मोफत हे सर्व एक नवंच नाटक होतं. बाकी, लशीमागचे राजकारण काय होते, वैद्यकशास्त्र काय म्हणते, त्यापाठीमागचा व्यापार काय होता. मताचे राजकारण किती होते हे सगळं सोडलं तरी, लशीसाठी केलेली सक्ती आपल्याला आवडली नव्हती. दॅट्स ऑल.

-दिलीप बिरुटे

कॉमी,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

एक डोकं कापलं कि तात्काळ दुसरं डोकं उगवतं.

तसं उगवायला पाहिजेच. एकतर करोना हा सर्दीपडशासारखा आजार आहे, फारतर फ्ल्यू सारखा म्हणता येईल. त्याच्यासाठी लस कशाला पाहिजे? सर्दी-फ्ल्यू वर कोणी जनुकोपचार ( MRNA ) लस काढतं का? डास मारायला रणगाडा कशाला ? आणि ते PCR चाचणी नसून अभिवर्धनतंत्र ( = amplification technique ) आहे. त्याचा लागणीशी अणुमात्र संबंध नाही. लागण ( clinical infection ) आधी होते आणि नंतर त्याची चाचणी करायची असते. पण करोनाचा उलटा कारभार आहे. आधी PCR 'चाचणी' करायची आणि नंतर त्यावरनं लागण झाली आहे असं ठोकून द्यायचं. थोतांड ते थोतांडच.

म्हणून इतकी असंख्य डोकी उगवताहेत.

२.

कापलेले डोके सुद्धा हळूच पुन्हा वर येते.

त्याचं काये की लबाडी तोकड्या चादरीसारखी असते. डोक्यावरनं ओढून घेतली की पाय उघडे पडतात. करोनाची लबाडी तशीच आहे.

३.

उदाहरणार्थ- विषाणू आयसोलेट केलेला आहे, पूर्ण जिनोम सिक्वेन्सीन्ग उपलब्ध आहे असा पुरावा दिल्यावर विषाणू आयसोलेट केलेला आहे ह्यावर तुम्ही अजिबात मत प्रदर्शित करत नाही, त्या लेखातल्या तिसऱ्याच गोष्टींवर टिप्पणी करता. आणि पुढच्या प्रतिसादात पुन्हा- विषाणू विलग केलेला नाही असा दावा करता.

रोग्याच्या नमुन्यापासनं करोनाचा विषाणू विलग केलेला नाही. तुम्ही दिलेल्या लेखात उल्लेखलेला नमुना इतरत्र वाढवलेला आहे. इथे इंग्लंडात सांख्यिकीय विभागाकडे करोना विषाणू अलग केल्याचा पुरावा नाही ( इंग्रजी दुवा ) : https://www.ons.gov.uk/aboutus/transparencyandgovernance/freedomofinform...

मात्र असा पुरावा इतरत्र असू शकतो, म्हणून ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये शोध घेतला. तिथे करोनाच्या अस्तित्वाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.bmj.com/content/370/bmj.m3379/rr-2

त्यानुसार १२ ऑक्टोबर २०२० पर्यंत करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नव्हता. नंतरचं माहित नाही. पण ज्याअर्थी विषाणू मिळाल्याचा गवगवा झाला नाही, त्याअर्थी ही परिस्थिती तशीच असावी असं वाटतंय.

४.

काही लेखांचे चुकीचे इंटरप्रिटेशन करून टाकले होते.
ऑक्सफर्डचा असो किंवा आत्ताचा ताजा निधी आयोगाचे पॉल काय म्हणले तो असो.

चूक झाली हे खरंय. कारण की माझा अन्वयार्थ ( = इंटरप्रीटेशन ) माझा जीव वाचवण्यापुरतंच होतं. त्यामुळे थोडी गफलत झाली.

मी यांतला तत्ज्ञ नाही. जे जाणकार आहेत ते तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेत. मग माझ्यासारख्या स्खलनशील माणसाला प्रयत्न करावे लागतात.

५.

तुम्ही फक्त एकूण मृत्यूमध्ये लसीकरण झालेले ४२% आहेत यावर आडून बसला.

कारण की, मला मरायचं नाहीये. लस घेऊनही मी जर ४२ % मध्येच अडकणार असेन, तर लस घ्यायचीच कशाला?

६.

बरं, जगात इतके जास्त लोक मेले आहेत- १.५ करोड. करोना थोतांड असेल तर इतके लोक मेले कसे काय ?

मृतांवर करोनाचे खोटे छाप मारल्याने. यावर कायझाद कापडिया यांच्या मृत्यूचं उदाहरण अगोदर https://henryclubs.com/kaizad-kapadia-fitness-expert-and-founder-of-k11-... दिलं होतं. निरर्थक व खोटे छाप मारून आकडा फुगवण्यात आला आहे.

७.

त्या एक्सेस मॉर्टलिटी वर सुद्धा काहीच टिप्पणी नाही.

इथे इंग्लंडात फ्ल्यूचे मृत्यू करोनाखाली लपवण्यात आले आहेत. मृतावर करोनाचा छाप मारण्यासंबंधी या लेखात प्रश्न उपस्थित केले आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.bmj.com/content/375/bmj.n2514

या लेखातलं वाक्य : Deaths from covid-19 were most pronounced in people over 75 with chronic kidney disease or dementia and in black people with obesity, diabetes, or chronic kidney disease.

करोनामृत्यूचा निरोगी असलेल्या धडधाकट माणसाशी कसलाही संबंध नाही.

८.

त्यांना रातोरात श्वास घ्यायला त्रास झाला आणि गेले. त्याहून संख्येने कित्येक जास्त ओळखीचे गंभीरपणे आजारी होते, त्यांना ऑक्सिजनवर ठेवावे लागलेले.

तुमचे आप्तेष्ट अकाली गेले याबद्दल खेद आहे. पण एक सांगायला हवं की, श्वासोत्तेजक व प्राणवायू हा करोनावरील उपचार नव्हे. आयव्हरमेक्टिन हा उपाय असू शकतो. तो डॉक्टरांच्या चर्चेत का येत नाही? इथे थोडी माहिती आहे : https://www.covid19treatmentguidelines.nih.gov/therapies/antiviral-thera...

९.

लस आल्यानंतर पुढे जी ओमीक्रोनची तिसरी लाट आली त्यात जवळपास दिसेल तो माणूस पॉझिटिव्ह अशी परिस्थिती होती. नुसता पाझिटिव्ह नाही तर माईल्ड आजारी सुद्धा- खोकला, ताप. पण (बहुदा) लसीकरणामुळे कोणालाही हॉस्पिटलमध्ये पायसुद्धा ठेवावा लागला नाही.

तिसरी लाट आलीच नाही हे डॉक्टर रवी गोडसे यांचं मत आहे : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-third-w...

असो.

जमेल तशी टिपणी केली आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

14 May 2022 - 2:06 am | गामा पैलवान

सुबोध खरे,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. हे वाक्य मला उद्देशून आहे असा मला वाटतं :

आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.

माझं म्हणणं आहे की; फुटबॉल खेळाडू मैदानावर मरताहेत, आणि मी दुराग्रही? इंग्लंडातल्या आरोग्यसेवेने लहान मुलांना लशीपायी हृत्शूल ( = हार्ट अॅटॅक ) येऊ नये म्हणून पत्रक काढलंय, आणि मी दुराग्रही? राफेल नदाल लशीमुळे छातीत गडबड वाटते म्हणून सांगतो, आणि मी दुराग्रही?

याचा अर्थ असा की तुम्ही ज्यास दुराग्रह म्हणता, त्या दुराग्रहामुळे माझा जीव वाचला आहे.

एक विनंती आहे. डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्री यांनी लशीच्या इतिहासाबद्दल जे पुस्तक लिहिलंय ते वाचून त्याबद्दल अभिप्राय द्यावा. ते पुस्तक इथे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे :
https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/

तुम्ही आकडेवारीच्या पलीकडल्या सत्याचा उल्लेख केला आहे. मग करून टाका त्या पुस्तकाचं खरंखोटं. सत्याला आकड्यांची भीती कशाला?

