मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही. भारतीयांचे सामान्य ज्ञान अधिक असूनही परकीयांच्या घरात नाक खुपसण्यात कमी पडतो
परक्या देशात एखादा भारतीय वंशाचा माणूस मुख्यस्थानावर गेला की अभिमानाने आपले उगीच मिरवून घ्यायचे बाकी परकीयांचे ठेवायचे झाकुन आपले दाखवायचे उघडून याचा भारतीयांना जाम अभिमानही वाटतो. असो.
ब्रिटेन उर्फ इंग्लंड म्हणून परिचीत युनायटेड किंगडमच्या सद्य प्रधानमंत्री ऋषी सुनकांनी सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्याची बातमी आहे.
खाली तुमच्यासाठी काही दुवे
खर म्हणजे खाली दिलेले दोन्ही नेते त्यांच्या पक्षाचे आहेत आणि पक्ष त्यांच्या मालकीचे नाहीत तरीपण ओळख भारतीय परंपरांना साजेशी केलेली बरी.:
* Politics of the United Kingdom
* ऋषी सुनक आणि त्यांचा कन्झर्वेटीव्ह पक्ष
* कैर स्टार्मर आणि त्यांचा लेबर पक्ष
जरासे वेगवेगळ्या बाजुने वाकुन बघण्यासाठी काही गुगल ट्रेंड शोध : १ , २ , ३ , ४ , ५ , ६ , ७ , ८ , ९ .
* अनुषंगिका पलिकडे अवांतर आणि शुद्ध लेखन टाळण्यासाठी अनेक आभार
प्रतिक्रिया
23 May 2024 - 5:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हे अमेरिकन राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की भाजपा लोकसभा निवडणुकीत किमान ३०५ जागा जिंकेल. ह्याला नाक खुपसणे म्हणणार का ?
https://www.youtube.com/watch?v=iA6FOD4i8_A&t=215s
भारत सरकारने तरी अजून तसे काही म्हंटलेले नाही!!
23 May 2024 - 7:27 pm | भागो
अब की बार ट्रंप सरकार. ह्याला काय खुपसणे म्हणायचे?
24 May 2024 - 9:34 pm | कंजूस
हितसंबंध गुंतलेले असतात.
त्यामुळे तिकडे काय चाललंय यावर लक्ष ठेवावं लागतं. केवळ खुर्चीत बसून टीका करणे, गप्पा मारणाऱ्यांसाठी हा विषय नसतो.
1 Jun 2024 - 1:04 pm | अहिरावण
कोण सुनक?
10 Jun 2024 - 2:07 am | नठ्यारा
लोकहो,
इथे इंग्लंडात ( खरंतर संयुक्त साम्राज्यात म्हणजे युकेत म्हणायला पाहिजे ) अचानक निवडणुका जाहीर झाल्या. त्यामागे युक्रेन विरुद्ध रशिया लढाईची पार्श्वभूमी आहे. कशी ते सांगतो.
रॉबर्ट फिको नामे स्लोव्हाक पंतप्रधानावर जीवघेणा हल्ला झाला. नाटोला हे युद्ध वाढवून युरोपभर भडकावीत न्यायचं आहे. पण सर्व युरोपीय नेते नाटोच्या बाजूने नाहीत. आणि जनता तर नाहीच नाही. मग एखादा दहशतवादी हल्ला घडवून जनतेस उल्लू बनवायचं किंवा राजकारण्यांना धमकावून इप्सित साध्य करवून घ्यायचं. नाटोस अमेरिकी सैन्यासाठी मुख्य युरोप मोकळा करायचा आहे. बातमी ( इंग्रजी लेख ) : https://www.dailymail.co.uk/news/article-13492243/NATO-plan-troops-line-...
