करोना : स्वलालधन्य जाहलो मी

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in काथ्याकूट
5 May 2022 - 8:22 pm
गाभा: 

महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत.

- मिपा व्यवस्थापन

लोकहो,

करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no...

सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे :

१.

रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.

हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ).

२.

आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :

ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ).

३.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.

हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 )

असो.

तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे.

आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया.

१.

करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817

नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/

श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर.

२.

टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945

हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं.

३.

करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745

रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन.

४.

माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413

आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे.

असो.

हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया.

धन्यवाद !

आपला नम्र,
-गामा पैलवान

प्रतिक्रिया

गामांची कोरोना बाबत वादशैली All rhetoric, no substance अशी आहे.

आग्या१९९०'s picture

11 Aug 2022 - 10:04 am | आग्या१९९०

संपादक मंडळ, लक्ष द्यावे.
आरोग्याच्या बाबतीत असे उलटसुलट दाव्यांमुळे नुकसान होऊ शकते.
कोविड हा विषाणूवर संशय, RT PCR चाचणीवर संशय. कोविडमुळे मृत्यू होत नाही असा दावा. वैद्यकीय क्षेत्रातील मिपाकरांनी हे सर्व दावे खोडूनही रोज तेच तेच दळण चालूच आहे. खरंच काहीतरी नियम करा अशा आरोग्य धाग्यांसाठी.

गामा पैलवान's picture

11 Aug 2022 - 5:33 pm | गामा पैलवान

कॉमी,

१.

आरोग्याच्या बाबतीत असे उलटसुलट दाव्यांमुळे नुकसान होऊ शकते.

मिसळपाव हे संकेतस्थळ म्हणजे वैद्यकीय सुविधा नव्हे. मेकॉलेछाप शिक्षणाने मेंदू बथ्थड झाला असल्यास नुकसान होऊ शकते. मिसळपाववरील चर्चेने नाही.

२.

कोविड हा विषाणूवर संशय, RT PCR चाचणीवर संशय. कोविडमुळे मृत्यू होत नाही असा दावा. वैद्यकीय क्षेत्रातील मिपाकरांनी हे सर्व दावे खोडूनही रोज तेच तेच दळण चालूच आहे.

तुमचे हे विधान म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील मतभिन्नता नाकारणे आहे. तुमची वागणूक सकलनियंता ( totalitarian ) पद्धतीची आहे.

सार्स-कोव्ह-२ नामे विषाणू अस्तित्वात नसल्याचे छातीठोकपणे सांगणारे अनेक तत्ज्ञ जगभरात आहेत. त्यापैकी एकीचं चलचित्रं पुढे दिलं आहे.

३.

खरंच काहीतरी नियम करा अशा आरोग्य धाग्यांसाठी.

आरोग्य धाग्यांपुरता नियम केला तर तो पुढे वाढवून त्यातनं मेकॉलेछाप स्कोअरची प्रणाली निर्माण केलेली बरी पडावी. ती सर्वसमावेशक म्हणून अधिक उपयुक्त असेल. कुणापासून किती नुकसान संभवतं याचा अंदाज येईल.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

11 Aug 2022 - 5:33 pm | गामा पैलवान

लोकहो,

पूर्णिमा वाघ नामे अमेरिकेतल्या विषाणूतत्ज्ञेने सार्स-कोव्ह-२ नामे कोणताही विषाणू नसल्याचं उघडपणे सांगितलं आहे. संबंधित इंग्रजी चलचित्र ( पावणेसहा मिनिटे) : https://www.bitchute.com/video/aRUYydaFRlYQ/
चलचित्रं चालंत नसल्यास कृपया व्यनि करणे. माझ्याकडील स्थानिक प्रतीचा दुवा पाठवेन.