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

15 May 2022 - 7:15 pm | मुक्त विहारि

"जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया."

हे अजिबात पटलेले नाही ....

नामजपात इतके सामर्थ्य आहे तर, मुस्लिम आणि ख्रिश्र्चन धर्माचे, हिंदुस्थानावर आक्रमण झालेच नसते....

धर्म राखल्या जातो, तो फक्त तलवारीच्याच बळावर ...

मेक्सिको, इराण ही उदाहरणे पुरेशी आहेत ....

परवाच एक जण अशीच गोष्ट करत होता की बाबा लोकांच्या अंगात दैवी शक्ती असते... इतकी जर शक्ती बाबा लोकांच्या अंगात असेल तर, विडीच्या एका झुरक्यात, सगळ्या ब्रिटीश लोकांना का नाही मारून टाकले?

हा वाद, गामा पैलवान, यांच्या बरोबरच आहे .... सुज्ञ माणसे चोंबडेपणा करायला येत नाहीत ...

गामा पैलवान's picture

17 Jun 2022 - 11:40 pm | गामा पैलवान

लोकहो,

मंकीपॉक्स रोगासाठी अमेरिकेने ५००००० ( अक्षरी पाच लाख ) लशींची मागणी नोंदवली आहे. संबंधित ( इंग्रजी ) बातमी : https://www.politico.com/news/2022/06/10/us-monkeypox-vaccine-00038776

याचा अर्थ करोनाचं थोतांड गुंडाळी करून थंड्या बस्त्यात बांधायची तयारी सुरू झाली आहे. त्याबद्दल मी स्वत:ची परत एकदा लाल करवून घेतो आहे. अशी संधी सारखीसारखी मिळंत नसते.

बाकी, मंकीपॉक्सला मराठीत प्रतिशब्द काय योजावा? माकडपुळी अगदीच पुचाट वाटतो. माकडफोड कसा वाटतो? किंवा मग माकडमोड हा माकडास मोड आल्यागत वाटतो. कुठला समर्पक आहे?

आ.न.,
-गा.पै.

सुक्या's picture

18 Jun 2022 - 3:46 am | सुक्या

The order also brings the number of U.S.-owned doses from 1.4 million to 1.9 million,
एवढे बोलुन मी खाली बसतो

अच्छा म्हणजे दुसरा रोग आला आहे आणि त्यासाठी लसी घेतल्या म्हणजे आधीचा रोग संपला असे गामाजींचे अफाट लॉजिक आहे.

आपल्या भारतदेशात काल १२०००+ केसेस वाढल्या.

चित्रगुप्त's picture

18 Jun 2022 - 12:28 pm | चित्रगुप्त

दुसरा रोग आला आहे आणि त्यासाठी लसी घेतल्या म्हणजे आधीचा रोग संपला असे गामाजींचे अफाट लॉजिक आहे.

काही काळ गर्दी खेचणारा एकादा पिच्चर फारसा चालेनासा झाला, की थेटरवाले नवीन पिच्चर आणतात, तरीसुद्धा काही काही थेट्रात तो जुना पिच्चर थोडे दिवस चालूच रहातो, तसे असावे.

गामा पैलवान's picture

18 Jun 2022 - 12:33 pm | गामा पैलवान

एकदम बराबर !
-गा.पै.

ल मेटाफॉरने उंदराची शेपटी कुत्र्याला लावता येते. त्यापलीकडे त्याला काही अर्थ नाही.

काल १२००० केसेस वाढल्यात हि वस्तुस्थिती आहे.

गामा पैलवान's picture

18 Jun 2022 - 9:57 pm | गामा पैलवान

त्या १२००० लोकांमध्ये क्लिनिकल इन्फेक्शन आहे का? ते नसतांनाच उगीच ठोकून दिलेलं दिसतंय की ते रुग्ण आहेत.
-गा.पै.

चित्रगुप्त's picture

18 Jun 2022 - 12:23 pm | चित्रगुप्त

अमक्याच्या तोंडावर देवीचे 'वण' आहेत, असे म्हटले जायचे.
मंकीपॉक्क्स = 'वानरवण'

लोकहो,

पंढरीच्या वारीवरील अधिकाऱ्यांना वर्धकमात्रेची सक्ती करण्यात आलेली आहे. संबंधित बातमी : https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/dose-for...

लससक्तीचा आदेश न्यायालयाच्या उपरोक्त टिपणीच्या विरोधात आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

17 Jul 2022 - 9:49 pm | गामा पैलवान

लोकहो,

इंग्लंडच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने लस व मृत्यूविषयी विदा प्रकाशित केला आहे. सर्वात अद्यतन धारिका येथे आहे : https://assets.publishing.service.gov.uk/government/uploads/system/uploa...

हिच्यातनं उचललेला मृत्यूंचा विदा खाली मांडला आहे. हा विदा रुग्णालयातल्या मृत्यूंचा आहे. हे मृत्यु करोना विषाणूशी संबंधित ( करोनामुळे झालेले नव्हे ) आहेत.


साल महिना - किमान एक लस घेतलेले / लस न घेतलेले
Year Month - Ever vaccinated / Unvaccinated
२०२१ जानेवारी - ३४९३ / २४३६४
२०२१ फेब्रुवारी - ४८९२ / ७६६०
२०२१ मार्च - १७७३ / १३११
२०२१ एप्रिल - ५२४ / २३८
२०२१ मे - २१३ / ७७
२०२१ जून - २२४ / ९७
२०२१ जुलै - ८३५ / ३३७
२०२१ ऑगस्ट - १६५७ / ५९०
२०२१ सप्टेंबर - २१६४ / ४९६
२०२१ ऑक्टोबर - २३६९ / ४३०
२०२१ नोव्हेंबर - २३७५ / ५५६
२०२१ डिसेंबर - १९९० / ६८२
२०२२ जानेवारी - ३९१४ / ६९३
२०२२ फेब्रुवारी - २४४७ / २६४
२०२२ मार्च - २६५८ / २०२
२०२२ एप्रिल - ३३६५ / २०६
२०२२ मे - १२८२ / ८२

करोनाशी संबंधित मृत्यूंमध्ये लस न घेतलेल्यांचं प्रमाण झपाट्याने उणावतंय हे संयुक्त साम्राज्याच्या शासनाने ( UK government ) अधिकृतरीत्या मान्य केलं आहे.

घ्या लस टोचून आणि व्हा परलोकी मार्गस्थ.

आ.न.,
-गा.पै.

गवि's picture

18 Jul 2022 - 7:38 am | गवि

:-)

पोलिओ लशीबाबतही हेच होणार आहे. हॉस्पिटल मृत्युंपैकी ९९ टक्क्याहून अधिक लोक पोलिओ लस घेतलेले असणार आहेत. बीसीजीचे पण तसेच.

जोक्स अपार्ट. आपण दिलेल्या डोक्युमेंटमधील बाकीची सर्व टेबले, निरीक्षणे काय म्हणतात?

हॉस्पिटल मृत्युंतील लस घेतलेले विरुद्ध न घेतलेले हा जो भाग इथे उद्धृत केला आहे त्याच्या बाबतीत दिलेला संदर्भ आपण वाचला असेल अशी आशा, पण नसेल अशी खात्री.

In the context of very high vaccine coverage in the population, even with a highly effective vaccine, it is expected that a large proportion of cases, hospitalisations and
deaths would occur in vaccinated individuals, simply because a larger proportion of the population are vaccinated than unvaccinated and no vaccine is 100% effective.
This is especially true because vaccination has been prioritised in individuals who are more susceptible or more at risk of severe disease. Individuals in risk groups may
also be more at risk of hospitalisation or death due to non-COVID-19 causes, and thus may be hospitalised or die with COVID-19 rather than because of COVID-19
.

गवि's picture

18 Jul 2022 - 7:50 am | गवि

ता.क.