तर अडचण अशीये की युरोपीय जनतेचा या बेतास आजीबात पाठिंबा नाहीये. म्हणून नाटोकडून ( म्हणजेच डीप स्टेट कडून ) नेत्यांना धमकावायचे प्रयत्न चाललेत. फिकोवरील गोळीबार हा याच हेतूने केलाय. याची चाहूल इंग्लंडातल्या अनेकांना लागलीये. युद्धापासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी आपण निवडणुकीस उभे राहणार नाही असं सुमारे १२० खासदारांनी जाहीर केलंय. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.independent.co.uk/news/uk/politics/mps-standing-down-general...
तर सुनाकबाबू हा युद्धाचा चेहरा आहे. यापूर्वी दोन्ही महायुद्दांच्या वेळेस अनेक नेतेमंडळींचे मुडदे पडलेले आहेत. मला माहीत असेलेला उच्चपदस्थ लॉर्ड किचनर. हा पहिल्या महायुद्धाच्या वेळेस इ.स. १९१६ साली फील्डमार्शल व युद्धसचिव होता. म.से. हांपश्यर ही नौका बुड(व)ली तेव्हा तिच्यासोबत यालाही जलसमाधी मिळाली. काही लोक जिवंतपणी स्कॉटलंडच्या ऑर्कनी बेटावर दाखल झाले. त्यांनाही ठार मारण्यात आलं अशी वदंता आहे. जर युद्धसचिव ( Secretary of State for War ) मारला जाऊ शकतो तर कुठलासा किरकोळ नेता किस झाड की पत्ती.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अनेक शांततावादी नेत्यांचे अकाली व/वा संशयास्पद मृत्यू झाले आहेत. हिटलरशी म्युनिक करार करणारा चेंबरलेन राजीनामापश्चात लगेच सहा महिन्यांत कर्करोगाने मेला ( १९४० ). जर्मनीशी समझोता करून युद्ध थांबवाचं धोरण असलेला क्लाईव्हडेन हा शांतीकंपू तर बऱ्याच प्रमाणावर नाहीसा झाला किंवा करण्यात आला. लॉर्ड एरॉल ( १९४० ) पासून सुरुवात झाली आणि दोनतीन वर्षांत एकेक जण मृत्यू पावले. त्यापैकी काही : लॉर्ड लोदियन ( १९४० ), लॉर्ड रॉदरमियर ( १९४० ), सर हॅरी ओक्स ( १९४३ ). जर ही बडी मंडळी विल्हेवाटीत निघू शकतात, तर कोण्या य:कश्चित खासदारास कोण विचारतो ! आणि हो, तो सगळ्यांत मोठ्ठा नाझी स्नेही राहिलाच. त्याचं नाव आठवा एडवर्ड. तो मात्र वाचला. कारण की त्याचे पिताश्री पाचवे जॉर्ज हे राजेसाहेब होते. भो पंचम म्हणतात तेच ते. तर आठव्या एडवर्डने म्हणे वॉलिस सिम्पसन या घटस्फोटीतेशी विवाह करण्याच्या मिषाने संयुक्त साम्राज्याची ( = युकेची ) राजगादी सोडली. कोण विश्वास ठेवणार असल्या भाकडकथेवर.
सांगायचा मुद्दा काये की युद्धाचे पडघम वाजू लागले नसले तरी वातावरणनिर्मिती जोरात चालू आहे. येत्या निवडणुका ही युद्धासंबंधी जनमत अजमावण्याची एक रीत म्हणून बघितली जात आहे.
-नाठाळ नठ्या
13 Jun 2024 - 8:50 am | माहितगार
शस्त्रांची बाजारपेठ युद्धजन्य परिस्थितीत रस ठेवते आणि राजकारण्यांवर ताबा मिळवते, हे शक्य, तरीही न टळणारे असते. पण इंग्लंडाची आर्थिक स्थिती तुर्तास बिकट असल्याचे सांगितले जाते मग ते युद्धासाठी पैसा कसा उभा करू इच्छितात?
13 Jun 2024 - 6:41 pm | नठ्यारा
माहितगार,
पैसे नाहीत वगैरे रड पब्लिकच्या तोंडावर फेकायला असते. खऱ्या सत्ताधारींना हा प्रश्न कधीच पडंत नसतो.
-नाठाळ नठ्या