चलचित्राचा उडता सारांश : बाईंनी CDC कडून रोग्यांच्या रक्ताचे ( की इतर स्रावाचे ) नमुने मागवले. सदर नमुन्याचं पृथक्करण केल्यावर विषाणू सापडला नाही. केवळ पेशीय डबर ( debris ) सापडलं. नंतर हे नमुने काही प्राण्यांना टोचले. ते प्राणीही निरोगी व खुटखुटीत राहिले. बाईंनी CDC शी संपर्क साधून निरीक्षणांची माहिती दिली. त्यावर CDC ने विषाणू सापडल्याचं खोटच दडपून सांगायची सक्ती केली. ती प्रयोगशाळेने नाकारली. तेव्हा FBI ने बाईंच्या प्रयोगशाळेवर धाड घातली. धाडीत बराच ऐवज नेला. पण बाईंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरावे इतरत्र हलवले होते. दरम्यान आपलं संशोधन तपासून पाहण्यासाठी बाईंच्या प्रयोगशाळेने सुमारे शंभरेक विद्यापीठांशी संपर्क साधला. त्यापैकी केवळ ६ विद्यापीठांनी त्यांचं संशोधनकृती परत आचरून निष्कर्ष तपासून पहायची तयारी दर्शवली.

बाईंची इंग्रजीतली पूर्ण मुलाखत ( ऐंशी मिनिटे ) : https://www.bitchute.com/video/MRT2yqyMeiVR/ ( मी आजून बघितलेली नाही. सवडीने बघेन. )
चलचित्रं चालंत नसल्यास कृपया व्यनि करणे. माझ्याकडील स्थानिक प्रतीचा दुवा पाठवेन.

असो. करोना विषाणू अस्तित्वात नाही.

आ.न.,
-गा.पै.

मंकीपॉक्स नावाचे काहीही अस्तित्वात नाही, हे फक्त लसीव्हे दुष्परिणाम आहेत.

असे ह्या बाई बोलत आहेत.
पुन्हा एकदा संपादक मंडळास साद घालतो.

कोणत्याही रँडम व्यक्तीचे व्हिडीओ देणे चालू झाले आहे आता.

प्रचेतस's picture

11 Aug 2022 - 8:27 pm | प्रचेतस

धाग्याच्या सुरुवातीस मिपा व्यवस्थापनाने लाल अक्षरात दिलेली सूचना दिसतेय :)

कॉमी's picture

11 Aug 2022 - 9:11 pm | कॉमी
गामा पैलवान's picture

14 Aug 2022 - 7:15 pm | गामा पैलवान

कॉमी,

अमेरिकेच्या रोगप्रतिबंध व रोगनिवारण केंद्राने ( CDC ने ) लसवंत व लसविहीन दोघांनाही एकाच तागडीत तोललं आहे. बातमी : https://www.thetimes.co.uk/article/novak-djokovic-given-us-open-hope-as-...

वरील बातमीनुसार CDC च्या मते

“unvaccinated people now have the same guidance as vaccinated people”

मग लस घ्यायचीच कशाला?

आ.न.,
-गा.पै.

कॉमी's picture

14 Aug 2022 - 8:20 pm | कॉमी

मृत्यू, गंभीर आजार आणि इस्पितळात भरती होण्याचा धोका टाळण्यासाठी.

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 7:19 pm | सुबोध खरे

@ कॉमी

वाद घालण्याचा आपला संयम सोशिकपणा आणि चिकाटी याबद्दल आल्याला साष्टांग नमस्कार.

पण मी सुरवातीलाच लिहिलं आहे कि

"आकाशातील ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही"

अर्थात मला आपल्याइतका संयम सोशिकपणा अजिबात नाहीच

गामा पैलवान's picture

12 Aug 2022 - 2:35 am | गामा पैलवान

कॉमी,

१.

...RT PCR चाचणीवर संशय. ...

खास तुमच्या माहितीसारही म्हणून सांगतो. अमेरिकेतील सरकारी संस्था CDC ने ३१ डिसेंबर २०२१ पासून RT-PCR चाचणी आपत्कालीन वापरार्थ ( Emergency use ) बंद करायला सांगितली आहे. सदर वार्ता ( इंग्रजी लेख ) : https://www.cdc.gov/csels/dls/locs/2021/07-21-2021-lab-alert-Changes_CDC...

२.

कोणत्याही रँडम व्यक्तीचे व्हिडीओ देणे चालू झाले आहे आता.