कोविड लस ही कमी परिणामकारक असू शकते आणि कदाचित तिचे गंभीर दुष्परिणाम (सुरुवातीला न समजलेले) असू शकतात या शक्यतेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. किंबहुना रक्तात गुठळी किंवा तत्सम काही परिणाम होतच नसतील असे छातीठोकपणे सांगणे सध्या कठीण आहे हेही मान्य. पण या बाबतीत दोन महत्वाचे मुद्दे:

अ. गुठ्ळी किंवा तत्सम दुष्परिणाम हे जर लसीने होत असतील तर लस न घेताही मूळ इन्फेक्षन झाल्यास ते अधिक तीव्रतेने होऊ शकतात. हे परिणाम विषाणूच्या पेशीशी संबंधित असतात. ते टाळायचे तर बंद खोलीतच बसावे लागेल.

ब. दिलेला विदा लशीची घातकता दाखवत नसून अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोचली आहे इतकेच दाखवत आहे.

मूळ मुद्दा (लस घातक) ही तात्विक शक्यता आणखी बराच काळ अस्तित्वात राहील. पण सध्या दिलेला विदा त्याला पूरक नाही. उलट ती शक्यता (टक्के) कमी कमी होताना दिसतात.

गामा पैलवान's picture

18 Jul 2022 - 7:24 pm | गामा पैलवान

गवि,

तुमचे वरचे दोन्ही प्रतिसाद वाचले. अधिक लसटोचणीमुळे अधिक मृत्यू झालेले असू शकतात. पण हे सारे करोनापायी रुग्णालयात दाखल झालेले होते. याचाच अर्थ लस टोचूनही करोना अंगात सापडतोच. म्हणजेच ती तितकीशी परिणाकारक नाही. मग घ्यायचीच कशाला?

आता तुमची दोन विधानं बघूया.

१.

अ. लस न घेताही मूळ इन्फेक्षन झाल्यास ते अधिक तीव्रतेने होऊ शकतात.

करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. लशीमुळे होतात. मग लस घ्यायचीच कशाला?

२.

ब. दिलेला विदा लशीची घातकता दाखवत नसून अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोचली आहे इतकेच दाखवत आहे

म्हणजेच लस घेऊनही काहीच लाभदायक फरक पडंत नाही. असाही अर्थ निघतो. मग लस घ्यायचीच कशाला?

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2022 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मग लस घ्यायचीच कशाला ?

ठीकय...! इतकं मान्य. बाकी, ते गुठळ्या बिठूळ्या सध्या अमान्य. :/

-दिलीप बिरुटे

बर्‍याच काळानंतर आज हा धागा पुन्हा उघडला.
आम्हा उभयतांना कोविडबाधा झाली होती, आणि त्यातून कोणतेही औषध न घेता सुखरूपपणे आपोआप बरे झालो. मात्र त्यानंतर काही काळाने लस घेतली होती.
माझे सगळे रिपोर्ट अगदी चांगले असूनही रक्तात गुठळ्या झाल्याचे सुमारे वीस दिवसांपूर्वी सीटी स्कॅनमधून कळले. या गुठळ्या कित्येक महिने पायाचा पोटर्‍यात होत्या, त्यामुळे बरेच महिने पाय दुखत होता. अलिकडे पाय दुखणे बंद होऊन त्या गुठळ्या रक्तातून फुफ्फुसापर्यंत पोहोचल्यावर कळा येऊ लागल्या, वगैरे डॉक्टरांनी सांगितले. (छातीत भयंकर कळा येऊ लागल्यामुळे इस्पितळात दाखल होऊन सीटीस्कॅन आणि अन्य चाचण्या कराव्या लागल्या) ताबडतोब चोवीस तासांसाठी रक्तातून औषध चढवले गेले, छातीत दुखणे बंद झाले आणि जन्मात पहिल्यांदाच मला आता औषध घ्यावे लागते आहे. या औषधाचा अनुषंगिक परिणाम म्हणून की काय माझी शारीरिक शक्ती पुष्कळच कमी झालेली आहे.
माझा कोविडबद्दलचा ऑगस्ट २०२० चा लेख इथे वाचता येईल.

चित्रगुप्त's picture

30 Jul 2024 - 8:10 am | चित्रगुप्त

आम्ही अमेरिकेत असताना कोविडबाधा झाली होती. त्यावेळे सव्वा वर्ष तिथे राहिलो होतो, लसही तिथेच घ्यावी लागली, कारण त्याकाळी लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणताही विमानप्रवास वा महत्वाच्या कार्यालयांमधे, संग्रहालयांमधे वगैरे जाता येत नव्हते.

कर्नलतपस्वी's picture

30 Jul 2024 - 8:37 am | कर्नलतपस्वी

कोविडबाधा झाली होती, आणि त्यातून कोणतेही औषध न घेता सुखरूपपणे आपोआप बरे झालो.

वेळेवर वैद्यकीय सल्ला व औषध उपचार करणे काही गैर नाही. कदाचित अतिरेकी पणा असेच मी म्हणेन.

मी ठिक आहे, मला काही होत नाही आशी समजुत करून घेऊन बरीच माणसे आला दिवस पुढे ढकलतात.

कौविड नंतर किंवा त्यानंतर ही कधीतरी रक्त तपासणी केली असती तर लवकर कळाले असते.

आम्हाला बाधा झाल्यावर लगेच मुलाने त्याच्या ऑफिसातील डॉक्टरचा तसेच सुनेने तिच्या अमेरिकेतल्याच डॉक्टर भावाचा सल्ला घेतला होता. दोघांनी सांगितले की कोविडवर काहीही औषध नसल्याने इस्पितळात नेण्याचा काहीही उपयोग नाही, उलट घरातच जास्त सुरक्षित रहाल. त्याप्रमाणे घरातच वेगवेगळ्या खोल्यांमधे राहिलो. घरगुती काढा वगैरे घेत होतो. बरे झाल्यावर लगेच तपासणी केली, ती निगेटिव आली. माझ्या १४ ऑगस्ट २०२० च्या लेखातला थोडा मजकूर इथे उधृत करतो:

--तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. अशक्तपणामुळे आम्हाला तिकडे जाताही आले नसते. याबद्दल मुलाने त्याच्या कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही. घरीच योग्य ती खबरदारी घेत आराम केल्याने हळूहळू ठीक होतील.
-- त्याच सुमारास इंदौरच्या माझ्या एका मित्रानेपण त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टरांना विचारून त्यांनी प्रिस्क्रिबलेल्या औषधांची यादी मला कळवली. त्यात भूक लागावी म्हणून अमुक गोळ्या, खोकल्यासाठी तमुक, स्ट्रेस कमी करण्यासाठी, ताप येऊ नये यासाठी अमुकतमुक अशी ती यादी होती. माझ्यामते तहान - भूक लागणे, झोप येणे वगैरे सगळे नैसर्गिक रीत्याच व्हायला हवे, त्यासाठी गोळ्या घेणे वगैरे मला अजिबात पटत नाही, आणि असे काही होणे, ही पण निसर्गाचीच एक योजना आहे, रोगप्रतिकारक यंत्रणेने आता पूर्ण शरीराचा ताबा घेऊन आघाडी सांभाळल्यामुळे अन्नावरची वासना उडणे वगैरे सर्व झालेले आहे, याची मला खात्री वाटत होती. स्ट्रेस वगैरे तर काही नव्हतेच. मग ती यादी बाजूला ठेवली. मागे चिकनगुनियाच्या वेळीपण कोणतेच औषध घेतले नव्हते. मुदत संपल्यावर आपोआप बरा झालो होतो. आपण यातून नक्कीच बाहेर पडणार याची मला खात्री वाटत होती. जीवेषणा अजिबात क्षीण झालेली नव्हती. दहा-बारा दिवस असेच गेल्यावर जरासे बरे वाटू लागले. थोडेसे खाणे आणि घरातच चालणे फिरणे सुरू झाले.

याउलट लस घेतल्याच्या परिणामी अलिकडे त्रास झाला असावा, असेही डॉ.चे मत आहे. इस्पितळात दर सहा तासांनी रक्त तपासणी केली जात होती, त्यात सगळे काही इतके चांगले असणे हे आश्चर्यजनक/अपवादात्मक असल्याचे नर्सने मला सांगितले, तसेच आजवर मी कधीही इस्पितळात गेलेलो नाही आणि औषधही घेतलेले नाही, याचे त्यांना खूप आश्चर्य वाटत होते.
पहले रचा प्रारब्ध, फिर रचा शरीर... असे तुम्हीच सांगितले होते कर्नल साहेब. त्यानुसार सगळे काही घडते आहे.
-- दुसरे म्हणजे कोविड टेस्ट एकाच दिवशी सकाळी पॉझिटिव आणि त्याच संध्याकाळी निगेटिव असे आमच्या घरातच घडलेले आहे. आता कशावर विश्वास ठेवायचा ?

याचाच अर्थ लस टोचूनही करोना अंगात सापडतोच.
जरा लस काय असते .. ती कशी काम करते .. हे वाचा. करोनाचीच नाही .. इतर कुठलीही .. तुमची आवडती ...
नंतर वरचे वाक्य पुन्हा वाचा ...

गामा पैलवान's picture

18 Jul 2022 - 8:50 pm | गामा पैलवान

सुक्या,

काटेरी प्रथिनांचा हवाला कोणी द्यायचा? mRNA वापरून लस तयार केली. भले ठीक. त्यामुळे काटेरी प्रथिनं निर्माण झाली. ही प्रथिनं प्रतिपिंडांचं काम करतात. त्यांनी करोना विषाणूचा जीव घेतला. इथवर ठीक.

पण हीच काटेरी प्रथिनं शरीरात इतरत्र घातक धुमाकूळ घालणार नाहीत याची हमी कोणी घ्यायची? तत्संबंधी लेख : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34100279/ ( केवळ प्रस्तावना पहावी )

याव्यतिरिक्त तुम्हीही जमलंच तर जरा Antibody Dependent Enhancement यावर वाचन करा म्हणून सुचवेन. लशीच्या दुष्परिणामांवर चर्चा करता येईल.

आ.न.,
-गा.पै.

आग्या१९९०'s picture

18 Jul 2022 - 8:48 pm | आग्या१९९०

करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.
काही कोरोना रुग्णांना heparin का देतात मग?

गामा पैलवान's picture

18 Jul 2022 - 9:09 pm | गामा पैलवान

करोनमुळे गुठळ्या होत नसून अतिरिक्त प्रतिपिंडांमुळे होतात. संदर्भ : https://www.imperial.ac.uk/news/227414/blood-clots-severe-covid-cases-re...

-गा.पै.

आग्या१९९०'s picture

18 Jul 2022 - 9:18 pm | आग्या१९९०

प्रतीपिंड कशाची?

गामा पैलवान's picture

19 Jul 2022 - 12:39 am | गामा पैलवान

आग्या१९९०,

आपल्या शरीराने करोनावर हल्ला करण्यासाठी एक योजना आखलेली असते. ती कार्यान्वित करणारे मानकरी म्हणजे प्रतिपिंडे होत. त्यांना antibodies म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

<स्वगत> हेचि फळ काय मम तपाला .... <⁄स्वगत>

आग्या१९९०'s picture

19 Jul 2022 - 12:48 am | आग्या१९९०

म्हणजे करोना शरीरावर हल्ला करतो हे तुम्हाला मान्य आहे. त्याविरुद्ध प्रतिपिंड शरीरात तयार होतात हेही तुम्हाला मान्य आहे. त्यामुळे रक्तात गुठळ्या होतात हेही तुम्हाला मान्य आहे. मग कोरोनात रक्तात गुठळ्या होत नाही हा दावा का करता तुम्ही?

गामा पैलवान's picture

19 Jul 2022 - 7:23 pm | गामा पैलवान

आग्या१९९०,

१.

म्हणजे करोना शरीरावर हल्ला करतो हे तुम्हाला मान्य आहे.

हो.

२.

त्याविरुद्ध प्रतिपिंड शरीरात तयार होतात हेही तुम्हाला मान्य आहे.

हो.

३.

त्यामुळे रक्तात गुठळ्या होतात हेही तुम्हाला मान्य आहे.

करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या होत नाहीत. शरीराची प्रतिकारयंत्रणा करोनावर प्रतिहल्ला करते. त्यासाठी योग्य प्रमाणात प्रतिपिंडे बनवते. पण लस टोचली तर भाराभार प्रतिपिंडे तयार होतात. आणि ही अतिरिक्त प्रतिपिंडे त्यांच्यावरील काटेरी प्रथिनांमुळे रक्तस्राव घडवून आणतात. त्यामुळे रक्त साकळून गुठळ्या होतात.

४.

मग कोरोनात रक्तात गुठळ्या होत नाही हा दावा का करता तुम्ही?

निव्वळ करोना विषाणूमुळे गुठळ्या होत नसून अतिरिक्त प्रतिपिंडांमुळे होतात. आधीच्या संदेशात हेच म्हंटलं आहे. अतिरिक्त हा शब्द महत्त्वाचा !

आ.न.,
-गा.पै.

आग्या१९९०'s picture

19 Jul 2022 - 8:12 pm | आग्या१९९०

करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या होत नाहीत. शरीराची प्रतिकारयंत्रणा करोनावर प्रतिहल्ला करते. त्यासाठी योग्य प्रमाणात प्रतिपिंडे बनवते. पण लस टोचली तर भाराभार प्रतिपिंडे तयार होतात.
ज्यांनी करोनाची एकही लस घेतली नाही , मास्कही वापरला नाही अशा जवळच्या दोन नातेवाईकांना कोरोनाने मृत्यू झाला. दोघांनीही कोरोनाचे निदान झाल्यावर आयुर्वेदिक काढे,वाफारे आणि कोमट पाण्याच्या गुळण्या हे घरगुती उपचार घेतले. दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात दाखल केले, दोघांच्याही रक्तात गुठळ्या झाल्याने एकाचा काही तासात मृत्यू झाला दुसऱ्याचा उपचाराला दाद देत नसल्याने पंधरा दिवसात मृत्यू झाला. तुम्ही म्हणता ते अतिरिक्त प्रतिपींड कुठून तयार झाले?

गामा पैलवान's picture

20 Jul 2022 - 1:33 am | गामा पैलवान

आग्या१९९०,

तुमच्या परिचितांच्या दुर्घात्नेबद्दल खेद आहे. १०० % अचूक निदान शक्य नाही. मला काय कोणालाही शक्य नाही. त्यांच्या परिस्थितीस विपरीत उपचारही कारणीभूत असू शकतात. जसे श्री. विवेक पटाईत यांच्या थोरल्या बंधूंवर झाले होते.

प्रत्येक रक्तस्रावास प्रतिपिंड कारणीभूत असतात असंही नव्हे. मला स्वत:ला पोटात रक्तस्राव झाला होता, तो उलटीतनं बाहेर पडला. रुग्णालयात ताबडतोब दाखल झालो. तिथे दुसऱ्या दिवशी दुर्बिणीने तपासणी केल्यावर काहीच जखम वा व्रण ( ulcer or scar ) आढळला नाही. विष्ठा सर्वसामान्य ( normal ) व विनात्रास होत होती. म्हणजेच रक्तस्राव आतड्यांतला नसून जठरात झाला होता ( इति डॉक्टर ). रक्तस्रावाचं कारण कळू शकलं नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे रक्त पातळ करायची औषधं जास्ती मात्रेत दिल्याने तो झाला.

सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक दुर्घटनेची कारणमीमांसा प्रतिपिंड नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

आग्या१९९०'s picture

20 Jul 2022 - 4:18 pm | आग्या१९९०

ॲडमीट होईपर्यंत दोघांनीही कुठलीच आधुनिक औषधे घेतली नव्हती तरी रक्तात गुठळ्या का झाल्या. लस घेतली नसल्याने अतिरीक्त प्रतिपिंड कुठून आली?

गामा पैलवान's picture

21 Jul 2022 - 7:36 pm | गामा पैलवान

आग्या१९९०,

मला नक्की कारण नाही सांगता येणार. पण इतर घटक कारणीभूत असू शकतात. किंबहुना ते लक्षांत न घेता उपचार केले गेलेले दिसताहेत.