पूर्णिमा वाघ या रँडम व्यक्ती आहेत का ते वाचकांनी ठरवावं. त्यांची कारकीर्द अशी आहे :

https://i.imgur.com/E130JtC.jpeg

माझ्या मते त्या रँडम व्यक्ती नसून विषाणूतत्ज्ञा ( virologist ) व शरीररक्षायंत्रणातत्ज्ञा ( immunologist ) आहेत.

आ.न.,
-गा.पै.

बीएस्सी फायनान्स आणि एमबीए फायनान्स ! बाप्रे !

त्यांनी क्षेत्र बदलले दिसत आहे. पुढील दोन विद्या स्नातक पदव्याही (PhD) पहा.
बाकी चालु द्या.

खरंय. वाघ बाईंच्या पात्रतेवर प्रश्न करणे हे चुकीचे ठरेल. मी फार गंभीरपणे तो प्रतिसाद लिहिला नव्हता.

तरीही, बाई वाट्टेल ते बोलत आहेत. "मंकिपॉक्स हा रोग नसून कोव्हिड लसींचा दुष्परिणाम आहे" असे म्हणत आहेत. हे अनेक पातळ्यांवर मूर्खपणाचे विधान आहे.
१. मंकीपॉक्स हा नवा रोग नाही. जुनाच आहे. मंकीपॉक्स जर खरोखर लसीचा दुष्परिणाम असता तर आत्तापर्यंत करोडो लोकांना झाला असता.
२. सध्या तरी मंकीपॉक्स बराचसा समलैंगिक पुरुषांमध्येच पसरताना दिसत आहे, आणि संख्येने कमी लोकांना झाला आहे (लसी घेतलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत.)

तसेच, मी सायंटिफिक कन्सेन्शस मानतो. मी स्वतः व्हायरॉलॉजिस्ट किंवा इम्युनॉलॉजिस्ट नसल्याने प्रत्येक एक आणि एक मतभेद समजून घेउ शकत नाही. आणि, मेन्स्ट्रीम मते मानतो.

२. सध्या तरी मंकीपॉक्स बराचसा समलैंगिक पुरुषांमध्येच पसरताना दिसत आहे

अहो, समलैंगिकताही लशीमुळे येत असू शकेल. व्हेअर आर यू? अं ?!!

शोधा म्हणजे सापडेल (एखादा रिसर्च पेपर - कुठे ना कुठे)

कॉमी's picture

12 Aug 2022 - 9:48 am | कॉमी

गामाजींच्या लिगमधला सुप्रसिद्ध अॅलेक्स जोन्स म्हणून माणूस आहे, त्याचे कालातील वक्तव्य आठवले-

THEY ARE TURNING THE FREAKINN FROGS GAY !!!!

Alex Jones Gay GIFfrom Alex Jones GIFs

"The majority of frogs in most areas of the United States are now gay," Jones said in 2017. The claim was without evidence.

John Jonah Jameson Lol GIFfrom John Jonah Jameson GIFs

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 9:01 am | रंगीला रतन

कॉमी तुसी ग्रेट हो :=)
what is the secret of your energy?
गामा पैलवान आणी तुमच्यावर एकविरा आईची कृपा कायम राहूदे

लोकहो,

अमेरिकेतील रोगनियंत्रण व रोगनिवारण केंद्राने ( CDC ने ) करोनासंबंधी लसवंत व लसविहीन यांना एकाच प्रकारचं मार्गदर्शन लागू करून करोनाच्या थोतांडावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासंबंधी एक लेख ( इंग्रजी दुवा ) : https://www.zerohedge.com/markets/cdc-says-people-exposed-covid-no-longe...

सदर लेखाच्या शेवटास उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयव्हरमेक्टिन व इतर घटक असलेली आरोग्यथैली जनतेत वितरीत करून करोनाच्या साथीस आवर घातला. कुठलेसे व्हेन्टिलेटर आणि कसलीशी लस टोचण्यापेक्षा हा उपाय अधिक प्रभावशाली ठरला.

गंगेत फेकून दिलेली प्रेते आणि ठिकठिकाणी जळणाऱ्या चिता वगैरे औषध कंपन्यांच्या दलालांनी पसरवलेल्या खोट्या बातम्या होत्या. आयव्हरमेक्टिन या परिणामकारी औषधावर कोणीच काहीही बोलायला तयार नव्हतं. मज्जा आहे, नाही?