आ.न.,
-गा.पै.

श्री गामा पैलवान,
तुमच्या चर्चेत मला जास्त लेखक / प्रतिसादक म्हणुन रस नाही. पण तुम्ही जी आकडेवारी सादर केलीत ती अतिशय चुकीच्या पध्दतीने आणि दिशाभुल करणारी आहे.

तुम्ही मृत्युचे टक्केवारी न देता, एकुण मृत्युचे आकडे दिले आहेत. खरे तर एकुण बाधित लोकांची संख्या, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या, आणि मृत लोकांची टक्केवारे आवश्यक आहे.

गामा पैलवान's picture

19 Jul 2022 - 12:14 am | गामा पैलवान

Trump,

ही सरकारी माहिती आहे. जितकी मिळाली तितकीच मी दिली आहे. मात्र तरीही तुमचा मुद्दा मान्य आहे.

सदर विदालेखात बिगर करोना मृत्यूंची आकडेवारीही समाविष्ट आहे (तालिका क्रमांक १). तिच्याकडे ओझरता दृष्टीक्षेप टाकला. लस घेतलेले ( किमान १) व लस न घेतलेले यांच्या मृत्यूंचं प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ६९७० : २८०९५ होतं. विनालस मृत्यू जास्त होते कारण तेव्हा लशीकरण फारसं झालं नव्हतं. मग लशीकरण झालं आणि मे २०२२ मध्ये हेच गुणोत्तर २८१८६ : ९३५ ( म्हणजे सुमारे ३० : १ ) झालं.

करोनामृत्यूंचं प्रमाण सुमारे १५ : १ आहे. आता प्रश्न असा आहे की लशीकरण ३० : १ वा १५ : १ या दरम्यान दिसतंय आहे का? ३० : १ म्हणजे ९६+ % तर १५ : १ म्हणजे ९३+% होतात. प्रत्यक्षात संयुक्त साम्राज्यातलं ( UK मधलं ) लशीकरण ५३ मिलियन ( ६७ मिलियन पैकी ) आहे. म्हणजेच ते ८० % हून खाली आहे.

मग प्रश्न असा उद्भवतो की लशीकरण ८० % असतांना मृत्यूचं प्रमाण ९३+% ते ९६+% कसंकाय? उरलेले १३+% ते १६+% अतिरिक्त मृत्यू लशीतून आले का?

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2022 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>श्री गामा पैलवान,
तुमच्या चर्चेत मला जास्त लेखक / प्रतिसादक म्हणुन रस नाही.

गापै यांनी तुम्हाला व्य.नि. आणि खरड करुन धाग्यावर यायचं निमंत्रण दिलं असेल.
नै तर, एखादा विचार पटत नसतांनाही कोण कोणाच्या धाग्यावर लिहायला येतं. ;)
(ह. घ्या)

-दिलीप बिरुटे

नै तर, एखादा विचार पटत नसतांनाही कोण कोणाच्या धाग्यावर लिहायला येतं. ;)

श्री बिरुटेसर, काही लोकांना सांख्यिकीमध्ये रस असतो.

घ्या लस टोचून आणि व्हा परलोकी मार्गस्थ.

लच टोचवून घेणे हा आत्महत्या करवून घेण्याचा खात्रीचा, राजमान्य, कायदेशीर उपाय, असे 'ह्यांचे म्हणणे.
------- बाईसाहेब फुरसुंगीकर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2022 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

होना....गा.पै. फार तान देऊ लागले सध्या...! :)

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

18 Jul 2022 - 10:16 pm | धर्मराजमुटके

प्रिय गामाजी,
अपेक्षा आहे की आपली पुरेसी लाल झालेली असेल.
प्रमाणापेक्षा जास्त लाल झाला की तो रंग नंतर काळपट तपकिरी रंगाकडे झुकतो.

गामा पैलवान's picture

19 Jul 2022 - 12:26 am | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

अहो काय सांगायचं आता. सरकारने नुकतीच वर्धक मात्रा ( बूस्टर ढोस ) ७५ दिवसांसाठी फुकट केला. मग अशी ताजा रंग फासायची संधी दिसल्यावर मलाही राहवलं नाही.

पण तुमच्या आस्थेबद्दल आभार. :-)

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

19 Jul 2022 - 11:54 am | सुबोध खरे

आकाशातील ग्रहांची शांती करता येते

पण

दुराग्रहाची नाही

गामा पैलवान's picture

19 Jul 2022 - 7:13 pm | गामा पैलवान

सुबोध खरे डॉक्टर,

संयुक्त साम्राज्यातलं लशीकरण ८० % असतांना मृत्यूचं प्रमाण ९३+% ते ९६+% कसंकाय? उरलेले १३+% ते १६+% अतिरिक्त मृत्यू लशीतून आले का? की नाही आले? की अधिक विदा हवाय?

याचं उत्तर दिलंत तर माझी या प्रश्नापुरती तरी शांती होईल.

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

19 Jul 2022 - 8:10 pm | कॉमी

गामाजींसाठी रोचक ट्विट

कॉमी's picture

19 Jul 2022 - 8:59 pm | कॉमी

घातक लसींच्या दुष्परिणामाच्या अश्या केसेस आता दिवसेंदिवस बाहेर येतील. गामाजींच्या लस विरोधी डॉक्युमेंटेशन मध्ये आमचा खारीचा वाटा.

“मी बूस्टर डोस घेतल्यापासून वेड्यासारखी झाली आहे. मी फक्त आदिलला शोधत आहे. आताही मी त्यालाच भेटायला जात आहे. यावरुन तुम्ही बुस्टर डोसने माझी अवस्था काय झाली असेल, याचा विचार करुच शकता. “मोदीजी, हे इंजेक्शन कसले आहे? यात कोणकोणते प्राणी आहेत हेच मला समजत नाही. मला झोप येत नाही. माझे डोळे सुजले आहेत. माझा चेहराही सूजला आहे. हे व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे”, असेही राखी म्हणाली. त्यासोबतच तिने हे इंजेक्शन न घेण्याचा सल्ला दिला.

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Jul 2022 - 12:42 am | चेतन सुभाष गुगळे
सुबोध खरे's picture

21 Jul 2022 - 11:54 am | सुबोध खरे

फालतू आणि महाभंपक बाई आहे हि नटी

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Jul 2022 - 1:58 pm | चेतन सुभाष गुगळे

ती बाई कशी आहे हे तिचे नाव ज्यांनी ऐकले / वाचले असेल त्यांना नक्कीच माहिती आहे. मुद्दा कोणी मांडला त्यापेक्षा काय मांडला हे महत्त्वाचे आहे. काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाने डझनभर वेळा कोरोनाची लस टोचून घेतली होती. जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याला त्याने असे का केले या बद्दल विचारणा झाली असता त्याने दिलेले उत्तर हे राखीने मांडलेल्या मुद्द्यासोबत साम्य दर्शविणारे होते आणि तो एक सामान्य निम्नवर्गीय इसम होता आणि म्हणूनच पकडला गेला कारण त्याने फुकटची सरकारी लस घेतली होती. विकतची लस घेतली असती तर त्याला पकडण्याचा काही प्रश्नच नव्हता. असो. जर लशीचा असाही परिणाम / दुष्परिणाम होत असेल तर त्यावरही संशोधन होणे गरजेचे आहे.

लोकहो,

अमेरिकेतील अध्यक्षीय निवासस्थानाच्या ( व्हाईट हाऊस च्या ) माजी डॉक्टर डेबोरा बर्क्स यांनी लशीमुळे लागणीपासून संरक्षण मिळंत नसल्याची कबुली दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोव्हिड लस या बाबतीत बिनकामाची आहे हे त्यांना माहीत होतं. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.foxnews.com/media/dr-deborah-birx-knew-covid-vaccines-not-pr...

करोनाची लस हे थोतांड असल्याचं सत्य थेट अश्वमुखातनं अवतीर्ण झालं आहे.

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

24 Jul 2022 - 9:24 pm | कॉमी

Overplayed असा शब्द त्यांनी वापरला आहे. ह्या बाई खुद्द मान्य करतात की लसी मुळे गंभीर रोग आणि इस्पितळात भरती न करावी लागण्याइतपत मदत होते, ह्याचा अर्थ प्राण वाचतात असा आहे. तुम्हाला ते सुद्धा मान्य नाहीये.

बाई म्हणतात की हॉस्पिटलायझेशन मध्ये लस घेतलेले जास्त आहेत. अर्थातच असणार.पूर्ण लसीकरण झालेले ६८% आहेत. किमान एक डॉस झालेले ७९% लोक आहेत. वारंवार विदा दाखवून देत आहे की लस न घेतलेल्या पूल मधून प्रोपोर्शनेटली जास्त मृत्यू आणि गंभीर रुग्ण आहेत.

गामा पैलवान's picture

25 Jul 2022 - 2:03 am | गामा पैलवान

कॉमी,

लसी मुळे गंभीर रोग आणि इस्पितळात भरती न करावी लागण्याइतपत मदत होते, ह्याचा अर्थ प्राण वाचतात असा आहे. तुम्हाला ते सुद्धा मान्य नाहीये.

का म्हणून मी मान्य करू? बाई परस्परविरोधी विधानं करताहेत.

गंभीर रोगांपासून बचाव वगैरे बाईंचा विश्वास आहे. तो विदा नव्हे. शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०+ वय असलेल्यांसाठी आहे. मग तरुणांनी लस घ्यायचीच कशाला?

आ.न.,
-गा.पै.

विदा नक्की आहे.तो तुम्हाला आणि बाईंना दोघांना माहिती आहे. पण तुम्ही अत्यंत चातुर्याने कानाडोळा करत आहात.

शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०+ वय असलेल्यांसाठी आहे.मग तरुणांनी लस घ्यायचीच कशाला?

बाईंनी थेट उलटे विधान केले आहे असे माझ्या अल्प आकलनास वाटते. लस घेतली असली तरी सत्तरी वरील लोकांना त्रास होऊ शकतो असे त्या म्हणत आहेत. आणि अबालवृद्धांनी सर्वांनीच लस घ्यावी अश्याच मताच्या त्या आहेत. खासकरून, तरुणांना लस घेतल्यावर त्रास होणार नाही असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ दिसतो, कारण त्या फक्त 70 वरील लोकांना त्रास होईल असे म्हणत आहेत.

मुद्दा काय, तर लस घेतल्यावर सेव्हर आजार आणि हॉस्पिटलायझेशन पासून संरक्षण मिळते असे त्यांचे मत आहे. त्या केवळ आणि केवळ म्हणतायत कि लसीचे महत्व OVERPLAY केले आहे, आणि त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा समज पसरला कि लस आजार आणि इस्पितळात भरती होण्यापासून संरक्षण देऊ शकत नाही (जे संरक्षण नक्की मिळते- it will).

तर हा त्यांचा विश्वास आहे, आणि तोच या पन्नास शब्दांच्या लेखात मांडला आहे. पण तुम्हाला लेखाची हेडलाईन सोडून बाकीचे सगळे अमान्य आहे असे दिसते. किंवा तुम्ही फक्त हेडलाईनच वाचलीये असे तरी दिसते.

गामा पैलवान's picture

25 Jul 2022 - 8:37 pm | गामा पैलवान

कॉमी,

it will हा केवळ बाईंचा दावा आहे. त्यास कसलाही आधार नाही. त्या म्हणतात way forward is testing and vaccination. हे टेस्टिंग कशासाठी करायचं? आणि जर लस घ्यायचीच असेल तर चाचणी करायची गरजच काय मुळातून? शिवाय RTPCR ही चाचणी नसून निव्वळ दिशाभूल आहे. अस्तित्वात नसलेल्या विषाणूपासून संरक्षण करायला लस कशाला पाहिजे?

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

26 Jul 2022 - 7:28 am | कॉमी

तुम्हाला बातमीच्या हेडलाईन खेरीज इतर काहीही मान्य नाही.

कॉमी's picture

26 Jul 2022 - 8:56 am | कॉमी

"लसींपासून रोगलागण होण्यापासून संरक्षण मिळत नाही हे मला (she knew) आधीपासून माहित होतं. आपण लसींचे (लागण रोखण्याबाबतचे) गुण जास्त वाढवून सांगितले. त्यामुळे लोकांचा लसीबाबत चुकीचा समज झाला की लस गंभीर आजार, इस्पितळात भरती होण्याचा धोका (आणि त्याच तर्काने, मृत्यू) पासून संरक्षण देणार नाही- जे नक्की मिळते आहे."

१. ह्या बाईंना व्यक्तिष: काय माहित होतं आणि नव्हतं हा मुद्दा पूर्णपणे गौण आहे. त्यावेळचे ओव्हरॉल मत आणि विदा लसींपासून इन्फेक्शन विरुद्ध संरक्षण मिळते असाच होता, आणि त्यानुसारच लसींबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचत असावी. अजूनही लसी इन्फेक्शन विरुद्ध पूर्ण पणे कुचकामी नाहीयेत, मात्र त्या बाबत उपयोगिता अंदाजापेक्षा कमी आहे, कारण नवे नवे व्हरायंट येत आहेत.

२. बाई स्पष्टपणे आणि या धाग्यावर अनेकदा देऊन झालेल्या विदावर आधारित सांगतात की लसीमुळे आजार व मृत्यूपासून संरक्षण नक्की मिळते. हा विदा जालावर अत्यंत सहजगत्या सापडतो, आणि ठराविक अजेंडा असलेले लोकच त्याकडे वारंवार कानाडोळा करतात.

बाईंचे पहिले आणि दुसरे मत दोन्ही उपलब्ध विदावर आधारित आहे. गामाजी तुम्ही दुटप्पीपणे केवळ पहिले मत विदेवर आधारित असल्याचे आणि दुसरे पोकळ आणि आधारविरहित असल्याचे नाटक करत आहात. बाईंच्या पूर्ण वक्तव्याचा विपर्यास करून चेरी पिकिंग करत तुम्हाला हवे तेव्हढे सांगत आहात.

धर्मराजमुटके's picture

26 Jul 2022 - 9:07 am | धर्मराजमुटके

कॉमी साहेब, गामा पहिलवान करोनाची लस घेणे आवश्यक आहे हे कधीच मान्य करणार नाहित. त्यामुळे कितीही प्रतिवाद केला तरी त्याचा फायदा नाही. गामा पहिलवान आणि त्यांचा प्रतिवाद करणार्‍यांची चिकाटी पाहून मला खरोखरच नवल वाटते. माझ्यात एवढी चिकाटी नाही त्यामुळे समोरच्याचे पटत नसले तरी मी जास्त प्रतिवाद करत नाही. हे जालीय आणी प्रत्यक्ष जीवनात देखील असेच आहे.

मी टाईमपास करण्यासाठी वेळ असेल तरच मिपावर येतो. आणि हे प्रतिवाद गामांसाठी नाहीत. ते ब्रेनवॉश झालेले आहेत, आणि हे वॉशिंग त्यांनी स्वतःहून केले आहे असेच मला वाटत आले आहे. पण मिपा वाचून कोणी गामाजींच्या "Do your own research" च्या नावाखाली फालतू निर्बुद्ध, मनाजोगते वाट्टेल ते आकलन केलेले आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख वाचून लस न घेण्याचा निर्णय घेत असेल तर ते थांबवणे हे मिपा या संस्थळाचे तसेच मिपावरील सदस्यांचे कर्तव्य आहे असे वाटते.

गामा पैलवान's picture

24 Jul 2022 - 3:26 pm | गामा पैलवान

लोकहो,

अमेरिकेतील ह्युस्टनचं दलित ( methodist ) हॉस्पिटल खुनी आहे. त्यांना रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचे खून पाडण्यात अधिक रस आहे. संबंधित बातमी : https://fee.org/articles/massive-nurse-shortage-hits-houston-weeks-after...