आ.न.,
-गा.पै.

विवेकपटाईत's picture

17 Aug 2022 - 12:35 pm | विवेकपटाईत

गंगेत प्रेत वाहण्याचा आणि करोंना यांत कुठलाही संबंध नाही. गंगेत जलसमाधी देणे काठावरच्या लोकांची परंपरा आहे. दहा बारा वर्ष आधी एनडीटीव्ही वर एक कार्यक्र्म ही यावर आला होता. जो पर्यन्त लोक गंगेत जलसमाधी देणे बंद करणार नाही गंगा स्वच्छ कशी होईल. दरवर्षी किमान 40 ते 50 हजार प्रेतांना जलसमाधी दिली जाते. बाकी स्मशानातले जळत्या चिता म्हणजे, म्हणजे आता आमच्या जवळचे स्मशान घाट अर्थात पालम गावाच्या स्मशानाचे रात्री चित्र घेतले तर किमान 10 ते 12 चिता जळताना दिसतील. (150 च्या जवळ चिता स्टँड तिथे आहेत). बाकी योगी आदित्यनाथ यांनी त्या काळात राज्यातील सर्वच होस्पिटलांची जातीने भेट घेऊन तिथली व्यवस्था ठीक केली. त्यामुळे उत्तर परदेशात हॉस्पिटल मध्ये मृत्यू दर कमी होती. बाकी उत्तर प्रदेश बिहार इथले लोक करोंना काळात रोज चहात आले, काळी मिरी, तुळशी इत्यादि घेत होतेच.

गामा पैलवान's picture

19 Aug 2022 - 5:41 pm | गामा पैलवान

लोकहो,

चारचार लशी ठोकवून घेऊनही बुरळ्यात करोना सापडलाच. संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.pfizer.com/news/announcements/statement-pfizer-chairman-and-...

आता, करोना सापडला म्हणजे रोग झाला असं धरायचं का ? की क्लिनिकल इन्फेक्शन नाहीये म्हणून रोग झाला नाही असं धरायचं ?

चारचार ढोस घेऊनही अंगात करोना सापडणार असेल तर लस घ्यायचीच कशाला? की लस हाच एक रोग आहे, त्यामुळे वेगळ्या रोगाची गरजच नाही?

आ.न.,
-गा.पै.

बेकार तरुण's picture

19 Aug 2022 - 7:15 pm | बेकार तरुण

आमीर खान, अक्षय कुमार तसेच रणबीर कपूर ने लशीचे ३ ही डोस घेतल्यानेच त्यांचे चित्रपट धडाधड आपटत आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे.....
(लवकरच याविषयी कायप्पा युनि ला लिहुन डॉक्टरेट मिळवेन म्हणतो).......
तरी आपली मते जाणुन घ्यायला आवडतील... (विरोधी मतांना ईग्नोरे करण्यात येईल हे वे सां न ल.....)

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 7:20 pm | सुबोध खरे

हायला

काय हसलोय मी

हा हा हा हा ~~

आग्या१९९०'s picture

19 Aug 2022 - 8:14 pm | आग्या१९९०

कोरोनाने मृत्यू होत नाही आणि कोरोनाची लस घेतलेल्यांचा भविष्यात मृत्यू झाला तर तो लसिमुळेच झाला अशी लवकरच WHO घोषित करणार आहे.

गामा पैलवान's picture

19 Aug 2022 - 9:33 pm | गामा पैलवान

अमेरिकेच्या CDC ने ल्स्वंत व लसविहीन दोघांनाही एकाच तागडीत तोलायचं निर्णय का घेतलाय मग? याचाच अर्थ लस बंडल आहे.
-गा.पै.

सुबोध खरे's picture

26 Aug 2022 - 6:52 pm | सुबोध खरे

कोरोनाने मृत्यू होत नाही

हायला

इतक्या लोकांनी आत्महत्याच केल्या म्हणायचं आणि इतर लोकांनी लस घेऊन आत्महत्येचा पर्याय निवडलाय म्हणा कि !

लैच हसलो बघा