सदर वार्तेनुसार रुग्णालयाने लस न घेतलेल्या सुमारे १५० जणांना कामावरून डच्चू दिला. आता त्यास मनुष्यबळाची कमतरता भासते आहे. या अभावापायी काही रुग्णांचा जीवही गेला आहे. एकंदरीत रुग्णालयाच्या व्यवस्थापनास रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचे खून पाडण्यात अधिक रस आहे.

आ.न.,
-गा.पै.

कॉमी,

तुमचे दोन प्रतिसाद वाचले :
https://www.misalpav.com/comment/1147985#comment-1147985

https://www.misalpav.com/comment/1147995#comment-1147995

माझी मतं सांगतो.

१.

त्यामुळे लोकांचा लसीबाबत चुकीचा समज झाला की लस गंभीर आजार, इस्पितळात भरती होण्याचा धोका (आणि त्याच तर्काने, मृत्यू) पासून संरक्षण देणार नाही- जे नक्की मिळते आहे."

लशीमुळे संरक्षण मिळते, हा केवळ दावा आहे.

२.

अजूनही लसी इन्फेक्शन विरुद्ध पूर्ण पणे कुचकामी नाहीयेत, मात्र त्या बाबत उपयोगिता अंदाजापेक्षा कमी आहे, कारण नवे नवे व्हरायंट येत आहेत.

तुम्ही ज्याला नवनवे व्हरायंट म्हणता ना, त्यांच्याशी लढायला शरीराची प्रतिकारशक्ती सक्षम असते. पण लशीमुळे तिची मोडतोड होते. आणि शरीरास विषाणूच्या नव्या आवृत्तीची लागण होते. हे प्रकार पूर्वीही झाले आहेत. यांस Original Antigenic Sin असं म्हणतात. खरंतर हा प्रकार डॉक्टर लोकांनी उलगडून सांगायला हवा. पण ते करणार कोण !

३.

लसीमुळे आजार व मृत्यूपासून संरक्षण नक्की मिळते. हा विदा जालावर अत्यंत सहजगत्या सापडतो,

तुमच्याकडे विदासंबंधी दुवा आहे का ? लशीमुळे रोग झाला नाही की इतर कारणामुळे, हे कसं कळणार ? शिवाय लस प्रायोगिक आहे ही बाब का लपवून ठेवलीये ?

कुठल्याही लशीमुळे कसलीही साथ आजवर आटोक्यात आलेली नाहीये. या सत्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो.

४.

बाईंचे पहिले आणि दुसरे मत दोन्ही उपलब्ध विदावर आधारित आहे.

या विदाचा दुवा मिळेल काय ?

५.

... ते ब्रेनवॉश झालेले आहेत, आणि हे वॉशिंग त्यांनी स्वतःहून केले आहे असेच मला वाटत आले आहे.

मी स्वत:हून ब्रेनवॉश्ड झालेलो आहे हे मान्य. आहेच मुळी मी स्वावलंबी. अहो लोकं कुठलीशी लस टोचवून घेतात आणि स्वत:ला करोनावॉश्ड समजतात. त्यापेक्षा माझा ब्रेनवॉश बराय. निदान जीव तरी जात नाही.

६.

.... फालतू निर्बुद्ध, मनाजोगते वाट्टेल ते आकलन केलेले आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख वाचून लस न घेण्याचा निर्णय घेत असेल तर ते थांबवणे ....

करोनाच्या लशीस मेकॉलेछाप क्लार्क लोकांनी मान्यता दिलेली आहे. भले त्यांच्या पदव्या व शिक्षणं काहीही असोत. ती तथाकथित लस टोचून कुणाचा जीव जाऊ नये या सद्हेतूने मी प्रेरित झालो आहे.

आता तुम्ही लावलेल्या एकेक विशेषणांचा परामर्ष घेतो.

फालतू : अत्यंत चुकीचं विशेषण. करोना हे थोतांड आहे. व त्याची लस फालतू आहे. त्यामुळे मला महाफालतू हे विशेषण लावायला पाहिजे. थोतांडाच्या पातळीवर उतरून मी महाफालतू पद्धतीने माझा मुदा पुढे रेटतोय. का ते पुढे वाचा ....

निर्बुद्ध : .... कारण की मी निर्बुद्ध आहे. होय तर. मला मेडिकल अक्कल नाही. म्हणून मी माझ्यापेक्षा अधिक मेडिकल अक्कल असेलल्या तत्ज्ञांचं ऐकतो. त्यांचा दृष्टीकोन सरकारी नसून पर्यायी आहे.

मनाजोगते : हे बरोबर बोललात. फक्त 'स्वत:च्या मनाजोगते' असं हवं होतं. कारण की मी मेकॉलेछाप कारकुंड्यांच्या ओंजळीने पाणी पीत नाही.

वाट्टेल ते आकलन केलेले : करेक्ट. मी माझ्या मनाला वाट्टेल ते आणि तेव्हढंच आकलन करतो. मी निर्बुद्ध असल्याने माझ्यापेक्षा अधिक माहिती असलेल्या तत्ज्ञांचं मत बघतो. मग ते सरकारी प्रचाराच्या बाजूने असो वा विरोधात. मला त्याची पर्वा नाही. का ते पुढे वाचा ....

आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख : .... कारण की माझा कॉन्टेक्स्ट इतरांसारखा मर्यादित नाही. माझा कॉन्टेक्स्ट 'जिवंत राहणे' हा आहे. करोनाचा विषाणू, त्याची चाचणी, त्याची लस, इत्यादि कॉन्टेक्स्ट उथळ व मर्यादित असून ते स्वतंत्रपणे अभ्यासल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. म्हणून 'जिवंत राहण्या'चा माझा विशालतम कॉन्टेक्स्ट माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.

उथळ कॉन्टेक्स्ट मध्ये नसलेले मुद्दे विशाल कॉन्टेक्स्ट मध्ये चर्चेस येतात. म्हणून तुम्हांस ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटतात.

असो.

लशीची पर्यायी बाजू का चर्चेस येत नाही, असा माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. पर्यायी दृष्टिकोनाचा इतका तिरस्कार का होतोय? इतका तिरस्कार तर मी लशीचाही करीत नाही. कारण की मी फ्ल्यूची लस घेतो प्रत्येक हिवाळ्यात.

आ.न.,
-गा.पै.

तुमच्याकडे विदासंबंधी दुवा आहे का ? लशीमुळे रोग झाला नाही की इतर कारणामुळे, हे कसं कळणार ?

लस आणि मृत्यू- अमेरिका.
https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#rates-by-vaccine-status

हॉस्पिटलायझेशन आणि लस- अमेरिका.
https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#covidnet-hospitalizations-vacc...

बाकी भारताचा मृत्यूसंदर्भात डेटा ऑलरेडी इथे दिलेला. त्यावर तुम्ही कोण निधी आयोगाचे पॉल आहेत त्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढून काहीबाही टाकले आणि परत त्या आकड्यांकडे फिरकला नाहीत.

ह्या सगळ्या गोष्टी एका गुगल सर्च वरून मिळतात. माझ्या कडे इतका सहजसाध्य विदा मागणे ते सुद्धा स्वावलंबी माणसाने हे कसे ?

आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख : .... कारण की माझा कॉन्टेक्स्ट इतरांसारखा मर्यादित नाही. माझा कॉन्टेक्स्ट 'जिवंत राहणे' हा आहे. करोनाचा विषाणू, त्याची चाचणी, त्याची लस, इत्यादि कॉन्टेक्स्ट उथळ व मर्यादित असून ते स्वतंत्रपणे अभ्यासल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. म्हणून 'जिवंत राहण्या'चा माझा विशालतम कॉन्टेक्स्ट माझ्यासाठी सर्वोत्तम आहे

माझे मत वेगळे झाले आहे. . तुम्ही काहीतरी वाचता, आणि लेखात जो तज्ञ व्यक्ती बोलत असतो त्याचे म्हणणे नक्की काय आहे ह्याची तुम्हाला फारसे देणे घेणे नसते इतकेच. तुम्हाला हवा तो संदेश तुम्ही त्यातून घेता, भले तो संदेश तज्ञाला आजिबात पटत का नसो.

एज स्टॅण्डर्ड केलेला मृत्यू आलेख. निळी रेषा लस घेतल्याचे मृत्यू दर्शवत आणि काळी रेषा लस न घेतलेल्यांची.

कॉमी's picture

27 Jul 2022 - 7:33 am | कॉमी

एज स्टॅण्डर्ड नाहीये.

सुक्या's picture

27 Jul 2022 - 9:43 pm | सुक्या

<गामा मोड ऑन>
सीडीसी चा डाटा आजिबात स्टँडर्ड नाहीये / विश्वसनीय नाहिये . कुठल्यातरी कारकुंड्यांनी बनवलेला डेटा आहे.
लस न घेतलेल्या लोकांचे जे मृत्यू झालेले दाखवले आहेत ते नक्की कोरोना ने झाले आहेत का? की कुठल्या सहव्याधी ने झाले आहेत? <कुठ्लीतरी लिंक> या दुव्यावर आकडेवारी उलट दाखवत आहेत. मग नक्की कोणती आकडेवारी खरी?

जानेवारी मधे लस घेतलेल्या लोकांचे मृत्यू हेच दर्शवतात की लस घेतल्याने कुठलेही संरक्षण मिळत नाही. सबब कोरोना हे थोतांड आहे.
<गामा मोड ऑफ>

धर्मराजमुटके's picture

27 Jul 2022 - 10:18 pm | धर्मराजमुटके

धाग्याच्या निमित्ताने 'हो लाल मेरी' हे गाणे आज ऐकून घेतले.

गामा पैलवान's picture

28 Jul 2022 - 2:59 am | गामा पैलवान

कॉमी,

१.

https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#rates-by-vaccine-status

positive specimen असलेले म्हणजे करोनाने पीडित नव्हे. तसंच मृताच्या अंगात करोना सापडणे म्हणजे करोनामुळे मृत्यू झाला असेही नव्हे. हा करोना संगे मृत्यू आहे. death from corona virus हा शुद्ध दिशाभूलजनक अपप्रचार आहे. कारण की खाली छोट्या अक्षरांत associated deaths असं लिहिलंय. म्हणजे हे मृत्यू करोनासंगे झालेले आहेत. साहजिकंच 'लसविहिनांची करोनामुळे मरण्याची शक्यता ९ पट आहे' वगैरे विधानं निव्वळ धूळफेक आहेत.

मी जो संयुक्त साम्राज्याचा ( UK चा ) विदा दिला त्यत कुठेही करोनामुळे मृत्यू असा स्तंभ नाही. सत्याशी अपलाप करणारा विदा नसेल तरंच मी तो ग्राह्य धरेन.

२.

https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#covidnet-hospitalizations-vacc...

हे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे आकडे आहेत. त्यांतही अपूर्ण लशीकृत ( partially vaccinated ) लोकांची संख्या जमेस धरलेली नाहीये. ती धरली की मगंच खरं चित्रं कळून येईल.

३.

निधी आयोगाचे पॉल आहेत त्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढून काहीबाही टाकले आणि परत त्या आकड्यांकडे फिरकला नाहीत.

मी त्या आकड्यांकडे फिरकलो नाही आणि फिरकणारही नाही. कारण की त्यांनी कसलीही आकडेवारी सादर केली नाही. केवळ ४,८९,००० करोनामृत्यू झालेत इतकंच बोललेत. यावर काय कप्पाळ चर्चा करणार? ( हा आकडाही फुगवलेला असू शकतो. पण ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे अतिरिक्त विदा नाही. )

बाकी, माझा रोख श्री. पॉल यांच्या या विधानाकडे आहे :

VK Paul on Tuesday said that the increase in death registrations in India in 2020 compared to 2019 is not only due to death from Corona.

४.

माझ्या कडे इतका सहजसाध्य विदा मागणे ते सुद्धा स्वावलंबी माणसाने हे कसे ?

समान विदावर चर्चा करण्यासाठी.

५.

तुम्ही काहीतरी वाचता, आणि लेखात जो तज्ञ व्यक्ती बोलत असतो त्याचे म्हणणे नक्की काय आहे ह्याची तुम्हाला फारसे देणे घेणे नसते इतकेच. तुम्हाला हवा तो संदेश तुम्ही त्यातून घेता, भले तो संदेश तज्ञाला आजिबात पटत का नसो.

अगदी बरोबर. या असल्या पोपटपंची तत्ज्ञांना मी फारशी किंमत देत नाही. ( म्हणूनंच मी जिवंत आहे. ) पण काये की हे तथाकथित तत्ज्ञ बर्क्सबाईंसारखं कधीकधी चुकून खरं बोलून जातात. अशा वेळेस त्यांच्यावर झडप घालून थोतांड उघडं पाडायला मजा येते.

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

28 Jul 2022 - 8:28 am | कॉमी

म्हणजे हे तद्न्य इतर वेळेस खोटं बोलत असतात पण पब्लिक मध्ये चुकून त्यांच्या तोंडातून बावळटपणे खरं बोलतात असा बालिश कन्स्पायरसी समज आहे तुमचा.

सत्याशी अपलाप करणारा विदा नसेल तरंच मी तो ग्राह्य धरेन.

होय, तुमच्या मताविरोधात जाणारा विदा हा सत्याशी अपलाप करतो.

गामा पैलवान's picture

28 Jul 2022 - 9:07 pm | गामा पैलवान

कॉमी,

१.

म्हणजे हे तद्न्य इतर वेळेस खोटं बोलत असतात पण पब्लिक मध्ये चुकून त्यांच्या तोंडातून बावळटपणे खरं बोलतात असा बालिश कन्स्पायरसी समज आहे तुमचा.

यांस फ्रॉईडियन स्लिप म्हणतात. ही सिगमंड फ्रॉईड याची थियरी आहे. ती कॉन्स्पिरसी थियरी असू शकते. मला माहित नाही.

२.

तुमच्या मताविरोधात जाणारा विदा हा सत्याशी अपलाप करतो.

होय तर. शंकाच नाही मुळी. विदा पुरेसा व सुसंगत ( sufficient and consistent ) असावा इतकंच माझं मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

विदा पुरेसा आणि सुसंगतच आहे. तुम्ही तर एक काडीचाही विदा तुमच्या मुद्द्यांच्या समर्थनात आणू शकला नाहीये.

गामा पैलवान's picture

29 Jul 2022 - 7:28 pm | गामा पैलवान

कॉमी,

अपूर्ण लशीकृत ( partially vaccinated ) लोकांची संख्या जमेस धरली की मग आपण या विदावर चर्चा करूया.

बाकी, माझ्या मुद्द्याच्या समर्थनार्थ इथे विदा प्रस्तुत केला आहे : https://www.misalpav.com/comment/1147005#comment-1147005

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

29 Jul 2022 - 10:32 pm | कॉमी

अपूर्ण लशीकृत ( partially vaccinated ) लोकांची संख्या जमेस धरली की मग आपण या विदावर चर्चा करूया.

बाकी, माझ्या मुद्द्याच्या समर्थनार्थ इथे विदा प्रस्तुत केला आहे : https://www.misalpav.com/comment/1147005#comment-1147005

हाहाहा म्हणजे असे रॉ आकडे बघून काय होणारे ? 80% लोकांच्या पूल मधून जास्त मृत्यू होणार हे कोणी सुद्धा सांगेल. त्यासाठीच आपण मॉर्टलिटी रेट वैगेरे बघत असतो. उद्या तुम्ही म्हणाल (उदाहरणार्थ) जगात उजवे लोक जास्त मरतात आणि डावरे खूप कमी मरतात, उजवे रहा आणि व्हा परलोकी मार्गस्थ.

इथे बघा इंग्लंडचा मोर्तलिटी रेट- लस घेतलेले आणि न घेतलेले.
https://ourworldindata.org/grapher/england-covid-19-mortality-rate-by-va...